Friday, December 5, 2025
Home Blog Page 6769

नक्षलवाद्यांशी संबध असल्याचा ठपका असलेल्या महेश राऊतच्या समर्थनार्थ ८० हून अधिक सरकारी अधिकार्यांनी लिहिले पत्र

thumbnail 1528630176681
thumbnail 1528630176681

गडचिरोली : भिमा कोरेगाव प्रकरणासंदर्भात मागील आठवड्यात पुणे पोलीसांनी पाच जणांना अटक केली होती. पुण्यामधे पार पडलेल्या एल्गार परिषदेला नक्षलवाद्यानी निधी पुरवला असल्याचा संशय पुणे पोलीसांनी व्यक्त केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमधे दलित लेखक सुधिर ढवळे, प्राध्यापिका शोमा सेन, अॅड. सुरेंन्द्र गडलिंग, रोना विल्सन आणि महेश राऊत आदींची नावे आहेत. यातील महेश राऊत यांनी यापूर्वी दोन वर्षे पंतप्रधान ग्रामविकास योजनेसाठी जिल्हा प्रशासनासमवेत काम केले आहे. महेश राऊतला अटक झाल्यानंतर ग्रामविकासमधे काम करणार्या ८० हून अधिक अधिकार्यांनी महेशच्या समर्थनार्थ एक पत्र लिहीले आहे. त्या सरकारी अधिकार्यांनी लिहिलेले व्हायरल पत्र खालीलप्रमाणे –

पंतप्रधान ग्रामविकासचे माजी फेलो (पीएमआरडीएफ) महेश राऊत यांना नागपूर येथून पोलिसांनी ‘यूएपीए’अंतर्गत अटक केल्याची बातमी वाचण्यास मिळाली. ‘यूएपीए’ कायद्यातील प्रखर कलमांचा वापर प्रामुख्याने गंभीर आणि देशविरोधी गुन्ह्यांसाठी होतो. म्हणूनच या कलमांतर्गत महेशला झालेली अटक आमच्यासह अनेक ‘पीएमआरडीएफ’ला धक्का देणारी आहे.

फेलो म्हणून महेश यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात दोन वर्षे जिल्हा प्रशासनासोबत राहून काम केले. ‘पीएमआरडीएफ’ म्हणून आम्ही त्याचे काम जवळून पाहिले आहे. ज्या गावांमध्ये/क्षेत्रांमध्ये शासन पोचू शकले नाही, अशा ठिकाणी स्वातंत्र्यानंतर प्रथमच शासकीय शिबिरे आणि मेळावे घेत महेश यांनी स्थानिकांचा विश्वास राज्यघटना, शासन आणि शासकीय संस्थेत रुजविला आहे.

व्यवस्थेने दुरावलेल्या ग्रामस्तरावरील लोकांना निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी महेश काम करत असताना आम्ही पाहिले आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून सातत्याने काम करून महेश यांनी गावस्तरावरील लोकशाही संस्थानांना मजबूत करून लोकांचा विकासकार्यातील सहभाग वाढविला आहे. विकास किंवा प्रगतीचा खरा अर्थ लोकांच्या बाजूने उभे राहून लोकांच्या भल्यासाठी सामूहिकरित्या कायदा आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणे, असा असतो. लोकांसाठी सर्वस्व त्यागणारे महेशसारखे युवक या युगात क्वचितच आढळतात. न्यायालयाच्या निर्णयाआधीच महेशला नक्षलवाद्यांशी जोडण्याचे बेजबाबदारीचे काम प्रसिद्धीमाध्यमे करत आहेत. या आरोपांतून निर्दोष मुक्त होऊन महेश पुन्हा नव्या जोशाने लोकांसाठी काम सुरू करेल, अशी आम्हाला आशा आहे.

राजकारणापलीकडचे रामराजे – सुरज शेंडगे

thumbnail 1528543160860
thumbnail 1528543160860

आज महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक निंबाळकर यांना ऐकण्याचा योग्य आला. निमित्त होत प्रा.रामकृष्ण मोरे यांच्या नावे दिली जाणारा जीवन गौरव पुरस्कार रामराजेंना मिळाला. त्या पुरस्कार वितरण समारंभात रामराजे बोलत होते. आयुष्यभर त्यांनी कृष्णेच्या पाण्यासाठी केलेल्या संघर्षाची गाथा त्यांनी सांगितली त्यातून एक लक्षात आलं की हा माणूस खरा तरमळीचा आहे. ढोंगी बेगडी वगैरे नाही.तसेच त्यांच्या स्वभावातील कौतुकाची आणि नवलाची बाब मला ही वाटली की लोकशाहीत ही राजेशाहीची मस्ती असलेले खानदानी राजे देशात कमी नाहीत परंतु रामराजेंच्या सारखा राजघरण्यातून आलेला प्रचंड श्रीमंत माणूस परंतु तो एवढा जमीनीवर असू शकतो हे अलौकीकच!

त्यांनी फक्त स्वतःच्या जीवनातील संघर्षच व्यक्त नकरता देश प्रश्नाला हात घातले देशातील विषमता,गरिबी,भूकमरी यावर बोलणारे रामराजे देशाचे आजोबा गहीवरत असल्या सारखे भासले. त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील किस्से सांगितले. शा.म.मुजुमदार त्यांना वनस्पतीशास्त्र शिकवत असत. त्यांना सांजवेळी फर्ग्युसनच्या मागच्या टेकडीवर विद्यार्थ्यांशी गप्पा मारत बसण्यास खूप आवडतं असे. असेच एक दिवशी टेकडीवर बसले असताना रामराजेंनी मुजुमदार सरांना शिक्षण संस्था स्थापण्याचा विचार मांडला, मुजुमदार सरांनी तो सकारात्मक घेतला आणि आज आपण सिम्बॉइसेस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ जे पाहतो त्याची बीजे थेट रामराजेंच्या विद्यार्थी दशेत आहेत.

राजराजेंनी आणखी एक दिलखुलास किस्सा सांगितला तो म्हणजे खा.वंदनाताई चव्हाण यांच्या वडिलांच्या हाताखाली त्यांनी पुणे सत्र न्यायालयात वकिली केल्याचा. रामराजेंनी फौजदारी खटल्याची वकिली केल्याचे सांगितले तसेच त्यांनी फौजदारीची सर्व कलमे तोंड पाठ असल्याचे सांगितले. पुढे त्यांनी सिम्बॉइसेस विद्यापीठात विधी विभागात प्राध्यापकी केल्याचेही सांगितले. कायदा अभ्यासून न्यायालयात युक्तीवाद मांडणे एक अंग असते.कायदा शिकवणे दुसरे अंग असते. आमदार म्हणून कायदा करणे तिसरे अंग असते.सभापती म्हणून कायदा राभवणे हे चौथे अंग असते.या सर्व भूमिकेतून गेल्याचा आपणास अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

रामराजेंनी फलटणच्या प्रियदर्शनी महाविद्यालयात ५वर्ष प्राचार्य म्हणून काम पाहिले. रामराजे १९९१ साली राजकारणात आले. फलटणच्या नगराध्यक्ष पदापासून सुरू झालेला हा प्रवास मंत्रिपद मार्गे विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत येऊन पोहचला आहे. रामराजेंनी देशस्थितीचा ठोकताळा घेत कृष्णा स्थिरीकरणाचा प्रश्न पोटतिडकीने मांडला. महाराष्ट्र जास्तीत जास्त सिंचित झालेला बघणं मला स्वर्गासारखं वाटेल अस ते ह्रदयाच्या तरमळीपासून म्हणाले.

पश्चिम महाराष्ट्रात संपन्नता आली यामागे इथल्या सामान्य जणांचे कष्ट आणि त्याला लोकप्रतिनिधींनी दिलेली जोड आहे हे त्यांनी सांगितले.पुढे ते म्हणाले,”पश्चिम महाराष्ट्रतील सुबत्ता ही इथल्या कसदार लोकप्रतिनिधीची देणं आहे. मला विश्वास आहे प.महाराष्ट्रात पुढील पिढीत ही कसदार लोकप्रतिनिधी सर्वच पक्षातून निर्माण होतील. “खर तर हे वाक्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून राजकारणात जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांना उत्तेजन देणारच होत.

भारतीय लोकशाहीवर ही त्यांनी खूप मौलिक भाष्य केले.तीन पिढ्यांनी ही लोकशाही टिकवून ठेवली आहे त्या पिढीची शक्ती खूप मोठी आहे. “लोकशाहीचा फायदा घेऊन श्रीमंत झालेले मतदानापासून दूर गेले परंतु ज्यांनी हयात गरिबीत घालवली ते मात्र मतदानात हिरहिरीने सहभागी होतात,हा गरिबांचा मोठेपणा आहे.” असे लोकशाहीचे वास्तव टिपत त्यांनी खूप सूचक विधान केले “जास्त विषमता असलेल्या देशात लोकशाही टिकू शकत नाही परंतु भारतात ती टिकली हा इथल्या लोकांचा मोठेपणा आहे.” भारतात मतदानाच्या वेळी लष्कर बोलावलं जाण्याची फार नगण्य उदाहरणे आहेत ही भारतीयांच्या रक्तातील ‘सहिष्णुता’आहे. त्या उदारतेच्या बळावरच भारतीय लोकशाही टिकून असल्याचं ते बोलले.टिळक गोखल्यांच्या ‘सुधारणा की स्वातंत्र्य’ या वादापासून आजही भारतीयांना सुटका मिळालेली नाही आज ही तोच वाद जिवंत आहे सुधारणा की स्वातंत्र्य.आशा शब्दांत त्यांनी लोकशाहीचे चित्र स्पष्ट केले. भ्रष्ट नेत्याबद्दल बोलताना त्यांनी मतदारांना जागरूक करणारे भाष्य केले.भ्रष्ट नेत्यांना तुम्हीच निवडून देता आणि तुम्हीच त्यांना शिव्या देता. “लोकशाहीच्या मंदिराचा नेता कळस असला तरी पाया ही सामान्य जनता आहे तो मजबूत करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे.” असे ते म्हणाले. शेवटी त्यांनी आगामी राजकीय पिढीबद्दल विश्वास आणि आशावाद व्यक्त केला आणि पुरस्काराच्या संयोजकांना सांगितले की आम्हा म्हातारांना पुरस्कार देण्यापेक्षा राजकारत हिरहिरीने लोकांची कामे करणाऱ्या तरुणांना पुढच्या वर्षीपासून पुरस्कार द्या कारण त्यांच्या खांद्यावर उद्याच्या भारताची धुरा आहे. पुरस्कारात मिळालेली २५हजारांची रक्कम एका गरीब विद्यार्थ्यास देण्याचे घोषित करून त्यांनी वाणीस विराम दिला आणि कार्यक्रम संपताच त्या विद्यार्थ्यास ती रक्कम सुपूर्द केली. रामराजेंच्या आजच्या निपक्ष भाषणाने मी मंत्रमुग्ध झालो आहे म्हणून हा एवढा वृत्तात शब्दांकित करण्याचा अट्टहास केला.रामराजेंच्या सारखे सभापती महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ सभागृहास लाभले आहेत हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.

सुरज शेंडगे

फेक बातम्यांना लागणार लगाम, व्हाॅट्सअॅपचे नवीन फिचर लाॅच

thumbnail 1528542574897
thumbnail 1528542574897

टीम, HELLO महाराष्ट्र : व्हाॅट्सअॅपची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच क्रेझ आहे. संदेशवहनासाठी व्हाॅट्सअॅपचा वापर करणार्यांच्या संख्येत अलीकडील काही काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका क्लिकवर हवे तेवढे मेसेजेस हव्या तेवढ्या लोकांना पाठवणे व्हाॅट्सअॅपमुळे सहजशक्य झाले आहे. परिणामी खोट्या अफवा पसरवणार्या संदेशांचा व्हाॅट्सअॅपवरती धुमाकूळ माजला आहे. व्हाॅट्सअॅपने आपली विश्वासार्हता शाबूत ठेवण्यासाठी नवीन फिचर लाॅच केले आहे. या नवीन फिचरनुसार आता फोरवर्डेड मेसेजेस ओळखता येणार आहेत. इतरांकडून आलेले मेसेजेस पुढे पाठवताना आता मेसेजच्या वरती फोरवर्डेड असा टेग दिसणार आहे. या फिचरमुळे फेक माहीती वायरल होण्यावर थोड्याबहूत प्रमाणामधे लगाम लागेल असे बोलले जात आहे. सध्या हे फिचर बेटा वर्जन करिता उपलब्ध असून लवकरच ते सर्वासाठी खुले करण्यात येईल असे कंपनीने जाहीर केले आहे.

एसटीच्या संपामुळे लाखो प्रवाशांचे हाल.

thumbnail 1528458297280
thumbnail 1528458297280

पंढरपूर : एसटी कर्मचा-यांनी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले आहेत.
पगारवाढीसह इतर विविध मागण्यांसाठी गुरूवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचा-यांनी संपाची हाक दिली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचा-यांच्या तेरा संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागे ऐन दिवाळीत एसटीने मोठा संप केला होता. न्यायालयाने या संपात हस्तक्षेप करत एसटी कर्मचा-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र परिवहन मंत्री आणि महामंडळ प्रशासनाकडून कर्मचा-यांच्या मागणीला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचारी वर्गात असंतोष पसरला होता. त्यातूनच या संपाची तयारी केली गेली. सध्या सुट्ट्यांचा हंगाम चालू असल्याने विविध पर्यटनस्थळांवर आणि तिर्थस्थळांना गेलेल्या लाखो लोकांचे या संपाने अतोनात हाल होताना दिसतात.
पंढरपूरात दर्शनासाठी आलेले तब्बल एक लाख भाविक एसटीअभावी बसस्थानकात आणि रेल्वेस्थानकावर ताटकळत बसले आहेत. या संपाचा गैरफायदा घेत खाजगी वाहनचालक प्रवाशाकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. सरकारने कर्मचा-यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून हा तिढा सोडवावा अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

गोपाळ देवकत्ते

शिवसेनेचा स्वबळावर निवडणूका लढविण्याचा नारा कायम

thumbnail 1528351199563
thumbnail 1528351199563

मुंबई : अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील २ तासांच्या भेटीनंतर राजकीय वर्तळात चर्चेला चांगलेच उधान आले होते. दोन पक्षांमधील ताण कमी होऊन युती कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु अमित शहांचे धोरण आम्हाला माहीती आहे. शिवसेनेने भावी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठराव सहमत केला असून आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. येणार्या काळातील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवेल असे मत सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केले. शिवसेनेने सहमत केलेल्या ठरावामधे काहीही बदल केला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर दोन तास चर्चा

thumbnail 1528306379117
thumbnail 1528306379117

मुंबई: भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांची बहुचर्चीत आणि बहुप्रतिक्षीत अशी भेट अखेर मातोश्रीवर संपन्न झाली. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामधे बंद दाराआड दोन तास चर्चा रंगली होती. या प्रदिर्घ चर्चेमधे नक्की कोणता विषय चर्चिला गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन पक्षांमधील अंतर्गत ताण मातोश्रीवरील चर्चेमुळे कमी झाला असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला राज्यात पत्करावा लागलेला पराभव, देशभरात विरोधकांची होत असलेली एकजूट आणि शिवसेनेनं दिलेला एकला चलो रे हा नारा, या अशा पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती होणार की नाही?, दोन पक्षांमध्ये निर्माण झालेली दरी मिटवण्यात अमित शहांना यश येणार का?, याची चर्चा या भेटीच्या निमित्तानं राजकीय वर्तुळात सुरू आहे. येणार्या काळात अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामधे अजुन २ ते ३ भेटी होण्याच्या शक्यता आहेत.

माजी एटीएस प्रमुख हिमांशू राॅय यांची आत्महत्या

thumbnail 1526036676040
thumbnail 1526036676040

मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आणि राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम पाहिलेल्या हिमांशू राॅय यांनी राहत्या घरात स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असणाऱ्या राॅय यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलाला चांगलाच हादरा बसला आहे. राॅय गेली २ वर्ष वैद्यकीय रजेवर होते. त्यांना हाडांच्या कॅन्सर झाला होता. अमेरीकेत जाऊन उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. परंतू आजारपणातून आलेल्या नैराश्यामधून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
हिमांशू राॅय हे १९८८ च्या बॅचचे आय.पी.एस. अधिकारी होते. आयपीएल मधील सट्टेबाजी पासून पत्रकार जेडे हत्याप्रकरणामध्ये तसेच लैला खान मर्डर केस ते अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरण अशा अनेक प्रकरणांच्या तपासात राॅय यांनी महत्वाची भुमिका बजावली होती.

वकील व्हायचंय? लाॅ शाखेला प्रवेश घ्यायचाय? अशी कराल प्रवेश परिक्षेची तयारी.

thumbnail 1525527203933
thumbnail 1525527203933

टीम, HELLO महाराष्ट्र : विधी शाखेतील वाढत्या संधींचा विचार करता अलीकडील काही काळात लाॅ मधे करिअर करु इच्छिणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लाॅ ही शाखा आज अनेक तरुणांना आकर्षीत करत असून लाॅ ची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी निर्मान होताना दिसत आहेत.

लाॅ शाखेचीच निवड का म्हणुन ?
१२ वी ची परिक्षा पास झाल्यानंतर किंवा पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर आता पुढे काय करायचे हा प्रश्न सर्वांनाच सतावत असतो. पुर्वी १२ वी झाल्यानंतर अभियात्रिकी शाखेला प्रवेश घेण्याचा ट्रेंड तयार झाला होता. परंतु आता इंजिनिअरिंगसारख्या तात्रिकी शिक्षणाला म्हणावा तसा वाव राहिलेला नाही. तसेच विज्ञान, वाणिज्य, कला यांसारख्या शाखांमधून चांगल्या गुणांनी पदवी घेतलेले अनेक युवक सुद्धा बेरोजगारीचा सामना करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमधे लाॅ हे क्षेत्र तरुणांना आश्वासक वाटत आहे. शिवाय वकिलीचे शिक्षण कधीच वाया जात नाही; ते आज ना उद्या आपल्या कामाला येतेच असेही बोलले जाते, त्यामुळे तरुण वर्ग लाॅकडे आकर्षीत होत आहे. विशेषत: यु.पी.एस.सी – एम.पी.एस.सी अशा स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्या युवकांसाठी लाॅ एक पर्वणीच ठरत आहे. स्पर्धा परिक्षांमधून येणार्या अस्थिरतेवर मात करण्यासाठी लाॅ चे शिक्षण स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्याना मदत करत आहे. आज बरेच विद्यार्थी स्वत:ची नोकरी वा इतर अभ्यास सांभाळून लाॅ ला प्रवेश घेताना दिसत आहेत. तेव्हा, जर तुम्ही १२ वी पास असाल कींवा तुम्ही कोणत्याही शाखेमधून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असेल आणि आता वकिल होण्याचे स्वप्न पाहत असाल, लाॅ शाखेला प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर मग तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात असे समजण्यास हरकत नाही.

लाॅ मधिल करिअरच्या संधी
लाॅ शाखेची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी आहेत. सर्वप्रथम लाॅ पुर्ण झाल्यानंतर कोणत्याही न्यायालयामधे वकिली सुरु करता येते. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय ते अगदी स्थानिक न्यायालयांमधे वकीली करण्यास तुम्ही पात्र होता. याशिवाय सरकारी क्षेत्रातील अनेक पदांकरिता घेण्यात येणार्या परिक्षांसाठी तुम्ही पात्र होता. यामधे न्यायाधीशांपासून सरकारी वकील इत्यादी पदे येतात. तसेच याव्यतिरिक्त अनेक कंपन्यामधे लीगल अॅडव्हायजर या पदाच्या अनेक जागा रिक्त असतात. काॅर्पोरेट क्षेत्रातसुद्धा नोकरीच्या अनेक संधी आहेत. महिलांकरीता लाॅ नंतर संरक्षण खात्यातसुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत. विविध लाॅ फर्म्स मधेही तुम्ही रुजू होऊन चांगला पगार मिळवू शकता. जर तुमच्यामधे पॅशन असेल आणि जिद्द व चिकाटीने काम करण्याची तयारी असेल तर या क्षेत्रामधे संधींना अंत नाही असे म्हणण्यास हरकत नाही.

सी.ई.टी. प्रवेश परिक्षा
विधी शाखेला प्रवेश घेण्यासाठी नेशनल इन्स्टिट्युट आॅफ लाॅ करीता CLAT ही परिक्षा द्यावी लागते तर महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता MHT – CET Law ही प्रवेश परिक्षा द्यावी लागते. पुर्वी पदवीच्या गुणांवरुन लाॅ शाखला प्रेवश मिळत असे परंतू २०१६ पासून शासनाने लाॅ प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा घेणे सुरु केले आहे.

बीए.एल.एल.बी. आणि एल.एल.बी –
१२ वी नंतर विधी शाखेला प्रवेश घेणार्यांसाठी BALLB हा कोर्स असतो तर कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करणार्यांसाठी LLB हा कोर्स असतो. BALLB या कोर्स चा कालावधी ५ वर्षांचा असतो तर LLB चा कालावधी ३ वर्षांचा असतो. या दोन्ही कोर्सेस करिता दरवर्षी सी.ई.टी. प्रवेश परिक्षा घ्याण्यात येते. हजारो विद्यार्थी या परिक्षेला बसतात. त्यातील साधारणत: १५००० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

प्रवेश परिक्षेचे स्वरुप व अभ्यासक्रम –
विधी शाखेची प्रवेश परिक्षा १५० गुणांची व बहुपर्यायी स्वरुपाची असते. इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि लिगल अॅप्टीट्युड हे विषय परिक्षेसाठी असतात. या परिक्षेमधे निगेटीव्ह मार्कींग पद्धत वापरली जात नाही. ही परिक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येते. परिक्षासाठी २ तास वेळ देण्यात येतो तसेच ही प्रवेश परिक्षा मराठी किंवा इंग्रजी अशा कोणत्याही माध्यमातून देता येते. सन २०१८ साली होणारी प्रवेश परिक्षा आजवरची तिसरी प्रवेश परिक्षा असल्याने बाजारात म्हणावे त्या दर्जाची पुस्तके अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपलब्ध साहित्यातून अभ्यास करावा.

प्रवेश प्रक्रीया
प्रवेश परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काहीच काळात लाॅ साठीची प्रवेश प्रक्रीया चालू होते. सी.ई.टी. च्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. संपुर्ण प्रवेश प्रक्रीया आॅनलाईन पद्धतीने होते. प्रवेशाच्या साधरणत: ૪ ते ५ फेर्या होतात. विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या फेर्या सुरु होण्यापूर्वी महाविद्यालयांची पसंती यादी जमा करण्यास सांगण्यात येते. पसंती याद्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालये दिली जातात.

अर्ज कसा भराल, अर्ज भरण्याची शेवटची तारिख –
इच्छुक विद्यार्थी www.dhepune.gov.in कींवा dhe.mhpravesh.in या वेबसाईटवर अर्ज भरु शकतात. एल.एल.बी. साठीच्या सी.ई.टी. परिक्षेचे अर्ज १५ एप्रिल पासून उपलब्ध झाले असून १५ मे ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १२ वी नंतर देता येणारी बी.ए. एल.एल.बी. साठीच्या प्रवेश परिक्षेसाठीची अर्ज भरण्याची मुदत संपली आहे.

ही महाविद्यालये लाॅसाठी प्रतिष्ठीत
पुण्यामधील आय.एल.एस. महाविद्यालय लाॅ साठी प्रतिस्ठीत मानले जाते. देशातील टाॅपच्या पहील्या पाच महाविद्यालयांमधे या विद्यालयाचा समावेश होतो. त्यानंतर मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयाचा (जी.एल.सी.) नंबर लागतो. याचबरोबर के.सी. लाॅ काॅलेज (मुंबई), नवलमल फिरोदिया लाॅ काॅलेज (पुणे), सिद्धार्थ लाॅ(मुंबई) इत्यादी महाविद्यायेही प्रतिष्ठीत मानली जातात.

तर मित्रांनो, विधी शाखेला प्रवेश घेण्याचा तुमचा निर्णय पक्का असेल तर आता प्रवेश परिक्षेच्या तयारीला लागा. लाॅ ची पदवी घेतल्यानंतर तुमचे भविष्य उज्वल आहे यात शंका नाही. तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत जगात १३८ व्या स्थानावर, तर पाकिस्तान १३९

thumbnail 1525451286796e0a5ae
thumbnail 1525451286796e0a5ae

टीम HELLO महाराष्ट्र : ‘रिपोर्टर्स विदाउट बोर्डर्स’ या संस्थेने केलेल्या पाहणी अहवालातून माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत जगात १३८ व्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. जगभरातील इतर लोकशाही राष्ट्रांच्या तुलनेत भारताचे माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीमधील स्थान खुपच खाली घसरले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणार्या माध्यमांच्या स्वातंत्र्यावर यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन २०१७ साली प्रकाशित झालेल्या यादीमधे भारत १३६ व्या स्थानावर होता. २०१८ सालच्या अहवालानुसार भारत दोन स्थानांनी घसरला आहे. यावर्षीच्या अहवालानुसार नोर्वे जगात प्रथम क्रमांकावर असून त्याखालोखाल स्विडनचा क्रमांल आहे. माध्यम स्वातंत्र्याबाबत जाहीर केल्या जाणार्या या अहवालात पाकीस्तानचा क्रमांक भारताच्या खालोखाल म्हणजेच १३९ वा आहे तर चीन १७६ व्या क्रमांकावर आहे. बांग्लादेशचा क्रमांक १૪६ वा असून उत्तर कोरियाचा सर्वात शेवटचा १८० वा क्रमांक आहे. रिपोर्टर्स विदाउट बोर्डर्स ही संस्था सन २००२ पासून सातत्याने “प्रेस फ्रिडम रिपोर्ट” प्रकाशित करते. माध्यमांमधील विविधता आणि माध्यमांवरील सरकारचे वर्चस्व तसेच वेगवेगळ्या राष्ट्रांत पत्रकारांना दिली जाणारी वागणूक इत्यादी गोष्टींचा अभ्यास करुन त्यावरुन हा अहवाल बनवण्यात येतो. या वर्षीच्या अहवालात भारताचे जागतिक स्तरावरील स्थान घसरण्याला गौरी लंकेश यांच्या हत्येची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे.

शरद पवारांसाठी या १३ व्यक्ती आहेत खास, अजित पवारांचा समावेश नाही

thumbnail 1525167246887
thumbnail 1525167246887

मुंबई प्रतिनिधी | सोशल मिडियाचे प्रभुत्व असणार्या आजच्या काळात कोणती राजकीय व्यक्ती सोशल नेटवर्कींग साईट्सवर कोणाला फोलो करते व कोणाला करत नाही यावरुन नेहमीच वेगवेगळ्या चर्चा झडत असतात. जनसंपर्कासाठी सोशल मिडीयाचा वापर अलीकडील काही वर्षांमधे मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. ट्विटर हे माध्यम राजकीय व्यक्तींसाठी प्रभावी माध्यम म्हणुन पुढे येत आहे. सोशल नेटवर्कींग साईट्सवर कोणी कोणाला फोलो करायचे तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु तरिही राजकिय वलय असणर्या व्यक्तीबाबत सोशल मिडियावरील गोष्टींवरुन नेहमीच चर्चा होत असतात. अशामधे शरद पवार ट्विटरवर कोणाकोणाला फोलो करतात याबद्दल उत्सुकता असणे साहजिक आहे.

ट्विटरवर एक मिलियन चाहता वर्ग असणारे शरद पवार फक्त १३ व्यक्तींनाच फोलो करत असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. या १३ व्यक्ती पवारांसाठी खास आहेत असं बोललं जात आहे. विशेष व्यक्तींमधे अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन, हिलरी क्लिंटन यांचा समावेश आहे. तसेच पंतप्रधान नरेंन्द्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही या यादीत समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे शरद पवारांच्या या १३ जणांच्या यादीमधे अजित पवारांचा समावेश नसल्याचे समोर आले आहे.

इतर कोणत्याही राजकीय पक्षाला फोलो न करणारे पवार साहेब ट्विटरवर आम आदमी पार्टीला फोलो करत असल्याचे दिसत आहे. तसेच सुप्रिया सुळे व जयंत पाटील यांचाही या यादीत समावेश आहे. मागे काही महिण्यांपूर्वी नरेन्द्र मोदी ट्विटरवर कोणाला फोलो करतात यावरुन वादंग उठले होते. ट्विटरचे महत्व उमजल्याने नुकतेच राज ठाकरे यांनीही ट्विटरवर खाते उखडले आहे. 

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

तर शरद पवार देशाचे पंतप्रधान होणार!

पवारांनी ज्यांची कॉलर ओढली ; ती सीट आम्ही पाडली : रामदास आठवले

माढा : प्रचाराच्या शेवट दिवशी भाजपचे चार नेते करणार राष्ट्रवादीची नाकाबंदी

माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

शरद पवारांच्या गुगली समोर पृथ्वीराज चव्हाण क्लीन बोल्ड

शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले

[youtube https://www.youtube.com/watch?v=7InWzw2CFbE&w=560&h=315]