Sunday, December 21, 2025
Home Blog Page 677

Vande Metro लवकरच प्रवाशांच्या सेवेत; Inside Photos पहाच

Vande Metro Inside Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता कमी अंतराच्या इंटरसिटी प्रवासासाठी भारतीय रेल्वे वंदे मेट्रो लाँच (Vande Metro) करण्यासाठी सज्ज झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसपासूनच प्रेरणा घेतलेली हि रेल्वे कमी अंतर असलेल्या शहरांना जोडण्याचे काम करेल. वंदे मेट्रोचा पहिला रॅक चेन्नईस्थित आईसीएफ कोच फॅक्टरी येथे तयार झाला आहे. याच्या लोड चाचणी, वेग चाचणी आणि कंपन चाचणीसाठी हा रेक चेन्नईहून राजस्थानच्या कोटा विभागात पाठवला जात आहे. आज आपण वंदे मेट्रोचे आतील आणि बाहेरील फोटो पाहुयात म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कि हि ट्रेन किती आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे.

काय फीचर्स मिळतील? Vande Metro

वंदे मेट्रो डेव्हलोप करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हंटल कि, या ट्रेनमुळे लोकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होईल. संपूर्ण ट्रेन वातानुकूलित असल्यामुळे प्रवाशांना त्यात प्रवास करताना थकवा जाणवणार नाही. प्रत्येक कोचमध्ये 100 प्रवासी बसतील आणि अतिरिक्त 200 लोकांसाठी उभे राहण्याची जागा उपलब्ध असेल. वंदे मेट्रो मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सारखेच स्वयंचलित दरवाजे आहेत.

वंदे मेट्रो ट्रेनमध्ये (Vande Metro) वेगवान असेलेरेशन आणि डिसलेरेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून ताशी 130 किमीच्या वेगाने हि ट्रेन धावेल. या ट्रेनमध्ये पॅनोरॅमिक खिडक्या आणि आधुनिक टॉयलेट बसवण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान जर टॉयलेटचा वापर करावा लागला तर त्यांना तिथला सुखद अनुभवही मिळेल.

पहिल्या वंदे मेट्रोमध्ये 12 डबे बसवण्यात आले आहेत. यात दोन्ही बाजूंना इंजिन कोच आणि सहा ट्रेलर कोचसह सहा मोटर कोच आहेत. एक प्रकारे याला AC MEMU (मेनलाइन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) म्हणता येईल. मात्र, त्यातील सुविधा वंदे भारत एक्स्प्रेससारख्या असतील.

वंदे मेट्रो ट्रेनमध्ये एलसीडी डिस्प्लेसह सुसज्ज पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिमसह हलक्या वजनाचा ॲल्युमिनियम लगेज रॅक मिळत असून कमी अंतर कव्हर करणाऱ्या प्रवाशांना सुखद अनुभव मिळेल. यामध्ये मोबाईल चार्जिंग सॉकेट्स, KAVACH ट्रेन अँटी कोलिजन सिस्टम, डिफ्यूज्ड लाइटिंग, रूट इंडिकेटर डिस्प्ले, रोलर ब्लाइंड्स सारखे फीचर्स मिळतात.

सुरुवातीला वंदे मेट्रो ट्रेन आग्रा-मथुरा, दिल्ली-रेवाडी, लखनौ-कानपूर, तिरुपती-चेन्नई आणि भुवनेश्वर-बालासोर या मार्गांवर धावण्याची शक्यता आहे.

Monsoon Delays | मौसमी वाऱ्याचा वेग मंदावला; महाराष्ट्रात मान्सूनमध्ये पडणार खंड

Monsoon Delays

Monsoon Delays | राज्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनचा सुरुवात झालेली आहे. अशातच आता मानसूनबाबत भारतीय हवामान खात्याकडून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. हवेच्या दाबाची स्थिती आता अनुकूल नसल्याने मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हवामान खात्याने दिलेले माहितीनुसार 20 जूननंतरच पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका, असा देखील सल्ला दिलेला आहे.

दरवर्षी पेक्षा या वर्षी मान्सून लवकरच महाराष्ट्रामध्ये (Monsoon Delays) दाखल झालेला आहे. मुंबईत देखील मोसमी वाऱ्याचा आगमन दोन दिवस अधिक झालेला आहे. राज्यातील अनेक भागात आत्तापर्यंत मुसळधार पाऊस देखील पडला आहे. मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोकण, सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पाऊस झालेला आहे.

त्याचप्रमाणे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडलेली शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. परंतु सध्या हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्याने वाऱ्याचा वेग देखील मंदावला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस येण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहे. 20 जूननंतर राज्यात सगळ्या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे.

आज कुठे कुठे कोसळणार पाऊस? | Monsoon Delays

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दक्षिण कोकणातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच मुंबईसह उपनगर आणि पुणे जिल्ह्यात देखील आज पावसाचा जोर वाढणार आहे. ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच मराठवाडा विभागातील पुढील 72 तासात चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

मोबाईल वापरासाठी भरावे लागणार अतिरिक्त पैसे, TRAI चा ‘हा’ नवीन नियम पाहा

Mobile Recharge

देशात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि त्यानंतर अनेक लोक हे वर्क फ्रॉम होम करू लागले. त्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्या घरी वायफाय बसून घेतलेले आहे. घरात वायफाय बसवल्याने लोक हे मोबाईलचा रिचार्ज करत नाही. तुम्ही देखील असे करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण पुढील काळात तुमचा मोबाईल नंबर वापरण्यासाठी तुम्हाला रिचार्ज व्यतिरिक्त आणखी पैसे द्यावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे सिम कार्ड असून तुम्ही त्याला रिचार्ज करत नसाल तरच तुम्हाला असे करावे लागणार आहे.

अनेक देशांमध्ये मोबाईल नंबरसाठी त्याचप्रमाणे टेलिफोनसाठी समान रक्कम आकारली जाते. कधी कधी या गोष्टी मोबाईल ऑपरेटरवरही लागू होतात. आणि त्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसतो. अशातच आता भारतीय दूरसंचार नियम प्राधिकरणाने हा प्रस्ताव नियम जारी केलेला आहे. म्हणजेच आता जर तुम्ही तुमचे सिम कार्ड जास्त वेळ रिचार्ज केले नाही तर ते ब्लॅकलिस्टला न टाकता मोबाईल ऑपरेटर्स जास्त दंड आकारू शकतात. हे शुल्क एक रकमी किंवा वार्षिक आधारावर घेतले जाऊ शकते. ट्रायने मोबाईल फोन आणि लँडलाईन नंबरसाठी मोबाईल ऑपरेटर कडून शुल्क आकारण्याची ही योजना आणलेली आहे.

ट्रायचा याबद्दल असा विश्वास आहे की, मोबाईल नंबर हा एक सार्वजनिक स्त्रोत आहे, खाजगी नाही. त्यामुळे मोबाईलचा वापर सार्वजनिक कामासाठी कसा करता येईल हे पाहिले पाहिजे. देशात मोबाईल नंबरची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. तसेच सिम कार्ड दीर्घकाळ रिचार्ज न केल्यास ब्लॅकलिस्टला टाकले जायचे. परंतु आता सिम कार्ड जास्त काळ रिचार्ज न केले तर ते ब्लॅकलिस्टला न टाकता ऑपरेटर्सकडून त्यावर दंड आकारला जाईल.

कोणत्या देशांमध्ये शुल्क आकारले जाते

ट्रायनुसार आत्तापर्यंत डेन्मार्क, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, पोलंड, स्विझर्लंड, नेदरलँड, कुवेत, बल्गेरिया होंगकोंग, ग्रीस, युके, फिनलँड, बेल्जियम, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये ही योजना आहे.

जे अहंकारी झाले, त्यांना प्रभू रामाने 241 वर रोखले; RSS नेत्याच्या विधानाने खळबळ

Indresh Kumar RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील मतभेद उघड येत आहेत. यापूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला आरसा दाखवून देशाच्या वास्तवाची जाणीव करून दिली होती, त्यानंतर आता आरएसएस नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीवरून जोरदार निशाणा साधला आहे. जे अहंकारी झाले, त्यांना प्रभू रामाने 241 वर रोखले असं म्हणत त्यांनी नाव न घेता भाजपवर हल्लाबोल केला आहे. संघाच्या नेत्याचेच असं विधान केल्याने खळबळ उडाली आहे. इंद्रेश कुमार यांनी जयपूरमध्ये रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजा समारंभात हे वक्तव्य केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेल्या इंद्रेश कुमार यांनी म्हंटल कि, प्रभू श्रीराम प्रत्येकाला न्याय देतात. रामाने बढाई मारणाऱ्या पक्षाला पूर्ण सत्ता दिली नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल बघा. ज्यांनी रामाची पूजा केली ते अहंकारी झाले आणि त्यांचा पक्ष 241 पर्यंत कमी झाला. त्याला जे पूर्ण बहुमत मिळायला हवे होते, जी सत्ता मिळायला हवी होती, ती देवाने त्याच्या अहंकारापोटी रोखली. इंद्रेश कुमार यांनी आपल्या विधानांमध्ये कुठल्याही पक्षाच नाव घेतलं नाही, मात्र त्यांचा रोख हा भाजपवर दिसून आला.

इंद्रेश कुमार यांनी यावेळी विरोधकांच्या INDIA आघाडीवर सुद्धा घणाघात केला. “ज्यांनी रामाचा विरोध केला, त्यांच्यापैकी कोणालाही सत्ता मिळाली नाही. सर्वजण मिळून क्रमांक २ वर राहिले. प्रभू रामाचा न्याय विचित्र नाही, तो खरा आणि आनंददायी आहे. ज्यांचा रामावर विश्वास नव्हता, त्या सर्वांना 234 वर थांबवण्यात आले. जे लोक रामाची पूजा करतात, त्यांनी विनम्र असलं पाहिजे आणि जे रामाला विरोध करतात, प्रभू राम स्वत: तो विषय हाताळतात” असं इंद्रेश कुमार म्हणाले.

Ekiv Waterfall : पावसाळ्यात ‘हा’ धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी आकर्षण; मनमोहक सौंदर्यामूळे वेधतोय लक्ष

Ekiv Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ekiv Waterfall) पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य हजारो पटीने वाढलेले असते. त्यामुळे न केवळ माणसे तर वन्य जीव, पशु, पक्षी आणि झाडेसुद्धा सुखावलेली असतात. त्यात डोंगर कपाऱ्यांमध्ये तर निसर्गाची वेगळीच शाळा भरलेली असते. गर्द हिरवाई, छोटे मोठे धबधबे, शुभ्र धुक्याची चादर आणि पाण्याने भरलेले तलाव पाहण्यात कधी मन रमून जातं तेच कळत नाही. पावसाच्या दिवसात निसर्गाशी अगदी जवळून मैत्री करण्याची चांगली संधी मिळते. त्यामुळे बरेच निसर्गप्रेमी या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात जाणे पसंत करतात. अशातच भर पावसाच्या दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील एकीव धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे. याच धबधब्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

एकीव धबधबा (Ekiv Waterfall)

राजधानी सातारामधील जावळी तालुक्याला निसर्गाचा आशीर्वाद आहे. त्याच आशीर्वादाचा एक भाग म्हणजे एकीव धबधबा. पावसाळ्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर बरसणाऱ्या धो- धो पावसामुळे अनेक धबधबे ओसंडून वाहत असतात. पण मेढ्याच्या पश्चिमेला असलेला एकीवचा धबधबा पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतो. हा धबधबा दोन टप्प्यांत कोसळतो आणि पर्यटकांसाठी अत्यंत सुंदर तसेच विहंगम दृश्य निर्मिती करतो. कासकडून येणाऱ्या पाण्याने हा तयार झालेला हा धबधबा दुंद गावाच्या वरच्या बाजूला कोसळतो.

अलौकिक सौंदर्यासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध

पावसाळ्यात एकीव धबधब्याचे सौंदर्य इतके वाढते की, पर्यटकांची मोठी गर्दी होते. कासला जाताना अगदी जवळच हा धबधबा असल्याने इथे आवजून पर्यटक येतात. (Ekiv Waterfall) नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेला हा धबधबा पंचक्रोशीत ‘पाबळ’ नावाने ओळखला जातो. या धबधब्याचा वरचा भाग सुरक्षित असून इथे भिजता येते. मात्र, खालचा भाग दुरून पाहावा लागतो. कारण इथे पाण्याचा विसर्ग इतका जास्त असतो की, पाण्यात उतरणे अशक्य.

कसे जाल?

साताऱ्याकडून कास रस्त्यावर आटाळी गावाजवळून एकीव धबधब्याकडे रस्ता जातो. मेढ्यातून कुसुंबी- दुदमार्गे या धबधब्याकडे जाता येते. दरम्यान, दोन्ही रस्ते सुस्थितीत असल्याने कण्हेर धरणाचे आणि डोंगरदऱ्यांचे मनमोहक दृश्यदेखील आपल्याला पहायला मिळते. (Ekiv Waterfall)

Loan From UPI : UPI वरून कर्ज घेणं झालं सोप्प; फक्त फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Loan From UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Loan From UPI) आजकाल अनेक बँकांनी लोन देण्याची प्रक्रिया अगदी सोप्पी आणि सुलभ केली आहे. त्यामुळे आता कर्ज घेणे बरेच सोपे झाले आहे. अनेक बँकांसह फिनटेक कंपन्यादेखील मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून अगदी कमी वेळात आणि कमी कागदपत्रांवर लगेच कर्ज उपलब्ध करून देतात. अशातच आता UPI शी लिंक असलेल्या क्रेडिट लाइनवरूनदेखील त्वरित कर्ज मिळण्याची सुविधा सुरु झाली आहे. त्यामुळे आता अनेक युजर UPI ॲपच्या मदतीने अगदी सहज कर्ज घेऊ शकतात. याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

‘या’ UPI ॲपच्या मदतीने मिळणार झटपट कर्ज (Loan From UPI)

गेल्या काही काळात UPI ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच UPI ॲपच्या मदतीने कर्ज घेण्याची सुविधा सुरु झाल्याने अनेक वापरकर्त्यांना याचा फायदा होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने (NPCI) या सुविधेची सुरुवात केली आहे. कर्ज देणाऱ्या UPI ॲपच्या यादीत BHIM, PayZap, Paytm, ZeePay यांचा समावेश आहे.

UPI ॲपच्या मदतीने कर्ज देण्याची सुविधा सुरु झाली असून यामध्ये कर्जाची रक्कम आगाऊ ठरवली जाते. यामध्ये, बँका किंवा वित्तीय संस्था युजर्सच्या क्रेडिट क्षमतेवर आधारित कर्जाची रक्कम आधीच ठरवतात. त्यामुळे UPI युजर कर्जाची रक्कम UPI ॲपच्या मदतीने खरेदीसाठी वापरू शकेल. (Loan From UPI) यामुळे कर्जाची रक्कम आधीच वापरकर्त्यासाठी उपलब्ध होईल. तसेच एखाद्याला कर्जासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेतून जाण्याची आणि त्यानंतर कर्ज मंजुरीसाठी कोणत्याही प्रकारे प्रतीक्षा करण्याची गरज उरत नाही.

कोणासाठी फायदेशीर?

होम क्रेडिट इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी यांनी UPI च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्ज सुविधेबाबत महत्वाची माहिती प्रदान केली आहे. (Loan From UPI) यावेळी त्यांनी सांगितले की, ‘आता UPI वापरकर्ते विशेषत: कमी उत्पन्न गटातील लोक त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच आणीबाणी, शिक्षण, आरोग्यसेवा किंवा व्यावसायिक उपक्रमाशी संबंधित आर्थिक गरजांसाठी UPI च्या माध्यमातून सहज कर्ज मिळवू शकतात. मुख्य म्हणजे, यासाठी त्यांना काहीही तारण ठेवण्याची किंवा कोणतीही कागदपत्रे जमा करण्याची आणि कर्ज मंजुरीच्या प्रतिक्षेची वाट पहावी लागणार नाही’.

कर्ज मिळण्याची प्रक्रिया

प्रत्येक UPI खाते हे बचत खात्याशी जोडलेले असते. त्यामुळे UPI वर क्रेडिट लाइनचा लाभ घेण्यासाठी युजर्सला त्यांच्या बँकेत एक अर्ज सबमिट करावा लागेल. ज्यामध्ये युजरशी संबंधित आर्थिक माहितीचा पुरवठा केला जाईल. यात युजरचे आर्थिक उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि परतफेडीचा इतिहास अशा माहितीचा समावेश असेल. (Loan From UPI) दरम्यान, बँकेच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला उत्पन्न विवरणपत्रे, ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतील. या कागदपत्रांच्या तपासणीनंतर बँक क्रेडिट लाइन त्वरित कर्ज मंजूर करेल. हे कर्ज क्रेडिट कार्डच्या क्रेडिट मर्यादेसारखे असेल. त्यावरील व्याज दर बँकेनुसार वेगवेगळे असू शकतात.

Airtel vs Jio Recharge Plans : Airtel का Jio? 395 रुपयांत कोणाचा रिचार्ज प्लॅन देतो चांगल्या सुविधा? जाणून घ्या

Airtel vs Jio Recharge Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Airtel vs Jio Recharge Plans) एअरटेल आणि रिलायन्स जिओ कायम आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असतात. ज्यांच्या माध्यमातून विविध सुविधा पुरवत ते आपल्या ग्राहकांना खुश करतात. आजच्या काळात प्रत्येकाला सर्वोत्तम सेवा हव्या असतात. त्यामुळे बरेच युजर्स एअरटेल आणि जिओमध्ये कन्फ्युज होतात. अशातच एअरटेल आणि जिओने भारतीय दूरसंचार बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवण्यासाठी एका नवा रिचार्ज प्लॅन ऑफर केला आहे. हा प्लॅन केवळ ३९५ रुपयांचा असून आता एअरटेलचा प्लॅन फायदेशीर का जीओचा प्लॅन फायदेशीर? यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. चला तर एअरटेल आणि जिओपैकी कुणाचा प्लॅन अधिक फायदेशीर आहे? ते लगेच जाणून घेऊया

Airtel चा रिचार्ज प्लॅन देणार HelloTunes, Wynk म्युझिकचा आनंद

Airtel चा ३९५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आधी ५६ दिवसांच्या वैधतेसह येत होता. मात्र, आता याची वैधता १४ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता हा रिचार्ज केल्यास ७० दिवसांची वैधता मिळेल. (Airtel vs Jio Recharge Plans) सोबत ६०० मोफत एसएमएस, 6GB डेटा आणि HelloTunes, Apollo 24/7 Circle, Wynk Music वर मोफत प्रवेश दिला जाईल.

Jio चा रिचार्ज प्लॅन देणार JioCinema आणि JioTV चा ॲक्सेस

Reliance Jio चा ३९५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन वापरकर्त्यांना JioCinema, JioTV आणि JioCloud चा ॲक्सेस मिळणार आहे. (Airtel vs Jio Recharge Plans) यासोबत जिओच्या रिचार्ज प्लॅनची वैधता ८४ दिवसांची असून यात तुम्हाला १ हजार एसएमएस, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 6GB डेटाचा लाभ मिळेल. मुख्य म्हणजे तुम्ही या रिचार्जसोबत 5G स्पीडचा आनंद घेऊ शकाल.

दोन्ही रिचार्ज प्लॅनमधील मुख्य फरक (Airtel vs Jio Recharge Plans)

Airtel आणि Reliance Jio च्या दोन्ही प्लॅनची वैधता तसेच सेवेत थोडाफार फरक आहे. जसं की, एअरटेल ६०० एसएमएस तर रिलायन्स जिओ १ हजार एसएमएसची सेवा देत आहे. तसेच एअरटेलच्या रिचार्ज पॅकची वैधता ७० दिवसांची तर जीव रिचार्ज प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. मात्र, दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ६ जीबी डेटाचा लाभ दिला जात आहे.

ATM Cash Withdrawal Charges : ATM मधून पैसे काढणं महागणार; ग्राहकांना मोठा झटका

ATM Cash Withdrawal Charges

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल पैसे काढण्यासाठी बँकेत न जाता आपण थेट ATM मध्ये जातो. देशभरात टप्प्याटप्प्यावर ATM मशीन उपलब्ध असल्याने बँकेत जाण्याची आणि रांगेत उभं राहण्याची कटकट मिटली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा सतत एटीएमचा वापर करतच असाल हे नक्की… मात्र आता ATM मधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी निराशाजनक बातमी आहे. कारण येत्या काही दिवसांत तुम्हाला दुसऱ्या बँकेतील ATM मधून पैसे काढणे (ATM Cash Withdrawal Charges) थोडे महाग पडू शकते. देशातील एटीएम ऑपरेटर रोख पैसे काढण्यासाठी आकारण्यात येणारे इंटरचेंज शुल्क वाढवण्याची मागणी करत आहेत.

का होत आहे मागणी ? ATM Cash Withdrawal Charges

तस बघितलं तर एटीएमधारक कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतात, परंतु देशातील वेगवेगळ्या बँकांनी इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून मोफत व्यवहार करण्याची मर्यादा निश्चित केली आहे. एका रिपोर्टनुसार, कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री 17 ते 23 रुपयांदरम्यान इंटरचेंज फीची मागणी करत आहे. रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयाकडे एटीएम उद्योग संघटनेची ही मागणी आहे. या वाढीमुळे व्यवसायास करण्यासाठी अधिक निधी मिळण्यास मदत मिळेल. मात्र, याबाबत आरबीआयकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. एटीएम इंटरचेंज हे असे शुल्क आहे जे कार्ड जारी करणाऱ्या बँकेद्वारे बँकेला दिले जाते जिथे कार्ड रोख काढण्यासाठी (ATM Cash Withdrawal Charges) वापरले जाते.

एटीएम इंटरचेंज चार्ज हे मेट्रो शहरांमध्ये 3 नॉन-बँक एटीएम विथड्रॉल्सवर आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 नॉन-बँक एटीएम विथड्रॉवलवर आकारले जाते. सध्या, बचत खातेधारकांसाठी एका महिन्यात किमान पाच व्यवहार विनामूल्य आहेत. त्याच वेळी, काही बँका आहेत ज्यांचे तीन एटीएम व्यवहार विनामूल्य आहेत. यानंतर वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममधून विविध प्रकारचे शुल्कही आकारले जाते. 2021 मध्ये हे शुल्क 15 रुपयांवरून 21 रुपये करण्यात आले. त्यातच आता ऑपरेटर्सने या शुल्कात आणखी वाढ करण्याची मागणी झाल्याने येत्या काही दिवसांत इतर कोणत्याही बँकेचे एटीएम वापरण्यासाठी जास्त चार्जेस भरावे लागण्याची शक्यता आहे.

पृथ्वीवर उतरले होते एलियन्स? आकाशातील ‘त्या’ गूढ हालचालींचे रहस्य उघड

UFO NEWS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बऱ्याचवेळा आकाशात वेगळ्या, विचित्र आणि रहस्यमयी हालचाली होताना दिसतात. ज्यामुळे परग्रहाबाबत विशेष उत्सुकता वाढीस लागते. परग्रह आणि एलियन्स यांच्याबाबत कायम काही ना काही चर्चा सुरु असतात. आकाशात एखादी वेगळी हालचाल दिसली, उडत्या तबकड्या दिसल्या की, साहजिकच सगळ्यांचे लक्ष वेधले जाते. आतापर्यंत पेंटागॉनने बऱ्याचवेळा परग्रहावरील वा पृथ्वीबाहेरील वस्तूंच्या हालचालींविषयी भाष्य केले आहे. आकाशात एखादी अनोळखी गोष्ट उडताना दिसली की, त्यावर संशोधन केले जाते. २०१३ साली अशीच एक घटना समोर आली होती. जिचे रहस्य पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी उलगडले आहे.

आकाशात दिसला महाकाय UFO

वृत्तानुसार, कॅनडातील यूएस संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला सन २०१३ मध्ये एक महाकाय UFO दिसला होता. ज्यावर गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळ संशोधन केल्यांनतर त्यांनी आता दोन पेटंट मिळवले आहेत. याबाबत खुलासा करताना त्यांनी एका रहस्यमय प्रकरणाचा उल्लेख केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. UFO पाहणारे एकूण ३ साक्षीदार होते. ज्यामध्ये एक पेंटागॉनचा अधिकारी होता. ज्याने ‘बार्बेल’ आकाराच्या UFO चे इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केल्याचा दावा केला आहे.

फुटबॉल मैदानाच्या निम्मा आकार

पेंटागॉनच्या अधिकाऱ्याने म्हटल्यानुसार, हा UFO फुटबॉल मैदानाच्या निम्म्या आकाराचा आणि निळ्या रंगाचा आहे. ही घटना २८ ऑगस्ट २०१३ रोजी कॅनडाच्या नैऋत्य ओंटारियोमध्ये घडली होती. त्यावेळी हे तिन्ही साक्षीदार शिकारीसाठी तळ ठोकून बसले होते. दरम्यान साक्षीदारांनी सांगितले की, आकाशात एक वस्तू शांतपणे उडत होती. मुख्य म्हणजे, ही वास्तू गतीच्या विरुद्ध दिशेने विद्युत ठिणग्या सोडत होती. ही वस्तू त्यांनी कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती वस्तू खूप जवळ असल्यामुळे त्यांच्या उपकरणांनी काम करणे बंद केले.

पेंटागॉन अधिकाऱ्याकडून मोठा खुलासा

याबाबत अधिक बोलताना साक्षीदारांनी म्हटले, ती वस्तू UFO होती हे तिच्यातून निघणारा निळा प्रकाश पाहून खात्री पटली. हा प्रकाश विसंगत प्रकाश नसून लेसरसारखा होता. दरम्यान, पेंटागॉनच्या अधिकाऱ्याने सोनी एचडी कॅमेऱ्यातून या घटनेचे चित्रीकरण केले. यानंतर यूएफओ संशोधक रॉबर्ट पॉवेल यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. तेव्हा ऑसिलोस्कोपने व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या गोष्टी सापडल्या. ज्यामध्ये UFO चे फिरते दिवे दिसले. तसेच यूएफओ एक प्रचंड एसी मोटर वापरत होता आणि म्हणून जवळच्या इलेक्ट्रॉनिक्सची सिस्टीम नीट चालत नव्हती, हे समजले. पेंटागॉनच्या अधिकाऱ्याने दिलेली ही साक्ष अत्यंत रंजक असल्याने आता UFO संशोधन आणि तंत्रज्ञानात आणखी इंटरेस्ट वाढू लागला आहे. या घटनेबाबत अजून काही पुरावे किंवा माहिती मिळते का? याचा अद्याप तपास सुरु आहे.

आता Jio देणार Satellite Internet सुविधा; कंपनीला मिळाला ग्रीन सिग्नल

Jio Satellite Internet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिओ च्या वापरकर्त्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. हायस्पीड इंटरनेटसाठी भारताच्या अंतराळ नियामकाकडून कंपनीला सॅटेलाइट इंटरनेट लाँच (Jio Satellite Internet) करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. रॉयटर्स या वृत्तवाहिनीने याबाबत माहिती दिली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, उपग्रहाद्वारे इंटरनेट वितरीत करण्याचा उपक्रम असलेल्या ऑर्बिट कनेक्ट इंडियाला तीन मंजुरी देण्यात आल्या. एप्रिल आणि जूनमध्ये इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) द्वारे जारी केलेल्या या मंजुरी, ऑर्बिट कनेक्टला उपग्रहांना भारताच्या वरच्या स्थानावर ठेवण्याची परवानगी देतात. परंतु, सेवा सुरू होण्यापूर्वी दूरसंचार विभागाच्या पुढील मंजुरीची आवश्यकता आहे.

सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवा ऑफर करण्याच्या शर्यतीतील एक महत्त्वाचा विकास म्हणून ही मंजुरी मिळाली आहे, जिथे Amazon आणि Elon Musk’s Starlink सारख्या कंपन्या देखील परवानगी घेत आहेत. IN-SPACE चे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितले की, इनमारसॅट आणि इतरांना उपग्रह चालवण्यास मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे सॅटेलाइट ब्रॉडबँड मार्केटमधील वाढती स्वारस्य अधोरेखित झाली आहे. Deloitte ने भारताच्या सॅटेलाइट ब्रॉडबँड मार्केटसाठी मजबूत वाढीचा अंदाज वर्तवला आहे, पुढील पाच वर्षांमध्ये 36% वार्षिक वाढीचा अंदाज आहे, 2030 पर्यंत महसूल 1.9 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, जागतिक स्तरावर ग्रामीण भागांना सॅटेलाइट इंटरनेटद्वारे जोडण्याच्या स्पर्धेने आता चांगलाच वेग घेतला आहे. Amazon चा Quiper उपक्रम, नियोजित $10 अब्ज गुंतवणुकीसह, आणि SpaceX ची Starlink, हे यातील महत्वाचे ब्रँड आहेत. अलीकडेच, स्टारलिंकला श्रीलंकेकडून तेथे सेवा देण्यासाठी प्राथमिक मान्यताही मिळाली आहे. गोयंका यांनी भारताच्या उपग्रह इंटरनेट क्षेत्रातील वाढलेल्या स्पर्धेचे फायदे अधोरेखित केले आणि असे सुचवले की ऑटोमोटिव्ह उद्योगात दिसणाऱ्या घडामोडींप्रमाणेच ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्पर्धात्मक किंमती नावीन्यपूर्ण ठरतील.,