Friday, December 26, 2025
Home Blog Page 741

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेला इतक्या जागांवर यश येईल

SHARAD PAWAR LOK SABHA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाचव्या टप्प्यातलं मतदान उरकलं आणि महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल मतपेटी मध्ये बंद झाला… कुठल्या जागेवरून कोण निवडून येणार? याचे अंदाज बांधले जात असले तरी 4 तारखेला स्पष्ट निकाल समोर येईल… त्यात शरद पवारांनी महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज लावत महायुतीच्या छातीत धडकी भरवली होती… पण यातल्या तुतारी नेमक्या किती जागांवर आघाडी घेत गुलाल उधळेल? यावर बोलणं मात्र त्यांनी टाळलं होतं… म्हणूनच महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शरद पवारांच्या तुतारीचे उमेदवार ज्या 10 जागांवर रेसमध्ये होते त्यातल्या किती जागा निवडून येतील? शरद पवारांचं राजकीय भविष्य ठरवणाऱ्या लोकसभेच्या महानिकालात तुतारीचे किती खासदार दिल्लीत जातील? हेच सांगणारा हा विशेष रिपोर्ट…

पहिला मतदारसंघ येतो तो अर्थात बारामतीचा… एकट्या राज्यातच नाही तर पुऱ्या देशाचं लक्ष बारामतीत काय होणार याकडे लागलं होतं. याला कारण होतं पवार विरुद्ध पवार अशी लढत… अजितदादांनी बंड करून बहिण सुप्रियाच्या विरोधात आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशा संघर्षाची ठिणगी पाडली… सुप्रियाताईंची पॉलिटिकल व्हॅल्यू, शरद पवारांच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वारं आणि अजितदादांच्या विरोधात गेलेली स्थानिक समीकरणे यामुळे ताई तुतारी वाजवणार हे फिक्स होतं… मात्र शेवटच्या काही दिवसात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अजितदादांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला… यावरून मतदान फिरलं अशी चर्चा होती… पण या अटीतटीच्या लढतीत सुप्रियाताई निसटता विजय मिळवतील असा अंदाज सर्वच राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत…

दुसरा मतदारसंघ आहे तो साताऱ्याचा…

बारामतीनंतरचा शरद पवारांचा हक्काचा बालेकिल्ला कुठला असेल तर तो साताऱ्याचा… इथे परिस्थिती मात्र बिकट होती. जनमत पवारांच्या बाजूने होतं. पण लोकसभेच्या रिंगणात उतरवावं, असा एकही चेहरा पवारांना सापडत नव्हता. बरीचशी चाचपणी केल्यानंतर अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला… विरोधात उदयनराजे असले तरी यंदाच्या निवडणुकीत हक्काची मतं वगळता म्हणावी अशी त्यांची क्रेझ नव्हती… त्यामुळे प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत शशिकांत शिंदे नावाची मतदारसंघात चर्चा होती… शरद पवारांच्या प्रत्येक वाईट काळात साथ देणारा हा सातारा यंदाही शिंदेंना लोकसभेवर पाठवेल, असा एकूण अंदाज आहे…

तिसरा मतदार संघ आहे तो माढ्याचा…. माढ्याचा तिढा हा सर्वात जास्त ड्रामॅटिक ठरला… इथंही भाजपकडून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट रिपीट केल्यानंतरही पवारांना इथून उमेदवार सापडत नव्हता… महादेव जानकरांना पाठिंबा देण्याचा डाव त्यांनी टाकून पाहिला पण त्यात त्यांना यश काही आलं नाही… याच दरम्यान अगदी अनपेक्षितपणे महायुतीत नाराज असलेल्या आणि लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हातात तुतारी देत पवारांनी मोठे राजकारण खेळलं… मोहिते पाटलांनी उडवून दिलेला प्रचाराचा धुराळा आणि शरद पवारांनी घेतलेल्या एकामागून एक सभा यामुळे मोहिते पाटील इथल्या लढतीत प्लसमध्ये राहिले… उत्तमराव जानकर, सुशील कुमार शिंदे यांना सोबत घेत मोहिते पाटलांनी इथलं जातीय समीकरण आपल्या बाजूने वळत करून घेतलं… या सगळ्यांचा परिणाम म्हणून माढ्यात 4 जूनला तुतारीचाच आवाज जास्त येईल, असं स्थानिकांचं म्हणणं आहे…

चौथा मतदारसंघ आहे तो शिरूरचा… घड्याळ विरुद्ध तुतारी अशा या लढतीत अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चांगली चुरस झाली… असं असलं तरी दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणाव असं आढळरावांचं काम केलं नाही अशी चर्चा झाली… शेवटच्या दिवसात अमोल कोल्हे यांनी केलेला वादळी प्रचार आणि त्याला शरद पवारांची मिळालेली जोड यामुळे कोल्हेंच्या तुतारीच पारड शिरूरमध्ये सध्यातरी जड दिसतंय…

पाचवा मतदारसंघ आहे तो दक्षिण नगरचा…
निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी काट्याने काटा काढावा अशी झालेली रंगतदार लढत… पैसे वाटण्यापासून ते बोगस मतदानापर्यंत अनेक घटना नगरमध्ये घडल्या… प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असं या निवडणुकीला स्वरूप आणत लंकेंनी आधीच स्वतःला सेफ केलं… विखेंना पक्षांतर्गतच सहन करावा लागलेला नाराजीचा फटका, लंकेंवर केलेलं पण विखेंवर बूमरँग झालेलं अजितदादांचं स्टेटमेंट या सगळ्यामुळे लंके नगरमध्ये तुतारी वाजवतील, याची खात्री अनेकांना वाटतेय…

सहावा मतदारसंघ आहे तो बीडचा…
अत्यंत हायव्होल्टेज ठरलेल्या या मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बप्पा सोनवणे यांच्यात घासून लढत झाली… बोगस मतदानाच्या अनेक घटना, निवडणूक नियमांचे केलेलं उल्लंघन आणि अनपेक्षितपणे वाढलेला मतदानाचा आकडा यामुळे इथे काहीतरी शिजतंय, असा संशय घेतला गेला… बजरंग बाप्पांनी तर फेर मतदानाची मागणी केली… मराठा विरुद्ध ओबीसी अशा जातीय ध्रुवीकरणातून झालेल्या या निवडणुकीत बजरंग बाप्पा यांचं पारड शेवटपर्यंत जड दिसलं… त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी बालेकिल्ल्यात तुतारी वाजणं ही धोक्याची घंटा ठरू शकते…

राज्यातल्या शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यात पार पडलेला पुढचा मतदारसंघ आहे तो भिवंडीचा…

भिवंडीची मुख्य लढत शरद पवार गटाकडून बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपकडून स्टॅंडिंग खासदार कपिल पाटील यांच्यात मुख्य लढत झाली… पाटलांच्या विरोधात असणारी अँटीइन्कमबन्सी, दोन टर्म निवडून देऊनही तसाच जिवंत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे जनतेला बदल हवा होता… हेच जनमानस ओळखून पवारांनी इथून बाळ्यामामा यांना मैदानात उतरवलं… भिवंडी मध्ये कागदावर महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी ग्राउंडवर मात्र महाविकास आघाडी एकदिलाने काम करत असल्यामुळे तुतारीची हवा होती… मनी आणि मसल पॉवर, सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध आणि शरद पवारांच्या बाजूने असणार वारं याचा अचूक अंदाज घेतला, तर बाळ्यामामा भिवंडी गाजवणार, असं इथलं वातावरण आहे…

आता उरले ते तीन उमेदवार… रावेर मधून रक्षा खडसे यांच्या विरोधात पवारांनी राजकारणात अगदीच नवख्या असणाऱ्या श्रीराम पवार यांना उमेदवारी दिली… नाथाभाऊ यांनी पवारांची साथ सोडत पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केल्यानं जळगाव आणि रावेर मधील राष्ट्रवादीची ताकद कमी झाली होती… श्रीराम पवार यांनी कडवी झुंज दिली असली तरीदेखील रक्षा खडसे यांचं पारड इथं मजबूत आहे…

यासोबतच दिंडोरीमध्ये भाजपमध्ये भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांच्यात लढत झाली… शेतीच्या मुद्द्यापासून कामधंद्यापर्यंत प्रत्येक प्रश्नावर दिंडोरीची जागा लढली गेली… पण महाविकास आघाडीचा म्हणावा असा जोर न लागल्याने आणि भाजपचा बालेकिल्ला असल्याने भारती पवार इथे तुतारीला ओव्हरटेक करतील…

आता पाहूयात शेवटचा मतदारसंघ आणि तो म्हणजे वर्ध्याचा…

विदर्भातल्या शरद पवारांच्या या एकमेव जागेवर भाजपकडून रामदास तडस विरुद्ध तुतारीकडून अमर काळे यांच्यात लढत झाली… भाजपचा हा मागील दोन टर्म पासून अभेद्य बालेकिल्ला असल्यामुळे इथं महायुतीनं चांगला जोर लावला होता… पण रामदास तडस हे तुतारीला वर्ध्यातून वरचढ राहतील, असं एकंदरीत चित्र दिसतंय… तर अशाप्रकारे एकूण दहा जागांपैकी तब्बल सात जागांवर तुतारीचा आवाज घुमू शकतो… हा आकडा खालीवर होऊ शकतो पण पक्ष फुटी नंतरही हा विजय शरद पवारांना राजकारणात जिवंत ठेवणारा… आणि नवीन उभारी घेऊन देणारा ठरू शकतो… महाराष्ट्रात तुतारीचा आवाज किती मतदारसंघात घुमेल? तुमचा अंदाज काय सांगतो? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

Shah Rukh Khan Hospitalized : शाहरुख खानची तब्येत बिघडली; ‘या’ कारणामुळे घ्यावे लागले रुग्णालयात उपचार

Shah Rukh Khan Hospitalized

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shah Rukh Khan Hospitalized) बॉलिवूड सिनेविश्वाचा बादशाह अर्थात लाडका अभिनेता शाहरुख खानचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो त्याच्याविषयी जाणून घेण्यात कायम रुची ठेवतो. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमधील शाहरुख खानच्या मालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स यंदा प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील IPL ची पहिली क्वालिफायर मॅच पाहण्यासाठी शाहरुख मंगळवारी, २१ मे रोजी अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हजर होता. दरम्यान, त्याची प्रकृती अचानक बिघडली होती. ज्यासाठी त्याला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अभिनेत्याची तब्येत बिघडण्याचे कारण (Shah Rukh Khan Hospitalized)

आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शाहरुख स्टेडियमवर हजर होता. दरम्यान, मॅच जिंकल्यावर संघ आणि केकेआरच्या चाहत्यांसह शाहरुखने विजयाचा जल्लोष देखील केला. यावेळी विजयाचा आनंद साजरा करताना शाहरुखला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने सर्वप्रथम प्राथमिक उपचार घेतले. मात्र प्राथमिक उपचार घेऊनही त्याची तब्येत सुधारत नव्हती. हे लक्षात येताच त्याला तातडीने अहमदाबादमधील एका रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे त्याच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.



डॉक्टरांनी शाहरुखला तपासल्यानंतर त्यांनी सांगितले की, शरीरातील पाणी अचानक कमी झाल्यामुळे अभिनेत्याची प्रकृती खालावली आहे. वाढत्या उष्णतेमुळे शाहरुख डिहायड्रेशनचा शिकार झाला आणि परिणामी त्याच्या तब्येतीवर गंभीर परिणाम झाल्याचे समजत आहे. (Shah Rukh Khan Hospitalized)माहितीनुसार, अहमदाबादमध्ये गेल्या २ दिवसांपासून उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. देशभरात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याने बरेच लोक उष्माघातासारख्या समस्येने त्रासलेले दिसत आहेत.

जुही चावलाने दिली हेल्थ अपडेट

शाहरुखच्या प्रकृतीबद्दल त्याचे चाहते चिंतेत असताना अभिनेत्याची जवळची मैत्रीण जुही चावला त्याच्या भेटीसाठी अहमदाबादला पोहोचली होती. यानंतर तिने शाहरुखच्या तब्येतीबाबत सांगताना म्हटले की, ‘काल (बुधवार २२ मे) रात्रीपासून त्याच्या प्रकृतीत सुधारणा आहे. त्याची उत्तमप्रकारे काळजी घेतली जात आहे. (Shah Rukh Khan Hospitalized) तो लवकरच बरा होईल डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. आता आमची टीम अंतिम सामना खेळेल तेव्हा तो या वीकेंडला टीमला सपोर्ट करण्यासाठी नक्की स्टेडियममध्ये येईल’.

कधी मिळेल डिस्चार्ज?

एका वृत्तानुसार, शाहरुख खानच्या तब्येतीत बरीच सुधारणा दिसून येत आहे. शिवाय त्याची सकारात्मक बाजू पाहता आज २३ मे २०२४ रोजी अभिनेत्याला डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. (Shah Rukh Khan Hospitalized)

नात्याच्या विविध छटा उलगडणार ‘मल्हार’; उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

Malhar Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नात्यातील विविध छटा उलगडणाऱ्या ‘मल्हार’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून मैत्री, प्रेम, विश्वास या भावना यात दिसत आहेत. व्ही मोशन प्रस्तुत या चित्रपटाचे प्रफुल पासड निर्माते असून दिग्दर्शन आणि लेखन विशाल कुंभार यांनी केले आहे. या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, मोहम्मद समद, अक्षता आचार्य, रवी झंकाळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ७ जून २०२४ रोजी ‘मल्हार’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलर रिलीज

गुजरातमधील कच्छच्या ग्रामीण भागात या तीन वेगवेगळ्या कथा घडताना ट्रेलरमध्ये दिसत आहे. यात दोन लहान मुलांची मैत्री, तरूण – तरूणीचे एकमेकांवर असणारे प्रेम आणि एका जोडप्याचे एकमेकांवर असणारा विश्वास अशा तीन कथांचा यात समावेश असून या कथा कोणत्या वळणावर जाणार हे औस्त्युक्याचे ठरणार आहे. हा चित्रपट भावनिक असला तरी लहान मुलांची धमालही यात दिसत आहे.

‘मल्हार’ एक कौटुंबिक चित्रपट

चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल कुंभार म्हणाले, ‘तीन वेगवेगळ्या वयोगटाची ही कथा आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातील निरागसता, संभ्रम, घालमेल, विश्वास अशा अनेक भावना यात पाहायला मिळतील. ‘मल्हार’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून नातेसंबंध कसे जुळतात आणि त्यांचा प्रवास कसा फुलत जातो, हे अतिशय रंजकतेने दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

ग्रामीण भागातील साधेपणा, गावच्या मातीतील सहवास, नात्यांमधील मुळं यावर हा चित्रपट आधारित असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल’.

New Marathi Movie : AI च्या जाळ्यात गुरफटलेल्या बापाची गोष्ट!! ‘धर्मा- दि एआय स्टोरी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; पहा टिझर

New Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Marathi Movie) एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने सगळ्यांनाच या चित्रपटाबाबत एक विशेष उत्सुकता आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक पुढील अपडेटसाठी आतुर आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग करत असून चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत देखील तो झळकणार आहे. दरम्यान, नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

कधी होणार प्रदर्शित? (New Marathi Movie)

पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित ‘धर्मा – दि एआय स्टोरी’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती. तेव्हापासूनच या वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समजत आहे. (New Marathi Movie) याबाबत घोषणा करताना एक टिझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या टिझरमधून हा चित्रपट एक रंजक कहाणी घेतोय हे समजते.

टिझर व्हिडीओ

या चित्रपटाचा टिझर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या टीझरमागील जबरदस्त संगीत ऐकूनच अंगावर शहारे येत आहेत. तर सिनेमा रिलीजनंतर किती लक्षवेधी ठरेल याचा अंदाज लावता येतोय.

\एका वडील आणि मुलीची गोष्ट या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय मराठी सिनेसृष्टीला मिळणार आहे, असे म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात प्रमुख भूमिकेत दिसतील.

काय म्हणाला पुष्कर जोग?

आपल्या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला की, ‘काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली होती. एआयच्या जंजाळात अडकलेल्या आपल्या मुलीच्या शोधात असलेल्या बापाचा प्रवास हा विषय फार आधीपासून माझ्या डोक्यात होता. तेच ‘धर्मा- दि एआय स्टोरी’च्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्यांना या विषयाबद्दल फारसे माहित नसेल, त्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय नक्कीच समजेल.



परदेशात फिल्मच्या शुटिंगदरम्यान मला थोडी दुखापतही झाली, परंतु तुम्हा सगळ्या प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी सुखरूप बाहेर आलो आणि आता येत्या २७ सप्टेंबरला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम सोबत असूद्यात’.(New Marathi Movie)

पुणे – बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमधील CNG गॅसच्या टाकीला गळती

CNG Gas Leaked

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Bangalore Expressway) एक मोठी दुर्घटना घडली आहे. सीएनजी गॅसची (CNG Gas) वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील गॅसची अचानक गळती सुरु झाल्याचा प्रकार घडला. कराड शहरानजीक असलेल्या मलकापूर हद्दीतील कराड (Karad) खरेदी विक्री संघ इमारतीशेजारी आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. अचानक लागलेल्या या गॅस गळतीमुळे परिसरातील वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली होती. तसेच नागरिकांमध्येही एकच गोंधळ उडाला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे बंगलोर महामार्गावर कोल्हापूरहून साताऱ्याच्या दिशेने एक ट्र्क CNG गॅसची वाहतूक करत होता. महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने या ठिकाणी दोन्ही लेनवरील वाहतूक हि सर्व्हिस रोडवरून सुरु ठेवण्यात आली आहे. या सर्व्हिस रोडवरून सातारच्या दिशेने सीएनजी गॅसच्या टाक्यांनी भरलेला ट्रक निघाला असताना अचानक ट्रकमधील टाक्यातून सीएनजी गॅस बाहेर येऊ लागला. गॅस बाहेर येत असल्याचे ट्रकमधील ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने त्याने तो ट्रक खरेदी विक्रि संघाच्या इमारतीसमोर सर्व्हिस रस्त्यावर उभा केला.

ट्रक मधील सीएनजी गॅस बाहेर येत असल्याचे परिसरात इमारतीमधील राहत असलेल्या रहिवाशांनी पाहिले. त्यांनी तत्काळ इमारत इमारतीतून खाली धाव घेतली. तसेच इतर नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना दिली. घटनास्थळी ड्रॉयव्हरने प्रसंगावधान राखत लिकेज झालेल्या सीएनजी टाक्याचे लिकेज काढून बाहेर पडणारा सीएनजी गॅस बंद केला. साधारण एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर सीएनजी गॅसवर नियंत्रण मिळवण्यात ड्रायव्हरला यश आले. त्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेनं परिसरात असलेल्या रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडून गेला. रहिवाशांनी भीतीपोटी इमारतीतून बाहेर धाव घेतली. तर सर्व्हिस रोडवरील सातारच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीकाळ थांबविण्यात आली. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली.

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत सर्वात मोठी घसरण!! पहा आजचे भाव

Gold Price Today 23 may

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेली सोन्याच्या किमतीनी (Gold Price Today) आज अचानक ब्रेक लागला आहे. आज गुरुवार २३ मे २०२४ रोजी एक तोळा सोन्याच्या किमतीत जवळपास १००० रुपयांची घट पाहायला मिळाली आहे. खूप दिवसांनी सोने स्वस्त झाल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज २४ कॅरेट १० ग्राम सोने 72380 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 0.89% म्हणजेच 647 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या किमतीत सुद्धा १८६६ रुपयांची घसरण झाली असून १ किलो चांदी 91089 रुपयांवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज MCX वर सोन्याचा भाव ७२६०० रुपयांपासून सुरु झाला.. मात्र बाजार जसा जसा पुढे जाईल तस तस सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) घट होऊ लागली. ११ वाजता सोन्याचा भाव ७२३६० रुपयांवर व्यवहार करू लागला. त्यानंतर ११ वाजून ३० मिनिटांनी सोन्याची किंमत ७२१८० रुपयांपर्यंत घसरली. यानंतर १२ वाजता या किमतीत थोडीफार वाढ झाली असून सध्या १० ग्राम २४ कॅरेट सोने 72380 रुपयांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, एक तोळा सोन्याची किंमत ७३४२० रुपये आहे.

Gold Price Today

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 67,300 रुपये
मुंबई – 67,300 रुपये
नागपूर – 67,300 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 73,420 रूपये
मुंबई – 73,420 रूपये
नागपूर – 73,420 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Pravara River SDRF Boat Accident : बुडालेल्या व्यक्तीला शोधायला गेलेल्या SDRF पथकाचीच बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Pravara River SDRF Boat Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदापूरातील भीमा नदी पात्रातील बोट बुडाल्यामुळे सहा जणांच्या मृत्यूची घटना ताजी असताना अहमदनगरमधील SDRF च्या बचाव पथकाची बोट बुडाल्याने (Pravara River SDRF Boat Accident) मोठी खळबळ उडाली आहे. एका बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एसडीआरफ पथक नदीपात्रात उतरलं होते मात्र त्यांची बोट उलटल्याने ५ जण बुडाले. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघांचा शोध सुरु आहे. या घटनेनं नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, याच परिसरात 22 मे रोजी दोघेजणं बुडाले होते. त्यातील एकाच मृतदेह सापडला मात्र दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडत नव्हता. यासाठी आज सकाळी SDRF च्या टीमला बोलावण्यात आलं होतं. SDRF पथक सदर बुडालेल्या मृताचा शोध घेत असताना त्यांचीच बोट उलटली. यामध्ये ५ जण बुडाले. त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध अजूनही सुरूच आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं. उजनी धरणात बोट बुडाल्याने बेपत्ता झालेल्या सहा जणांचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुखःद आहे. तर नदीत बुडालेल्याचा शोध घेताना प्रवरा नदीत बोट उलटून SDRF च्या बचाव पथकातील तीन जवानांचा मृत्यू झाल्याची बातमीही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. यातील सर्व मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

Pune Porsche Accident : पोर्श कार अपघात! आजोबांचं छोटा राजन कनेक्शन… ‘पुणे टू दुबई ‘

Pune Porsche Accident updates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझा मुलगा मला परत द्या… माझा मुलगा मला सोडून गेला त्याची काय चूक होती. मेरा बच्चा अच्छा था… असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आहे पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात (Pune Porsche Accident) बळी गेलेल्या अनिस अवधियाच्या आईचा… अश्विनी आणि अनिस या दोन होतकरू तरुणांचा श्रीमंत बापाच्या बारावी पास झालेल्या अल्पवयीन मुलानं मद्याधुंद अवस्थेत चिरडून जीव घेतला… अशांची पाचर बसवायची सोडून प्रशासनानं त्याची 14 तासांच्या आत जामिनावर सुटका केली… आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिथल्याच एका स्थानिक लोकप्रतिनिधीनं प्रयत्न केल्याच्याही बातम्या फुटल्या… आरोपीला पोलिस स्टेशनमध्ये पिझ्झा घेऊन जाणं असो… की निकालात दोन निर्दोष व्यक्तींचा जीव घेतल्याबद्दल निबंध लिहिण्याची दिलेली शिक्षा यामुळे सोशल मिडियापासून ते राजकारणात याचे पडसाद उमटू लागले… रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ, देवेंद्र फडणवीस आणि थेट राहुल गांधी यांनी या प्रकरणावर बोट ठेवल्याने यंत्रणा कामाला लागली…

दारू पितो हे आपल्या वडिलांना माहिती होतं- Pune Porsche Accident

वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल होऊन पुन्हा याची कोर्टात सुनावणी सुरू आहे…अल्पवयीन मुलानं कोझी किचन या हॉटेलमध्ये भरलेलं 48 हजार रुपयांचं बील ज्युविनाईल कोर्टासमोर सादर करण्यात आलं..ज्यामध्ये या मुलानं दारूसाठी पैसे मोजल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर हा मुलगा दारू पित असल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांकडून जुव्हीनाईल कोर्टात सादर करण्यात आलं… मात्र, हा मुलगा दारू प्यायलेला होता की नाही, यासाठी सर्वात भक्कम पुरावा असणारा ब्लड रिपोर्ट अजून न आल्याने या प्रकरणात कोण तरी हस्तक्षेप करतोय, हे बोललं जाऊ लागलंय… विशाल अग्रवाल यांच्यावर या आधी देखील काही गुन्हे दाखल आहेत… आपण दारू पितो हे आपल्या वडिलांना माहिती होतं, त्यांच्या संमतीनेच आपण गाडी पार्टीला घेऊन गेलो होतो. असं पोलिसांना आधीच सांगितल्याने विशाल अग्रवाल यांच्या बाप असण्याच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालय… हे कमी होतं की काय म्हणून ज्यांनी या अल्पवयीन मुलाचा जामीन मंजूर केला त्याच्या आजोबांनी आम्ही आमच्या नातूला व्यसनांपासून लांब ठेवू, त्याला इथून पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या शिक्षणात व्यस्त ठेवू. असा जबाब दिला… पण ज्या आजोबांनी आपल्या नातूच्या सुधारण्याची हमी घेतली. त्याच आजोबांचे छोटा राजनसोबत कनेक्शन असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं आता अग्रवाल कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत…

आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालने डॉन छोटा राजनला तत्कालीन नगरसेवक अजय भोसले यांची 2009 मध्ये हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती…. सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अजय भोसलेंनी आरोपीच्या आजोबांची आणि अग्रवाल कुटुंबाची सारी कुंडकीच बाहेर काढली… ते म्हणाले की , संपूर्ण अग्रवाल फॅमिलीच क्रिमिनल आहे… प्रत्येकावर किमान एक-दोन केसेस आहेत… धमकी, दमदाटी करून पैसे देऊन ते न्याय विकत घ्यायला पाहतात…यासोबत त्यांनी 2009 च्या घटनेचा किस्साही सांगितला…2009 मध्ये वडगावशेरीमधून आमदारकीसाठी भोसले उभे होते. राम अग्रवाल यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. राम अग्रवाल हे आरोपीच्या आजोबांचे म्हणजेच सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे सख्खे बंधू… त्यावेळी छोटा राजनचे अनेक फोन दोन भावांच्या भांडणातून भोसलेंना येत होते. हजारो कोटींचा हा वाद होता. राम अग्रवाल एस .के. अग्रवालला पैसे देत नव्हता. एसके अग्रवालने दुबईला जाऊन त्यासाठी छोटा राजन यांची भेटही घेतली होती… छोटा राजनला राम अग्रवाल हा अनिल भोसले याचा खास मित्र असल्याचं सांगितलं होतं. त्यातून भोसलेंची छोटा राजनला सुपारी देण्यात आली… गोळीबार करण्यात आला…जर्मनी बेकरीजवळ झालेल्या या गोळीबारात शार्प शूटर यांनी सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि छोटा राजन यांची नावही घेतली होती…

छोटा राजनला भारतात आल्यानंतर त्याच्यावरील आरोपांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला… पण एस. के. अग्रवाल यांच्या केस मुद्धामहून लांबवण्यात आली… असाही त्यांचा आरोप आहे…पोलिसांकडे मोठी अफरातफर करून प्रकरण दाबायचे हा त्यांचा धंदा असल्याचा आरोपही भोसले यांनी आरोपीच्या आजोबांवर केला आहे… थोडक्यात काय तर नातवाच्या करामतीमुळे आजोबांनी दाबलेली जुनी पुरानी प्रकरणही यानिमित्ताने बाहेर आली आहेत… पुणे सत्र न्यायालयाने आज विशाल अग्रवालसह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवलंय… पण आरोपीच्या आजोबांच्या या अंडरवर्ड कनेक्शनचाही पोलीस तपास करणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे… आम्ही या घटनेचे (Pune Porsche Accident) लाईव्ह अपडेट्स देऊच…पण सध्या ?चर्चेत असणारी ही बातमी काही दिवसांनी पैशांचा पाऊस पाडून चर्चेतून गायब होऊ नये, म्हणजे मिळवली… बाकी पुण्यातल्या या हायव्होल्टेज अपघात प्रकरणावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा?

PM Kisan Yojana : PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट; सरकार का घेत आहे आढावा?

PM Kisan Yojana Niti Aayog

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) ही मोदी सरकारची सरावात महत्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी ६००० रुपये जमा केले जातात. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्यात हे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. मात्र आता याच PM किसान योजनेबाबत नवीन अपडेट समोर येत आहे. पीएम किसान योजनेला ५ वर्ष पूर्ण होत असून आता या योजनेची केंद्रीय नीती आयोग समीक्षा करत आहे.

सरकार का घेत आहे PM किसान योजनेचा आढावा? PM Kisan Yojana

मोदी सरकारने कृषी आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत पीएम किसान योजनेचे मूल्यमापन करण्याची योजना आखली आहे. NITI आयोगाशी संबंधित विकास देखरेख आणि मूल्यमापन कार्यालय (DMEO) ने या योजनेच्या मूल्यमापनासाठी निविदा मागवल्या आहेत. या योजनेने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा कितपत पूर्ण केल्या आहेत याचे मूल्यांकन करणे हा त्याचा उद्देश आहे. यासोबतच त्याचा कृषी उत्पन्नावर किती परिणाम झाला? तसेच थेट फायदेशीर हस्तांतरण (DBT) ही शेतकऱ्यांसाठी आदर्श पद्धत आहे की नाही हे समजून घेण्यासाठी केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये आलं आहे.

त्याअंतर्गत देशातील 24 राज्यांमधील 5000 शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या 24 राज्यांमध्ये यूपी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, ओडिशा, छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, पंजाब, आसाम, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा, या राज्यांचा समावेश आहे. या योजनेत लाभ देताना काही गडबड झाली का? योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहचला की नाही, हे नीती आयोग तपासणार आहे. यासोबतच पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर काय परिणाम होतो याचाही अभ्यास करण्यात येणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) सरकारी तिजोरीत वर्षाला ६०,००० कोटी रुपये खर्च येतो. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळतो. शेती करत असताना शेतकऱ्याना आर्थिक हातभार लागावा यासाठी मोदींनी पीएम किसान योजना सुरु केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकार कडून दरवर्षी ६००० रुपये मिळतात. २००० रुपयांच्या ३ हप्त्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केले जातात. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत आत्तापर्यंत १६ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट वर जमा झाले असून आता १७ व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

भाजपला 272 चा आकडा गाठता आला नाही, तर पाठिंबा देणार का? पवारांचे थेट उत्तर

modi sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) आत्तापर्यंत ५ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यंदा पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असा दावा भाजपकडून केला जातोय तर दुसरीकडे देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल असा दावा विरोधी पक्षातील नेतेमंडळी करत आहेत. अनेक राजकीय विश्लेषक भाजपला २८० ते ३०० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करत आहेत. अशातच जर मोदींना २७२ ची मॅजिक फिगर गाठता आली नाही तर महाराष्ट्रातून शरद पवार (Sharad Pawar) किंवा उद्धव ठाकरे मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देतील का? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र आता खुद्द शरद पवारांनीच हि गोष्ट फेटाळून लावली आहे.

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम यांनी शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी शरद पवारांना थेट प्रश्न केला कि समजा यंदाच्या निवडणुकीत 272 पेक्षा कमी भाजपच्या जागा आल्या आणि तुम्हाला त्यांनी साद घातली तरी तुमचा पक्ष त्यांच्यासोबत जाणार का? यावर उत्तर देताना पवारांनी स्पष्टपणे नाही असं उत्तर दिले. भाजपचे धोरण आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नाही.. आमचे व्यक्तिगत संबंध चांगले राहतील, मी अजून राज्यसभेत आहे, त्याठिकाणी मोदींची भेट झाली तर आम्ही बोलणार नाही असं नाही .. मात्र उद्या संसदेत मी त्यांच्या बाजूने हात वर करणार नाही असं पवारांनी स्पष्ट केलं. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपला पक्ष भाजपला साथ देणार नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

ठाकरे भाजपला पाठिंबा देणार नाहीत –

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही भाजपला पाठिंबा देणार नाहीत असं शरद पवारांनी सांगितले. निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील अशी अजिबात शक्यता नाही.. अजिबात म्हणजे अजिबात शक्यता नाही. उद्धव ठाकरे हे भाजप आणि मोदींसोबत जाणार नाहीत.. नाहीत.. नाहीत.. असे म्हणत शरद पवारांनी या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. राज्यात महाविकास आघाडीच्या जागा वाढतील, मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही काँग्रेसच्या जागा वाढणार आहेत. केजरीवालांच्या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. असे शरद पवार यांनी म्हंटल.