नवी दिल्ली | कोल्हापूर ते वैभववाडी या बहुचर्चित रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून पाच महिन्यात या प्रकल्पाच्या पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन होणार आहे. २०१९ च्या जानेवारी महिन्यात हे उदघाटन होणार आहे. या संदर्भात सुरेश प्रभू यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
१०३ किलोमीटर लांबी असणाऱ्या लोहमार्गाची दहा स्थानके नव्याने वाढवण्यात आली आहेत. इंदापूर, गोरेगाव, सोपे-वामने, कळंबी, कडवाई, वेरावळी, खेरे पाटण, अछीमे, मिरज आणि इनांजे ही नवीन स्थानके आराखड्यात सामील झाले आहेत. या प्रकल्पाचे काम ५० – ५० टक्के केंद्र-राज्य भागीदारी वर होणार असून त्याला ४० अब्ज डॉलर निधी खर्च होणार आहे.
मध्य आणि कोकण रेल्वेचा होणार, कोल्हापुरात संगम, बहुचर्चीत रेल्वे प्रकल्पाला मिळाली मान्यता
धक्कादायक! गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार
तासगाव | आठ महिण्यांच्या गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील तासगाव येथे झाला आहे. सदर घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून तासगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, गर्भवती महिलेच्या पतीला मोटारीमधे डांबून ठेवून काही नराधमांनी आठ महिण्याच्या गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार केला. अजुनपर्यंत एकाही आरोपीचे नाव व पत्ता पोलीसांच्या हाती न लागल्याने या गुन्ह्याचा छडा लावने तासगाव पोलीसांसाठी आव्हान बनले आहे.
मराठा मोर्चा | चाकण मधे हिंसाचार करणार्या त्या आंदोलकांना अटक
चाकण | पुण्याजवळील मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या चाकन परिसरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लावून जाळपोळ करणार्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पुणे ग्रामीण पोलीसांनी दंगेखोरांना अटक केली असून त्यांना आज न्यायालया समोर हजर करण्याची संभावना आहे. सामाजिक शांतते साठी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.
३० जुलै रोजी मराठा आंदोलनाच्या मोर्चात भडकलेल्या हिंसाचारात एसटी महामंडळाच्या आणि पुणे शहर परिवहन विभागाच्या सहा बस जळून खाक झाल्या आहेत. तसेच अतुल भापकर हे पोलीस शिपाई हिंसाचाऱ्यांच्या हल्ल्यात कोम्यात गेले आहेत.
चाकण मध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात मी जातीने लक्ष घालत असून हिंसाचाराचा तपास प्रगती पथावर आहे. हिंसाचार घडवणाऱ्या २२ लोकांची ओळख पटली असून त्यांचा आंदोलनाच्या ठिकाणी हिंसाचार भडकवण्यात सहभाग असल्याचे व्हिडिओ क्लिप व्दारे स्पष्ट झाले आहे. यापुढे चाकण औद्योगिक पट्ट्यात आणि शहरात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.
आंबेनळी अपघातातील मृतांना लोकसभेत श्रध्दांजली
नवी दिल्ली | पोलादपूर जवळ आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी घडलेल्या बस अपघातातील मृतांना आज लोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. संसदीय शिष्टाचारा नुसार आज सकाळी अकरा वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. त्यानंतर लोकसभेच्या सर्व सदस्यांनी मृतकांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी दोन मिनिटे उभे राहून मौन पाळले.
दिनांक २८ जुलै रोजी दुपारी १२ च्या सुमारास पोलादपूर जवळ मिनी बसचा अपघात झाला. या अपघातात ३० लोक जागीच ठार झाले होते. फक्त एक व्यक्ती या अपघातातून बचावला होता. बस मधील सर्व लोक हे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. या घटनेवर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी ही ट्विटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले होते.
Maratha Kranti Morcha | गिरीश बापट यांच्या घरा समोर मराठा आंदोलकांची निदर्शने
पुणे | गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील घरा समोर आज सकाळी मराठा आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतं देत नाय घेतल्या शिवाय राहत नाय’ अशा आशयाच्या घोषणांनी बापट यांच्या निवासस्थानाजवळील परिसर दुमदुमून गेला होता.
संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींच्या घरा समोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करण्याचे ठरवले आहे. पुण्यामध्ये आज दिलीप कांबळे यांच्या घरासमोर ही आंदोलक ठिय्या देणार आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहर अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या घरासमोर ही आंदोलक ठिय्या देणार आहेत. मराठा आंदोलकांनी कालपासून लोकप्रतिनिधींच्या घरा समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काल लातूरमध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली होती.
मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले त्यावेळी सरकारला जाग का आली नाही ? – छत्रपती शाहू महाराज
कोल्हापूर | मुख्यमंत्र्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समाजातील प्रतिष्ठित लोकांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला कोल्हापूरातून इतिहासकार जयसिंग पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांना आमंत्रण होते. शाहू महाराजांनी बैठकीला जाण्या आगोदर दसरा चौकात ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना (Maratha Morcha) भेटण्याचे ठरवले. आंदोलकांना भेटल्यावर शाहू महाराजांनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. ‘मोठया प्रमाणावर लाखोंच्या संख्येने मराठ्यांनी मूक मोर्चे काढले त्याच वेळी सरकारला जाग का आली नाही..आत्ता आंदोलन भडकल्यावर हे बैठकीचे नाटक कशाला ?’ असे शाहू महाराज म्हणाले.
दरम्यान आज सह्याद्रि अतिथीगृहावर मुख्यमंत्री मराठा समाजातील प्रमुख व्यक्तींनसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकी साठी मराठा समाजातील कलाकार, लेखक, विचारवंत, संशोधक आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
सांगवीत आढळला बेवारस मृतदेह
पुणे | सांगवीमध्येऔंध कामगार वसाहती जवळ एक बेवारस मृतदेह आढळला आहे. मृतदेहावर धारधार शस्त्रांचे वार असून डोक्यात दगड घालून ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या खिशात आधार कार्ड सापडल्याने मृताची ओळख पटू शकली आहे. अजित नंदकुमार भुईया (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो झारखंडचा मूळ रहिवासी आहे.
खून मध्यरात्री झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. खून करून मृतदेह त्या ठिकाणी रात्रीच्या अंधारात आणून टाकला होता पहाटे लोक बाहेर पडल्यावर त्यांनी पोलिसांना फोन लावल्याने हा प्रकार उजेडात आला आहे. सांगवी पोलीस हत्येचा पुढील तपास करत आहेत.
नितीन गडकरींनी केली नव्या रेल्वे मार्गाची घोषणा
नवी दिल्ली | धडाडीचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आणखी एका नव्या निर्णयाची घोषणा केली आहे. मनमाड – इंदोर रेल्वे मार्गाची घोषणा गडकरी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली आहे. ३६२ किलोमीटर लांब लोहमार्गाच्या खर्चाची अंदाजित रक्कम ८,५७४ कोटी रुपये इतकी आहे. त्याचा महाराष्ट्रात येणारा भाग १८६ किलोमीटर इतका असून मध्यप्रदेशात १७६ किलोमीटर एवढा भाग येतो आहे.
बहु प्रतिक्षित असणारा हा रेल्वे मार्ग मंजूर झाल्याने देशाच्या या भागात आनंद व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील खान्देशाला मध्यप्रदेशाशी जोडण्यात हा लोहमार्ग दुवा ठरणार आहे. सुभाष भामरे यांच्या लोकसभा मतदारसंघाला या लोह मार्गाचा सर्वाधिक फायदा होत असल्याने त्यांनी गडकरींचे आणि मोदींचे आभार मानले आहेत.
निलंगेकरांच्या घरासोमोर पोलीस आणि आंदोलकात बाचाबाची
लातूर | मराठा आंदोलकांनी दिनांक १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट लोकप्रतिनिधींच्या घरा बाहेर ठिय्या देण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पा नुसार मराठा आंदोलकांनी वसंतराव नाईक चौकातून मोर्चा काढून आर एस कॉलिनीतील संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला आणि विशिष्ठ अंतरावर लावलेले बॅरिगेस्ट कार्यकर्त्यांनी तोडून लावले. तेव्हा पोलिस आणि आंदोलकांच्यात बाचाबाची झाली. आंदोलक हिंसक रूपात असल्याने पोलिसांनी माघार घेतली आणि निलंगेकरांच्या घरा समोर आंदोलकांनी ठिय्या दिला.
मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवण्याची मागणी केली. तर संभाजी पाटील निलंगेकर यांना मराठ्यांबद्दल कणव असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली
माजी उप – सरपंचाची दगडाने ठेचून हत्या
सासवड | भिवरी गावचे माजी उपसरपंच संतोष साधू दळवी (वय ३६) यांची पूर्व वैमनस्यातून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात साधू अनंता दळवी यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे.
हाती आलेल्या माहीतीनुसार संतोष दळवी यांच्यावर गावठी कट्ट्याच्या साहाय्याने गोळी झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने आरोपींनी दळवी यांना दगडाने ठेचून मारले. सदरची घटना मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली आहे.
दत्तात्रय कटके, भारत कटके, दादासाहेब कटके, हेमंत गायकवाड, दीपक भांडवलकर, अक्षय गायकवाड, आदेश पवार, बाळू गायकवाड, मोहन गायकवाड यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदर सर्व आरोपी भिवरी गावचे रहिवाशी आहेत. पोलीसांनी अद्याप कोणालाच अटक केली नसुन घटनेचा तपास सासवड पोलीस करत आहेत.










