Sunday, December 21, 2025
Home Blog Page 678

Virat Kohli Poor Form : कोहलीचे संघातील स्थान धोक्यात? खराब फॉर्म ठरतोय चिंतेचं कारण

Virat Kohli Poor Form

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवत ग्रुप मध्ये आघाडी घेतली आहे. यामध्ये अंतिम षटकात पाकिस्तानचा केलेल्या पराभवाचा सुद्धा समावेश आहे. मात्र ३ विजय मिळवून सुद्धा टीम इंडियासाठी टेन्शन सारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म…. आत्तापर्यंत भारतीय संघ या स्पर्धेत अजिंक्य राहिल्याने कोहलीचा सुमार फॉर्म झाकला गेला आहे, मात्र सुपर ८ मध्ये मात्र याची मोठी किंमत भारतीय संघाला मोजावी लागू शकते.

वर्ल्डकप पूर्वी पार पडलेल्या आयपीएल मध्ये विराट कोहलीने सलामीला येऊन खोऱ्याने धावा काढल्या होत्या. ज्या स्ट्राईक रेटवरून त्याला डिवचण्यात आलं तो सुद्धा त्याने सुधारल्याने विश्वचषक स्पर्धेत कोहलीकडून मोठी अपेक्षा होती. विराट कोहली सुद्धा प्रथमच वर्ल्डकप मध्ये सलामीला येत आहे. मात्र पहिल्या तिन्ही सामन्यात त्याने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला आहे. आयर्लंडविरुद्ध विराट कोहली 5 चेंडूत 1 धावा काढून बाद झाला. यानंतर पाकिस्तानविरुद्ध 3 चेंडूत 4 धावा आणि अमेरिकेविरुद्ध तर शून्यावरच कोहली बाद झाला. म्हणजेच आतापर्यंत विराट कोहलीला T20 विश्वचषकातील 3 सामन्यांत केवळ 5 धावा करता आल्या आहेत. कोहलीच्या या सुमार फॉर्ममुळे (Virat Kohli Poor Form)टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे.

विराट कोहलीचा फॉर्म असाच खराब राहिला तर त्याची संघातील जागाही धोक्यात येऊ शकते. टीम इंडियाकडे यशस्वी जैस्वालच्या रूपाने आक्रमक सलामीवीर आहे जो कोणत्याही मैदानावर डाव पलटवण्याची क्षमता राखतो. मात्र कोहली सलामीला येत असल्याने यशस्वीला संधी मिळाली नाही. भारतीय संघ ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध खेळणार आहे. १५ जूनला होणाऱ्या या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असणार आहेत. कोहलीने कॅनडाविरुद्ध चांगल्या धावा केल्या तर भारतासाठी ही दिलासायक बाब ठरेल, अन्यथा कोहलीचे संघातील स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Shocking Video : सेल्फी घेण्यात मग्न तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रसंग; VIDEO पाहून उडेल थरकाप

Shocking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये कधी काय पहायला मिळेल काही सांगू शकत नाही. अनेकदा आपल्याला आपल्याच डोळ्यांवर विश्वास ठेवणे अशक्य होईल अशा कितीतरी घटना सोशल मीडियावर व्हायरल होतात. तुम्ही आजपर्यंत अनेक समुद्र जीवांचे विविध व्हिडीओ व्हायरल होताना पाहिले असतील. जे पाहिल्यानंतर समुद्रकिनारी फिरताना आणि समुद्राच्या पाण्यात खेळताना चुकून पायावरून वाळू जरी सरकली तरी भीती वाटते. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात एका तरुणीसोबत असं काहीतरी घडलंय जे पाहून तुम्ही शॉक व्हाल.

काय घडलं? (Shocking Video)

समुद्रकिनारी फिरायला कुणाला आवडत नाही? शांत, निवांत समुद्राचा किनारा मनावरील ताण हलका करतो आणि त्यामुळे बरेच लोक बीचवर फिरायला जातात. समुद्रकिनारे कितीही सुंदर असले तरीही इथे फिरताना काळजी घ्यावी लागते. अनेकदा नकळत असे अपघात होतात जे फारच अनपेक्षित असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत असंच धक्कादायक दृश्य आपण पाहू शकतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक तरुणी मस्त फोटो काढण्याचा आनंद घेत असताना अचानक समुद्राच्या पाण्यातून सी लायन बाहेर येऊन तिला पाण्यात ओढताना दिसत आहे.

आजोबांची वाचवला नातीचा जीव

खरंतर सी लायन हा समुद्री जीव अत्यंत शांत प्राण्यांपैकी एक आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये सी लायनची वागणूक अत्यंत धक्कादायक होती. दरम्यान, या व्हिडिओत सी लायनने या तरुणीला अत्यंत वाईट पद्धतीने पाण्यात ओढले. यानंतर तिच्या आजोबांनी लगेच पाण्यात उडी घेतली आणि तिचा जीव वाचवल्याचे आपण पाहू शकतो. (Shocking Video) हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर discover.our.nature नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत सी लायनच्या वागणुकीसंबंधित महत्वाची माहितीदेखील शेअर केली आहे.

यात लिहिलंय, ‘सी लायन ह्यूमन फ्रेंडली सी क्रीचर प्राणी आहे. जो खडकाळ किनाऱ्यावर किंवा मानवनिर्मित किनाऱ्यावर राहतो. हा प्राणी सहसा आक्रमक नसतो. मात्र, प्रजनन काळात मादी सी लायन त्यांच्या प्रदेशाबाबत अधिक सतर्क आणि सावध असतात. अशा परिस्थितीत काहीवेळा ते आक्रमक असू शकतात. (Shocking Video) त्यामुळे, जर अशावेळी त्यांच्याजवळ एखादा माणूस वा इतर कोणी गेले तर आपल्याला धोका असल्याचे गृहीत धरून ते हल्ला करतात. त्यामुळे अशा प्राण्यांना पाहताना त्यांच्यापासून विशिष्ट अंतर ठेवा. विशेषत: त्यांच्या नैसर्गिक अधिवासात अधिक काळजी घ्या आणि दिलेल्या सूचनांचे पालन करा’.

Free Aadhaar Update : आधारकार्ड अपडेट करण्याबाबत सरकारची मोठी घोषणा; नेमका निर्णय काय??

Free Aadhaar Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्ड मोफत अपडेट (Free Aadhaar Update) करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे. UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत उद्या 14 जून 2024 रोजी संपत होती मात्र आता ती वाढवून 14 सप्टेंबर 2024 करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी अपडेट केल नाही त्यांच्यासाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. महत्वाच म्हणजे यापूर्वी सुद्धा आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवण्यात आली होती.

UIDAI ने दिली माहिती

आधार जारी करणारी संस्था, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार ज्या ग्राहकांनी आधार कार्ड अपडेट केलेलं नाही ते वापरकर्ते 14 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार अपडेट मोफत मिळवू शकतात. आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे नाव, लिंग, पत्ता, वय आणि बायोमेट्रिक माहिती इत्यादी माहिती असते. आधार कार्ड असेल तरच तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. तसेच प्रवास तिकीट बुकिंग आणि बँकेसंदर्भात काही कामे, शिक्षण इत्यादी सर्व गोष्टींसाठी आधार कार्ड महत्वपूर्ण ठरत. जातो.

कोणाला आहे अपडेटची गरज– Free Aadhaar Update

त्यांचे आधार 10 वर्षे किंवा त्याहून जुने आहे अशा वापरकर्त्यांना लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करायचे आहे. डेमोग्राफिक तपशील अपडेट करण्यासाठी, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत उपलब्ध आहे. मात्र आधार केंद्रावर जाऊन तपशील अपडेट करण्यासाठी (Free Aadhaar Update) तुम्हाला शुल्क भरावे लागेल.

आधारकार्ड अपडेट कस कराल ?

सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्या.
तुमच्या मोबाईल नंबरच्या मदतीने येथे OTP टाकून लॉगिन करा.
आता तुमचे सर्व डिटेल्स तपासा.
जर तुम्हाला तपशील बदलायचा असेल, तर तो पर्याय निवडा.
पुढे जा आणि तो तपशील दुरुस्त करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज पुरावा अपलोड करा.
यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला 14 अंकी URN नंबर मिळेल ज्याद्वारे तुम्ही आधार अपडेट प्रक्रियेचा स्टेट्स चेक करू शकता.

High Cholesterol Symptoms : तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय?? कसं समजेल? ‘ही’ गंभीर लक्षणे देतात संकेत

High Cholesterol Symptoms

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (High Cholesterol Symptoms) रोजच्या दगदगीत आपण आपल्या आरोग्याकडे कुठे ना कुठे लक्ष द्यायला कमी पडतोय, याची जाणीव होईपर्यंत आपण विविध आजारांचे शिकार झालेलो असतो. सद्यपरिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर, बदलत्या काळानुसार प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे. मात्र, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की,बदलणारी जीवनशैली आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक सिद्ध होते आहे. कामाचा- कौटुंबिक गोष्टींचा वाढणारा ताण आणि त्यात चुकीच्या सवयी आरोग्याची वाट लावण्यासाठी पुरेशा आहेत. हृदय विकार, स्ट्रोक, श्वसन विकार, मानसिक अस्थैर्य, लठ्ठपणा अशा अनेक समस्यांनी आज बरेच लोक त्रासलेले आहेत.

यातील कितीतरी समस्यांचे कारण वाढते कोलेस्ट्रॉल आहे. आजची तरुण पिढी या वाढत्या कोलेस्ट्रॉलच्या समस्येची मोठी झाली आहे. केवळ लठ्ठ नव्हे तर शरीरयष्टीने बारीक असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा वाढते कोलेस्ट्रॉल इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण करत आहे. (High Cholesterol Symptoms) कितीतरी लोकांना आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली आहे किंवा वाढते आहे याचा वेळीच सुगावा लागत नाही. परिणामी, अनेक वेळा शिरा पूर्णपणे बंद होईपर्यंत कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत जाते आणि त्यानंतर ब्लॉकेजेस, हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अशा वाढत्या कोलेस्ट्रॉलची काही लक्षणे असतात. जी माहित नसल्यामुळे पुढे जाऊन पश्चातापाची वेळ येते. म्हणूनच आज आपण उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे जाणून घेणार आहोत.

स्नायूंमध्ये वेदना होणे (High Cholesterol Symptoms)

अनेकदा आपल्याला अचानक हात, पाय दुखण्याची समस्या जाणवते. कित्येकदा असह्य वेदना होतात. ज्यांचे कारण आपल्याला माहित नसते. तर याचे कारण उच्च कोलेस्ट्रॉल असू शकते. जेव्हा आपल्या शरीरात प्लेक जमा होतो तेव्हा, ते रक्तवाहिन्यांना अवरोधित करते. या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘एथेरोस्क्लेरोसिस’ असे म्हणतात. आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने रक्त वाहिन्यांवर परिणाम होतो. परिणामी स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात. ज्यामुळे हात, पाय, खांदे ते अगदी बोटंसुद्धा दुखू शकतात.

अंग थरथरणे किंवा बधीरपणा येणे

बऱ्याचदा उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांमध्ये अंग थरथरणे आणि बधीरपणाची समस्या येऊ शकते. कारण कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने शरीराच्या काही भागांमध्ये रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होतात. (High Cholesterol Symptoms) परिणामी, अंगात थरकाप भरणे आणि काही प्रकरणांमध्ये बधीरपणा जाणवू शकतो. या परिस्थितीत उच्च कोलेस्ट्रॉल रक्तप्रवाहात रोख आणतो आणि अशावेळी दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

नखं पिवळी पडणे

जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर एक महत्वाचे लक्षण जे लगेच दिसून येते ते म्हणजे नखांचा रंग पिवळा बदलणे. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे नखांचा रंग बदलून पिवळा होऊ शकतो. (High Cholesterol Symptoms) हा संकेत तुमच्या शरीरातील खराब रक्त परिसंचरण असल्याचे सांगतो. उच्च कोलेस्ट्रॉलचे हे महत्वाचे लक्षण असून अशा परिस्थितीत लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

नखांना तडा जाणे

उच्च कोलेस्ट्रॉलच्या काही प्रकरणांमध्ये नखांची वाढ थांबते. इतकेच नव्हे तर कोलेस्ट्रॉलची पातळी जसजशी वाढत जाते तसतसा तुमच्या नखांचा रंगबदलत जातो आणि काही प्रकरणांमध्ये नखांना तडादेखील जाते. (High Cholesterol Symptoms) अशावेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन लवकरात लवकर उपचार सुरु करणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या.

Steamed Amla Benefits : मधुमेहींसाठी वाफवलेला आवळा ठरेल वरदान; रोज सेवन केल्यास होतील आश्चर्यकारक परिणाम

Steamed Amla Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Steamed Amla Benefits) बिघडती जीवनशैली आणि चुकीच्या सवयी यामुळे मानवी आरोग्य खराब होत आहे. गेल्या काही काळात हृदय विकार, श्वसन संबंधित समस्या आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मधुमेह हा आजार तर जागतिक पातळीवरील संकट होण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना दिसतोय. मधुमेहींना आपल्या आरोग्याबाबत कायम सतर्क राहावे लागते. आपल्या खाण्यापिण्यात येणारा पदार्थ आपल्या आरोग्यासाठी किती चांगला किती वाईट याची त्यांना काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्यांच्या आरोग्यावर लगेच परिणाम होतो.

मधुमेहात टाईप १ आणि टाईप २ असे प्रकार असतात. हे दोन्ही प्रकार हळूहळू माणसाला आतून कमजोर बनवतात. त्यामुळे मधुमेहींनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे तज्ञमंडळी सांगतात. (Steamed Amla Benefits) अशा मधुमेहींच्या आरोग्यासाठी आवळा हा अत्यंत गुणकारी ठरू शकतो. कारण, त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते. अशा औषधी आवळ्याचे सेवन विविध प्रकारे केले जाऊ शकते. कच्चा आवळा खाणे, लोणचे, रस, कँडी किंवा चटणी बनवूनसुद्धा आवळा खाता येतो. आज आपण आवळ्याच्या औषधी गुणधर्मांविषयी जाणून घेऊया. त्यासोबत आवळा इतर कोणकोणत्या समस्येंवर प्रभावीपणे काम करतो त्याबाबतही माहिती घेऊ.

वाफवलेले आवळा खाणे ठरेल आरोग्यदायी

आवळा हा व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, लोह यांचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे आवळा कसाही खाल्ला तरी आरोग्यवर्धक ठरतो. मात्र तज्ञ सांगतात की, आवळा वाफवून खाल्ल्याने शरीरात निरोगी बदल होऊ शकतात. (Steamed Amla Benefits) याबाबत न्युट्रिशनिस्ट सांगतात की, ‘कच्चा आवळा वाफवल्यानंतर त्याची चव आणखी चांगली लागते. तसेच रोज एक वाफवलेला आवळा खाल्ल्याने आपल्या शरीरात निरोगी बदल होऊ शकतात.

कारण, आवळा वाफवल्यानंतर देखील त्यातील व्हिटॅमिन सी टिकून राहते. हे एक प्रभावी अँटि ऑक्सिडंट आहे. जे इम्युनिटी सुधारण्यासाठी आणि शरीराचे संसर्गांपासून संरक्षण करण्यासाठी मदत करते. (Steamed Amla Benefits) शिवाय त्वचेचे आरोग्य, केसांचा पोत सुधारण्यास देखील मदत करते’. खास करून असा आवळा मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतो. कारण वाफवलेले आवळा नियमित खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. ज्याचा फायदा मधुमेहींचे आरोग्य रोखण्यास होतो. चला तर आवळ्याचे इतर आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.

वाफवलेल्या आवळ्याचे फायदे (Steamed Amla Benefits)

1. वाफवलेल्या आवळ्याचे सेवन केल्यास त्यातील अँटी ऑक्सिडंट आपल्या शरीराचे नुकसान करणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि फ्री रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करतात.

2. वाफवलेला १ आवळा नियमित खाल्ल्यास पचनक्रिया सुलभ होते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि आतड्यांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

3. खराब कोलेस्ट्रॉलमूळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबधी आजार होतात. (Steamed Amla Benefits) अशा आजारांपासून संरक्षण हवे असेल तर वाफवलेले एक आवळा नियमित खावा.

4. आवळा वाफवल्यावरसुद्धा त्यातील अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी कायम राहते. त्यामुळे असा आवळा नियमित खाल्ल्यास फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण मिळते. शिवाय याचा फायदा कोलजेन निर्मितीसाठी होतो. परिणामी, यातील नैसर्गिक रेडिअन्स त्वचेच्या समस्यांपासून संरक्षण देतात.

5. मधुमेहींबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्यासाठी वाफवलेले आवळा वरदान ठरतो. कारण, मधुमेहाने ग्रासलेल्या एखाद्या व्यक्तीने नियमित वाफवलेल्या आवळ्याचे सेवन केले तर त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आवळा वाफवल्यामुळे त्यातील सक्रिय संयुगे (ॲक्टिव्ह कंपाऊडस्) जपण्यास मदत होते. (Steamed Amla Benefits) परिणामी असा आवळा सर्व बाजूने मधुमेहींच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो.

Gold Price Today : सोने- चांदी झालं स्वस्त; खरेदीची हीच ती वेळ??

Gold Price Today 13 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफा बाजारात आज सोने- चांदीच्या किमती (Gold Price Today) दाणकन कोसळल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोने 71338 रुपये वर व्यवहार करत असून कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 0.64% म्हणजेच 458 रुपयांनी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे . तर दुसरीकडे चांदी 88780 रुपयांवर व्यवहार करत असून या किमतीत 1594 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांसाठी हि मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज MCX वर सोन्याचा भाव ७१३४१ रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात या किमती (Gold Price Today) खाली गेल्याचे पाहायला मिळाले.१० वाजता तर सोन्याचा दराने ७११९६ रुपयांची निच्चांकी पातळी गाठली होती. मात्र त्यानंतर या किमती हळू हळू वाढू लागल्या. सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ७१३३७ रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २४ कॅरेट १० ग्राम सोन्याची किंमत ७२१६० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६६१५० रुपये आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 66,150 रुपये
मुंबई – 66,150 रुपये
नागपूर – 66,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,160 रूपये
मुंबई – 72,160 रूपये
नागपूर – 72,160 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Mhada Housing : स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी; MHADA मुंबईत उभारणार 3600 घरे

Mhada Housing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mhada Housing) प्रत्येक माणसाचं स्वतःचं घर असावं, असं एक स्वप्न असतं. या स्वप्नासाठी प्रत्येकाची शक्य तेव्हढे प्रयत्न करायची तयारी असते. खास करून बड्या शहरात आपलं हक्काचं घर असावं, म्हणून प्रत्येकाची धडपड सुरु असते. वयाची अर्धी वर्ष निघून जातात आणि तरीसुद्धा बऱ्याच लोकांना मुंबईत घर घेणे होत नाही. आयुष्यात पाहिलेलं एक महत्वाचं स्वप्न स्वप्नचं राहतं. याच कारण म्हणजे, घराच्या वाढत्या किंमती. आजही कित्येक तरुण मंडळी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहत आहेत. पण ते पूर्ण होईल का? याची शाश्वती नसताना एक आशेचा किरण दिसू लागला आहे. एकीकडे घरांच्या किंमती आकाशाला भिडत असताना दुसरीकडे म्हाडाच्या साथीने अनेकांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार असे दिसत आहे.

स्वप्नपूर्ती होणार

आता मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत. कारण या स्वप्नांना म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्था आशेचं बळ देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकसुद्धा आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न बिनघोर पाहू शकतात. (Mhada Housing) या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून बड्या शहरांमध्ये अनेक घरे उभारली जातात आणि सोडतीच्या माध्यमातून ही घरे परवडणाऱ्या किमतींमध्ये विकली जातात. दरम्यान, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये घर घ्यायचे अनेकांचे स्वप्न आता म्हाडाच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होणार आहे. तशी नवी संधी लवकरच सर्वसामान्यांना मिळणार आहे.

मुंबईत म्हाडा उभारणार नवीन घरे (Mhada Housing)

वृत्तानुसार, येत्या कालावधीत म्हाडा गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून मुंबईत ३ हजार ६०० नव्या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या घरांसाठी विविध उत्पन्न गटातील नागरिकांना अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे. सन २०२४- २५ या आर्थिक वर्षात म्हाडाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी नव्या घरांची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये गोरेगाव, कन्नमवार नगर, अँटॉप हिल, पवई आणि मागाठाणे या भागांचा समावेश आहे. या घरांची उभारणी झाल्यानंतर लगेच पुढील कालावधीत म्हाडाकडून या घरांसाठी सोडत जाहीर केली जाईल. त्यामुळे अनेकांच्या घराचे लवकरच स्वप्न पूर्ण होणार आहे.

गतवर्षीच्या शिल्लक घरांचा होणार समावेश

गतवर्षी २०२४ मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून एकूण ४०८२ घरांसाठी सोडत जाहीर झाली होती. तेव्हा सोडतीदरम्यान या घरांमधून १५० घरांची विक्री अद्याप झालेली नाही. (Mhada Housing) त्यामुळे येत्या कालावधीतील प्रतीक्षा यादीत ज्या अर्जदारांचे नाव असेल त्यांना ही घरे उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. तशी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या पद्धतीने पुन्हा ही घरे अशीच राहिली तर येणाऱ्या कालावधीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या ३६०० घरांमध्ये शिल्लक १५० घरांचा समावेश होऊ शकतो.

न केवळ मुंबई तर इतर राज्यातही उभारणार घरे

म्हाडा गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात न केवळ मुंबई तर महाराष्ट्रातील अजून काही राज्यांमध्ये घरांची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती आणि नागपूरचा समवेश आहे. (Mhada Housing)

विनोद तावडे गट महाराष्ट्रात ॲक्टीव्ह झालाय; देवेंद्र फडणवीस काय करणार?

DEVENDRA FADNAVIS TAWDE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस की विनोद तावडे? महाराष्ट्र भाजपमध्ये नेमकं पॉवरफुल कोण? हा प्रश्न आम्हाला पडलाय त्याला कारण आहे पब्लिक डोमेन मध्ये चाललेल्या काही चर्चा… येणाऱ्या विधानसभेत भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून विनोद तावडेंना प्रमोट केलं जाईल…फडणवीसांना दिल्लीत पाठवलं जाईल… अशा या सगळ्या चर्चांचा सेंटर पॉइंट…महाराष्ट्र भाजपमध्ये अगदी सुरुवातीपासूनच फडणवीस गट आणि तावडे गट असे दोन गट सक्रिय असल्याची चर्चा माध्यमांमध्ये असते… मात्र फडणवीसांच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्यानंतर त्यांनी तावडे (Vinod Tawde) आणि त्यांच्या समर्थक मंडळींचा पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू केल्याचा आरोप हा नेहमीच होत असतो…मंत्रीपदावर असणाऱ्या तावडेंना 2019 च्या निवडणुकीत आमदारकीची साधी उमेदवारीही मिळाली नाही… इतकच काय तर त्यांच्या गटातल्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांसारख्या नेत्यांना मेनस्ट्रिम पॉलिटिक्स पासून साईडलाईनही करण्यात आलं…

मात्र कर्मा इज बॅक जसं म्हणतात तसं आता तावडे दिल्लीचा राजकारणातील बिग बॉस ठरलेत…तर फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राच्या राजकारणात पुरते अडकलेत…त्यामुळे सध्याच्या राजकारणाकडे थोडं बारकाईने पाहिलं तर महाराष्ट्र भाजपमध्ये नेमकी कुणाची हवा आहे? येत्या काळात राज्यातील भाजपची सूत्र कुणाकडे शिफ्ट होऊ शकतात? फडणवीस आणि तावडे या दोघांपैकी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? त्याचाच हा पॉलिटिकल आढावा…फडणवीस आणि तावडे या दोघांपैकी पॉवरफुल कोण आहे? हे समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला या दोघांचं वर्तमान राजकारण बघावं लागेल…

सध्याच्या कंडिशनला विनोद तावडे दिल्लीत चांगलेच सेट झालेत… एका मागून एक कामाचा रिझल्ट दाखवत ते भाजपच्या महामंत्री पदावर जाऊन पोहोचलेत… म्हणूनच ज्या 2019 मध्ये तावडेंना विधानसभेची उमेदवारी डावलण्यात आली होती… त्याच तावडेंनी 2024 च्या भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली…यावरून विनोद तावडेंच्या दिल्लीतील वजनाचा आपल्याला अंदाज येऊ शकतो…हरियाणा आणि बिहार राज्यांतील निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळे भाजप बरीच मजबूत झाली… एनडीए सरकारमध्ये किंगमेकर ठरलेले नितीश कुमार यांना युतीमध्ये घेण्यातही तावडे यांचा मोठा वाटा राहिलाय…याच सगळ्या कामांची गोळा बेरीज करता तावडेंचं नाव आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतही सर्वात पुढे आहे..

दुसरीकडे एक टर्म मुख्यमंत्री राहिल्यावर फडणवीस यांनी आपल्या प्रतिभेचा आणि काटशहाच्या राजकारणाची महाराष्ट्राला चुणूक दाखवून दिली होती…शरद पवारांच्या तोडीस तोड नवा चेहरा महाराष्ट्राला मिळालाय, अशा शब्दात त्यांच्या कामाचा गवगवा व्हायला लागला… पण 2019 मध्ये उलटा गेम पडून जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हापासून फडणवीस बॅकफुटला फेकले गेले… राजकीय महत्त्वकांक्षांतून शिंदे आणि अजित दादा भाजपसोबत आले…राजकीय डावपेच टाकून फडणवीसांनी पुन्हा सत्ता खेचून आणली खरी… पण हा फोडाफोडीचा डाव महाराष्ट्राच्या काही पचनी पडला नाही…त्याचंच रिफ्लेक्शन लोकसभा निकालावर पडलं… आणि भाजपच्या जागा 23 वरून 9 वर फेकल्या गेल्या…लोकसभा लीड केल्यामुळे अर्थात या पराभवाचं खापर फडणवीसांवर फुटलं…थोडक्यात पक्षातील राजकीय पातळीवर विनोद तावडेंचा हात धरण फडणवीसांना लांब लांब पर्यंत शक्य दिसत नाहीये…

फडणवीस आणि तावडे यांच्यापैकी पावरफुल कोण हे ठरवायचं असेल तर त्याला दुसरा फिल्टर लागतो तो म्हणजे मराठा कार्ड आणि सर्वसमावेशक चेहरा

महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा फॅक्टर सध्या पिकला आहे.. याचा ट्रेलर मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने दाखवून दिलाय…फडणवीसांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये, असं नरेशन या सगळ्यात बिल्डअप झालं… त्याचाच फटका म्हणजे भाजपाला मराठवाड्यात एकही जागा जिंकता आली नाही… ज्या भाजपाला ओबीसींचा पक्ष म्हणून ओळखलं जातं त्याच भाजपच्या पंकजा मुंडे यांसारख्या प्रस्थापित चेहऱ्याला ओबीसींचा प्रभाव असणाऱ्या बीडमधून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला…अर्थात या सगळ्याला कारणीभूत कोण ठरलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस…खरंतर फडणवीस सत्तेत असताना मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन त्यांनी शांतपणे हाताळायला हवं होतं… निवडणुकीच्या आधीच समाजाचा राग कसा शांत करता येईल, याचा प्रयत्न करायला हवा होता…पण असं काहीही न करता त्यांनी उलट जरांगे पाटलांवर आरोप करायला सुरुवात केली…याचा बूमरँग असा झाला? फडणवीस मराठा आणि मराठा आरक्षण विरोधी आहेत असा पर्स्पेक्टिव्ह विरोधकांनी सेट केला, ज्याचा भाजपला निवडणुकीत मोठा तोटा झाला…त्यात फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणविसांच्या बिघडलेल्या संबंधांबद्दल न बोललेलं बरं…

दुसरीकडे विनोद तावडे हे शांत, संयमी आणि अगदी पक्षाला अपेक्षित असं निर्भिड व्यक्तिमत्व आहे.. त्यात मराठा समाजातून येत असल्याने हा एक प्लस पॉईंट त्यांच्याकडे नेहमीच राहिलेला आहे…महामंत्री पदावर असले तरी त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे संबंध हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहेत… त्यामुळे सध्याच्या घडीला फडणवीसांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रातून होत असणारा विरोध आणि नेतृत्वासाठी असणारी पोकळी पाहता विनोद तावडे यांचं विमान महाराष्ट्रात लॅंड करुन त्यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी प्रोमोट केला जाण्याची शक्यता अधिक आहे…थोडक्यात तावडे यांच्याकडे एकाचवेळेस मुख्यमंत्रीपद तर त्याच वेळेस राष्ट्रीय अध्यक्षपद अशी डबल धमाका ऑफर त्यांच्याकडे आहे तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या फडणवीसांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करण्याची सध्या वेळ आलीय…

फडणवीस आणि तावडे यांच्यापैकी पावरफुल कोण हे ठरवायचं असेल तर यातल्या शेवटच्या मुद्द्याचा विचार करायला लागतो तो म्हणजे संघांचा आणि दिल्लेश्वरांचा पाठींबा…. होय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि दिल्ली हायकमांडचं पारडं या दोघांपैकी कुणाच्या बाजूने झुकतंय, यावरही बरीच समिकरण अवलंबून आहेत… सांगायचं झालं तर अमित शहा आणि फडणवीस यांच्यात सुप्त संघर्ष असल्याच्या बातम्या आपल्या अनेकदा कानावर पडल्या असतील. त्यात संघालाही शांतपणे कसलाही आरडोओरडा न करता निमुटपणे काम करणारी माणसं सत्तेच्या केंद्रस्थानी असलेली आवडतात… थोडक्यात काय तर या दोन राजकारण्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भाजप हायकमांड आणि संघाचंही तावडेंच्या बाजूने पारडं जड दिसतं…

तर फडणवीस आणि तावडे यांच्यापैकी पावरफुल कोण? या प्रश्नाच्या निष्कर्षापर्यंत पोहचायचं असेल तर कोणत्याही अँगलने पाहायचं झालं तर तावडे फडणवीसांपेक्षा कित्येक पटींनी यात वरचढ ठरलेले दिसतात… त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र भाजपमध्ये मोठी उलथापालथ झालीच तर तावडे यांचं नाव मोठ्या पोजिशनला आपल्याला दिसेल एवढं मात्र नक्की… बाकी तुम्हाला काय वाटतं? फडणवीस आणि शिंदे यांच्यापैकी नेमकं कोण पॉवरफुल आहे, असं तुम्हाला वाटतं?

Road Trip : पावसाळ्यात लॉन्ग ड्राइव्ह करायची आहे? तर ‘ही’ ठिकाणं करा एक्स्प्लोर; घ्या प्राकृतिक सौंदर्याचा आनंद

Road Trip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Road Trip) पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सगळ्यांनाच आवडतो. कारण, पावसाळ्याच्या दिवसात निसर्गाचे सौंदर्य दहा पटीने वाढलेले असते. असा निसर्ग मनाला विशेष आनंद देतो आणि हा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात एखादी रोड ट्रिप करावी. त्यात जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर आवर्जून मोठी सुट्टी काढून पावसाळ्यात रोड ट्रिप प्लॅन करा. आपल्या मित्र मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबियांसोबत केलेली ही ट्रिप तुम्हाला तणावमुक्त करेल. आता अशी ट्रिप करायची तर चांगली आणि परफेक्ट ठिकाणं माहित हवीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रोड ट्रीपसाठी बेस्ट ऑप्शन्स देणार आहोत. कमी अंतर, कमी वेळ आणि एक अनोखा आनंद देणाऱ्या या रोड ट्रिप तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवालं.

1. मुंबई ते गोवा (Road Trip)

मुंबई ते गोवा ही लॉन्ग ड्राइव्हसाठी एक बेस्ट रोड ट्रिप आहे. मुंबई ते गोवा हे सुमारे ५९० किलोमीटर अंतर आहे. गुळगुळीत रस्ते कापत, आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य पाहत मुंबईहून गोव्याला रोडने जाणे खूपच आनंददायी असू शकते. मुंबईतून निघाल्यापासून गोव्याला पोहोचण्यासाठी १० ते ११ तास लागू शकतात. मात्र, या रोड ट्रिपदरम्यान डोळ्यांना सुखावणारे निसर्गाचे विहंगम दृश्य पाहून मनाला विशेष आनंद मिळतो. याशिवाय अधे मध्ये अनेक फूड पॉईंट्स आहेत. त्यामुळे जाताना भूक लागली तर त्याचीही चिंता मिटेल.

2. दिल्ली ते अल्मोडा

पावसाळ्याच्या दिवसात डोंगरी भागांचे सौंदर्य अनेक पटीने वाढते. पण अशा अनेक भागात दरड कोसळण्याचा धोका असतो. ज्यामुळे अशा ठिकाणी जाणे धोकादायक ठरू शकते. असे असले तरीही तुम्हाला जर योग्य मार्गांची माहिती असेल तर अशा ठिकाणी जाणे तुमच्यासाठी सोपे होऊ शकते. (Road Trip) असा एक सुंदर रस्तेप्रवास करायचा असेल तर दिल्ली ते अल्मोडा असा प्रवास नक्की करा. दिल्ली ते अल्मोडा हे अंतर सुमारे ३७० किलोमीटर इतके आहे. पावसाळ्यात येथील रस्त्यांच्या आजूबाजूला हिरवळ असते आणि दिल्ली ते अल्मोडा या रोड ट्रिपमध्ये लागणारे भीमताल, लॅन्सडाउन, कासारदेवी मंदिर देखील पाहण्यासारखे आहे.

3. दार्जिलिंग ते गंगटोक

जर तुम्हाला पावसाळ्यात एक भन्नाट रोड ट्रिप करायची असेल तर दार्जिलिंग ते गंगटोक हा रस्तेप्रवास तुमच्यासाठी अत्यंत आनंददायी ठरू शकतो. पावसाळ्यात दार्जिलिंगला जाणे यापेक्षा सुखद आणखी काय असू शकते? कारण, या सीझनमध्ये दादार्जिलिंग ते गंगटोक फिरायला जी मजा येते ती इतर कोणत्याच रस्ते प्रवासात येत नाही. (Road Trip) म्हणूनच पावसात तुम्ही दार्जिलिंग ते गंगटोक अशी रोड ट्रिप प्लॅन करू शकता. या दोन्ही ठिकाणांमध्ये सुमारे १०० किलोमीटर इतके अंतर आहे. हा प्रवास तुम्ही NH10 वरून केला असता अवघ्या ४ तासांचा वाटतो.

4. उदयपूर ते माउंट अबू

पावसाळ्याच्या दिवसात भेट देता येईल असे सुंदर ठिकाण म्हणजे राजस्थानमधील उदयपूर. त्यातही तुम्हाला जर सुंदर रस्ते प्रवासाचा आनंद लुटायचा असेल आणि सुरक्षित व मजेशीररित्या प्रवास करायचा असेल तर उदयपूर ते माउंट अबू एक बेस्ट रोड ट्रिप ठरेल. उदयपूर हे शहर तलावांसाठी प्रसिद्ध आहे. (Road Trip) ज्यात माउंट अबू हे राजस्थानचे एकमेव हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात इथला रस्ता नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असतो. त्यामुळे प्रवासादरम्यान एक वेगळाच हर्ष प्राप्त होतो.

5. बंगळुरु ते कुर्ग

पावसाळ्यात लॉन्ग ड्राइव्ह करायची असेल तर बंगळुरु ते कुर्ग एक भन्नाट रोड ट्रिप होऊ शकते. या दोन्ही ठिकाणांमध्ये सुमारे २६५ किलोमीटर इतके अंतर आहे. इथला रस्ता पावसामध्ये प्रवासासाठी चांगला, सुरक्षित आणि सोयीचा आहे. (Road Trip) शिवाय या रोड ट्रीपदरम्यान अनेक निसर्गरम्य दृश्ये दिसतात. जी पाहून अनोखा आनंद मिळतो.

One Day Trip Spots : पावसाळ्यात वन डे ट्रीपसाठी ‘ही’ ठिकाणं एकदम बेस्ट; जाल तर म्हणाल WOW

One Day Trip Spots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (One Day Trip Spots) सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असून सगळीकडे निसर्गाने हिरवाईची चादर ओढली आहे. पावसाच्या दिवसात निसर्गाचा एक वेगळच अवतार पहायला मिळतो. जो सगळ्यांनाच आवडतो. मनाला सुखावणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत हिरवाईने नटलेला निसर्ग, धुक्याची शुभ्र चादर अन त्यासोबत चिंब झालेले डोंगर पाहणे आल्हाददायी अनुभव देणारे आहे. त्यामुळे पाऊस सुरु झाला की, कुठेतरी मस्त फिरायला जायचं प्लॅनिंग सुरु होतं. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पावसाळ्यात आणखीच सुंदर दिसतात आणि त्यांचे हे नैसर्गिक सौंदर्य आपल्याला आकर्षित करतं.

पावसाच्या रिमझिम सरींमध्ये हिरवा शालू पांघरलेला निसर्ग जवळून पाहायचा असेल तर किमान वन डे पिकनिक (One Day Trip Spots) तरी जरूर करा. ज्यामुळे रोजच्या दगदगीतून तुम्हाला थोडीशी शांतता मिळेल आणि मनावरील ताण हलका होईल. बऱ्याचदा ऑफिसमधून सुट्टी काढून फिरायला जाणे जमत नाही. अशावेळी वन डे पिकनिक प्लॅन करणे फायद्याचे ठरते. पण मग एका दिवसात कुठे फिरून यायचं? असा प्रश्न पडतो. याचं उत्तर आज आम्ही देऊ. महाराष्ट्रात अशी बरीच ठिकाणे आहेत जी निसर्गाने समृद्ध असून वन डे पिकनिकसाठी बेस्ट आहेत. चला त्याविषयी जाणून घेऊया.

1. लोणावळा – खंडाळा

Lonavala Khandala

मुंबई पुण्याजवळील लोणावळा आणि खंडाळा ही अत्यंत सुंदर ठिकाणे आहेत. (One Day Trip Spots) निसर्गाने समृद्ध अशी ही ठिकाणे पावसाळ्यात आणखीच सुंदर दिसतात. डोंगर, दऱ्या, हिरवाई, धबधबे पहायचे असतील आणि निसर्गाच्या सौंदर्यात हरवून जायचे असेल तर लोणावळा खंडाळाला जरूर जा. इथे तुम्ही तुमच्या प्रायव्हेट गाड्यांची किंवा बाईकवरून लॉन्ग ड्राईव्हची मजा घेऊ शकता.

2. माथेरान (One Day Trip Spots)

MATHERAN
MATHERAN

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले माथेरान हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. इथे कोणत्याही ऋतूमध्ये फिरायला जायची एक वेगळीच मजा आहे. त्यात जर पावसाळा असेल तर इथला निसर्ग पर्यटकांना फारच आकर्षित करतो. मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असणारे हे एक असे डोंगरी शहर आहे जिथले शांत वातावरण आणि निसर्गाचे विहंगम दृश्य मनाला भुरळ घालतात. त्यामुळे सुट्टी मिळत नसेल तर वन डे साठी हा एक बेस्ट पर्याय आहे. इथे तुम्ही टॉय ट्रेनचा प्रवास करून निसर्गाचा आनंद घेऊ शकता. शिवाय नौकाविहार आणि हॉर्स रायडिंगसुद्धा करू शकता.

3. अलिबाग

Alibaug

अलिबाग हे एक असे पर्यटन स्थळ आहे जिथली शांतता तुम्हाला रोजच्या गजबजाटातून क्षणभर विश्रांती देऊ शकतात. मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेले अलिबाग इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. या ठिकाणी नागाव बीच तसेच अक्षी बीच फिरण्यासारखे आहेत. (One Day Trip Spots) पावसाळ्याच्या दिवसात इथले वॉटर स्पोर्ट्स बंद असले तरीही निसर्ग अगदी पाहण्यासारखा असतो. त्यामुळे या ठिकाणी निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता येईल. शिवाय स्वादिष्ट समुद्री खाद्यपदार्थांची चव घ्यायची असेल तर जवळच्या जवळ अलिबागला हे ठिकाण एकदम बेस्ट.

4. मुंबई- पुणे जुना महामार्ग

Mumbai_ Pune Old Highway

ऑफिसमधून सुट्टी मिळत नसेल पण निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर धावपळीपासून दूर आणि तरीही शहरापासून जवळ अशा मुंबई- पुणे महामार्गावर एक लॉन्ग ड्राइव्ह तो बनती है!! (One Day Trip Spots) बऱ्याच लोकांना निसर्गात रमायला आवडत. यांपैकी एक तुम्ही असाल तर मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर प्रवास करा. पावसाळ्याच्या दिवसात हा महामार्ग प्रवासादरम्यान अनोखा आनंद देतो. या आनंदासाठी मुंबई ते पुणे असा जुन्या महामार्गावरून प्रवास करा. आजूबाजूची दृश्य तुमच्या मनाला प्रचंड आनंद देतील.