Friday, December 26, 2025
Home Blog Page 739

Planetary alignment | ‘या’ तारखेला 6 ग्रह येणार एकाच रेषेत, दुर्बिणीविना पाहता येणार आकाशातील हा देखावा

Planetary alignment

Planetary alignment | यंदा 8 एप्रिल 2024 रोजी या वर्षातील सगळ्यात पहिले सूर्यग्रहण झाले. त्या सूर्यग्रहणाची खूप जास्त चर्चा देखील झाली. परंतु आता 2024 च्या दुसऱ्या सूर्यग्रहणाविषयी जास्त चर्चा चालू आहे. हे सूर्यग्रहण ऑक्टोबरमध्ये दिसणार आहे. हे सूर्यग्रहण दिसण्यासाठी आणखी पाच महिने अवकाश आहे. खगोलीय घटनेची अजून बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु जर आकाशात घडणाऱ्या घटनांमध्ये स्वारस्य असेल, तर त्यासाठी फक्त एक आठवडा एवढीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्लॅनेटरी अलाइनमेंट | Planetary alignment

ही घटना 3 जून रोजी देखील घडू शकते. जेव्हा सहा ग्रह म्हणजेच बुध, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे एका रेषेत दिसतील, याला प्लॅनेटरी अलाइनमेंट असे म्हणतात. ज्यामध्ये पृथ्वी एक बिंदू असेल जेथून सहा ग्रह एका सरळ रेषेत किंवा एकमेकांच्या अगदी जवळ दिसतात.

दुर्बिणी शिवाय दिसणार हे ग्रह

हे दृश्य 3 जून रोजी दिसणार आहे. 3 जून रोजी दिसणारे हे सहा ग्रहांपैकी काही ग्रह हे दुर्बिणी शिवाय देखील दिसू शकतात. यामध्ये चंद्राचे महत्त्वाची भूमिका असेल. त्याच्या प्रकाशामुळे इतर ग्रहांची चमक थोडीशी कमी देखील होऊ शकतात. मंगळ, शनी, गुरु हे ग्रह अंधुक दिसतील. युरेनस आणि नेपच्यूनला पाहायचे असेल, तर त्यांना दुर्बिणीचा वापर करावा लागणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार शनि हा प्रथम चमकदार दिसणार आहे. त्यानंतर नेपच्यून दिसेल त्याला पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज लागणार आहे. तुम्हाला जर हे ग्रह पाहायचे असेल तर तुम्ही नासा आणि इतर वेबसाईटवर भेट देऊन देखील हे पाहू शकता.

दुसरे सूर्यग्रहण

2024 चे दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही घटना ज्योतिष शास्त्र आणि सनातन धर्मात अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. हे सूर्यग्रहण हिंदू कॅलेंडरमधील सर्वपितृ अमावस्याशी जुळणारे त्याचप्रमाणे कल्पना कृती ग्रहण असेल. या ग्रहणादरम्यान चंद्र सूर्यापेक्षा लहान दिसतो. ज्यामध्ये घडत मध्यभागी सूर्यप्रकाशाचे तेजस्वी वलय देखील असणार आहे. या खगोलीय देखाव्याला रिंग फायर असे देखील म्हटले जाते. हे दृश्यमान सहा तासांपेक्षा जास्त वेळ असणार आहे. रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी हे सुरू होईल. आणि दुसऱ्या दिवशी 3 वाजून 17 मिनिटांनी हे संपेल.

Lok Sabha Election 2024 : सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेत येणार, हे विश्लेषण पहाच

narendra mdoi bjp

मोदींची हवा गायब झालीय… अबकी बार तडीपार… भाजप हटाओ देश बचाओ…2024 च्या संपूर्ण निवडणूक प्रचारात आणि मतदानाच्या वेळेसही भाजपच्या विरोधात देण्यात येणाऱ्या या घोषणा… सोशल मीडिया पासून ते लोकांच्यातील चर्चांमध्येही मोदी सरकार जातंय, अशी एकच चर्चा आहे… मोदी 400 नाही तर 200 पण पार करू शकणार नाही, असं या सगळ्याचं म्हणणं… विरोधकांच्या गालावर हे सगळं ऐकून कळी खुलली असेल, तर जरा थांबा… काहीही झालं, लोकांचे अंदाज वेगवेगळे असले तरी 2024 ला येणार तर मोदीच! असं मी नाही तर भारतातील सर्वात मोठा पॉलिटिकल स्ट्रॅटेजीस्ट सांगतोय… मोदी 2019 पेक्षा जास्त जागांनी निवडून येण्यामागची प्रॅक्टिकल कारण काय आहेत? निवडणुकांचे अवघे दोन टप्पे शिल्लक असताना समोर आलेल्या या विश्लेषणामुळे मोदी विरोधकांची झोप का उडू शकते? तेच सविस्तर पाहुयात

भाजपने 400 पार ची तयार केलेली घोषणा ही एक स्टॅटर्जी होती… 4 जूनला मोदी सरकार 2019 पेक्षा जास्त जागा पदरात पाडून सत्तेत येईल, असं स्टेटमेंट केलंय राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या पीके उर्फ प्रशांत किशोर यांनी… प्रशांत किशोर यांनी 2014 मध्ये मोदी सरकारच्या कॅम्पेनची जबाबदारी घेतली होती… भाजपला सत्तेत बसवण्या सोबत अनेक लहान मोठ्या राज्यातील निवडणुकाही वेगवेगळ्या पक्षांनी प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याने जिंकल्या आहेत… सध्या बिहारमध्ये जनसुराज अभियान चालवणाऱ्या याच प्रशांत किशोर यांना 2024 च्या निकालाचा अंदाज विचारला. तेव्हा त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता येणार तर मोदीच, हे क्लिअर कट सांगून टाकलं…यासाठी त्यांनी काही महत्वाची कारणं देखील दिली…प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेत येईल याची केलेली फोड पाहून खरंच मोदींशिवाय सध्यातरी देशासमोर पर्याय नाहीये, याची जाणीव होते….

प्रशांत किशोर यांनी आपल्या दाव्याला सिद्ध करण्यासाठी दिलेलं पहिलं कारण म्हणजे पूर्व -दक्षिण आणि पश्चिम – उत्तर अशी फोड…

पाठीमागच्या दोन लोकसभा निवडणुका पाहिल्या तर भाजपला जो बहुमताचा आकडा गाठता आला तो उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यातील मिळालेल्या जागांमधून…2019 मध्ये भाजपने 303 जागा जिंकल्या त्यापैकी तब्बल 250 जागा या महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब या पट्ट्यातून जिंकल्या…या भागात भाजपला फटका बसताना दिसत असला तरी इथून 50 हून अधिक जागांचं नुकसान भाजपला होईल अशी सध्या परिस्थिती नाहीये…आता दक्षिण आणि पूर्वेकडील 225 जागांपैकी भाजपला केवळ 50 च्या आसपास जागा मिळवता आल्या होत्या. इथंच खरी मेख आहे…उत्तर पश्चिममध्ये भाजपाला फटका बसत असला तरी पूर्व दक्षिणमध्ये भाजपचं व्होट शेअर आणि जागा दोन्ही देखील वाढताना दिसत आहेत. यामुळे उत्तरेतून जो लॉस होतोय तो भाजप आरामात दक्षिणेतून भरून काढू शकते.. हे गणित भाजपला सहजपणे बहुमताच्या जवळ घेऊन जाईल, असं प्रशांत किशोरी यांचं म्हणणं आहे…

प्रशांत किशोर यांनी दिलेलं दुसरं कारण म्हणजे मोदींविरोधात नाराजी पण राग नाही…

विरोधक म्हणतायत मोदींच्या विरोधात नाराजी आहे… नाराजी असू शकते, पण राग नाही… हीच या सगळ्यातील मुख्य अडचण आहे. मोदींना काहीही करून सत्तेतून खाली खेचायचं आहे, अशी तीव्र स्वरूपाची लाट सध्यातरी देशात दिसत नाहीये… विरोधकांच्या इंडिया आघाडीने शेवटच्या दिवसांत जरी जोर लावला असला तरी मोदींना पर्याय म्हणून सक्षम नेत्याची घोषणा अजूनही विरोधकांकडून करण्यात आलेली नाहीये…. त्यामुळे मोदी नाहीतर कोण?, असं भाजपला फायद्याचं ठरणार गणित यंदाही मोदींना प्लसमध्ये ठेवतय… काठावरची जी मत आहेत ती भाजपला आपल्याकडे खेचून घ्यायला यश मिळतंय…त्यामुळे वाईड स्पेअर मोदीं विरोधात चीड, संतापाची लाट आहे.. असं सध्यातरी नाहीये…

तिसरा मुद्दा येतो तो 400 प्लसचं सेट केलेलं नरेटिव्ह…

अबकी बार चारसो पार असं म्हणत भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक वातावरण निर्मिती केली…सुरुवातीच्या काही टप्प्यात 2019 ला 303 जागा घेतलेल्या भाजपाला आरामात 400 चा आकडा गाठता येईल, अशी चर्चा होती… पण मतदान जसजसं पुढे जात राहिलं तशी भाजप गोत्यात येतंय असं वातावरण दिसलं… यानंतर एकच चर्चा सुरू झाली की भाजप 400 जागा जिंकेल का? भाजपला 400 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर भाजपचा दावा फोल ठरेल… यामुळं भाजप निवडणूक हारेल, असं सगळ्यांना वाटतंय. पण भारतात सरकार बनवण्यासाठी केवळ 272 खासदारांची गरज लागते…मग 273 निवडून आले काय 300 आले काय किंवा 400… सरकार बनवण्याचा पहिला अधिकार त्याच पक्षाला दिला जातो…400 पर ची घोषणा करून भाजपने त्यांचा टारगेट आकडा मोठा गेला… त्याला हवा दिली… यामुळे अनेक काठावरची मतं भाजपकडे शिफ्ट झाली… 400 जागा भाजपला संविधान बदलण्यासाठी हव्या आहेत, असं जेव्हा त्यांचं निगेटिव्ह कॅम्पेनिंग सुरू झालं तेव्हा भाजपने ते बंद केलं. पण तोपर्यंत या अबकी बार 400 पारचा इंपेक्ट लोकांवर पडलेला होता…

चौथं आणि शेवटचं कारण सांगितलं गेलं ते म्हणजे भाजपला गोत्यात आणण्याच्या विरोधकांनी सोडलेल्या अनेक संधी

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला किंवा विरोधकांना भाजपच्या विरोधात तयार झालेल्या वातावरणाचा फायदा उचलण्याच्या चार संधी आल्या होत्या…पण त्याच काळात विरोधकांनी म्हणावं असं काम केलं नाही…गुजरात मधील पटेलांच्या आंदोलनापासून ते महाराष्ट्रातील मराठा आरक्षणामुळे पेटलेलं वातावरण अशा भारताच्या पाठीवर घटनांच्या अनेक मालिका होऊन गेल्या या काळात जनमत भाजपच्या विरोधात होतं…तेव्हा हा स्पेस विरोधकांनी कॅप्चर केला असता, तर भाजपचा सुपडासाफ झाला असता. पण विरोधक याकाळात थंडे राहिले.. त्यात शेवटच्या काही दिवसात विरोधकांनी इंडिया आघाडीचा प्रयोग केला…तेव्हा कूठे ही आघाडी भाजपला कडवं आव्हान उभे करेल, असं वाटलं होतं…पण बैठकांमधून आउटपुट बाहेर न निघणं, जागा वाटपामुळे झालेला खोळंबा यामुळे आघाडीत दुफळी निर्माण झाली…आश्चर्य वाटावी अशी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यानंतर लागलेल्या विधानसभा निवडणुकांत यातल्या काही राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करून इंडिया आघाडीवर आपला डोमिनन्स ठेवण्यासाठी काँग्रेसने जवळपास सहा ते सात महिने आघाडीला संथ ठेवलं… याचाच फायदा उचलत भाजपने पुन्हा आपल्या बाजूने वातावरण तयार करून घेतलं राम मंदिर आणि त्यानंतर इंडिया आघाडीतील मेजर घटक पक्ष फुटल्यामुळे आघाडी पुन्हा एकदा कमकुवत झाली.. आणि इथेच भाजपचा तिसऱ्यांदा विजय नोंदवला गेला…

थोडक्यात काय तर आकड्यांची गोळाबेरीज, विरोधकांनी केलेल्या चुका आणि भाजपने तयार केलेलं परसेप्शन यामुळे भाजपला सलग तिसऱ्यांदा बहुमताचा आकडा आरामात ओलांडता येईल, असे प्रशांत किशोर यांचे म्हणणं आहे…एवढंच नाही तर मोदींची लाट असताना भाजपने जो 303 चा आकडा गाठला होता त्यालाही क्रॉस 2024 चा आकडा जाईल, असही त्यांनी कॉन्फिडंटली सांगितलंय…हे सगळं विश्लेषण पाहता खरंच नरेंद्र मोदी सत्तेची हॅट्रिक पूर्ण करतील का? तुमचा अंदाज काय सांगतो? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद…

POCO F6 5G : 12GB रॅम , 50MP कॅमेरासह POCO ने लाँच केला नवा मोबाईल; किंमत किती पहा

POCO F6 5G launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी POCO ने भारतीय बाजारात नवीन मोबाईल लाँच केला आहे. POCO F6 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 12GB रॅम , 50MP कॅमेरासह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आली आहेत. येत्या २९ मे ला फ्लिपकार्टवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होईल. आज आपण पोकोच्या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

6.67 इंचाचा डिस्प्ले –

POCO F6 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67 इंचाचा WQHD+ Flow AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने मोबाइलमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर बसवला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Xiaomi HyperOS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. हा स्मार्टफोन एकूण ३ स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आलाय. यामध्ये 8GB RAM + 256GB, 12GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 512GB स्टोरेजचा समावेश आहे.

कॅमेरा – POCO F6 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास POCO F6 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळतोय. यामध्ये पाठीमागील बाजूला 50MP मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 120W USB टाइप C फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

जस आम्ही तुम्हाला सांगितलं कि पोकोचा हा स्मार्टफोन ३ स्टोरेज मध्ये लाँच करण्यात आलाय, त्यानुसार त्याची किंमत सुद्धा वेगेवेगळी आहे. 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे, 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 31,999 रुपये आहे तर 12GB RAM + 512GB स्टोरेज हँडसेटची किंमत 33,999 रुपये ठेवण्यात आली आहे. येत्या 29 मे रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. पहिल्या सेलमध्ये मोबाईल खरेदीवर ग्राहकांना 2,000 रुपयांचा बँक डिस्काउंट आणि 2,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल. एवढेच नाही तर पहिल्या सेलमध्ये फोन खरेदी करणाऱ्या युजर्सना 1 वर्षाची एक्स्टेंडेड वॉरंटी देखील दिली जात आहे.

Ice Cream | आइस्क्रीम खाल्ल्यानंतरही चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, गंभीर आजारांना जावे लागेल सामोरे

Ice Cream
Ice Cream

Ice Cream | नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे. या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये सगळेजण थंडगार पदार्थ खात असतात. त्यातच आईस्क्रीम खायला सगळ्यांना खूप आवडते. कडाक्याच्या थंडीमध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आईस्क्रीम खातात. परंतु आईस्क्रीमचे सेवन जर तुम्ही जास्त प्रमाणात केले, तर त्याच्या आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काही गोष्टींचे सेवन करणे. आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. आता आपण असे पदार्थ पाहणार आहोत, जे आईस्क्रीमनंतर (Ice Cream) खाल्ले तर त्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.

चहा कॉफी | Ice Cream

आईस्क्रीम खाल्ल्यानंतर चहा, कॉफी किंवा इतर कॅफिनयुक्त पेये पिण्याची इच्छा तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की घसा दुखणे, घसा खवखवणे आणि खोकला याशिवाय पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो. अशा परिस्थितीत, पोटाचे तापमान अचानक बदलते, जे चांगल्या पचनासाठी अजिबात चांगले नाही.

लिंबूवर्गीय फळे

जर तुम्हीही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आंबट फळे खाण्याची चूक करत असाल तर तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. असे केल्याने तुम्हाला गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. आंबट फळांमध्ये असलेले ऍसिड्स पचन बिघडवतात

थंड पाणी | Ice Cream

आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुम्हाला पाणी प्यावेसे वाटेल आणि तुम्ही विचार न करता ते नक्कीच प्यावे. गॅस, ॲसिडिटी आणि पोटदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. शिवाय, यामुळे पचन मंद होते.

मसालेदार गोष्टी

जर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुम्हाला काही मसालेदार खावेसे वाटत असेल तर तुम्हाला हे देखील टाळावे लागेल, कारण यामुळे डायरिया, अपचन आणि पोटात जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. कॅप्सेसिन हे मसालेदार पदार्थांमध्ये आढळते, जे दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच दुधावर प्रतिक्रिया देऊ शकते.

दारू पिऊ नका

आईस्क्रीम खाल्ल्यानंतर दारू पिणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि तुम्हाला पोट खराब होण्याचा त्रास होऊ शकतो. याशिवाय उलट्या किंवा जुलाब देखील होऊ शकतात.

T20 World Cup 2024 : T20 वर्ल्डकपचे सामने Free मध्ये पाहायचे आहेत? हे App करा डाउनलोड

T20 World Cup 2024 Free Streaming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) सुरु होणार आहे. वर्ल्डकप म्हणजे क्रिकेटचा कुंभमेळा .. त्यामुळे प्रत्येकजण आवर्जून विश्वचषक स्पर्धेचे सामने बघत असतो. आता मोबाईल आणि टीव्ही वर T20 विश्वचषक स्पर्धेचे सामने पाहायचे असतील तर ते कुठे बघावे? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात नक्कीच पडला असेल. मात्र चिंता करू नका आम्ही तुम्हाला अशा एका अँप बद्दल सांगणार आहोत ज्याठिकाणी तुम्ही अगदी फ्री मध्ये वर्ल्ड कपचे सामने बघू शकता…

भारतात सध्या आयपीएल अंतिम टप्प्यात आली आहे. आयपीएलचे सामने तुम्ही जिओ सिनेमा अँपवर मोफत मध्ये बघितले असतील यात शंकाच नाही. परंतु वर्ल्डकपचे सामने तुम्ही जिओ सिनेमावरून मोफत मध्ये बघू शकणार नाही. जिओ सिनेमा ऐवजी तुम्ही डिस्ने हॉट स्टारवरून विश्वचषक स्पर्धेचे सर्व सामने लाईव्ह मध्ये पाहू शकता. यासाठी तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च करण्याची आवश्यकता नाही. 15 मे रोजी डिस्ने हॉट स्टारने घोषणा केली होती की, वर्ल्ड कपचे सर्व सामने अगदी मोफत पाहण्यासाठी उपलब्ध असतील. म्हणजेच यासाठी तुम्हाला काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत. याचाच अर्थ, मोबाईल मध्ये डिस्ने हॉट स्टार डाउनलोड करून वर्ल्डकपचा आनंद लुटू शकता.

किती वाजता सुरु होणार सामने – T20 World Cup 2024

यंदाची T20 विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार असल्याने भारतीय वेळ आणि तेथील वेळ यात खूप फरक पाहायला मिळेल. भारतात वर्ल्डकपचे काही सामने सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतील, तर काही सामने संध्याकाळी 8 वाजता सुरू होतील. परंतु क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बाब म्हणजे भारतीय क्रिकेट संघाच्या मॅचेस संध्याकाळीच होतील. जर टीम इंडिया सेमीफायनल किंवा फायनलमध्ये पोहोचली तर मॅच सुरू होण्याची वेळ बदलली जाईल. हे अपडेट नंतर केले जाईल. भारत 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर 2024 च्या T20 विश्वचषकाचा रोमांचक प्रवास सुरू होईल.

भारताचे सामने कधी?

2024 च्या T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) भारतीय संघाला A गटात ठेवण्यात आले आहे. टीम इंडियाच्या गटात पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा या संघांचा समावेश आहे. भारतीय संघ 5 जूनपासून आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया 9 जूनला पाकिस्तानविरुद्ध लढेल. त्याचवेळी 12 जूनला अमेरिकेशी आणि 15 जूनला कॅनडाचा टीम इंडियाचा सामना होईल. भारताचा संघ पहिले तीन सामने न्यूयॉर्कमध्ये खेळणार आहे. तर ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना फ्लोरिडामध्ये होणार आहे, त्यानंतर टीम सुपर एट सामन्यांसाठी वेस्ट इंडिजला जाईल.

Tulashi Benefits | उन्हाळ्यात ग्लोइंग आणि पिंपल फ्री स्किन हवी असेल, तर तुळशीच्या पानांचा करा वापर

Tulashi Benefits

Tulashi Benefits | तुळस ही धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण वनस्पती आहे. त्वचेसाठी देखील तुळस खूप फायदेशीर असते. उन्हाळ्यात जर तुम्हाला पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्या होत असतील. तर या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुळस ही तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुळशीमुळे आपल्या आरोग्याला तसेच तुमच्या स्किनला देखील खूप जास्त फायदे होतात. आता आपण तुळशीमुळे (Tulashi Benefits) आपल्या त्वचेला नेमके कोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

लालसरपणा कमी होते | Tulashi Benefits

तुळशीमध्ये शुद्धीकरणाचे गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेचे छिद्र खोलवर स्वच्छ करण्याची क्षमता तुळशीमध्ये असते. तुम्ही तुळशीची काही पाने घ्या आणि ती पाण्यात घालून उकळा. थंड झाल्यावर हे पाणी तुम्ही एका टोनर बॉटलमध्ये भरून ठेवा. रोज फेस वॉश केल्यानंतर तुम्ही हे टोनर वापरू शकता. असे केल्यामुळे थोड्या दिवसातच लालसरपणा कमी होईल आणि जळजळ देखील कमी होईल.

पिंपल्स पासून सुटका

उन्हाळ्यामध्ये अनेक लोकांना पिंपल्स येतात. परंतु तुळशीमुळे हे पिंपल दूर होऊ शकतात. तुम्ही तुळशीची पाने बारीक करून त्यात एक चिमूटभर हळद आणि गुलाब पाणी घालून ते चेहऱ्याला लावा. यामुळे पिंपल्स आणि पिंपल्सचे डाग देखील दूर होतात.

ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दूर होतील

ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दूर करण्यासाठी तुळशीचा वापर खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला त्यात थोडी कडुलिंबाची पाने आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावावे लागेल आणि 10 मिनिटांनी धुवावे लागेल उन्हाळ्यात अनेकांना त्वचेवर अतिरिक्त तेलाची समस्या असते, ती समस्या देखील दूर होते.

डाग दूर होतात

चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात परंतु मागे राहिलेले डाग अनेकदा लोकांसाठी डोकेदुखी बनतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही अनेक उत्पादने वापरून कंटाळा आला असेल, तर यावेळी तुम्ही तुळस वापरून पाहू शकता. यासाठी तुळशीची पाने, संत्र्याची साल आणि गुलाबपाणी मिक्सरमध्ये एकत्र करून ही पेस्ट चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावावी. हळुहळु हे मुरुमांचे ठसे कमी होऊ लागतील.

रिचार्ज न करता पहा TV; सरकारने आणली Free Dish सर्व्हिस

Free Dish sERVICE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीव्ही (TV) हे आजकालचे मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन आहे. परंतु टीव्ही बघण्यासाठी आपल्याला दर महिन्याला रिचार्ज करावा लागतो. अनेकदा सर्वसामान्यांना हा रिचार्ज परवडत नाही. मात्र आता यावर उपाय म्हणून सरकारने एक नवीन योजना आणली आहे. सरकारकडून Free Dish Connection हा पर्याय दिला जात आहे. ज्याच्या मदतीने, तुम्ही डिश घरबसल्या सहजपणे इन्स्टॉल करू शकता आणि यूजर्सना टीव्ही पाहण्यासाठी कोणत्याही रिचार्जची आवश्यकता नाही.

डीडीकडून फ्री डिश DTH सेवेचा पर्याय दिला जात आहे. हे सार्वजनिक सेवा प्रसारक प्रसार भारती द्वारे प्रदान केले जात असून 2004 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेतल्यानंतर, तुम्हाला फ्री-टू-एअर (FTA) डायरेक्ट-टू-होम (DTH) दिले जाते. याचा अर्थ तुम्हाला दर महिन्याला रिचार्जकरण्याची आवश्यकता नाही. एकदा गुंतवणूक करून तुम्ही ते सहज इन्स्टॉल करू शकता. ही सेवा घेण्यासाठी तुम्हाला एकदाच 2 हजार रुपये खर्च करावे लागतील. यानंतर कोणताही रिचार्ज करण्याची गरज नाही. म्हणजेच तुम्हाला कायमस्वरूपी मोफत टीव्ही चॅनेल बघायला मिळतील.

कसा अर्ज कराल?

तुम्हाला या फ्री मधील डिश सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 1800114554 आणि 011-25806200..या दोन्ही नंबर वर संपर्क करावा लागेल. तुमच्या जवळचा जो कोणी केबल ऑपरेटर असेल त्याच्याकडून सुद्धा तुम्ही हि मोफत मिळणारी डिश घेऊ शकता. मात्र, यासाठी तुमच्याकडे टीव्ही असणे अनिवार्य असून त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. एकदा हि डिश बसवली कि मग तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याची काळजी करण्याची गरज नाही. मात्र त्यात फक्त निवडक चॅनेल दिसतील. अजून कोणते चॅनेल पाहायचे असतील तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

कधीपर्यंत पूर्ण होणार समृद्धी महामार्ग ? MSRDC च्या अधिकाऱ्याने दिली माहिती

samrudhi

Samruddhi Mahamarg : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई नागपूर महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. 701 किलोमीटरचा असलेला हा मार्ग येत्या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे मुंबई नागपूर प्रवास सुखकर (Samruddhi Mahamarg) होणार आहे.

आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने गाव हा अदयाप पूर्णत्वास आलेला नाही. हे काम सुरू आहे. मात्र महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन म्हणजेच एम एस आर डी सी कडून उर्वरित काम येत्या वर्षाअखेर (Samruddhi Mahamarg) पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मिळाली आहे.

MSRDC च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 90% काम पूर्ण झालेले आहे. उरलेले काम १. ८ किलोमीटर लांबीचे कासरा येथील खर्डी ब्रिज चे आहे जे प्रामुख्याने आव्हान असेल. याशिवाय आठ किलोमीटरच्या लांब बोगद्याचे (Samruddhi Mahamarg) काम सुद्धा पूर्णत्वास आलेले आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. खरंतर 701 किलोमीटरचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा सहा पदरी मार्ग आहे मात्र खर्डी पुलावर हा मार्ग केवळ चार पदरी राहणार असून थोडासा अरुंद होणार असल्याची माहिती देखील या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

7-8 तासांत पूर्ण होणार प्रवास (Samruddhi Mahamarg)

एकेकाळी मुंबई ते नागपूर हे अंतर कापण्यासाठी 16-20 तास लागत होते. मात्र, समृद्धी महामार्गामुळं हे अंतर 7-8 तासांत पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गाने मुंबई आणि नाशिककरांना इगतपुरीतून येथून येणाऱ्या वाहनांना थेट नागपूरपर्यंत आठ तासात पोहोचणे शक्य होणार. हा मार्ग खुला झाल्याने विदर्भ मराठवाड्याला मुंबईच्या वेशीपर्यंत वाहने जलद गतीने प्रवेश करण्याचा मार्ग (Samruddhi Mahamarg) सुकर झाला आहे.

Indian Railway : ट्रेनमधून प्रवास करताय ना ? ‘हे’ नंबर SAVE करा , चुटकीसरशी सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम

indian railway helpline

Indian Railway : भारतामध्ये ट्रेन ही दळणवळणाच्या साधनांपैकी महत्वाचे साधन आहे. दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करीत असतात. तसे पाहायला गेले तर प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सोयी सुविधा रेलवे विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी देखील रेलवे मध्ये प्रवास करीत असताना तुम्हाला काही समस्या आल्यास तुमच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी रेल्वे विभागाकडून काही हेल्प लाईन नंबर्स जारीकरण्यात आले आहेत. हे नंबर कोणते आहेत ? त्यामुळे प्रवासाच्या दरम्यानच्या कोणत्या समस्या (Indian Railway) सोडवू शकता चला जाणून घेऊया…

सुरक्षेशी संबंधित समस्यांसोबतच डब्यातील अस्वच्छता, लाईट सुरू नसणे, मोबाईल चार्जिंग पॉइंट काम न करणे आणि बाथरूममध्ये पाणी नसणे यासारख्या समस्या या हेल्पलाइन क्रमांकांवर कॉल करून त्वरित सोडवता येतात. या रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 बद्दल सर्वांना माहितीच असेल. हा एक एकीकृत हेल्पलाइन क्रमांक आहे, ज्यावर जवळपास सर्व प्रकारच्या समस्या सोडवल्या जातात. समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने विशेष हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने हे क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह (Indian Railway) करायलाच पाहिजे.

डायल करा 139 (Indian Railway)

रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 हा एकात्मिक हेल्पलाइन क्रमांक आहे. या नंबरवर तुम्ही ट्रेनमधील सेवेतील कोणत्याही कमतरतेसह सर्व प्रकारची तक्रार करू शकता. रेल्वेने जारी केलेल्या या क्रमांकावर बारा भाषांमध्ये तक्रारी केल्या जाऊ शकतात, ज्या IVRS आणि कॉल सेंटरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शकता. येथे वीज आणि पाण्याच्या समस्येसोबतच नको असलेल्या व्यक्तींचा रेल्वेमध्ये प्रवेश, चोरी आदींच्या तक्रारीही करता येतात.

स्वच्छता किंवा विजेची समस्या असल्यास

तुम्हाला ट्रेनमध्ये अशी कोणतीही अडचण आल्यास, तुम्हाला 7208073768/9904411439 या नंबर वर कॉल करून तुमच्या समस्येबद्दल तुम्ही सांगू शकता. या नंबरवर कॉल करून तुम्ही डब्यांची साफसफाई, लाइटिंगशी संबंधित समस्या, एसीमधील बिघाड आणि ब्लँकेट आणि उशा यासारख्या समस्यांवर तोडगा काढू शकता.

एसएमएस सुविधेसाठी (Indian Railway)

फोन कॉलशिवाय तुम्ही रेल्वेला तुमच्या समस्येबद्दल एसएमएसद्वारेही कळवू शकता. फोन कॉल व्यतिरिक्त, आपण एसएमएसद्वारे देखील आपल्या समस्येचे निराकरण करू शकता. यासाठी तुम्हाला फोनच्या (Indian Railway) मेसेज बॉक्समध्ये जाऊन CLEAN लिहावे लागेल, त्यानंतर तुम्हाला 10 अंकी PNR टाकावा लागेल. यानंतर, साफसफाईसाठी C, पाण्यासाठी W, कीटक नियंत्रणासाठी P, लाईट AC साठी E आणि किरकोळ दुरुस्तीसाठी R असा सर्व्हिस कोड लिहा आणि मोबाईल क्रमांक 7208073768 किंवा 9904411439 वर पाठवा.

Personal Loan : पर्सनल लोन घेताय? थांबा!! आधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या; नाहीतर, कर्जाच्या जाळयात अडकाल

Personal Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Personal Loan) गेल्या काही काळात बरीच लोक वैयक्तिक कर्ज घेत असल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे, आजकाल बऱ्याच बँका अगदी कमी कागदपत्रांसह कमी वेळात सोयीस्कर स्वरूपात पर्सनल लोन देतात. त्यामुळे लोकांसाठी पर्सनल लोन घेणे सोपे झाले आहे. खरतर पर्सनल लोन एक असुरक्षित कर्ज मानलं जात. मात्र तरीही काही कारणांसाठी पर्सनल लोन घेणे सोयीचे समजले जाते. नजीकच्या काळात जर तुम्हीही पर्सनल लोन घेण्याच्या विचारात असाल तर मग ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. कर्ण आज आम्ही तुम्हाला पर्सनल लोन घेतेवेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? याविषयी माहिती देणार आहोत.

बँकांच्या दृष्टीने पर्सनल लोन हे सर्वसाधारणपणे खूप महाग आणि असुरक्षित कर्ज मानले जाते. त्यामुळे बँका पर्सन लोन (Personal Loan) उच्च जोखमीचे कर्ज आहे असे गृहीत धरतात आणि त्याचा व्याजदर हा उच्च ठेवतात. असे असले तरीही आपण स्वस्त पर्सन लोन घेऊ शकतो. फक्त यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्या कोणत्या? याविषयी आपण माहिती घेऊ.

चांगला क्रेडिट स्कोअर हवा

पर्सनल लोन स्वस्त दरात हवे असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असायला हवा. (Personal Loan) कारण, तुमचा क्रेडिट स्कोअर तुम्ही तुमची मागील कर्जे कोणत्याही डिफॉल्टशिवाय वेळेवर फेडली आहेत याचा पुरावा असतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर ७५० च्या वर असेल तर त्याला चांगला क्रेडिट स्कोअर म्हणता येईल. त्यामुळे सगळ्यात आधी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल याची काळजी घ्या.

इतर शुल्क लक्षात घ्या (Personal Loan)

कमी दरात पर्सनल लोन हवे असेल तर आधी तुम्ही घेत असलेल्या कर्जासोबत असणारे इतर शुल्क तपासा. हे इतर शुल्क तुमचे लोन महाग करतात. ज्यामध्ये प्रीपेमेंट शुल्क आणि उशीरा पेमेंट यांशिवाय काही अतिरिक्त खर्चदेखील आहेत. ज्यांच्या एकत्रित येण्याने तुमचे कर्ज महाग होऊ शकते. त्यामुळे पर्सनल लोन घेताना आधी इतर शुल्क तपासणी करा.

इतर बँकांशी तुलना करा

तुम्ही घेत असलेले कर्ज पर्सनल असो किंवा इतर कोणतेही ते घेण्याआधी वेगवगेळ्या बँकांची तुलना करा. कारण, बऱ्याचदा वेगवेगळ्या बँका वेगवेगळे दर आकारत असतात. (Personal Loan) शिवाय व्याज आकार, प्रक्रिया शुल्क, कर्जाची रक्कम यासह सर्व बँकाच्या अटी आणि शर्तीसुद्धा भिन्न असू शकतात. त्यामुळे पर्सनल लोन घेण्याआधी वेगवेगळ्या बँकांची तुलना करा म्हणजे बराच पैसा वाचवता येईल.

परतफेडीसाठी सक्षमता महत्वाची

कोणतेही कर्ज घेताना आपण एक जबाबदारी खांद्यावर घेत आहोत हे लक्षात घ्या. त्यामुळे पर्सन लोन घेताना तुम्ही त्या कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहात याची पक्की खात्री करून घ्या. (Personal Loan) महत्वाचे म्हणजे, तुमच्या मासिक उत्पन्नानुसार आणि जितकी गरज आहे तितकेच कर्ज घ्या. म्हणजे कर्जाच्या जाळ्यात अडकून नंतर पश्चाताप होणार नाही.