दिल्ली : ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्ड च्या वतीने देशभर शरिया न्यायालये (दारुल कजा) उभारण्याचा घाट घातला आहे. यासाठी मुस्लिम लॉ बोर्डाची राष्ट्रीय बैठक नुकतीच पार पडली आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात अशी न्यायालये उभारण्यात येणार आहेत. मुस्लीम समाजातील कौटुंबिक कलहाचे मसले या कोर्टात सोडवले जाणार आहेत.
मुस्लिम बोर्डच्या या निर्णयाला भाजपा आणि सपाचा विरोध आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला असून मुस्लिम स्त्रियांना कमी लेखण्याचे सर्व प्रयत्न मुस्लिम बोर्ड करत असल्याचे त्यांनी म्हणले आहे. समाजवादी पक्षाने आपली भूमिका मांडताना असे म्हणले आहे की न्याय पालिका स्वतःचे स्वतंत्र दायित्व घेऊन लोकशाहीत उभी आहे. त्या निकोप न्याय व्यवस्थेला काळिंबा लावण्यासाठी धर्मावर आधारित न्यायालये या देशात येऊ नये अशी आमची भूमिका आहे.
मुस्लिम बोर्डचा हा निर्णय अस्तित्वात येणे तसे सोपे काम नाही. परंतु हा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम ध्रुवीकरणाचे राजकारण तापवण्यास कारणीभूत ठरु शकतो असे बोलले जात आहे.
मुस्लिमांना वेगळी न्यायालये, ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाची मागणी
राहुल गांधीमुळे निर्भयाचा भाऊ झाला वैमानिक
दिल्ली : निर्भयावर १६ डिसेंबर २०१२ मध्ये क्रूरातीक्रूर पध्द्तीने बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. बलात्कार्यांनी तिला अर्धमेले करून रस्त्यावर फेकले असता उपचारादरम्यान तिचा २९ डिसेंबर २०१२ रोज मृत्यू झाला. या प्रकारानंतर निर्भयाचे कुटूंब अक्षरशः कोलमडून गेले होते. तेव्हा तिच्या कुटूंबातील सदस्यांना आधार देण्याचे महत्वाचे काम कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते.
२०१३ साली सी.बी.इ.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर राहुल गांधी यांनी निर्भयाच्या भावाला रायबरेलीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड़ान अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन दिला. त्याच्या शिक्षणाचा आर्थिक भार राहुल गांधी यांनी उचलला होता. तसेच त्याला मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी त्याला सतत संवाद साधत राहिले. निर्भयाच्या भावाचे आता वैमानिकीची शिक्षण पूर्ण झाले असून तो लवकरच विमानाने उडान भरणार असल्याचे समजत आहे.
ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांचे पुण्यातून पंढरीकडे प्रस्थान
पुणे : ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात पुण्याच्या दोन दिवसांच्या मुक्कामा नंतर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी आज पंढरीकडे प्रस्थान केले. सकाळी ६ वाजता दोन्ही पालख्यांची आरती झाली आणि पालख्या प्रस्थानासाठी सिद्ध झाल्या. संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामास जाणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसर मार्गे दिवे घाटातून सासवड मुक्कामी जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील आजचा टप्पा रोमहर्षक असून पालखीला दिवे घाटाचे दिव्य पार करून पुढे जायचे आहे.
निर्भया बलात्कार आणि हत्याकांडावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी
दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी पूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा दिली आहे. परंतु मुकेश (२९), पवन गुप्ता (२२)आणि विनय शर्मा यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
१६ डिसेंबर २०१२ रोजी पॅरामिल्ट्रीची विद्यार्थिनी निर्भया हिच्यावर चालत्या गाडीत बलात्कार करून अत्यंत हिंस्त्र पणे तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. तिच्या सोबत असलेल्या मित्राला ही बेदम मारहाण करून त्यालाही जखमी करण्यात आले होते. जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला त्यांना टाकून देण्यात आले होते. त्यानंतर देश भर या दोषींच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले होते. पीडितेस न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीची तरुणाई रस्त्यावर उतरली होती.
या खटल्यातील आरोपी राम सिंह ने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली होती. अन्य एक आरोपी सज्ञान नसल्याने अल्पवयीन असल्याने त्यास बालसुधार गृहात पाठवले होते. तर बाकीच्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ति आर भानुमति आणि न्यायमूर्ति अशोक भूषण यांच्या न्यायपीठा व्दारे आज निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन भारत दौर्यावर, आजचा दिनक्रम असा
नोएडा : दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन सध्या भारत दौर्यावर आहेत. मून-जे-इन यांचा भारत दौरा काल रविवार पासून सुरू झाला असून त्यांनी काल अक्षरधाम मंदिराला भेट दिली आहे. राष्ट्रपती मून-जे-इन आज सकाळी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्यासोबत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर नोएडाला जाऊन सॅमसंग युनिटचे उद्घाटन करणार आहेत. सायंकाळी ते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेणार आहेत. तसेच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशीही त्यांची भेट पूर्व नियोजित आहे.
मोबाईलची जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात, पंतप्रधान करणार आज उद्घाटन
नोएडा : भारतात जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी बनणार आहे. भारतीयांच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे ही कंपनी बनत आहे. नोएडा मध्ये सॅमसंग ची मोबाईल कंपनी उभारण्याचा सरकारचा बेत आहे. या कंपनीचा विस्तार ३५ एकरमध्ये असणार आहे. २००५ मध्ये उभारण्यात आलेल्या मोबाईल कंपनीला सॅमसंग कंपनीने ४९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून सदर कंपनी सुधारित स्वरूपात उभी केली आहे. एका वर्षात कंपनी दुपटीने उत्पादन करण्यास तयार आहे. ७० हजार लोकांना रोजगार देणारी ही कंपनी येणाऱ्या काळात १ लाख ५० हजार लोकांना रोजगार मिळवून देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन या दोघांच्या उपस्थितीत आज नोएडा येथे प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
टी-20 वर भारताची मोहर, १-२ने मालिका जिंकली
दिल्ली : इंग्लन सोबत सुरू असलेली टी 20 सामना मालिका भारताने जिंकली आहे. आज मालिकेतील शेवटचा सामना होता. तिसरा सामना शेवटचा आणि निर्णायक ठरला आहे. दुसऱ्या सामन्यापर्यंत १ – १ ने लढत बरोबरीवर होती. इंग्लंड ने ठेवलेल्या १९९ धवांच्या लक्षात भारतीय संघाने १८ ओव्हर आणि चार चेंडूने भेदले. या सामन्यामध्ये भारताने तीन विकेट गमावल्या तसेच रोहित शर्माची ५६ चेंडूत शतकाची खेळी उत्कंठा वर्धक ठरली.
पनामा पेपर घोटाळ्यात मुख्यमंत्री पुत्राचा समावेश, छत्तीसगड कॉग्रेसचा दावा
रायपूर : पाकिस्तानच्या न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी देशाला धक्का देणारा निकाल सादर केल्याची घटना ताजी असताना काहीसा तसाच प्रकार भारतातील एका राज्यात होण्याचा सध्या संभव आहे. दोन दिवसांपूर्वी पनामा पेपर लीक घोटाळ्यात नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला अनुक्रमे दहा आणि सात वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या पुत्राचा पनामा पेपर घोटाळ्यात समावेश असल्याचा दावा छत्तीसगड काँग्रेसने केला आहे.
पनामा पेपर्स मध्ये इंटरनॅशनल कंसोर्शियम ऑफ इनवेस्टिगेटिव जर्नलिस्ट्स ने ज्या ‘अभिषेक सिंह’ चा उल्लेख केला आहे तो म्हणजे दुसरा कुणी नसून मुख्यमंत्री रमनसिंह यांचा पुत्र अभिषेक सिंह आहे असा आरोप छत्तीसगड काँग्रेसने केला आहे. आमच्याकडे यासंदर्भातले ठोस पुरावे असल्याचा दावा छत्तीसगड कॉग्रेस कमिटीने केला आहे.
एन.डी.तिवारी रुग्णालयामध्ये दाखल
दिल्ली : कॉग्रेसचे वरिष्ठ नेते एन.डी. तिवारी यांना प्रकृतीत बिघाड झाल्याने दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिवारी यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे सुत्रांकडून कळत आहे. मागील वर्षी तिवारी यांना पक्षाघाताचा झटला आला होता. परंतु त्यातून ते वाचले होते.
एन.डी.तिवारी कॉग्रेसचे वरिष्ठ नेते असून त्यांनी चार वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच एकदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. एन डी तिवारी यांनी विदेश मंत्री म्हणून ही काम पाहिले आहे.
बाहेरील संबंधातून जन्मास आलेला त्यांचा मुलगा आणि एन डी तिवारी यांच्यातील संपती चा खटला सर्वोच्च न्यायालयात विशेष गाजला होता. डी एन ए ची वैद्यकीय चाचणी करण्यास तिवारी यांनी विरोध दर्शवला परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशापुढे त्यांना नमते घ्यावे लागले होते. २०१४ साली खटल्याचा निकाल लागताच मोठ्या उदार अंतकरणाने त्या मुलाच्या आईशी त्यांनी लग्न केले. त्याच मुलाचे भाजपात राजकीय वसन करण्यासाठी तिवारी सक्रिय असल्याच्या बातम्या मधल्या काळात माध्यमात झळकल्या
आम्ही भाजपच्या सोबतच राहणार पण दुर्लक्षित करण्याची चूक भाजपने करू नये-नितीशकुमार
दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये आज जदयुची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या सोबत राहण्याचा ठराव संमत झाला आहे. आम्ही भाजपाच्या सोबत राहू परंतु भाजपने आम्हाला दुर्लक्षित केल्यास भाजपला त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल असे नितीशकुमार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत जदयु ला दोनच जागा मिळाल्या होत्या. त्याउलट भाजपला २२ जागी विजय मिळाला होता. या निकालावर आधारित जागावाटपास आम्ही तयार नाही कारण आम्ही २०१४ साली एकटे लढून सुद्धा १७% मते घेतली होती. तसेच विधान सभा निवडणुकीमधील कामगिरी लक्षात घेऊनच जागा वाटप करण्यात यावे असेही नितीशकुमार यांनी यावेळी म्हणले अाहे.
राजकीय विचारवंतांच्या म्हणण्यानुसार नितीश कुमार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आटोपतील आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भेटतील आणि नंतरच आपला निर्णय जाहीर करतील असे बोलले जात होते. परंतु या संभावतेला नितीशकुमार यांनी छेद दिला असून त्यांनी अमित शहा यांना भेटण्या अगोदरच आपला निर्णय जाहीर केला आहे. २२ राज्यांच्या जदयु प्रतिनिधीं सोबत आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांसोबत केलेल्या सल्ला मसलतीच्या सहाय्याने भाजपा सोबत राहण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले आहे. नितीशकुमारांच्या या निर्णयामुळे तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व, कॉग्रेस सोबत आघाडी इत्यादी चर्चांना मुठमाती मिळाली आहे.










