Friday, December 26, 2025
Home Blog Page 740

Viral Video : अवघ्या काही सेकंदात हिरवागार आंबा झाला पिवळा ; व्हायरल झाली पिकवण्याची पद्धत

viral video

Viral Video : वर्षातून एकदा येणाऱ्या आंब्यांच्या सिझनची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. गोड रसाळ आंब्यांची बाजारात रेलचेल आहे. आता हा आंब्यांचा यावर्षीचा सिझन शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आंबे स्वस्त देखील झाले आहेत. शिवाय आंबे खरेदीची लगबगही बाजारात दिसत आहे. आंबा तयार झाल्यानंतर नैसर्गिक रित्या पूर्ण पिकण्यासाठी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये काही सेकंदात झाडाला लागलेली कैरी पिवळी झाल्याचे दिसत आहे. नक्की काय आहे हा व्हिडीओ ? काय आहे काही सेकंदात आंबा पिकवण्याचा फॉर्म्युला चला पाहूया…

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झालेल्या या व्हिडीओ मध्ये एक व्यक्ती दिसतो आहे. जो आंब्याच्या झाडाला लागलेल्या हिरव्या कैरीजवळ उभा आहे. या व्यक्तीजवळ एक रंगाचा डबा आहे. यामध्ये नारंगी रंग आहे. अगदी पिकलेल्या आंब्यासारखा … हा व्यक्ती झाडाला लागलेला आंबा या रंगाच्या डब्ब्यात बुडवतो. आणि अवघ्या सेकंदात हिरवा आंबा नारंगी होतो. एकवढेच नाही तर हा आंबा हुबेहूब पिकलेल्या आंब्यासारखा सुद्धा व्हिडीओ मध्ये दिसतो आहे. या मजेशीर व्हिडिओला युजर्सची पसंती मिळत आहे. या मजेशीर व्हिडिओला अनेकांनी लाईक देखील केले आहे.

प्रोफेसर ऑफ मीम्स नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत २ लाख ५५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियाही (Viral Video) दिल्या ​​आहेत. एका यूजरने लिहिले…आम्ही आंबा त्याची साल काढून खाऊ. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…व्वा, काय काम आहे. तर आणखी एकाने “मला माझं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळत नाही, नाहीतर आमच्यातही टॅलेंटची कमतरता नाही”. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Bee Attack : तुमच्यावर मधमाशांचा जीवघेणा हल्ला झाल्यास त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा…

Bee Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bee Attack) अनेकदा एखाद्या झाडावर मधमाशीचे पोळे लागल्याचे दिसून येते. गावाकडे अशा मधमाशीच्या पोळ्यांमधून मध काढले जाते. मात्र शहरात किंवा एखाद्या वस्तीत असे पोळे आढळले तर सगळ्यात आधी नगर पालिका वा पंचायतीत त्याची तक्रार दिली जाते. कारण पोळे तयार करणाऱ्या मधमाशांनी जर चुकून हल्ला केला तर त्यापासून आपला बचाव करणे फार अवघड होऊ शकते. अशावेळी नेमकं काय करायला हवं हे माहित नसेल तर आपण मोठ्या अडचणीत येऊ शकतो. म्हणूनच आज आपण मधमाशांच्या हल्ल्यापासून आपले संरक्षण कसे करता येईल याविषयी काही खास टिप्स जाणून घेणार हॊत.

मधमाशांचं एखाद पोळं पडलं किंवा त्याला धक्का लागल्याने मधमाशा आक्रमक झाल्या तर त्या हल्ला करू शकतात. (Bee Attack) असा अचानक हल्ला झाला तर त्यावेळी आपला बचाव करण्यासाठी काही खबरदारी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत मधमाशांचा दंश झाल्यास त्वरित काय उपचार करावे याबाबत देखील माहिती घेऊया.

धोक्याची जाणीव होताच त्वरित दूरवर जा

लक्षात घ्या, मधमाशा कधीही आधी आणि थेट हल्ला करत नाहीत. त्यामुळे समजा जर एकामागे एक अशा मधमाशा तुमच्या डोक्यावर घोंगाऊ लागल्या तर त्या हल्ला करणार आहेत समजून जा आणि लगेच तिथून दूरवर निघून जा. (Bee Attack) कारण, एक एक करत काही वेळातच मधमाशांचा मोठा थवा त्या भागी येऊन हल्ला करण्याची शक्यता असते. मुख्य म्हणजे मधमाशा जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची संख्या शेकडोंनी असते. त्यामुळे ऐनवेळी पळून फायदा होत नाही. म्हणून धोक्याची जाणीव होताच लगेच पळ काढणे फायदेशीर राहील.

कोणतीही वस्तू वा दगड त्यांच्यावर फेकू नका

बरेच लोक मधमाशी जवळ येताच तिला दूर करण्यासाठी तिच्यावर एखादी वस्तू वा दगड फेकून मारतात. तर काही लोक जोरजोरात हात हलवून मधमाशीला दूर करायचा प्रयत्न करतात. (Bee Attack) असे केल्याने मधमाशा त्यांच्या राणी मधमाशीला धोका आहेत असे गृहीत धरतात आणि तिला वाचवण्यासाठी लगेच तुमच्यावर तुटून हल्ला करतात. त्यामुळे एकतर मधमाशांच्या पोळ्यापासून दूर राहा आणि मधमाशी जवळ आली तर तिला मारु नका किंवा त्या जागी अत्तर, सेंट वा धूर करु नका. असे केल्यास मधमाशा आक्रमक होऊ शकतात.

मधमाशांचा हल्ला झालाच तर काय कराल? (Bee Attack)

समजा जर तुमच्यावर मधमाशांनी हल्ला केलाच तर सगळ्यात आधी तुम्ही तुमचा चेहरा कव्हर करा. जेणे करून मधमाशा तुमच्या तोंड, नाक आणि डोळे यांसारख्या नाजूक अवयवांवर हल्ला करून त्यांना हानी पोहचवू शकणार नाहीत. कारण, मधमाशी चावल्यानंतर तो भाग सुजतो आणि काळा देखील पडतो. त्यात आपल्या चेहऱ्यावरील प्रत्येक अवयव हा नाजूक आणि तितकाच संवेदनशील असतो. म्हणून मधमाशांनी हल्ला केला तर सगळ्यात आधी चेहऱ्याचे रक्षण करा.

बऱ्याचदा मधमाशांचा हल्ला झाल्यानंतर लोक त्यांच्या डंखापासून वाचण्यासाठी थेट पाण्यात उड्या घेतात. (Bee Attack) पण यामुळे मधमाशीपासून बचाव होत नाही. उलट अचानक पाण्यात उडी मारल्याने तुम्ही बुडण्याची शक्यता असते. शिवाय मधमाशी चावल्यानंतर पाण्यात उतरल्यास डंख वेळीच न निघाल्याचे आणखी समस्या वाढू शकते. अर्थात पाण्यात उडी मारणे हा काही भरवशाचा पर्याय नाही.

समजा तुम्हाला मधमाशांनी डंख मारला तर तुम्हाला प्रचंड वेदना सहन कराव्या लागतील. कारण, मधमाशीच्या शरीराच्या पाठचा कुसळासारखा काटा तिने एकदा का तुमच्या त्वचेत घुसवला की, प्रचंड असह्य वेदना होतात. या वेदना देणारा हा काटा त्वरित तुमच्या शरीरातून काढून टाकण्याचा प्रयत्न करा. कारण, हा काटा विषारी असू शकतो.

जर तुम्हाला एकावेळी अनेक मधमाशांनी डंख मारले असतील तर कोणतेही घरगुती उपाय करत बसू नका. त्वरित रुग्णालयात जा आणि उपचार घ्या. अन्यथा, ते धोकादायक ठरू शकते. (Bee Attack)

Side Effects Of Using Lipstick : तुमच्या ओठांना ग्लो देणारी लिपस्टिक करते आरोग्याचे नुकसान; किडनी, लिव्हर होईल खराब

Side Effects Of Using Lipstick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Using Lipstick) मेकअप म्हटलं की, त्यात लिपस्टिक ही आलीच. मुलींच्या मेकअप किटमध्ये लिपस्टिक नसेल असं होणं शक्यच नाही. बऱ्याच मुली अशाही असतात ज्या एकवेळ चेहऱ्याला पावडर लावणार नाहीत पण ओठांना लिपस्टिक लावल्याशिवाय घरातून बाहेर पडणार नाहीत. एकंदरच काय तर मुलींना लिपस्टिक हा प्रकार फार आवडतो. कारण लिपस्टिक लावल्यामुळे ओठांना एक वेगळा ग्लो येतो. ज्यामुळे, ओठ अतिशय सुंदर दिसतात. पण हीच लिपस्टिक तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान करू शकते, याबाबत तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर ही बातमी पूर्ण वाचा.

बहुतेक मुली आपल्या ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नियमित स्वरूपात लिपस्टिकचा वापर करतात. (Side Effects Of Using Lipstick) पण ही लिपस्टिक आपल्या किडनीचे आणि लिव्हरचे आरोग्य खराब करू शकते. त्यामुळे जर तुम्हालाही लिपस्टिक लावणे आवडत असेल तर सावध व्हा. चला तर लिपस्टिकचा नियमित वापर केल्यास आरोग्याचे काय नुकसान होते? याविषयी जाणून घेऊया.

ओठांच्या त्वचेचे नुकसान

लिपस्टिक बनवताना त्यामध्ये शिसे, क्रोमियम आणि कॅडमियमसारखी रसायने वापरलेली असतात. (Side Effects Of Using Lipstick) जी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. मुख्य म्हणजे या रसायनांमूळे ओठांची नाजूक त्वचा डॅमेज होते आणि यामुळे इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.

ऍलर्जीचा त्रास (Side Effects Of Using Lipstick)

लिपस्टिकमध्ये काही क्रोमियम संयुगे असतात. जी ओठांवर वापरल्याने त्वचेत शोषून घेतली जातात. परिणामी रिऍक्शन होऊन त्वचेवर व्रण वा चट्टे येऊ शकतात.

आतड्यांचे नुकसान

याशिवाय, जर क्रोमियम जास्त प्रमाणात पोटात गेले तर हा जड धातू हृदय आणि मेंदूसाठी देखील धोकादायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही लिपस्टिक वापरत असाल तर सावध राहणे गरजेचे आहे. अशा समस्या टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.

मृत्यूची शक्यता

इतकंच नाही तर लिपस्टिकमधील हानिकारक रसायनांमुळे न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होऊ शकतात. (Side Effects Of Using Lipstick) यातील क्रोमियम पोटात गेल्यास पोटात अल्सर, क्रॅम्प्स, किडनी, यकृताला इजा होऊ शकते. या समस्यांनी गंभीर स्वरूप घेतल्यास मृत्यूदेखील होऊ शकतो.

‘अशी’ घ्या काळजी

1. लिपस्टिक खरेदी करताना ती चांगल्या दर्जाची असेल याची खात्री करून घ्या. बाजारात स्वस्त आणि चमकदार दिसणाऱ्या लिपस्टिक खरेदी करू नका. (Side Effects Of Using Lipstick)

2. लिपस्टिक खरेदी करतेवेळी खास करून लाल तसेच कोणत्याही गडद शेड्समधील लिपस्टिक खरेदी करू नका. अशा रंगाच्या लिप्स्टीकमध्ये जड धातूचा अपार केला असण्याची शक्यता असते. जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

3. लिपस्टिक लावताना ती पुन्हा पुन्हा डार्क करू नका. लिपस्टिक लावताना तोंडात गेली वा दातांना चिकटली तर लगेच स्वच्छ करा. तसेच ओठ वारंवार तोंडात दाबू नका. यामुळे लिपस्टिक पोटात जाणार नाही. (Side Effects Of Using Lipstick)

4. लिप्स्टिकमुळे ओठांची त्वचा खराब होऊ नये यासाठी लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर लिप बाम किंवा व्हॅसलीनचा वापर करा. ज्यामुळे ओठांची त्वचा लिपस्टिक कमी शोषून घेईल आणि यामुळे ओठांचे नुकसान होणे टाळता येईल.

MahaRERA कडून 20,000 रियल इस्टेट एजंटची नोंदणी रद्द ; काय आहे कारण ?

MahaRERA

MahaRERA : मालमत्ता किंवा घरे खरेदी करताना होणारे अनेक फसवणुकीचे प्रकार पाहता हे प्रकार रोखण्यासाठी MAHARERA कडून अनेक महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. केवळ विकासकांनाच नाही तर इस्टेट एजंटांना देखील नियम लागू करण्यात आले आहेत. या वर्षीपासून एजंटांना पशिक्षण घेणे, परीक्षा उत्तीर्ण करणे आणि नियामकाने तपशीलवार नमूद केल्यानुसार त्यांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे बंधनकारक आहे. शिवाय वेबसाईटवर प्रमाणपत्रांची नोंदणी देखील बंधनकारक करण्यात आली आहे. महरेराचे हेच नियम पळाले नसल्यामुळे महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण म्हणजेच (MahaRERA) ने 20,000 रियल इस्टेट एजंटची नोंदणी रद्द केली आहे.

नोंदणी वर्षभरासाठी रद्द (MahaRERA)

खरेतर 1 जानेवारी, 2024 पासून, रिअल इस्टेट एजंटना प्रशिक्षण घेणे, परीक्षा उत्तीर्ण करणे आणि नियामकाने तपशीलवार नमूद केल्यानुसार त्यांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे न झाल्यास ते व्यवसाय करणे सुरू ठेवू शकणार नाहीत असे महारेरा कडून सांगण्यात आले होते. तरीदेखील नियमांची पूर्तता न झाल्यामुळे महरेरा कडून निर्णय घेऊन अखेर वीस हजारांहून अधिक एजंटांची नोंदणी वर्षभरासाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रियाल इस्टेट एजंटांची चांगलीच गोची झाली आहे. मात्र महारेरा कडून अशा एजंटांना एक संधी देखील देण्यात आली असून जर त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले, सक्षमतेचे प्रमाणपत्र प्राप्त केले आणि ते एका वर्षाच्या आत पोर्टलवर अपलोड केले, तर त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाईल असे महारेराने (MahaRERA) म्हंटले आहे. जे विहित मुदतीत प्रक्रियेचे पालन करणार नाहीत, त्यांची नोंदणी वर्षभरानंतर रद्द केली जाईल.

यापूर्वीही एजंटांची नोंदणी रद्द

त्यानंतर, पुढील सहा महिन्यांसाठी, ते नवीन नोंदणीसाठी अर्ज करू शकणार नाहीत, ज्याचा अर्थ स्थावर मालमत्तेचे व्यवहार करता येत नाहीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.याबाबत माहिती देताना महारेराच्या एका अधिकाऱ्याने म्हंटले आहे की, ” 1 मे 2017 पासून महारेरामध्ये सुमारे 47,000 एजंट्सची नोंदणी झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, महारेराने (MahaRERA) 13,785 रिअल इस्टेट एजंट्सची नोंदणी त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न केल्यामुळे रद्द केली आहे,” असे महारेरा अधिकाऱ्याने सांगितले.

महारेरा चे (MahaRERA) चेअरमन अजोय मेहता म्हणाले, “रिअल इस्टेट क्षेत्रात, ‘एजंट’ महत्वाची भूमिका बजावतात कारण ते घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील दुवा असतात. घरखरेदी करणारे सहसा त्यांच्याशी संपर्क साधतात. सहसा, संभाव्य गृहखरेदीदार प्रकल्पाशी संबंधित प्राथमिक माहिती थेट या एजंटांकडून प्राप्त करतात.”रिअल इस्टेट एजंट्सना रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) कायदा, 2016 च्या नियमनाची माहिती असणे आवश्यक आहे. विकासकाची विश्वासार्हता आणि प्रकल्प, जमिनीच्या टायटलची वैधता, RERA-अनुपालक चटई क्षेत्र, प्रारंभ प्रमाणपत्रे आणि स्थानिक प्राधिकरणांकडून मिळालेल्या मंजुरी यासारख्या प्रकल्प आणि उद्योगाच्या विविध पैलूंबद्दल त्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यांना डिफॉल्ट, विकासकांची आर्थिक स्थिती आणि संबंधित बाबींचे तपशील कसे मिळवायचे हे देखील माहित असले पाहिजे. या सर्व माहितीच्या आधारे, ग्राहक मालमत्ता खरेदी करण्याबाबत माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात.” मेहता म्हणाले. म्हणून, महारेराने एजंटना प्रशिक्षण घेणे, परीक्षा उत्तीर्ण करणे आणि प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे.

अन्यथा विकासकांची नोंदणीही रद्द (MahaRERA)

हा निर्णय 10 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आला आणि शेवटी 1 जानेवारी 2024 रोजी सर्व एजंट्ससाठी बंधनकारक होण्यापूर्वी अनेक वेळा वाढविण्यात आला. असे असूनही, सुमारे 20,000 एजंट कार्यरत आहेत ते अद्यापही अपात्र आहेत आणि त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. जे विकसक अपात्र एजंट्सशी संलग्न राहतील त्यांची नोंदणी रद्द करण्यास महारेरा मागेपुढे पाहणार नाही. विकासकांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नये, असा इशारा मेहता यांनी दिला.

आधी खरेदी, मग पेमेंट; गुगल पे आणतयं 3 खास फीचर्स

Google Pay Feature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या सर्वत्र ऑनलाईन पेमेंट केलं जातंय. मोबाईलच्या माध्यमातून एकेमकांना पैसे पाठवणं सोप्प झाल्याने खिशात पैसे घेऊन सहसा कोणी फिरत नाही. ऑनलाईन पेमेंट म्हंटल कि समोर पहिले नाव येत ते म्हणजे गुगल पे … गुगलपे च्या माध्यमातून अगदी काही सेकंदात आपल्याला एकमेकांना पैसे पाठवता येतात, मोबाईल रिचार्ज मारतो येतो तसेच वीजबिल सारखी अनेक बिले सुद्धा आपण घरबसल्या भरू शकतो . ग्राहकांना गुगल पे वापरत असताना आणखी सोप्प व्हावं यासाठी आता कंपनी ३ नवीन फीचर्स लाँच करण्याच्या तयारीत आहे.

यातील पहिले फिचर म्हणजे फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा पिनद्वारे कार्ड माहिती भरणे. आता Chrome आणि Android वर ऑटोफिल फीचर्ससह तुम्ही वस्तू खरेदी करताना तुमचा वेळ वाचवू शकता. हे वैशिष्ट्य तुमचा शिपिंग पत्ता, बिलिंग पत्ता आणि पेमेंट माहिती ऑटोमॅटिक भरते.आता जेव्हाही तुम्ही Chrome किंवा Android वर ऑटोफिल वापरून पेमेंट करता तेव्हा तुम्ही तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी वापरता तीच पद्धत वापरून तुम्ही तुमचे सर्व कार्ड डिटेल्स भरण्यास सक्षम असाल (फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा पिन). याचा अर्थ तुम्हाला यापुढे सुरक्षा कोड स्वतः टाकण्याची गरज नाही.

दुसरे फीचर्स म्हणजे कार्डचे फायदे सहजपणे पाहणे. तुम्हाला अनेक क्रेडिट कार्डांवर खरेदीसाठी रिवार्ड मिळतात. परंतु कोणत्या रिवार्डच्या माध्यमातून आपल्याला जास्त फायदा मिळेल हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु गुगल पे च्या नवीन फीचर्स नुसार, आता पेमेंट करताना तुम्हाला तुमच्या कार्डमधून मिळणारे फायदे दिसतील.

आता तिसरं आणि महत्वाचं फिचर म्हणजे Buy now, pay later…म्हणजेच “आता खरेदी करा, नंतर पैसे द्या”… गुगल पे आता अधिक शॉपिंग वेबसाइटवर हे फीचर्स ऑफर करत आहे. कंपनीने सांगितले की, “या वर्षाच्या सुरुवातीला, आम्ही ऑनलाइन पेमेंट करताना Google Pay सोबत यापैकी काही पर्याय दाखवण्याचे टेस्टिंग सुरू केली, ज्यामध्ये Affirm आणि Zip यांचा समावेश होता.

Nilgiri Hills : निळे पर्वत पाहिलेत का? भारतातील ‘या’ ठिकाणी जा; दृश्य असे की, प्रेमातच पडालं

Nilgiri Hills

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (Nilgiri Hills) जगभरात अनेक थक्क करणारी ठिकाणे आहेत. निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार पहायचे असतील तर निसर्गाच्या सानिध्यात जावं लागतं हेच खरं. आपल्या भारताला नैसर्गिक साधनसंपत्तीची अमाप प्रमाणात लाभली आहे. भारतात नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येतील अशी बरीच ठिकाणे आहेत. उंच उंच डोंगर, दऱ्या, धबधबे, नद्या पाहण्याची मजा काही औरच असते. अत्यंत सुखद आणि नेत्रदीपक दृश्यांमुळे अशा ठिकाणी मनाला अनोखी प्रेरणा मिळते. तुम्ही आजपर्यंत अनेक डोंगर, पर्वत रांगा असलेली स्थळं पाहिली असतील, फिरली असतील. पण तुम्ही कधी निळे पर्वत पाहिलेत का? होय. तुम्ही बरोबर वाचताय निळे पर्वत.

केरळ मधील मुन्नार हे ठिकाण सुंदर चहाचे मळे पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. (Nilgiri Hills) मात्र, त्याहून जास्त या ठिकाणी येणारे पर्यटक निळे पर्वत पाहण्यास उत्सुक असतात. अनोख्या सौंदर्याने नटलेल्या या निळ्या पर्वतांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. जे केरळच्या सौंदर्यात विशेष भर टाकतात आणि मुख्य म्हणजे मुन्नार या ठिकाणाचे विशेषत्व वाढवतात. चला तर जाणून घेऊया निळ्या पर्वतांचे रहस्य.

निळ्या पर्वतांचे रहस्य तरी काय? (Nilgiri Hills)

केरळमधील मुन्नार या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा निळ्या पर्वतांचे दर्शन होते. सलग तीन पर्वत रांगांच्या संगमावर असलेले मुन्नार हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे १६०० मीटर उंचीवर आहे. या सुंदर ठिकाणी दरवर्षी निलकुरिंजी नावाचे निळ्या रंगाचे फुल उमलते. ही फुले दिसायला अत्यंत सुंदर आणि आकर्षक असतात. (Nilgiri Hills) ज्यामुळे पर्यटकांसाठी ही फुले आकर्षणबिंदु ठरतात. मुख्य म्हणजे प्रत्येक १२ वर्षांनंतर निलकुरिंजी फुले फुलतात आणि याच सुंदर निळ्या फुलांमुळे हे पर्वत निळ्या रंगाचे दिसतात. सर्वत्र फुललेली ही फुले या पर्वतांना निळ्या रंगाचे स्वरुप देतात आणि म्हणून हे पर्वत ‘नीलगीरी’ नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहेत.

शेवटचे कधी फुलले होते निलकुरिंजी ?

माहितीनुसार, २००६ साली या निलगिरी पर्वतांवर निलकुरिंजी फुलांचे दर्शन झाले होते. (Nilgiri Hills) यानंतर २०१८ साली ही फुले पुन्हा उमलली होती. यानंतर आता २०३० मध्ये निलकुरिंजी फुले पुन्हा फुलतील, असे म्हटले जात आहे.

कसे जाल?

जर तुम्ही मुन्नार फिरायला जायचा विचार करत असाल तर तुम्ही रोड, रेल्वे किंवा हवाई मार्गाने प्रवास करू शकता. तामिळनाडू येथील तेनी नावाचे रेलवे स्थानक या ठिकाणाहून सगळ्यात जवळ आहे. तर मदुराई विमानतळदेखील मुन्नारच्या जवळ आहे.(Nilgiri Hills)

Mangi Tungi : महाराष्ट्रातील ‘या’ सिध्दक्षेत्राला जाण्यासाठी चढाव्या लागतात 2 हजाराहून जास्त पायऱ्या; तुम्ही गेलाय का?

Mangi Tungi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mangi Tungi) संपूर्ण महाराष्ट्राला अनेक प्राचीन मंदिरे आणि पुरातन वास्तूंचा विशेष इतिहास लाभला आहे, हे काही नव्याने सांगायला नको. मात्र यांपैकी काही वास्तू फारच विशेष आहेत. महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांचा इतिहास हा कायम रंजक असल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक मंदिराची एक आख्यायिका आहे. जी त्या मंदिराची खासियत आणि वैशिट्य सांगते. आज आपण अशाच एक अत्यंत रमणीय तीर्थस्थळाविषयी माहिती घेणार आहोत. या सिध्दक्षेत्राला मांगी तुंगी शिखर म्हणून ओळखतात. जिथे पोहोचण्यासाठी २ हजाराहून जास्त पायऱ्या चढून जावे लागते. चला या तीर्थक्षेत्राविषयी अधिक माहिती घेऊया.

सिद्धक्षेत्र मांगी तुंगी शिखर (Mangi Tungi)

नाशिकपासून १२५ किलोमीटर दूर अंतरावर सटाणा तालुक्यात हे सिद्ध क्षेत्र आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ४ हजार फूटपेक्षा जास्त उंचीवर हे मंदिर आहे. या सिद्ध क्षेत्रापर्यंत जाण्यासाठी २००० च्या आसपास पायऱ्या चढाव्या लागतात. मांगी तुंगीच्या पायथ्याशी भिलवाडी नावाचे गाव आहे. जिथून या पायऱ्या सुरु होतात. जिथे जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच अशी भव्य मूर्ती पहायला मिळते ही मूर्ती मांगी डोंगरावर सुमारे ४५०० फूट उंचीवर आहे. माहितीनुसार, ही मूर्ती तयार करण्यासाठी १९ वर्षे इतका कालावधी लागला होता.

मांगी शिखर

माहितीनुसार, मांगी शिखराची उंची फार जास्त नाही. असे असले तरीही गिर्यारोहणाची सवय असलेल्यांनाच हे शिखर सर करता येते असे म्हंटले जाते. (Mangi Tungi) या शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव अशा काही देवदेवतांच्या एकूण ३५६ कोरीव मुर्ती आहेत. येथील गुफांमध्ये अप्रतिम कोरीव काम केले असून या ठिकाणी मांगीगिरी मंदीर आहे. जे अत्यंत प्रसन्न ठिकाण आहे.

तुंगी शिखर

तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा थोडे उंच असे शिखर आहे. या शिखराला प्रदक्षिणा करता येते आणि या प्रदक्षिणा मार्गावर एकूण ३ गुंफा आहेत. ज्यातील एका गुंफेत तुंगीगिरी मंदीर आहे. या मंदिरात भगवान बुद्धांच्या सुंदर अशा ९९ कोरीव मूर्ती पहायला मिळतात.

कसे जाल?

मांगी तुंगी सिद्ध क्षेत्राला जायचे असेल तर तुम्ही रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग किंवा हवाई मार्गाने देखील जाऊ शकता. रस्ते मार्गाने जायचे असल्यास नाशिक सेंट्रल बस स्थानकापर्यंत तुम्ही बसने जाऊ शकता. (Mangi Tungi) पुढे भिलवाडी सुमारे १२५ किमी अंतरावर आहे. दरम्यान, नाशिकवरून सटाणामार्ग ताहराबादला जा आणि तिथून भिलवाडीपर्यंत एस.टी. किंवा बसने जाता येईल.

याशिवाय रेल्वेने जात असाल तर नाशिक रोड स्टेशनला उतरून पुढे १३० किलोमीटर अंतर जावे लागेल. तसेच हवाई मार्गे जाण्यासाठी इथे सर्वात जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. (Mangi Tungi) शहराच्या मध्यभागापासून हे विमानतळ २४ किलोमीटर अंतरावर असून नाशिकवरून सटाणामार्ग ताहराबादवरून भिलवाडीपर्यंत जाण्यासाठी एस.टी. किंवा बसने प्रवास करावा लागेल.

Viral Video : भरधाव गाडीच्या धडकेने वाघ गंभीर जखमी; उपचार मिळण्याआधीच सोडला जीव

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपल्या महाराष्ट्रात अनेक अभयारण्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे भंडारा आणि गोंदिया महामार्गावरील नवेगाव नागझिरा अभयारण्य. या अभयारण्यात अनेक प्राणी वास्तव्य करतात. ज्यामध्ये वाघाचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या कमी असली तरीही काही अभयारण्यात वाघ पहायला मिळतात. त्यापैकी एक हे अभयारण्य आहे. दरम्यान, अनेक पर्यटक या ठिकाणी जंगल सफारी करायला जात असतात. अशाच काही पर्यटकांच्या गाडीने एका वाघाला जोरदार टक्कर दिल्याने वाघ अत्यंत जखमी झाल्याची घटना अलीकडेच घडली आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Creta गाडीच्या धडकेने वाघ जखमी (Viral Video)

भंडारा- गोंदिया महामार्गावरील नवेगाव नागझिरा अभ्यारण्यातजवळ घडलेल्या या घटनेत वाघ गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे. वास्तविक, ही गाडी इतकी वेगात होती की कार चालकाला गाडी नियंत्रित न झाल्याने समोर आलेल्या वाघाला जोरदार धडक दिली गेली. या धडकेत वाघ जागीच पडला आणि गंभीर जखमी झाला. पायाला दुखापत झाल्याने त्याला उभं राहता येत नव्हतं. मात्र काही करून जंगलात परत जाण्यासाठीची त्याची धडपड या व्हिडिओत पहायला मिळते आहे.

वाघाचा दुर्दैवी मृत्यू

या व्हिडीओसोबत माहिती देताना युजरने म्हटलंय, ‘नवेगाव- नागझिरा अभयारण्यातून जाणाऱ्या भंडारा- गोंदिया महामार्गावर हा प्रकार घडला. येथे भरधाव येणाऱ्या क्रेटा कारने रस्ता ओलांडणाऱ्या वाघाला जोरदार धडक दिली. (Viral Video) ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या २ एअर बॅग्ज बाहेर आल्या. कारचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले. मात्र, गाडीतील कोणत्याही व्यक्तीला इजा झालेली नाही. दरम्यान, या अपघातात वाघाला मात्र जबर मार बसला आहे. या घटनेची माहिती वन विभागाला मिळाली असता रात्रीच्या अंधारात टॉर्चचा वापर करून वाघाचा शोध घेण्यात आला. मात्र दुर्दैवाची बाब अशी की, वाघाला उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत वन्यजीवप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अगदी १९ सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून वाघाला किती वेदना झाल्या असतील याचा अंदाज येत आहे. हा व्हिडीओ फारच क्लेशदायक आहे. (Viral Video) जो पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्या क्रेटा वाहन चालकावर संताप व्यक्त केला आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया X हॅण्डलवर Prateek34381357 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Travel : वॉटर पार्क विसराल ! भेटी द्या पुण्यापासून जवळ असलेल्या ‘या’ बजेटफ्रेंड्ली ठिकाणांना

water parak

Travel : सध्या उन्हाळाच्या सुट्टीचे दिवस सुरु आहेत. उन्हाळी सुट्टीत मुलांसोबत कुठेतरी बाहेर फिरायचा प्लॅन नक्की केला जातो. उन्हाळी सुट्टीची मजा घ्यायची असेल तर वॉटर पार्क हा पर्याय आवर्जून हल्ली निवडला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? महागड्या वॉटर पार्कला वेळ आणि पैसे घालवण्यापेक्षा आजच्या लेखात आम्ही तुम्हाला पुण्यापासून जवळचे असे काही पर्याय सांगणार आहोत. जिथे तुमचे जास्त पैसे जाणार नाहीत शिवाय तुम्हाला नैसर्गिक (Travel) वातावरणात तुमच्या कुटुंबासोबत काही अविस्मरणीय क्षण घालवता येतील.

खरंतर उन्हाळयात पाण्याची कमतरता असते. त्यामुळे वॉटर पार्क (Travel) मध्ये कोणत्या प्रकारचे पाणी असते. शिवाय हे पाणी चांगले राहावे म्हणून अनेकदा त्यामध्ये क्लोरीन टाकले जाते. त्यामुळे तुमची त्वचा काळवंडते. असा अनुभवत तुम्हाला वॉटर पार्कला जाऊन आलाच असेल मात्र नैसर्गिक पाण्यामुळे असे परिणाम होत नाही. शिवाय खेळताना मुलानांच्या तोंडात पाणी गेले तरी त्याचे तितकेसे वाईट परिणाम होत नाहीत. वॉटर पार्कसाठी एका दिवसाला तुम्हाला ५०० ते १८०० रुपये (Travel) मोजावे लागतात. मात्र एवढ्या बजेटमध्ये तुमची मस्त ट्रिप प्लॅन होईल यात शंका नाही. चला तर मग जाणून घेऊया ही ठिकाणे कोणती आहेत.

पुण्याजवळ (Pune) असलेल्या धबधब्यांबद्दल आम्हीच सांगणार आहोंत. तसेही जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शाळांना सुट्ट्या असतात. त्यामुळे पावसाळा सुरुवात झालेली असते. जिथे तुम्हाला मस्त अनुभव घेता येईल. ही ठिकाणे पुण्याच्या जवळ आहेत शिवाय मुलांसाठी आणि पूर्ण कुटुंबासाठी सुद्धा सेफ आहेत.

ताम्हिणी (Travel)

पुण्यापासून जवळच अंतरावर असलेले हे ठिकाण आहे. पुणे ते ताम्हिणी हे अंतर ५३ किमीचे आहे. खरेतर सुंदर डोंगरांमधून गेलेला घाटरस्ता म्हणजे ताम्हिणी घाट. पावसाला सुरु झाला की इथे धबधबे कोसळायला सुरु होतात. हा पूर्ण घाट छोट्या मोठ्या धबधब्यांनी फुलून जातो. ढग खाली उतरतात. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासारखे असते. पूर्ण घाटात छोटे मोठे धबधबे कोसळायला लागतात जिथे लहान मुलं भिजण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकतात.

ठोकरवाडी धबधबा

हे ठिकाण ठोकरवाडी धरणाजवळ असून पुण्यापासून ६६ किमी अंतरावर आहे. तुम्ही विकेंडला येथे तुमच्या कुटुंबासोबत जाऊ शकता. इथल्या रस्त्यावरून जाताना तुम्हाला अनेक छोटे धबधबे दिसतात. तथापि, या धबधब्याला भेट देण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती सुमारे १०० रुपये (Travel) मोजावे लागतील. पण हे वॉटर पार्कपेक्षा स्वस्त आहे. तुम्हाला सेल्फी क्लिक करणे आवडत असल्यास, येथे तुम्हाला सर्वोत्तम सेल्फी स्पॉट्स मिळतील.

भाजे धबधबा (Travel)

हे ठिकाण लोणावळ्यानजीक असून पुण्यापासून याचे अंतर ६१ किमी आहे. येथील धबधब्याखाली एक लहान तलाव आहे. तुम्ही या ठिकाणी मुलांसोबत तासन्तास पाण्यात खेळू शकता. भाजे फॉल्स हे रॅपलिंगसाठीही उत्तम ठिकाण मानले जाते.

Viral Video : मूर्खपणाचा कळस!! उन्हाने तापलेल्या रस्त्यावर बनवलं Egg ऑम्लेट; व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

Viral Video

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. विचित्र आणि अतरंगी चाळे याशिवाय भयानक जीवघेणे स्टंट किंवा एकदा विचित्र रेसिपी व्हायरल व्हायला काही मिनिटं पुरेशी असतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुमचं डोकं फिरलं नाही तर नवल. एखादा पदार्थ बनवताना स्वच्छता किती महत्वाची असते हे काही वेगळे सांगायची गरज नाही. अशातच एक महिला कडक उन्हामुळे तापलेल्या रस्त्यावर चक्क अंड्याचं ऑम्लेट बनवताना दिसली आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कुणीही काहीही करू शकतं याचा प्रत्यय तुम्हाला आलाच असेल. अशातच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ही महिला चक्क उन्हाने तापलेल्या रस्त्यावर अंड्याचे ऑम्लेट बनवताना दिसते आहे. व्हिडिओत दिसतंय की. एक तरुणी रस्त्यावर बसली आहे. तिच्या बाजूने वाहनांची ये- जा सुरु आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ती २ अंडी दाखवते. त्यानंतर रस्त्यावर पाणी टाकून रस्ता साफ करते आणि डोक्यावर असलेल्या कापडाने तो पुसून घेते.



यानंतर रस्त्यावरच थोडे तेल टाकून हाताने पसरवते आणि मग दोन्ही अंडी फोडून रस्त्यावर टाकते. एका चमच्याने ती अंड पसरवते आणि त्यानंतर तापलेल्या अंड्याचे ऑम्लेट बनते का नाही ते मात्र व्हिडिओत दिसत नाही. (Viral Video)कारण त्याआधीच हा व्हिडीओ संपतो. या व्हायरल व्हिडिओला अनेक लोकांना पाहिले असून बऱ्याच लोकांनी कमेंटबॉक्समध्ये वेगवेगळ्या कमेंट दिल्या आहेत. सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर tejalmodi454 नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील बऱ्याच युजर्सने या महिलेच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. (Viral Video) एखादा कन्टेन्ट बनवण्यासाठी अशाप्रकारे अन्न वाया घालवणे, याबाबत अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच रस्त्यावर टाकलेल्या तेलामुळे अपघात होऊ शकतो, याबाबत देखील अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे.