Friday, December 26, 2025
Home Blog Page 745

Gold Price Today: खरेदीला लागा!! आज सोन्यासह चांदीच्याही भावात मोठी घसरण

Gold Price Today

Gold Price Today: बऱ्याच काळानंतर सोने-चांदी खरेदी करू इच्छणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आज 21 मे रोजी सोन्यासह चांदीच्या पण किमतींमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलखुलासपणे सोने चांदी खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे सध्या लग्नाचा काळ सुरू असताना सोन्याचे भाव उचलल्यामुळे सराफ बाजारात खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. याकाळात तुम्हालाही सोने-चांदी खरेदी करायचे असेल तर आजचे भाव तपासा.

मंगळवार Good Return नुसार सोन्याचे भाव पाहिला गेलो तर, 21 मे 2024 रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 68,300 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने हे 74,510 रुपयांवर आले आहे. MCX नुसार, आजचे सोन्याचे भाव पाहिले तर, आज 24 कॅरेट सोने 73873 रुपयांनी बाजारात व्यवहार करत आहे. (Gold Price Today)

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 68,300 रुपये
मुंबई – 68,300 रुपये
नागपूर – 68,300 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 74,510 रूपये
मुंबई – 74,510 रूपये
नागपूर – 74,510 रूपये

चांदीचे आजचे भाव

आज सोन्याच्या चांदीचे ही भाव उतरले आहेत. Good Return नुसार, आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 946 रुपयांनी व्यवहार करत आहे. (Gold Price Today) तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 9460 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 91,600 रूपये अशी आहे.

Desi Jugaad : मोबाईलचा डिस्प्ले गेला तर करा ‘हा’ जुगाड; खर्चात पडायची मुळीच गरज नाही

Desi Jugaad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Desi Jugaad) देशात जुगाडू लोकांची काही कमी नाही. प्रत्येक प्रोब्लेमवर एक सोल्युशन यांच्याकडे तयार असतंच. अशा बऱ्याच चतुर लोकांच्या चतुराईचे नमुने सोशल मीडियावर पहायला मिळतात. आजकाल व्हायरल व्हायला काहीही कारण चालतं. मग कुणाची हुशारी का चालणार नाही? त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकापेक्षा एक शक्कल लढवणाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. यातील काही व्हिडीओ जरा विनोदीच असले तरी काही मात्र थक्क करणारे असतात.

व्हिडीओ बनवायचा म्हणजे मोबाईल हवा आणि त्याच मोबाईलचा डिस्प्ले गेला तर??? बापरे… नुसतं वाचून काही लोकांच्या काळजाचं पाणी झालं असेल. मोबाईलचा डिस्प्ले गेला तर मोबाईल वापरणं अवघड होत. (Desi Jugaad) पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला अवघड असं काहीच वाटणार नाही. हा व्हिडीओ पाहून एखादा इंजिनियर स्वतःची डिग्रीच फाडून टाकेल. कारण या तरुणानं टच खराब झालेल्या मोबाईलचा वापर करण्यासाठी लढवलेली शक्कल खरोखरच अचंबित करणारी आहे.

पहा व्हिडीओ (Desi Jugaad)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एका मुलाने मोबाईलचा डिस्प्ले खराब झाला म्हणून त्याला माऊस लावला आहे. अनेकदा फोन पडल्याने त्याची स्क्रीन जाते आणि मग त्याच्या दुरुस्तीचा खर्च अंगावर पडतो. जो खूप खर्चीक असतो. पण फोनच्या स्क्रीनला टच न करता मोबाईल वापरता येईल असा जुगाड या तरुणाने करून दाखवला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

(Desi Jugaad) या व्हिडिओत एका मुलाच्या हातात तुटलेला फोन दिसतोय. दरम्यान, त्याला हा खराब डिस्प्ले असलेला फोन कसा वापरतोस? असे विचारले असता तो त्याच्या खिशातून माऊस काढतो आणि त्याला जोडून दाखवतो. थक्क करणारी बाब म्हणजे, मोबाईल नुसता माऊस जोडत नाही तर हा तरुण फोनचा वापरही करतोय.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर Daily_over_dose नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी पाहिला असून यावर विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘मी हे करून पाहिलंय रे..’. (Desi Jugaad) तर आणखी एकाने लिहिलं, ‘तू मला या माऊसने टाइप करून दाखव.. तरच मानलं तुला’. अन्य एकाने लिहिले, ‘काय मूर्खपणा आहे? फक्त कर्सर हलवून फोन चालतो का?’

Samsung Announcement | तुटलेला फोन वर्षातून 2 वेळा करू शकता रिपेअर; सॅमसंग कंपनीचा मोठा निर्णय

Samsung Announcement

Samsung Announcement | जे लोक सॅमसंगचा फोन वापरतात. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता सॅमसंग कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. कंपनीने त्यांच्या प्रॉडक्टच्या संरक्षणासाठी आधीपासूनच Samsung care + हा प्रोग्राम आणलेला आहे. जो कंपनीने आता विनामूल्य देखील केलेला आहे. त्यामुळे आता सॅमसंग युजर्सला त्यांचे डिवाइस वर्षातून दोन वेळा दुरुस्त करता येणार आहे. तसेच त्यांच्या स्क्रीनचे संरक्षण आणि लिक्विड डॅमेज संरक्षणाचा लाभ देखील घेऊ शकतात. Samsung care + हा गॅलेक्सी उपकरणांसाठी एक स्कीम आहे.

त्यामुळे आता सॅमसंगचे (Samsung Announcement) युजर100% सुरक्षा प्राप्त करू शकतात. युजर्सला वॉक इन आणि पीक अपची देखील सुविधा उपलब्ध आहे. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात. त्यांच्या उपकरणाची दुरुस्ती करू शकतात. Samsung care + याबाबत या कंपनीचा असा दावा आहे की, सॅमसंग उत्पादनांच्या दुरुस्तीसाठी अस्सल भाग वापरण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे या उपकरणांच्या कार्यक्षमतेसह कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. हे उपकरण अगदी नवीन उपकरणांप्रमाणेच काम करते.

Samsung care + | Samsung Announcement

या Samsung care + ची सुरुवातीची किंमत ही 399 एवढी आहे. जी संपूर्ण गॅलेक्सी श्रेणी कव्हर करते. यामध्ये गॅलेक्सी स्मार्टफोन्स, गॅलेक्सी टॅबलेट आहे. कोणत्याही कागदपत्राशिवाय तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाण तुमचा डेटा पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित असेल. ग्राहकाला हवे असल्यास दुरुस्ती प्रक्रियेची माहिती घेऊ शकतो. यासाठी एक साधी प्रक्रिया करावी लागेल. तसेच डिवाइस खरेदी करताना तुम्हाला Samsung care + योजना देखील खरेदी करावी लागेल.

अभिमानास्पद!! कान्समध्ये झळकला सिद्धूचा मराठी सिनेमा; स्पेशल स्क्रिनिंग पडले पार

Hajarvela Shole Pahilela Manus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील ‘शोले’ हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. या चित्रपटानं लोकप्रियतेचे मापदंड बदलले, अनेक कलाकारांचं करिअर घडवले. अशा या ‘शोले’ चित्रपटाच्या महानतेला ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या मराठी चित्रपटातून सलाम करण्यात आला आहे. आपल्या नावामुळेच चर्चेत असलेल्या ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच प्रतिष्ठित अशा कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये करण्यात आले. ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

कान्समध्ये ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’चा बोलबाला

अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या यंदाच्या सोहळ्यात ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले. याप्रसंगी चित्रपट निर्माते शेहजाज सिप्पी, सगून वाघ यांचा सत्कार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि निर्मात्या श्रीदेवी शेट्टी वाघ आणि जीत वाघ यांचा सत्कार स्वाती म्हसे I.A.S.MD महाराष्ट्र चित्रपट मंच आणि सांस्कृतिक विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या हस्ते करण्यात आला. रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटला मिळाला.

जबरदस्त स्टारकास्ट

राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. या चित्रपटातून अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम बालकलाकार श्रीरंग महाजन अशी दमदार स्टारकास्ट असून अभिनेते आनंद इंगळे, समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत झळकले आहेत.

सिद्धार्थ जाधवने व्यक्त केला आनंद

‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्यामुळे कान्समध्ये आपला मराठी सिनेमा गेल्याचा आनंद त्याने व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपला सिनेमा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार असल्याची माहिती दिली होती. सोबतच हा अभिमानाचा क्षण असल्याचेही त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

HSC Result 2024: महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी

HSC Result 2024

HSC Result 2024 | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतेच बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केलेली आहे. यावर्षी राज्यात 93.7% विद्यार्थी पास झालेले आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे.

यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा 1 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पार पडल्या. जवळपास 15 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यावर्षी बारावीची परीक्षा दिली. यावर्षी बारावीचा निकाल हा 93.37% लागलेला आहे. यावर्षी मुलांपेक्षा 3.84 टक्क्यांनी जास्त मुली पास झालेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात 2.12 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

यावर्षी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळात मार्फत फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात बारावीची परीक्षा झाली. त्याचप्रमाणे बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

या वेबसाईटवर निकाल पाहा (HSC Result 2024)

mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://result.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org

Bigg Boss Marathi 5 : सरप्राईज!! Bigg Boss मराठी 5 येतोय; मांजरेकर नव्हे ‘हा’ लयभारी अभिनेता सांभाळणार होस्टिंगची सूत्र

Bigg Boss Marathi 5

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bigg Boss Marathi 5) संपूर्ण महाराष्ट्र गेली २ वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता अखेर तो क्षण आता जवळ आला आहे. रिऍलिटी शोचा बाप अर्थात बिग बॉस मराठीच्या नव्या सिजनची घोषणा झाली आहे. कलर्स मराठी आणि JioCinema वर ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच बिग बॉस मराठीच्या आगामी सिजनचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. मुख्य म्हणजे यावेळी शोच्या होस्टचा चेहरा बदलला आहे.

बिग बॉस मराठीचा होस्ट बदलला

आतापर्यंत बिग बॉस मराठी या शोचे होस्टिंग दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले आहे. मात्र, यावेळी बिग बॉस मराठीचे होस्टिंग बॅालीवूडचा स्टार आणि प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. कलर्स मराठी आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर आगामी सिजनचा प्रोमो व्हिडिओ शेयर केला आला आहे. (Bigg Boss Marathi 5) ज्यामध्ये बिग बॉसचा डोळा आणि त्यासोबत बॅालीवूडचा स्टायलिश हिरो, महाराष्ट्राचा मराठमोळा मुलगा सुपरस्टार रितेश देशमुख दिसतो आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.

पहिला प्रोमो आऊट (Bigg Boss Marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या प्रोमोमध्ये रितेशच्या तोंडी एकही डायलॉग नसला तरी त्याची स्टाईल कातिलाना आहे.

खूप सारे टीव्ही आणि त्यासमोर एकदम बॉस सारखा उभा असलेला रितेश एका चुटकीने होस्ट चेअर बोलावतो. यावरून यंदा कार्यक्रमाच्या होस्टिंगची सूत्र त्याच्या हाती आहेत हे समजतं. सध्या हा प्रोमो तुफान व्हायरल होत असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो आहे.

महाराष्ट्रात पुन्हा घुमणार मराठी बिग बॉसचा आवाज

हिंदीमधल्या अफाट यशानंतर ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम मराठीत सुरु झाला. ‘बिग बॉस मराठी’चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या ४ सिझनने मराठी प्रेक्षकांची मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच ‘बिग बॅास’ मराठी 5’ची (Bigg Boss Marathi 5) जोरात तयारी सुरू झाली आहे.

बिग बॅासचे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये बिग बॅासच्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. (Bigg Boss Marathi 5)

Free Higher Education | मोठी बातमी!! 2024-25 शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्चशिक्षण मोफत मिळणार

Free Higher Education

बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता राज्यभरातील 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षण मिळणार आहे. या शिक्षणामध्ये अभियांत्रिकी, मेडिकल तसेच फार्मसीसह तब्बल 642 कोर्सेसचा समावेश आहे. यासाठी राज्य शासन दरवर्षी 1800 कोटी रुपये खर्च करणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून होणार आहे.

आपला देश कितीही प्रगतशील झाला असला, तरी अनेकवेळा मुलींना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेता यावे आणि मुलींनी त्यांच्या करिअरमध्ये पुढे जावे. यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार उच्च शिक्षणातील तब्बल 642 कोर्सेसचे शुल्क शासनामार्फत भरले जाणार आहे.

मुलींची शिक्षणातील टक्केवारी वाढावी. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण परवडत नाही, म्हणून मुलींचा विवाह करून देणे हा प्रकार थांबावा. त्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. जवळपास 20 लाख मुलींना याचा फायदा होणार आहे.

राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या जवळपास 20 लाख मुलींना 642 कोर्सेस पूर्णपणे मोफत देण्याची सुविधा सरकार करणार आहे. या कोर्सेसची अर्धी सध्या शासनाच्या माध्यमातून भरली जाते. परंतु आता पूर्णपणे ही फी सरकारच भरणार आहे. यासंबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत झाला आहे. आता कॅबिनेटमध्ये यांनी त्यावर अंतिम निर्णय घेण्यात असून लोकसभेची आचारसंहिता संपल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे.

Army BSC Nursing Application Form 2024 | आर्मी बीएससी नर्सिंग अंतर्गत विविध पदांची भरती, असा करा अर्ज

Army BSC Nursing Application Form 2024

Army BSC Nursing Application Form 2024 | नोकरी शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता आर्मी बीएससी नर्सिंग अंतर्गत महिला उमेदवार पदांची भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 220 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत

महत्त्वाची माहिती | Army BSC Nursing Application Form 2024

  • पदाचे नाव – महिला उमेदवार
  • पदसंख्या – 220 जागा
  • अर्जशुल्क – 200 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरावा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नखांच्या रंगावरून समजणार कँसर !! अमेरिकेतील संशोधकांनी केला खुलासा

Nails colour

हॅलो महाराष्ट्र | आजकाल कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. वेगवेगळे कॅन्सर आजकाल होत आहेत. कॅन्सर होताच शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. ज्यामुळे कॅन्सरची लक्षणे आपल्याला दिसतात. परंतु आता तुमच्या नखांच्या रंगांमध्ये त्याचप्रमाणे आकारावरून देखील तुम्हाला कॅन्सर आहे की, नाही हे ओळखता येऊ शकते. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ शास्त्रज्ञांनी याबाबतचे नवे संशोधन केले आहे. जर तुमच्या नखांच्या रंगांमध्ये पांढरे आणि लाल असा बदल होत असेल किंवा टोकावर फुगवता जाणवत असेल, तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण हा एक कॅन्सरचा धोका असण्याचे लक्षण आहे.

नखांच्या सामान्य स्थितीला ओनीकोपॅपिलोमा असे म्हणतात. ही नखे आकाराने मोठे असतात. नखाच्या रंगामुळे त्वचा, डोळे, किडनी यांचा कर्करोग होण्याची शक्यता आहे की नाही हे समजते. अमेरिकेने केलेल्या संशोधनात 88 लोकांच्या एकापेक्षा अनेक नखांमध्ये हा आजार आढळून आलेला आहे. 35 कुटुंबातील बीएपी सिंड्रोम असलेल्या 47 व्यक्तींचा यासाठी अभ्यास केला गेला.

अशावेळी काय करावे?

यावेळी तज्ञांनी सल्ला देता दिला आणि ते म्हणाले की, बीएपी 1 ट्यूमर प्रोडीस्पोझिशन सिंड्रोमचा निदानाचा त्वरित विचार केला पाहिजे. हा आजार सामान्य लोकांपेक्षा क्वचित लोकांमध्ये आढळतो. अशी लक्षणे दिसताच या आजारावर तातडीने उपचार केले पाहिजे.

यावेळी नेमके काय होते ?

प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ओनीकोपॅपीलोमा हा एक दुर्मिळ अनुवंशिक असा आजार आहे. याला बीएपी 1 ट्युमर प्रोडीस्पोझिशन सिंड्रोम असे म्हटले जाते. जणूकातील उत्परिवर्तन सिड्रोमच्या वाढीसाठी मदत करते. यामुळे कर्करोगाच्या गाठी होण्याचा धोका असतो.

Bee Attack | मधमाश्यांची हल्ला केला, तर ‘अशा’ प्रकारे करा स्वतःचा बचाव

Bee Attack

Bee Attack | अनेकवेळा आपण काही ठिकाणी मधमाशांचा हल्ला झालेला पाहिलेला आहे. मधमाशांचा हल्ला हा अत्यंत भयंकर असतो. वेळप्रसंगी हा हल्ला तुमच्या जीवावर देखील बेतू शकतो. त्यामुळे जंगलात जाताना मधमाशांच्या पोळ्यापासून सावध राहणे, खूप गरजेचे आहे. मधमाशांचा डंक खूप जीवघेणा असतो. आजकाल अनेक ठिकाणी मधमाशांचा हल्ला होण्याचे प्रकार घडत आहेत.

छत्तीसगडमधील बिलोरी गावात बुधवारी मधमाशांनी गावकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये 30 गावकरी जखमी झालेले आहेत. आणि त्यांना रुग्णालयात देखील दाखल केलेले आहे. हा प्रकार गावातील जत्रेच्या दरम्यान घडलेला आहे. जत्रेमुळे गावात पूजा करण्यात आली होती आणि या पूजेच्या धुरामुळे मधमाशांनी गावकऱ्यांवर हल्ला केला. परंतु जर मधमाशांनी हल्ला केला, (Bee Attack) तर त्यापासून सतर्क राहणे गरजेचे आहे. आता हल्ला केल्यावर आपण काय करावे? हे आपण जाणून घेणार आहोत.

धोका जाणवता दूर जा | Bee Attack

मधमाशी कधीही थेट किंवा सुरुवातीला हल्ला करत नाही. जर मधमाशी तुमच्या डोक्यावर गोंगाऊ लागल्या तर हल्ला करणार हे गृहीत धरा. आणि तिथून पळ काढा. कारण त्या ठिकाणी मधमाशांचा मोठा थवा हल्ला करू शकतो. अशावेळी तुम्ही स्वतःचा बचाव करू शकत नाही. त्यामुळे थोड्याशा मधमाश्या दिसल्या तरी तिथून पळ काढा.

वस्तू किंवा दगड मारू नका

अनेक लोक मधमाशांच्या आवाज आला की त्यांना हाताने हाकलण्याचा प्रयत्न करतात. कारण जेव्हा तुम्ही हात फिरवतो, तेव्हा मधमाशी त्यांच्या राणी मधमाशीला वाचवण्यासाठी तुमच्यावर तुटून पडतात. त्यामुळे मधमाशांच्या थव्यापासून दूर राहा. त्याचप्रमाणे दगड किंवा काठीने मारू नका.

चेहऱ्याचे आधी रक्षण करा

जेव्हा मधमाशांचा हल्ला होईल. तेव्हा सगळ्यात तुमच्या हातांनी चेहरा झाकण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचे नाक, डोळे, तोंड यांसारख्या नाजूक अवयवांवर जर मधमाशींनी हल्ला केला तर तो पूर्ण भाग सुजतो आणि काळा देखील पडतो. चेहऱ्यावरील हे भाग खूप संवेदनशील असतात. त्यामुळे सगळ्यात आधी या भागाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करा.

पाण्यात उडी मारू नका

मधमाशीयांपासून वाचण्यासाठी अनेक लोक पाण्यात उडी मारतात. परंतु असे केल्याने मधमाशांपासून वाचता येणार नाही. त्याचप्रमाणे पाण्यात बुडण्याचा धोका देखील असते. त्यामुळे मधमाशांपासून बचाव करण्यासाठी पाण्यात उडी मारू नका ते तुमच्या जीवावर बेतू शकेल.