Friday, December 5, 2025
Home Blog Page 6770

त्या १,૪०૪ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – उच्च न्यायालय

thumbnail 1525087612005
thumbnail 1525087612005

औरंगाबाद : बोगस पटसंख्या दाखवणार्या १,૪०૪ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. २०११ साली महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने राज्यभरातील शांळांची पटपडताळणी कली होती. या पाहणीमधे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवली असल्याचे समोर आले होते. बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचे प्रकार अनेक शाळांमधे सर्रास सुरु असल्याचे पाहणीत निदर्शनास आले आहे. बोगस पटसंख्येस कारणीभूत असणार्या मुख्याद्यापक, शिक्षक व संबंधित अधिकारी यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावे असे औरंगाबाद खंडपीठाने आदेशात म्हणले आहे. ब्रिजमोहन मिश्रा या बीड मधील शिक्षकाने संबंधीत विषयावर औरंगाबाद खंडपीठामधे जनहित याचिका दाखल केली होती. सन २०१૪ साली बोगस पटसंख्या दाखवणार्या शाळांवर कारवाई करण्याचे शपथपत्र घेवूनही अद्याप सरकारकडून कोणतेच पाऊल उचलले गेले नव्हते. परंतु आता औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानंतर ૪ जुन पर्यंत १,૪०૪ शाळांवर कारवाईचा बडगा उठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयामुळे बोगस पटसंख्या दाखवून सरकारी अनुदान लाटणार्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

नागराजच्या ‘झुंड’ चित्रपटातून अमिताभ बच्चन यांची माघार

thumbnail 1525083869608
thumbnail 1525083869608

मुंबई : सैराटच्या अभुतपूर्व यशानंतर सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या बाॅलिवुड चित्रपटाची सर्वांनाच आस लागली आहे. झुंड या चित्रपटामधे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांची मुख्य भुमिका असणार आहे असे नागराज यांनी मागील वर्षीच जाहीर केले होते. नागराजच्या या नव्या कलाकृतीविषयी सिनेसृष्टीमधे जोरदार चर्चा सुरु असताना आणि शुटिंग सुरु होण्याचे काम उंबरठ्यावर आलेले असताना बिग बि यांनी झुंड हा चित्रपट सोडला असल्याचे बोलले जात आहे. अमिताभ बच्चन यांनी मागील वर्षी झुंड या चित्रपटासाठी काम करण्यास होकार दर्शवला होता. परंतु चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम दिवसेंदिवस पुढे ढकलले जात असल्याने इतर चित्रपटांना वेळ देता येत नसल्याचे सांगून बच्चन यांनी झुंड चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. झुंड बाबत काॅपिराईटशी संबंधीत काही समस्या असल्याचे बोलले जात आहे. ‘थग्ज आॅफ हिंदुस्तान’ या चित्रपटाचे चित्रिकरण आटोपल्यानंतर फेब्रुवारीमधे झुंडचे चित्रिकरण सुरु होईल अशी बच्चन यांना अपेक्षा होती. झुंडमधे अमिताभ स्पोर्ट शिक्षकाच्या भुमिकेत दिसणार होते. १०२ नाॅट आऊट व ब्रह्मास्त्र या चित्रपटांमधे सध्या अभिताभ व्यस्त आहे. बच्चन यांची तब्बेतही वयोमानानुसार पुर्वीप्रमाणे साथ देत नसल्याने डाॅक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबईमधे वाहतुक कोंडीचा सामना करण्यासाठी दुचाकी रुग्नवाहिकेचे अनावरण

thumbnail 1525024065438
thumbnail 1525024065438

मुंबई : शहरातील वाहतुक कोंडीचा सामना करता यावा व रुग्नांना जलद रुग्नवाहीकेची सेवा पुरवता यावी याकरिता मुंबईस्थित सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. लोढा फौन्डेशन या संस्थेने मुंबई येथील एका कार्यक्रमामधे नुकतेच दुचाकी रुग्णवाहीकेचे अनावरन केले. शहरातील रुंद रस्त्यांवरील वाहनांच्या रहदारीतून निकडीच्या प्रसंगी जलदगतीने मार्ग काढता यावा यासाठी या विशेष दुचाकी रुग्नवाहीकेची निर्मिती करण्यात आली आहे. या दुचाकी रुग्नवाहिकेची निर्मिती करत असताना संबंधितांनी रुग्नांचा विचार करुन गाडीमधेच स्ट्रेचर व प्रथमउपचार पेटीची व्यवस्था केली आहे. तसेच गरज पडल्यास आॅक्सिजन गॅसची सोयसुद्धा करण्यात आली आहे. लोढा फौन्डेशनच्या सहकार्याने बनवण्यात आलेली ही विशेष बांधणीची दुचाकी रुग्नवाहीका २૪×७ नागरीकांच्या सेवेसाठी उबलब्ध असेल असे कार्यक्रमावेळी लोढा फौन्डेशन संस्थेच्या पदाधिकार्यांनी जाहीर केले.

आर.एस.एस. व भाजपाने देशात केवळ द्वेष पसरवण्याचे काम केले – राहुल गांधी

thumbnail 1524991553139
thumbnail 1524991553139

दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने या देशात केवळ द्वेष पसरवण्याचे काम केले आहे असा आरोप काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावरील जनआक्रोश रेलीमधे ते बोलत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधुन भाषण करत असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘पंतप्रधान मोठमोठाली आश्वासने देतात परंतु त्यातील कोणतेच आश्वासन सत्यात उतरवत नाहीत. परिणामी जनतेच्या मनामधे सरकारप्रती असणारी विश्वासार्हता आता कमी झाली आहे. पंतप्रधान जेव्हा भाषण करत असतात तेव्हा एकणारे लोक पंतप्रधानांच्या भाषणात काही तरी सत्य सापडतंय का हे शोधत असतात’ असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर राजधानी दिल्लीमधील त्यांचे हे पहीलेच भाषण होते.

‘मोदी जिकडे जातात तिकडे गरीबी, भ्रष्टाचार, विकासावर बोलत असतात परंतु त्यांच्या बोलण्यात थोडीही सत्यता नसते. कर्नाटक राज्याचे भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येदियुरप्पा हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन तुरुंगात जावून आले आहेत. रेड्डी बंधू आणि येदियुरप्पा या भ्रष्टाचाराचे आरोप असणार्यांच्या मधे उभे राहून नरेंन्द्र मोदी भ्रष्टाचार संपवण्याची बात करतात यामधेच त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो’ असेही ते म्हणाले. भष्टाचाराच्या मुद्यावरुन गांधी यांनी पियुष गोयल व नीरव मोदी यांच्यावर सुद्धा जोरदार हल्ला केला. सध्याच्या सरकारबाबत जनतेच्या मनामधे असंतोष खदखदत असून मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकींमधे काँग्रेसचाच विजय होईल असा विश्वास गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची निवड

thumbnail 1524985725430
thumbnail 1524985725430

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार यावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटनीस पदी नियुक्ती करण्यात आल्याने आता राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची राजकीय वर्तुळामधे उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकार्यांची बैठक २९ एप्रिल रोजी पुण्यामधे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली खासगी बैठकीमधे प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. परंतु प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन तरुण कार्यकर्त्यांची अहमदनगरमधे गोळ्या झाडून हत्या

thumbnail 1524980384054
thumbnail 1524980384054

अहमदनगर : शिवसेनेच्या शहरप्रमुखांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन तरुण कार्यकर्त्यांची जामखेड येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारामधे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश राळेभात (वय ३०) व राकेश राळेभात यांचा जागीच मृत्यु झाला आहे. बीड रस्त्यावरील वामन ट्रेडर्स समोर २८ एप्रिल रोजी संध्याकाली ६ च्या दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी पिस्तुलीतून योगेश व राकेश यांच्यावर गोळ्या झाडल्या. रक्तबंवाळ अवस्थेत पडलेल्या त्यांना उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने जिल्हा रुग्नालयात उपचारासाठी हलवले परंतू डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा रुग्नालयात धाव घेतली. एकाच महिण्यात नगरमधे दुसर्यांदा गोळीबाराची घटना झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आला असून जिल्ह्यात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्या रात्री नक्षलवादी लपून राहीले चक्क सरकारी आश्रमशाळेत

thumbnail 1524897284995
thumbnail 1524897284995

गडचिरोली : पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर स्वत:चा जीव वाचवण्याकरिता नक्षलवाद्यांनी चक्क पेरमिली येथील सरकारी आश्रमशाळेचा आश्रय घेतला असल्याचे तपासातून समोर आले अाहे. दिनांक २२ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील बोरियाच्या जंगल परिसरात पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक होवून २२ मोवोवादी ठार झाले. यावेळी बचावलेले मावोवादी अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले होते. चकमकीनंतर नक्षलविरोधी पथकाने बोरिया जंगल परिसरात शोधमोहीम केली. यादरम्यान सोमवारी पुन्हा पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक होवून ६ नक्षली ठार झाले. पोलिसांच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी चकमकीतून बचावलेल्या नक्षलवाद्यांनी चक्क सरकारी आश्रमशाळेचा आश्रय घेतल्याचे उघड झाले आहे.

नक्षलवाद्यांनी मुक्काम केलेली पेरमिली येथील आश्रमशाळा

नक्षलवाद्यांनी मुक्काम केलेल्या शाळेपासून अवघ्या काही पावलांवर पोलिस चौकी असूनसुद्दा पोलिसांना नक्षलींचा मागमूस न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नक्षलवाद्यांच्या धाकाने घाबरलेल्या शिक्षकांनी त्या रात्री नक्षल्यांसाठी जेवणही बनवून दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. विशेष म्हणजे रविवारच्या चकमकीमधे ठार झालेला पेरमिली दलम कमांडर साईनाथ व सोमवारच्या चकमकीमधे ठार झालेला अहेरी दलम कमांडर वासुदेव हे दोघेही याच माध्यमिक आश्रमशाळेत शिकले आहेत. पोलिसांना नक्षलींच्या हालचालींची माहीती मिळाली असती तर तिसरी चकमक होवून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता होती.

यु.पी.एस.सी. परिक्षेचा निकाल जाहीर, उस्मनाबादचा गिरिश बडोले राज्यात प्रथम

thumbnail 1524856228486
thumbnail 1524856228486

दिल्ली : केंन्द्रीय लोकसेवा आयोग ( यु.पी.एस.सी.) परिक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. उस्मनाबादच्या गिरिश बडोले या विद्यार्थ्याने महाराष्ट्रात प्रथम तर देशात विसावा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील एकूण १६ विद्यार्थी पहिल्या १०० मधे आले आहेत. हैदराबादचा अनुदीप दुरीशेट्टी देशात प्रथम आला आहे. नागपूरमधून MBA चे शिक्षण घेतलेली अनु कुमारी महिलांमधे देशात प्रथम आली आहे.

शेतकर्याचा मुलगा राज्यात प्रथम
महाराष्ट्रात प्रथम आलेल्या गिरिश बडोलेचे वडील शेतकरी असून त्याचे माध्यमिक शिक्षण तुळजापूर येथील सैनिक महाविद्यालयात झाले आहे. लातुर येथील दयानंद काॅलेजमधे उच्च माध्यमिल शिक्षण घेतल्यानंतर गिरिशने मुंबईच्या जे. जे. मेडीकल काॅलेजमधून MBBS ची पदवी घेतली आहे.

गिरिश बडोले

पहिल्या शंभरमधे महाराष्ट्रातील ९ जण
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी यु.पी.एस.सी. परिक्षेत चांगले यश मिळवले आहे. ९९० यशश्वीतांच्या यादीमधे महाराष्ट्रतील एकून १६ परिक्षार्थी यशश्वी झाले असून ९ जण पहील्या १०० मधे आले आहेत. दिग्विजय बोडके (५४), सुयश चव्हाण (५६), भुवनेश पाटील (५९), पियुष साळुंखे (६३), रोहन जोशी (६७), राहुल शिंदे (९५), मयुर काटवटे (९६), वैदेही खरे (९९), वल्लरी गायकवाड (१३१), यतिश विजयराव देशमुख (१५९),रोहन बापूराव घुगे (२४९), श्रीनिवास वेंकटराव पाटील (२७५), प्रतिक पाटील (३६६), विक्रांत सहदेव मोरे (४३०), तेजस नंदलाल पवार (४३६) आदी परिक्षार्थी यशश्वी झाले आहेत.

आसारामला जन्मठेपेची शिक्षा

thumbnail 1524636586734
thumbnail 1524636586734

जोधपूर : स्वयंखोषीत आध्यात्मिक गुरु आसाराम बापू अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरला आहे. जोधपूर येथील विशेष एस.सी. – एस.टी. न्यायालयाने आसाराम यास बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाचा निकाल ऐकून आसारामला अश्रू अनावर झाले. गेली साडे चार वर्षे जोधपूर सेंट्रल जेलमधे असलेला आसाराम याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप होता. १५ आॅगस्ट २०१३ रोजी जोधपूर जवळच्या मनाई येथील आश्रमामधे बलात्कार करण्यात आला असल्याचे तक्रारदार मुलीने म्हणले आहे. नोव्हेंबर २०१३ रोजी पोलिसांनी आसारामसह त्याच्या इतर ૪ सहकार्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीपासून जोधपूरपर्यंत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून चार राज्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आसारामसोबतच्या चार सहआरोपींपैकी शिल्पी व शरदचंद्र यांनी बलात्कार प्रकरणामधे आसाराम यास साथ दिल्याचे न्यायालयीन चौकशीमधे स्पष्ट झाले असून त्यांना प्रत्तेकी २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवा व प्रकाश यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.

नक्षलवादी आता शरण येतील – सतीश माथूर

thumbnail 15245624766391
thumbnail 15245624766391

मुंबई : नक्सली विरोधी मोहिमेत सुरक्षा दलाने गडचिरोलीमध्ये ३७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीमधील बोरिया जंगल परिसारात झालेल्या चकमकीमधे महाराष्ट्र पोलिसांच्या सी ६० जवानांनी आणि सी.आर.पी.एफ ने ही कामगीरी केली आहे. रविवार आणि सोमवारी झालेल्या या मोठ्या कारवाईनंतर लवकरच अनेक नक्सली शरण येण्याची अपेक्षा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी व्यक्त केली आहे.
“आम्ही नक्सली चळवळीचा वित्तपुरवठा तोडला आहे. त्यामध्ये आम्हाला यश आल्याने येत्या काही महिन्यात अनेक नक्षलवादी पोलिसांना शरण येतील. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमारेषेवर ही चळवळ सक्रिय असून पोलिसांची त्यावर नजर आहे.”, असे सतीश माथूर यावेळी म्हणाले.