Sunday, December 21, 2025
Home Blog Page 679

रोहित, पार्थ की युगेंद्र पवार … ?? राष्ट्रवादीचा खरा वारसदार ‘हा’ असेल

Rohit parth yugendra pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा, रोहितदादा, पार्थदादा, जयदादा आणि आता युगेंद्रदादा… बारामतीच्या पवार कुटुंबात एका मागून एक येणाऱ्या दादांची ही लाईन वाढत चाललीये… यातले जय आणि पार्थ अजित पवार गटातील…. तर रोहित आणि युगेंद्र हे शरद पवार गटातील… बारामतीच्या राजकारणात आधी कसं सगळं सोर्टेड होतं… दिल्लीच्या राजकारणात ताईंनी लक्ष घालायचं तर राज्याचं सगळं राजकारण दादा बघणार…पण याच सगळ्यात राष्ट्रवादीत दोन गट पडतात काय…आणि एकामागून एक पवार कुटुंबातील नवे चेहरे राजकारणात उडी घेतात काय.. पवार कुटुंबातच नव्या दमाचे 5 ते 6 दादा सध्या राजकारणात ऍक्टिव्ह असल्यामुळे येणाऱ्या काळात बारामतीचा दादा कोण बनतोय? शरद पवार, अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबाचा वारसा नक्की कोणत्या दादाकडे शिफ्ट होऊ शकतो? नव्याने राजकारणाच्या रिंगणात आलेल्या या दादांचे प्लस मायनस काय आहेत? आणि या सगळ्याचा पवार कुटुंबावर कसा इम्पेक्ट पडू शकतो? त्याचाच हा रिपोर्ट…

बारामतीच्या या पवार कुटुंबातील पहिला दादा आहे तो रोहितदादा…

शरद पवारांच्या राजकारणाकडे बघत पॉलिटिक्समध्ये उतरलेले दादा म्हणजे रोहितदादा..रोहित पवार हे शरद पवारांचे सख्खे भाऊ अप्पासाहेब पवार यांचे नातू…रोहित पवारांची राजकीय कारकीर्द बारामतीतूनच सुरू झाली. 2017 मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे ते सदस्य बनले. त्यांचा झेडपी मतदारसंघ बारामतीतला शिरसूफळ हा होता… मात्र, दोन वर्षांनी आलेल्या म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीतच त्यांनी मोठी रिस्क घेतली… आणि आमदारकीसाठी मतदारसंघ निवडला तो दुष्काळी कर्जत जामखेडचा…इथले विद्यमान खासदार आणि तेव्हाचे कॅबिनेट मंत्री असणाऱ्या भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित दादा जायंट किलर ठरले… आणि मोठ्या दिमाखात खासदार झाले…प्रतिकूल परिस्थितीत विजय खेचून आणायचा ही पवारांची ‘किलर इंस्टिंक्ट’ रोहित पवारांनी यावेळेस दाखवली होती…शरद पवारांनी आपलं नेतृत्त्वं महाराष्ट्रभर आणि विविध क्षेत्रात पसरवलं, तसंच रोहित पवार करतायेत. मग त्यासाठी राज्यभरात फिरणं असो, पत्रकारांशी मैत्री करणं असो, कलाकारांना भेटणं असो, इत्यादी गोष्टी ते करतात. राजकारणाच्या पलिकडच्या क्षेत्रातही स्वत:ला जोडून घेणं ही पवारांची शैली त्यांनी आत्मसात केलीय…

शिक्षण आणि रोजगार संबंधीचे प्रश्न असोत की एमआयडीसीचा मुद्दा रोहित पवार यांनी पहिल्याच टर्ममध्ये स्वतःला स्टेट लेवलचा नेता बनवण्यासाठी विविध टॅक्टीक वापरल्या… आणि आता त्यात त्यांना यश येताना दिसतंय…अजित पवार हे पक्ष फुटीनंतर दुसऱ्या गोटात गेल्यावर आपलं नेतृत्व सिद्ध करायला रोहितदादांना आणखीनच स्कोप मिळाला… अजित पवार, छगन भुजबळ ते प्रफुल्ल पटेल यांसारख्या पहिल्या फळीतील नेत्यांना ते खडे बोल सुनावू लागले… शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचं वजन वाढलं…लोकसभेच्या प्रचारात त्यांनी शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या प्रचारामुळे आणि तब्बल 8 जागा जिंकल्यामुळे येणाऱ्या काळात रोहित दादांना मोठे फ्युचर आहे… 2050 पर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न रोहित दादा बाळगून आहेत अशी चर्चा असते… त्यामुळे हा पक्षातील फाटाफुटीचा सगळा खेळ रोहित दादांच्या पथ्यावर पडलाय असं म्हणायला हरकत नाही…

बारामतीच्या राजकारणातील दुसरा दादा आहे तो पार्थदादा…

अजितदादांचे पुत्र पार्थदादा यांच्या राजकारणाची सुरुवातच पराभवापासून झाली…मागचा पुढचा कुठलाही राजकीय अनुभव नसताना पार्थ पवार यांना मावळमधून 2019 चं लोकसभेचं तिकीट देण्यात आलं… अजितदादांनी संपूर्ण ताकत लावूनही पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला…पवार कुटुंबातील हा पहिलाच पराभव असल्याने या धक्क्यातून कुणीही लवकर सावरू शकला नाही… अजित दादा पार्थ पवारांकडे आपला राजकीय वारस म्हणून पाहतात…मात्र त्यांच्या पॉलिटिकल लॉन्चिंगचा प्रयोगच फसल्याने अजितदादांवर बरीच ठिकाही झाली… एकदा खासदारकीला पडल्यावर मात्र राजकारणात फारसे काही दिसले नाहीत.. नाही म्हणायला महाविकास आघाडीच सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, म्हणून लिहिलेल्या पत्रामुळे ते एकदा फोकसमध्ये आले होते…

त्यावर पार्थ पवार यांच्या मताला कवडीची किंमत नाही, ते अपरिपक्व आहेत… असं म्हणून स्वतः शरद पवारांनीच आपल्या नातवाला निकालात काढलं होतं…यानंतर राम मंदिरापासून अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बराच गोंधळ उडाला होता…पवार कुटुंबात विरोध होता.. पण तो सोशल मीडियावरून जग जाहीर करायला पार्थ पवार यांनी सुरुवात केली आणि तेव्हाच पवार कुटुंबात कुठेतरी विस्तव आहे? याची जाणीव व्हायला सुरुवात झाली…नंतर अजित दादांनी जेव्हा पक्ष फोडला… तेव्हा पार्थ पवार पुन्हा एकदा लाईम लाईट मध्ये आले… प्रचार सभांना आणि विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांना भेटीगाठी सुरू झाल्या…त्यांना सरकारकडून वाय प्लस सुरक्षाही देण्यात आली…बारामतीतून आपल्या आईला निवडून आणण्यासाठी पार्थ पवार फ्रंटला आले होते… मात्र हे सगळं करूनही निकाल उलटा लागला… आणि सुप्रियाताई निवडून आल्या…मात्र असं असलं तरी येणाऱ्या विधानसभेत अजित पवार पार्थ दादांसाठी काही नवा विचार करू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे…

बारामतीच्या राजकारणतील तिसरा दादा अर्थात युगेंद्रदादा…

तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी फुटल्यावर बारामतीमधून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा पवार कुटुंबातील सामन्याची घोषणा झाली तेव्हा युगेंद्र पवार हे नाव सर्वात पहिल्यांदा मीडियासमोर आलं… शरद पवारांची भेट घेऊन ते राजकारणात ऍक्टिव्ह झाले…बारामती लोकसभा मतदारसंघाची सुप्रिया ताईंच्या प्रचाराची सगळी धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती… घोंगडी बैठकांपासून गाव दौऱ्यापर्यंत बारामती आणि परिसरात त्यांनी चांगला कनेक्ट वाढवला…अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव…युगेंद्र पवार हे स्वभावानं अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी आहेत…शरयू ऍग्रोचे सीईओ, बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार तर बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही असल्याने वय लहान असलं तरी त्यांचा लोकांच्यातील कनेक्ट हा सुरुवातीपासूनच राहिलाय…बारामती मतदारसंघात त्यांनी केलेल्या वादळी प्रचारामुळेच अजितदादांवर प्रचाराच्या सांगता सभेतून युगेंद्र पवारांवर टीका करण्याची वेळ आली…

पण आपल्याला टारगेट केलं जातं असलं तरी त्यांनी संयम कायम ठेवला… त्यांनी केलेल्या मोर्चे बांधणीचं यश म्हणून की काय सुप्रियाताई निवडून आल्या . अर्थात या सगळ्यामागे युगेंद्र पवार यांचा एक राजकीय पर्पज आहे तो म्हणजे बारामती विधानसभेचा…बारामती विधानसभेला अजित दादांच्या विरोधात शरद पवार गटाकडून आमदारकीच्या मैदानात उतरेल असा सध्या एकही तगडा उमेदवार नाही…अशा वेळेस बारामतीची विधानसभा युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी होईल, अशी चर्चा आता पुऱ्या पंचक्रोशीत होऊ लागलीय…युगेंद्र पवार यांनी विधानसभेसाठी आपल्या प्रचाराचा नारळही फोडलाय…बारामती विधानसभेत अजितदादांना हरवून जायंट किलर ठरायचंच असा जणू त्यांनी चंग बांधलाय…त्यामुळे बाकी दादा जाऊंद्या पण जर युगेंद्र पवार यांनी ठरवलं ते केलं तर यामुळे डायरेक्ट अजितदादांच्या राजकारणाला नख लागू शकतं… त्यामुळे पवार कुटुंबातील राजकारणात हातपाय मारणाऱ्या या दादांपैकी येत्या काळात कोण कुणाला वरचढ ठरेल? हे आत्ताच सांगता येणं तसं जरा जास्त अवघड आहे… बाकी तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादीचा पुढचा दादा कोण असेल? रोहित, युगेंद्र की पार्थ… तुम्हाला काय वाटतं? तुमचं काही वेगळं मतं असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Amrit Bharat Express : वर्षभरात धावणार 50 अमृत भारत ट्रेन; भारतीय रेल्वेचा खास प्लॅन

Amrit Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षांपासून देशातील वाहतूक आणि दळणवळण सोप्प झालं आहे. देशातील रस्ते आणि रेल्वे ट्रॅक मोठ्या प्रमाणात विकसित झाले असून यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होत आहे. केंद्र सरकार कडून अजूनही नवनवीन योजना आणि प्रोजेक्ट सुरु आहेत. भारतात वंदे भारत एक्सप्रेस नंतर अमृत भारत ट्रेन (Amrit Bharat Express) चालवण्यात येत आहे. सध्या तरी देशात फक्त २ अमृत भारत ट्रेन धावत असून या आर्थिक वर्षात 50 अमृत भारत ट्रेन रुळावर आणण्याची रेल्वेची योजना आहे.

खर्च असणार कमी – Amrit Bharat Express

अमृत ​​भारत ट्रेन या नॉन-एसी गाड्या आहेत आणि त्यामध्ये द्वितीय श्रेणीचे, अनारक्षित डबे आणि स्लीपर कोच यांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आधी नमूद केले की आगामी अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये देशभरातील विविध मार्गांवर सेवा देणारे वातानुकूलित (एसी) आणि नॉन-एसी दोन्ही डबे असतील. महत्वाची गोष्ट म्हणजे अमृत ​​भारत ट्रेनचे तिकीट परवडणारे असण्याची अपेक्षा आहे. उदाहरणार्थ, 1,000 किमी प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे 454 रुपये मोजावे लागतील.

अहवालानुसार, अमृत ​​भारत ट्रेनमध्ये 22 डबे आहेत, ज्यामध्ये अनारक्षित प्रवाशांसाठी 8 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे, 12 द्वितीय श्रेणीचे 3-स्तरीय स्लीपर कोच आणि दोन गार्ड डब्यांचा समावेश आहे. अमृत ​​भारत ट्रेन ही LHB पुश-पुल ट्रेन आहे, जिच्या दोन्ही टोकांना चांगल्या प्रवेगासाठी लोकोमोटिव्ह आहेत. ट्रेनचे डिझाईन अतिशय छान आणि आकर्षक आहे. साहित्य ठेवायला मोठी जागा यामध्ये मिळतेय. बसायला चांगल्या आणि आधुनिक सीट्स आहेत. मोबाईल चार्जिंगसाठी सॉकेट आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा , एलईडी लाईट्स यांसारख्या सुविधा सुद्धा अमृत ​​भारत ट्रेनमध्ये (Amrit Bharat Express) प्रवाशांना मिळतात.

सुनेत्रा पवारांना राज्यसभा? आजच अर्ज दाखल करण्याची शक्यता

sunetra pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव फायनल करण्यात आलं असून आजच दुपारी त्या आपला अर्ज भरणार आहेत. काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली, त्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) नावावर एकमत झालं आहे. आज दुपारी दीड वाजता सुनेत्रा पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. शरद पवार गटाकडून ही राज्यसभा आपल्याला मिळाल्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी 27 फेब्रुवारीला 2024 ला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. या जागेचा कार्यकाळ 4 जुलै 2028 पर्यंत असणार आहे. याच जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. खरं तर राज्यसभेसाठी अजित पवार गटातून छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी आदी नावे चर्चेत होती. अखेर सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीला आता एक नव्हे तर दोन खासदार मिळणार आहेत. कारण, शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी आधीच बारामतीमध्ये विजय मिळवला आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्या प्रसिद्ध शैक्षणिक संस्था विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्या बारामती मतदारसंघातून उभ्या होत्या. मात्र सुप्रिया सुळे यांनी त्यांचा दणदणीत पराभव केला. या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती. त्यामुळे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवायचं कि छगन भुजबळ यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याला राज्यसभा द्यायची अशा धर्मसंकटात अजित पवार होते. अखेर सुनेत्रा पवार यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

…. तर मी बारामतीची जागा 1000 टक्के जिंकलो असतो; शिवतारेंचं मोठं विधान

vijay shivtare ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निडवणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिली ती म्हणजे बारामतीची निवडणूक.. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद- भावजयीच्या लढाईत मधल्या काळात विजय शिवतारेंनी सुद्धा अपक्ष अर्ज भरत रंगत आणली होती. दोन्ही पवारांना पाडण्यासाठी मी उभा आहे असेही शिवतारे म्हणाले होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सांगण्यानुसार शिवतारेंनी अर्ज मागे घेतला आणि सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केला. परंतु आता निवडणूक निकालानंतर शिवतारेंनी एक मोठं विधान करत अजित पवारांना डिवचलं आहे. मी अपक्ष उभा असतो तर १००० टक्के जिंकलो असतो असं विजय शिवतारेंनी म्हंटल आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना विजय शिवतारे म्हणाले, बारामतीत महायुतीची जागा निवडून यावी, अशी सर्वांची इच्छा होती, पण ही जागा जर मी अपक्ष लढलो असतो, तर एक हजार टक्के जिंकलो असतो. कारण दोन्ही उमेदवारांना मोठा विरोध होता. इथे पक्ष नाहीत, तर दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. एक पवार प्रो आणि दुसरा पवार विरोधी आहे. पाच लाख ८० हजार इतकं पवार विरोधी मतदान आहे. त्यांना दोन्ही उमेदवारांना मतदान करायचं नव्हतं. त्यामुळे मी एक हजार टक्के निवडून आलो असतो.

दरम्यान, शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या जमिनीच्या मुद्द्यावर सुद्धा शिवतारेंनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार कोणाचही ऐकून जाहीर स्टेटमेंट देत असतील तर माझ्याकडे भरपूर माहिती आहे, पण मी तुमचा आदर करतो. तुम्ही कोणाचही ऐकून नका ना बोलू. विजय शिवतारेने जे काही केलं आहे ते सगळ्यांना माहित आहे. मी सगळं उघड-उघड केलं आहे असं विजय शिवतारे म्हणाले,

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी मिळेल स्वर्गाचा अनुभव; पावसाळ्यात नक्की भेट द्या

matheran

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून चांगला मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. पावसाळा सुरू झाला की सगळ्यांचे लक्ष निसर्गाकडे असतं. कारण निसर्गमध्ये फिरायला लोकांना खूप जायला आवडते. जर तुम्ही देखील या वीकेंडला जाण्याचा प्रयत्न करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी अशा एका पर्यटन स्थळाबाबत सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला पावसाचा आनंद घेता येतो. निसर्गाचा देखील आनंद पूर्णपणे घेता येईल. मुंबई आणि पुण्यापासून हे ठिकाण अगदी काही तासांच्या अंतरावर आहे. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला नक्कीच स्वर्गाचा आनंद घेता येईल. या पर्यटन स्थळाबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

आज आपण ज्या ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत ते ठिकाण आहे माथेरान. माथेरान हे महाराष्ट्रातील एक सुंदर असे हिल स्टेशन आहे. मुंबईपासून केवळ 100 किलोमीटर अंतरावर माथेरान आहे. तर आता तुम्ही माथेरानला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आपण त्याबद्दलची सगळी माहिती जाणून घेऊया.

मुंबई किंवा पुण्यात राहणाऱ्या लोकांना एका सुंदर ठिकाणी भेट द्यायची असेल, तर त्यांच्यासाठी माथेरान हा एक चांगला पर्याय असू शकतो. या ठिकाणी उन्हाळ्यात देखील अनेक लोक फिरण्यासाठी येतात. परंतु पावसाळ्यात या ठिकाणी खूप गर्दी असते. आणि वातावरण देखील खूप चांगले असते. माथेरानमध्ये तुम्हाला अनेक धबधबे पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे निसर्ग आणि धुक्यामध्ये वसलेले माथेरान पाहण्याचा अनुभव तुम्हाला घेता येईल.

माथेरानला कसे जायचे ?

माथेरानला जाण्यासाठी सगळ्यात मस्त पर्याय म्हणजे लोकल ट्रेन. तुम्ही दादर ठाणे कल्याण येथून खोपोली किंवा कर्जतला जाणारी लोकल ट्रेन पकडू शकता. त्यानंतर तुम्ही नेरळ या स्थानकावर उतरायचे आणि नेरळमधून माथेरानला जाण्यासाठी टॅक्सी किंवा बस असतात त्याने तुम्ही प्रवास करू शकता.

माथेरानमध्ये प्रवेश शुल्क किती?

माथेरानला फिरायला जाण्यासाठी तिथे तुम्हाला काही शुल्क देखील भरावे लागते परंतु हे खूपच कमी आहे तुम्ही केवळ एका दिवसात देखील भेट देऊ शकता किंवा दोन दिवसही राहू शकता. येथे राहण्यासाठी चांगले हॉटेल्स देखील आहे जी तुम्हाला दीड हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत मिळतात. येथे राहण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च येत नाही.

माथेरानमध्ये भेट देण्यासाठी काही ठिकाणं

माथेरानमध्ये गेल्यावर तुम्हाला वेगवेगळे पोलीस देखील पाहायला मिळू शकतील यामध्ये मंकी पॉईंट पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, शिवाजीचा जिना, शार्लोट लेक. येथे तुम्हाला टॉय ट्रेनचा आनंद देखील घेता येऊ शकतो. परंतु पावसाळ्यात ही ट्रेन बंद ठेवली जाते. तुम्ही घोड्यावरून सवारी देखील करू शकता. आणि येथील दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर रांगेत उभं राहण्याची कटकट मिटली; प्रवाशांना मिळणार ‘ही’ खास सुविधा

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Airport) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) दररोज अनेक विमानं उड्डाण घेत असतात. त्यामुळे नियमित स्वरूपात मोठ्या संख्येने प्रवाशांची ये- जा सुरु असते. दरम्यान, अनेकदा बऱ्याच प्रवाशांकडून विमानतळावर बराच काळ प्रतीक्षा करावी लागल्याच्या तक्रारी तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, आता या तक्रारींची संख्या कमी होणार असे चिन्ह दिसत आहे. कारण, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक महत्त्वपूर्ण परिवर्तन घडून आले आहे. ज्यामुळे प्रवाशांसाठी हवाई प्रवास आनंददायी होणार आहे.

मुंबई विमानतळावर महत्वाचे परिवर्तन (Mumbai Airport)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता लांबलचक रांगा आणि कंटाळवाणी वाट पाहण्याचे दिवस संपले आहेत. कारण, मुंबई विमानतळाने आपली ई- गेट क्षमता दुप्पट केल्याचे समोर आले आहे. वृत्तानुसार, या परिवर्तनामुळे प्रवेश प्रक्रियेची वेळ १ मिनिटापेक्षा कमी झाली आहे. परिणामी, प्रवाशांना याचा चांगला लाभ होणार आहे. यापूर्वी, प्रवाशांना कर्बसाइड (लँडसाइड) प्रवेश पॉइंटवर कायम प्रतीक्षा करावी लागत होती.

(Mumbai Airport) मात्र, आता टर्मिनल १ आणि २ वर एकूण ६८ ई- गेट्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे, मुंबई विमानतळ मोठ्या संख्येतील प्रवाशांना कार्यक्षमतेने हाताळू शकते. यामुळे CSMIA ची प्रक्रिया क्षमता टर्मिनल २ वर ताशी ७,४४० प्रवासी आणि टर्मिनल १ वर २,१६० इतकी वाढेल.

नुकतेच सुरु केलेले नवे ई- गेट्स डिजीयात्रा (भारताची डिजिटल बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीम) वापरकर्ते आणि डिजीयात्रा वापरत नसलेल्या प्रवाशांसाठी वरदान ठरणार आहे. दरम्यान, गेट्सची संख्ये वाढल्याने आता प्रवेश प्रक्रिया सुलभ आणि जलद होणार आहे. (Mumbai Airport) वृत्तानुसार, T2 मधील डिजिटल गेटवे आता २८ समर्पित डिजी यात्रा ई- गेट्ससह २८ समर्पित नॉन- डिजियात्रा ई- गेट्स प्रदान करतो. तसेच टर्मिनल १ (T1) मध्ये ६ समर्पित डिजीयात्रा ई- गेट्स आणि ६ नॉन- डिजियात्रा ई- गेट्स आहेत. याशिवाय प्रवाशांसाठी T2 येथील प्री-अम्बर्केशन सुरक्षा तपासणी क्षेत्रात अतिरिक्त ११८ ई- गेट्स तैनात करण्यात आले आहेत.

Escalator Accident : एस्केलेटर वापरा, पण जरा सांभाळून!! ‘ही’ एक चूक घेईल जीव; VIDEO पाहून लागेल धक्का

Escalator Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Escalator Accident) मॉल, रेल्वेस्थानक, मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट अशा सगळ्या ठिकाणी एस्केलेटरचा वापर केला जातो. ही सुविधा खास करून वृद्ध लोकांसाठी फार फायदेशीर आहे. कारण, एस्केलेटर वापरतेवेळी जिने चढायची किंवा उतरायची गरज पडत नाही. मात्र, सोयीची वाटणारी ही सुविधा काहीवेळेस धोक्याची ठरू शकते. एस्केलेटर भारतात येऊन बराच काळ लोटला आहे. तरीही बरेच लोक एस्केलेटर वापरताना घाबरतात. एस्केलेटरवर पाय टाकायचा म्हटलं की, कितीतरी लोकांची भांबेरी उडते. अशावेळी एक चूक जीवघेणी ठरू शकते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो पाहून तुम्हाला कळायचं बंद होईल.

व्हायरल व्हिडीओ (Escalator Accident)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये एस्केलेटरचा वापर करून जिना वर- खाली कारण जर कुणाकडून निष्काळजीपणा घडला तर त्याचे मोठे घातक परिणाम होऊ शकतात. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एस्केलेटरवर एक हाय हिल्सची जोड ठेवली आहे. जी एस्केलेटरमध्ये अडकून आपल्या डोळ्यासमोर तुटताना दिसतेय. यातली एक हिल चप्पल आधी एस्केलेटरच्या आत गेली आणि त्यानंतर दुसरीसुद्धा एस्केलेटरच्या आत जाताना दिले. हा व्हिडीओ शेअर करून एस्केलेटर वापरताना खबरदारी घेणे किती गरजेचे आहे ते सांगण्यात आले आहे.

एस्केलेटर ठरू शकतो जीवघेणा

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया X (जुने ट्विटर) हँडलवर Manak Gupta नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हे भयानक आहे. एस्केलेटर किती धोकादायक असू शकतात ते पाहा. लहान मुले व वृद्धांनी काळजी घ्यावी’. (Escalator Accident) या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय, ‘एस्केलेटरवर टोकदार चप्पल आणि सैल कपडे खरोखर धोकादायक असू शकतात’. तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘हे खरोखरच खूप धोकादायक आहे’.

एस्केलेटरमूळे अपघात

आतापर्यंत एस्केलेटरशी संबंधित कित्येक अपघात झाले आहेत. यातील कितीतरी घटना या भारतात घडल्या आहेत. अलीकडेच रायपूरमध्ये एक घटना घडली होती. ज्यामध्ये एस्केलेटरवर चढताना एका मुलाचा हात घसरून मृत्यू झाल्याचे समोर आले होते. असे देशात अनेक ठिकाणी विविध प्रकार घडले आहेत. (Escalator Accident) तूर्तास, देशातील एस्केलेटर संबंधित अपघातांची आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र, एस्केलेटरचा वापर करताना निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो याचा अंदाज व्हायरल व्हिडीओवरून येत आहे.

Detox Diet Plan : शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा डिटॉक्स डाएट; काय खाल?

Detox Diet Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Detox Diet Plan) निरोगी आरोग्यासाठी शारीरिक स्वच्छता महत्वाची असते. न केवळ बाहेरून तर आतूनही आपले शरीर स्वच्छ असेल तरच निरोगी जगता येते. बिघडती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या शारीरिक आरोग्याची पुरेपूर वाट लावत असतात. डोळ्यांना न दिसणारी शरीराच्या आतील घाण आपल्या आजारपणाचे कारण असते. तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर तुम्हाला तुमचे शरीर आतून स्वच्छ करणे गरजेचे आहे. यासाठी काय कराल? तर डिटॉक्स डाएट प्लॅन फॉलो करा. याविषयी जर तुम्हाला माहित नसेल तर चिंता करू नका. ही बातमी स्किप न करता वाचा आणि डिटॉक्स प्लॅनविषयी सविस्तर माहिती घ्या.

डिटॉक्स डाएट प्लॅन फॉलो करण्याचे फायदे (Detox Diet Plan)

शरीरात साचलेली घाण काढून टाकण्यासाठी डाएट फॉलो मदत करते. यासाठी तुम्ही चांगला आणि योग्य डिटॉक्स डाएट फॉलो करायला हवा. तरच तुमचे शरीर व्यवस्थित डिटॉक्स होईल आणि आरोग्य राखले जाईल. चांगले डिटॉक्स डाएट तुमच्या शरीरात साचलेले विषारी द्रव्ये काढून टाकण्यास मदत करतात आणि शरीराला आतून स्वच्छ करतात. चला तर मग जाणून घेऊया शरीरातील घाण काढण्यासाठी डिटॉक्स डाएट प्लॅनमध्ये काय खावे?

सकाळचा नाश्ता

डिटॉक्स डाएट प्लॅनमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो सकाळचा नाश्ता. (Detox Diet Plan) या डाएटमध्ये सकाळच्या नाश्त्यात भाज्या बारीक चिरून त्यासोबत मोड आलेले मूग खावे किंवा रव्याच्या उपम्यात विविध भाज्या घालून खावा. याशिवाय उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग खावा.

मिड मॉर्निंग मिल

डिटॉक्स डाएटमध्ये मिड मॉर्निंग मिलसाठी १ लहान वाटी मिक्स्ड फ्रूट सॅलड किंवा १ ग्लास ताज्या संत्र्याच्या रस प्यावा. (Detox Diet Plan)

दुपारचे जेवण

हे डाएट फॉलो करताना दुपारच्या जेवणात मिक्स भाज्यांसोबत ब्राउन राईसचा पुलाव, रायता किंवा पालक पनीर, गव्हाची पोळी आणि काकडीचे सॅलड खावे.

संध्याकाळचा नाश्ता

संध्याकाळचा नाश्त्यासाठी भाजलेला मखाना हळद आणि जिरे घालून शिजवून खा किंवा चाट मसाला घालून भाजलेला हरभरा खाता येईल. (Detox Diet Plan)

रात्रीचे जेवण

डिटॉक्स डाएटमध्ये रात्रीच्या जेवणात १ वाटी दुधी भोपळा किंवा एशगोर्डचे सूप आणि यासोबत काही हलक्या भाजलेल्या भाज्या खा. (Detox Diet Plan) याशिवाय मेथीच्या पानांसोबत शिजवलेली डाळ सुद्धा खाता येईल.

Added Sugar मूळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या

Added Sugar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Added Sugar) आपण आपल्या दैनंदिन आहारात जे काही खातो ते अन्नपदार्थ आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आपल्या अन्नपदार्थांमध्ये प्रथिनं, पिष्टमय घटक, तंतूमय घटक आणि इतर पोषक घटक समाविष्ट असतात. त्याचप्रमाणे, साखरेचाही यात समावेश असतो. बऱ्याच लोकांना तिखट झणझणीत खायला आवडत. तर काही लोकांना प्रचंड गोड खायला आवडतं. तर काही लोकांना अजिबातच गोड आवडत नाही. असे असले तरीही, आपण जे अन्नपदार्थ खातो त्यामधून आपल्या शरीराला थोडथोडक्या प्रमाणात साखर मिळत असते.

त्यामुळे ज्यांना गोड आवडत नाही, त्यांच्या नकळत ते साखर खात असतात. जिला नॅचरल शुगर म्हणतात. दरम्यान, इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरने एक महत्वाची माहिती दिली आहे. (Added Sugar) ज्यानुसार, दिवसातून २५ ग्रॅमहून अधिक ॲडेड साखरेचे सेवन करू नये किंवा आपल्या आहारातून साखर पूर्णपणे वर्ज्य करावी असे सूचित करण्यात आले आहे. असे का? ॲडेड साखर आणि नॅचरल साखरेत काय फरक असतो? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

आयसीएमआरची सूचना

ICMR च्या सूचनेनुसार, कोणत्याही व्यक्तीने दिवसभरात २५ ग्रॅमपेक्षा जास्त ॲडेड साखरेचे सेवन करू नये. कारण, ॲडेड साखरेच्या सेवनामूळे कॅलरी वगळता इतर कोणताही घटक शरीराला पुरवला जात नाही. (Added Sugar) परिणामी शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. ICMR कडून दर दिवशी Total Energy Intake पैकी केवळ ५% किंवा दर दिवशी २५ ग्रॅम साखरेचे सेवन हाय शुगर असे गृहीत धरले जाते. त्यामुळे आयसीएमआरने आरोग्याच्या दृष्टीने या महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

ॲडेड शुगरमुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका (Added Sugar)

आयसीएमआरच्या तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, ज्या पदार्थांमध्ये मुळातच साखर असते अशा पदार्थांमध्ये वेगळी साखर जादा म्हणून मिसळल्यास त्याचा कॅलरी इंटेक वाढतो. परिणामी, अशा पदार्थांमधून आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचे पोषक घटक मिळत नाहीत. म्हणजेच इथे कोणत्याही प्रकारे पोषक तत्वांचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे साखरेपासून दुरावा महत्वाचा मानला जातो. ॲडेड साखरेचे सेवन करणाऱ्यांमध्ये स्थुलता, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर आणि डिमेन्शिया यांसारख्या गंभीर आजारपणांचा धोका सर्वाधिक असतो, असेही तज्ञांनी सांगितले आहे.

ॲडेड शुगर आणि नॅचरल शुगरमधला फरक

ॲडेड शुगर म्हणजे काय? तर एखाद्या पदार्थावर प्रोसेसिंग करताना त्यामध्ये शुगर सिरप मिसळणे. अनेकदा बऱ्याच खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये अशी ॲडेड शुगर मिसळली जाते. यात सुक्रोज (टेबल शुगर), गूळ, मध, ग्लूकोज, फ्रुक्टोज, डेक्सट्रोजचा समावेश आहे. तर नॅचरल शुगर अर्थात नैसर्गिक साखर. (Added Sugar) जी मुळातच पदार्थांमध्ये असते. जसे की, एखादे फळ. फळातील ग्लुकोज किंवा फ्रुक्टोजसारखे घटक त्याचा गोडवा वाढवतात. हा गोडवा म्हणजेच नैसर्गिक साखर. अशा फळांचे सेवन करताना आणखी साखर घालून खाऊ नये, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

Ramdas Athawale : निवडणूक न लढता कॅबिनेट मंत्री होण्याची निंजा टेक्निक रामदास आठवलेंनाच जमलीय

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला आपल्या 36 उमेदवारांचं डिपॉझिटही वाचवता आलं नाही… तर स्वतः प्रकाश आंबेडकर यांना आपल्या हक्काची अकोल्याची सीटही वाचवता आली नाही… कट टू…लोकसभेची एक ही जागा न लढवता रामदास आठवले यांनी राज्यसभेच्या खासदारकीच्या जीवावर सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची काल शपथ घेतली… तसं बघायला गेलं तर आंबेडकरी चळवळीतून वर आलेली… दलितांचं, वंचितांचं राजकारण जीवंत ठेवणारी महाराष्ट्रातील हे दोन राजकीय चेहरे… दोघांच्याही राजकारणाची सुरुवात एकत्रच झाली…पण बाबासाहेबांचे नातू असतानाही प्रकाश आंबेडकरांना जे जमलं नाही ते रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) करून दाखवलय… एकीकडे वंचितचा आगळावेगळा प्रयोग करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना खासदारकी जिंकता येत नाहीये. तर दुसरीकडे रामदास आठवले हे कोणत्याही निवडणुकीला सामोरे न जाता सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतायत…

विनोदी शैली, उत्स्फूर्त कविता आणि गुलाल तिकडं चांगभलं असा अप्रोच घेऊन राजकारणात आलेल्या रामदास आठवलेंना बेरजेचं जे गणित जमत ते उच्चशिक्षित, अभ्यासू आणि बाबासाहेबांचा वारसा लाभलेल्या प्रकाश आंबेडकरांना का जमत नाही?… वंचितच्या राजकारणापेक्षा रिपब्लिकन पक्षाचं राजकारण कसं वेगळंय? महाराष्ट्राच्या दलित चळवळीचं येणाऱ्या काळात कुठला पक्ष नेतृत्व करेल? तेच पाहूयात…. आंबेडकरांच्या वंचितला जे जमलं नाही ते आठवले यांनी सहजपणे करून दाखवलं त्याला पाहिलं कारण ठरलं ते आंबेडकर आणि आठवलेंचा पॉलिटिकल अप्रोच

इतिहास पाहिला तर 1994 पूर्वी आंबेडकर रिपब्लिकन पक्षातच काम करत होते… मात्र 1994 मध्ये त्यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाची स्थापना करून स्वतंत्र राजकारणाला सुरुवात केली… मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेचा अकोला पॅटर्न वगळता प्रकाश आंबेडकर राजकारणाच्या पटलावर सतत चाचपडतानाच पाहायला मिळाले…1990 मध्ये त्यांची राज्यसभेतून संसदेत एन्ट्री झाली… यानंतर त्यांनी अनेक लोकसभा निवडणूक लढवल्या पण सगळीकडे पराभव स्वीकारावा लागला… 1999 आणि त्यानंतरची एक टर्म काँग्रेसच्या पाठिंब्यावर प्रकाश आंबेडकर लोकसभेतून दिल्लीत गेले… पण यानंतर त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसपासून फारकत घेत आपल्या स्वतंत्र राजकारणाला सुरुवात केली…पुढे तर त्यांनी भारिप बहुजन महासंघ बाजूला सारत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा आगळावेगळा प्रयोग केला…महाराष्ट्राला तिसरी आघाडी देण्याचा अप्रोच डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लोकसभा लढवली… वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी 2019 च्या या निवडणुकीत आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घातली… काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला या वंचित फॅक्टरमुळे तब्बल 10 हून अधिक जागांवर पाणी सोडावं लागलं…वंचितच्या जीवावर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील खासदार झाले ही गोष्ट वेगळीच… आंबेडकरांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली असली तरी यानंतर पुन्हा एकदा सतत भूमिका बदलण्याचा प्रकार त्यांनी सुरूच ठेवला…

आंबेडकरांनी ठाकरेंसोबत युती केली… पण आपण महाविकास आघाडी सोबत नाही आहोत, असा स्टॅन्ड घेतला…राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर या काळात त्यांनी टीका केली…पण पुढे लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू झाली तेव्हा त्याच काँग्रेस राष्ट्रवादीसोबत त्यांनी मांडीला मांडी लावायची तयारी दाखवली…पण तिकीट वाटपाच्या चर्चेत फिस्कटल्याने आंबेडकरांनी पुन्हा स्वतंत्र राजकारण सुरू केलं…यात कुठे काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दे… तर कुठे अपक्ष, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दे… असा सावळा गोंधळ वंचितच्या गोटात सुरू होता…थोडक्यात प्रकाश आंबेडकरांची राजकीय अस्थिरता आणि आघाड्यांचं राजकारण जमण्याइतपत ते मुरलेले राजकारणी नसणं… या सगळ्या गोष्टी त्यांना बॅक फुटला घेऊन जातात… त्याचाच फटका 2024 च्या लोकसभा निकालला बसला असून आंबेडकरांचं राजकारण उतराला लागलं आहे…

दुसरीकडे रामदास आठवले हे दलित पॅंथरचे कट्टर कार्यकर्ते…दलित चळवळीच्या मुशीत आपली सामाजिक आणि राजकीय समज वाढवत आठवलेंनी आपल्या स्वतंत्र राजकारणाला सुरुवात केली…रिपब्लिकन पक्षात काम करताना रामदास आठवले यांचा कल सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडे होता. 1990 ते 1996 या काळात त्यांनी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम केल. या काळात आठवलेंनी समाजकल्याण, परिवहन, रोजगार हमी या खात्यांची मंत्रिपदं सांभाळली… नंतरच्या काळात रामदास आठवले मुंबई उत्तर मध्य आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. 1998 मध्ये रामदास आठवले पहिल्यांदा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले. त्यानंतर सलग दुसऱ्या टर्ममध्येही लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. खासदारकीच्या तिसऱ्या टर्ममध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी घरोबा केला…काँग्रेसशी बिनसल्यानंतर त्यांनी भाजपला जवळ केलं… त्यानंतर सलग दहा टर्म भाजप सत्तेत असताना आठवलेंना आरामशीर मंत्रीपद मिळत गेली… त्याचा वापर त्यांनी आपल्या पक्ष वाढीसाठी करून घेतला…

आंबेडकरांपेक्षा आठवलेंचं राजकारण प्लसमध्ये राहिलं त्यांचं दुसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे हवा कुणाच्या दिशेने आहे याचा आठवलेंना येणारा अचूक अंदाज.

महाराष्ट्रात अशी काही मंडळी आहेत की ते दुसऱ्या पक्षासोबत गेले की समजा त्यांची सत्ता गेली… पण आठवले मात्र याला अपवाद आहेत.. आठवले जिथं गुलाल तिथंच… असा एकूण त्यांच्याबाबतीत प्रकार घडतो… 2009 पूर्वी ते काँग्रेस सोबत होते तेव्हा यूपीए आघाडीची सत्ता होती… जेव्हा ते भाजपबरोबर गेले तेव्हापासून सलग दोन टर्म भाजप सत्तेत आणि आठवले मंत्रीपदात राहिले… मुळात पावर पॉलिटिक्समध्ये टिकून राहणं यावरच त्यांचं राजकारण टिकून असल्यानं आठवलेंना इतर कोणत्या गोष्टींपेक्षा सत्ता महत्वाची वाटतं आली… आणि त्यात त्यांना यशही मिळत गेलं.. दुसरीकडे आंबेडकर यांचा भर हा सत्तेत राहण्यापेक्षा स्वतःच राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याकडे जास्त होता… त्यात त्यांना काही प्रमाणात यश आलं असं म्हणताही येईल… पण राजकारण कुठल्या दिशेला सरकेल? याचा अचूक अंदाज आठवलेंप्रमाणे आंबेडकरांना लावता आला नाही… त्यामुळे 2019 मध्ये स्वतंत्र राजकारण करून भाजपची बी टीम असल्याचा टॅग स्वतःहून ओढवून घेतला…तर 2024 मध्ये ही इमेज पुसण्याच्या नादात पक्षाचा प्रभावच नाहीसा करून टाकला…लोकसभेच्या निकालात अगदीच किरकोळ कामगिरी केल्यामुळे प्रकाश आंबेडकर विधानसभेलाही राजकारणावर किती प्रभाव टाकतील? हे आत्ताच सांगता येत नाही…पण लोकसभेचा असणारा मोठा चान्स आंबेडकरांनी घालवला… असं म्हणायला हरकत नाही…

आंबेडकरांपेक्षा आठवलेंचं राजकारण प्लसमध्ये राहिलं याचं शेवटचं कारण सांगता येईल ते म्हणजे लोकसभा निवडणुकांचे बदललेले डायमेन्शन्स…

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर राष्ट्रवादी आणि शिवसेनासारखे पक्ष फुटल्यामुळे या दोन्ही गटांकडे सहानुभूतीचं वार होतं… महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी घासून फाईट होणार असल्यामुळे स्वतंत्र राजकारणाचा विचार म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार झाला असता… महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांना 2 ते 3 जागा मिळत होत्या पण जास्त जागांवर अडून बसल्यामुळे त्यांचं आघाडीत फिस्कटलं… यानंतर वंचितनं स्वतंत्र निवडणूक लढवली… आपल्यावर भाजपच्या बी टीमचा शिक्का लागू नये, यासाठी त्यांनी महत्त्वाच्या ठिकाणांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करत 38 जागा लढवल्या… पण यातल्या तब्बल 36 जागांवर वंचितच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं… वंचितचा व्होट शेअर घसरला… मतदानाचा टक्काही खाली आला… थोडक्यात महाराष्ट्राच्या जनतेने वंचितवर अविश्वास दाखवलाय, असा त्याचा अर्थ निघू शकतो… त्यामुळे आघाडी सोबत निवडणूक लढवून आज कदाचित आंबेडकरांना आपली सीट वाचवता आली असती.. पण त्यांनी एकला चलो रे म्हणत पुन्हा एकदा वंचितचं राजकीय पानिपत करून टाकलय… दुसऱ्या बाजूला स्वतंत्र राजकारण करण्यापेक्षा महायुतीमध्ये राहून आठवले सेफ राहिले… निवडणूक नाही, प्रचार नाही की रुसवा फुगवा नाही… आपल्या समाजाची निर्णायक व्होट बँक सोबत घेऊन आठवलेंनी टॅक्टिक वापरल्याने त्यांना पुन्हा एकदा आरमत राज्यमंत्री मिळालंय…

अर्थात हे आम्ही सगळं सांगितलं असलं तरी प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांची कार्यपद्धती, राजकारण आणि उद्देश वेगवेगळे असल्याने त्यांच्यात तुलना करता येणार नाहीच… पण शेवटी राजकारणामध्ये तुम्ही पॉवर पॉलिटिक्समध्ये कुठे आहात? यावरूनच तुमच्या पक्षाचं आणि तुमचं भविष्य ठरत असतं… इथे मात्र आंबेडकर कच्चे राहतात एवढं मात्र निश्चित… बाकी प्रकाश आंबेडकर हे राजकारणात नेमके कुठे चुकले? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा,