Friday, December 26, 2025
Home Blog Page 746

दैवी चमत्कार!! लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात भगवान विष्णूंना सूर्यकिरणांचा सोनेरी अभिषेक; पहा फोटो

Thenudan Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशभरात अनेक प्राचीन तसेच पुरातन मंदिरे आहेत. ज्यांचे इतिहास, आख्यायिका ऐकण्यासारख्या आहेत. प्रत्येक मंदिराची काही ना काही खासियत आणि वैशिट्य आहेत. अशाच एक खास मंदिराबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. लोणार हे सर्वश्रुत ठिकाण आहे. उल्कापाताने तयार झालेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे याविषयी आपण जाणतो. मात्र, सरोवराच्या परिसरात इतरही अशा अनेक पौराणिक वास्तु आणि मंदिरे आहेत त्यांपैकी एक अत्यंत खास मंदिर आहे. ज्याला दैत्यसूदन मंदिर म्हणून ओळखतात. हे मंदिर देखील लोणारच्या ओळखीचे कारण आहे. जाणून घेऊया या मंदिराविषयी.

लोणारचे दैत्यसूदन मंदिर

दैत्यसूदन मंदिर हे लोणार नगरीची मोठी ओळख आहे. या मंदिरात स्थापत्य आणि खगोलशास्त्र याचा विलोभनीय संगम पहायला मिळतो. दैत्यसूदन मंदिर हे नवव्या शतकातील चालुक्यकालीन दक्षिणात्यशैलीतील आणि पश्चिम विदर्भातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर भगवान विष्णू यांचे असून इथे त्यांची भव्य तसेच आकर्षक मूर्ती पहायला मिळते. या मूर्तीचे खास वैशिट्य म्हणजे, भगवान विष्णू यांनी ज्या लवणासुर राक्षसाचा वध केला होता तो त्यांच्या पायाखाली आहे.

भगवान विष्णूंना सूर्यकिरणांचा अभिषेक

गेल्या दोन दिवसात या मंदिरात एक अद्भुत नजारा पहायला मिळाला. बरोबर सकाळी ११.१० ते ११.३० या वेळेत भगवान विष्णूंच्या मुकुटावर सूर्य किरणांची एक विशेष क्रीडा पहायला मिळाली. भगवान विष्णूंच्या मूर्तीवर मुकुटापासून ते पायापर्यंत सूर्य किरणांनी अभिषेक घातल्याचा नजारा पाहून अनेकांनी दैवी प्रचितीचा अनुभव घेतला.

कोरीव अन अद्भुत शिल्पकलेतून साकारलेले मंदिर

लोणारचे दैत्यसूदन मंदिर हे फार प्राचीन आहे. लोणार धार येथील हे मंदिर शेकडो वर्षांपासून आहे. क्रेप पेपरला घड्या घालाव्या अशा या मंदिराच्या बांधकामात दगडाला घड्या घातल्याचे दिसते. हे मंदिर खरोखरच एक अद्भुत शिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहे. कोणार्कचे सूर्य मंदिर आणि खजुराहो मंदिर या दोन मंदिराच्या स्थापत्यशैलीच्या आधारावर या मंदिराची रचना करण्यात आली आहे. या मंदिराचे बाहेरील काम अत्यंत कोरीव असून पाहण्यासारखे आहे. त्यामुळे अनेक पर्यटक हे मंदिर पहायला आवर्जून येतात.

अद्भुत!! रात्रीच्या काळोखात लख्ख चमकणारे समुद्रकिनारे; तुम्ही पाहिलेत का?

Beaches in India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दूरवर पसरलेला समुद्रकिनारा आणि त्याची शांतता कायम आपल्याला आकर्षित करते. समुद्रात फेसाळणाऱ्या लाटा, सरकणारी वाळू आणि थंडगार वारा जेव्हा अंगाला स्पर्श करतो तेव्हा एक सुखद अनुभव मिळतो. जो शब्दात सांगता येणार नाही. तुम्ही असे बरेच समुद्रकिनारे फिरले असाल. शांत, निवांत, सुंदर आणि नयनरम्य दृश्यांनी समृद्ध.. पण तुम्ही कधी रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात चमकणारे समुद्रकिनारे पाहिले आहेत का? आपल्या भारतात अशा काही समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. जे रात्रीच्या अंधारात चमकतात. चला जाणून घेऊया.

कुठे आहेत?

आपल्या भारतात अनेक अद्भुत आणि आश्चर्यकारक वास्तू तसेच ठिकाणे आहेत. जी एक्स्प्लोर करण्यात काही वेगळीच मजा आहे. खास करून भारतातील समुद्र किनारे. प्रत्येक समुद्र किनाऱ्याची एक खासियत आणि वैशिट्य आहे. अशा या समुद्र किनाऱ्यांमध्ये काही समुद्रे किनारे असे आहेत जे रात्रीच्या अंधारात चांदण्यांसारखे चमकतात. महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल, केरळ, अंदमान- निकोबार या ठिकाणी हे समुद्र किनारे आहेत. चला या समुद्रकिनाऱ्यांविषयी अधिक जाणून घेऊया.

महाराष्ट्र – मालवण समुद्र किनारा

महाराष्ट्रातील मालवण हे अत्यंत सुंदर आणि नयनरम्य असे ठिकाण आहे. जिथला समुद्रकिनारा पाहणे अत्यंत सुखद अनुभव देणारे आहे. खास करून मालवण समुद्र किनारा रात्रीच्या वेळी पाहणारा आयुष्यात ते दृश्य विसरू शकत नाही. कारण हा बीच रात्रीच्या अंधारात अगदी आकाशातील ताऱ्यांसारखा चमकतो. जे पाहणे फारच आल्हाददायी आहे.

गोवा – पालोलेम बीच

गोवा नेहमीच पर्यटकांची पहिली पसंती राहिला आहे. गोव्यातील पालोलेम बीच अत्यंत वेगळा आणि अद्भुत आहे. रात्रीच्या वेळी लखलख चमकणारा हा समुद्रकिनारा एका अत्यंत सुंदर दृश्यासह मनाला वेगळाच आनंद देतो. त्यामुळे गोव्याला गेलात तर रात्रीच्या वेळी पालोलेम बीचचे निखळ सौंदर्य पहायला जरूर जा.

पश्चिम बंगाल – मंदारमणी बीच

पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील मंदारमणी बीचसुद्धा रात्रीच्यावेळी ताऱ्याप्रमाणे चमकतो. त्यामुळे हा बीचसुद्धा सर्वत्र प्रसिद्ध आहे.

केरळ – वर्कला समुद्रकिनारा

केरळमधील वर्कला बीच ज्याला ‘पापनाशम बीच’ असेही म्हटले जाते. हा भारतातील केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील वर्कला नगरपालिकेच्या वर्कला टाउनमध्ये आहे. हा समुद्रकिनारा देखील रात्रीच्या अंधारात चमचम करतो. हा अद्भुत नजारा पहायला अनेक लोक रात्रीच्या वेळी या ठिकाणी जातात.

अंदमान आणि निकोबार – राधानगरी बीच

अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावर असणारा राधानगरी बीचसुद्धा रात्रीच्यावेळी चमकतो. मुख्य म्हणजे हा बीच रात्रीच्या काळोखात निळ्या आणि हिरव्या रंगाच्या रोषणाईने उजळलेला दिसतो.

समुद्र किनाऱ्यांच्या चमकण्यामागील कारण काय?

भारतामध्ये असणारे हे समुद्रकिनारे रात्रीचे चमकतात आणि त्यामुळे या समुद्र किनाऱ्यांना अद्भुत मानले जाते. मात्र त्यांच्या चमकण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ते म्हणजे ‘बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन’. या समुद्रकिनारी तुम्ही बायोल्युमिनेसेन्सच्या विस्मयकारक घटनेचे साक्षीदार होऊ शकता. कारण या ठिकाणी बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टनची उपस्थिती असते. वर्षाच्या ठराविक काळात, बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन लाटांच्या हालचालीवर प्रतिक्रिया देत. ज्यामुळे हे समुद्रकिनारे रात्रीच्या वेळी चमकतात.

आश्चर्यकारक!! मृत्यूनंतर 24 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाली महिला; सांगितला ‘त्या’ थरारक क्षणाचा अनुभव

After Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मरण कुणालाही चुकलेलं नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी मरायचं आहे. पण मेल्यानंतर काय होत याबाबत जिवंतपणीच प्रत्येकाला कुतूहल असतं. सिनेमामध्ये दाखवतात तसं मेल्यानंतर आधी काही क्षण डोळ्यासमोर एक लख्ख प्रकाश पडतो आणि मग पुढे पायऱ्यांचा एक मार्ग दिसतो. असं असेल का मरणानंतरचं जग? आपल्याला काय बुवा माहित नाही. पण समोर आलेल्या एका वृत्तानुसार, एका महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. मात्र काही मिनिटांतच ती परत जिवंत झाल्याची घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या मृत्यूनंतर आपण २४ मिनिटांनी परत जिवंत झाल्याचा धक्कादायक दावा केला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया.

मेल्यानंतर २४ मिनिटांनी परत जिवंत झाली महिला

एका वृत्तानुसार, लॉरेन कॅनाडे नावाच्या एका महिलेने सोशल मीडिया साईट रेडिटवर तिच्या मृत्यूची गोष्ट सांगितली आहे. यामध्ये तिने सांगितलं आहे की, मागच्या फेब्रुवारी महिन्यात घरात असताना मला कार्डियक अरेस्ट आला. माझ्या नवऱ्याने ९११ क्रमांकावर फोन केला आणि CPR द्यायला सुरूवात केली. डॉक्टरांनी तपासून मला मृत घोषित केले. मात्र, २४ मिनिटांनंतर मी पुन्हा जिवंत झाले. त्यानंतर मला आयसीयूत दाखल केले. MRI मध्ये माझ्या मेंदूचे कोणतेही नुकसान झालेले नाही हे पाहून डॉक्टरांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केले’.

महिलेने सांगितला मृत्यूनंतरचा अनुभव

या महिलेने पुढे सांगितले की, ‘त्यावेळी माझ्यासोबत काय घडले ते मला चांगले आठवत आहे. हार्ट अटकनंतर माझ्या पतीने मला ४ मिनिटे सीपीआर दिला. त्यानंतर त्याने ९११ नंबरवर कॉल केला आणि काही वेळाने आपत्कालीन सेवा आली. मात्र, २४ मिनिटांनंतर माझं हृदय पुन्हा धडधडू लागलं आणि त्यानंतर मला दवाखान्यात नेले. तोपर्यंत मी कोमात गेले होते. साधारण २ दिवस मी कोमात होते. परंतु, जेव्हा मला जाग आली तेव्हा मी खूप गोंधळले होते. बरेच दिवस जुन्या गोष्टी आठवत नव्हत्या. ICU मध्ये माझं काय झालं, तेसुद्धा मला आठवत नाही’.

तो शेवटचा क्षण..

पुढे सांगितले, ‘जेव्हा माझ्या शरीरात जीव नव्हता तेव्हा मला खूप शांत वाटत होतं. कोमातून बाहेर आल्यावर काही आठवडे ही शांतता माझ्यात राहिली. मी दिवस आणि वेळ विसरले होते. मी प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नव्हते. मला हॉस्पिटलमध्ये नेले होते तेसुद्धा मी विसरले. मृत्यू झाला त्यावेळी मला कोणताही प्रकाश किंवा बोगदा दिसला नाही. परंतू, मला शांततेची भावना जाणवली. मला माझ्या ऑफिसमध्ये पडल्यासारखं वाटत होतं. हे विचित्र आहे, परंतु पूर्णपणे सत्य आहे. हे सगळं पाहिल्यानंतर मला मृत्यूची भीती वाटत नाही’.

Green Chilli Cultivation | हिरवी मिरची बनवेल तुम्हाला लखपती, अशाप्रकारे करा लागवड

Green Chilli Cultivation

Green Chilli Cultivation | आजकाल शेतकरी हे नवनवीन पिकांची लागवड करत आहे. आणि त्यातून चांगले उत्पन्न देखील घेत आहेत. आता देखील आम्ही तुम्हाला अशाच एका पिकाच्या लागवडीबद्दल माहिती देणार आहोत. ज्यातून तुम्हाला दर आठवड्याला हजारो रुपयांचा नफा मिळू शकतो. शेतकरी हिरव्या मिरचीची लागवड करून चांगले पैसे कमवू शकता. या पिकामध्ये खूप कमी वेळेमध्ये जास्त नफा मिळतो. आता या पिकाच्या लागवडीबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

देशातील कर्नाटक, मध्यप्रदेश तसेच इतर अनेक राज्यातील शेतकरी हे मिरचीची लागवड करून खूप चांगला नफा कमावत आहेत. मिरचीच्या लागवडीसाठी तुम्हाला चिकनमाती लागेल. त्याचप्रमाणे सेंद्रिय पदार्थांनी मिरचीची लागवड चांगल्या प्रकारे येऊ शकेल. त्यामुळे उत्पन्न देखील चांगले मिळेल.

मिरचीची लागवड करण्याआधी जमिनी योग्य प्रकारे तयार करणे खूप गरजेचे आहे. नांगरणीच्या वेळेस 300 ते 400 क्विंटल शेणखत शेतात टाकावे लागते. जेणेकरून मिरचीचे उत्पन्न देखील चांगले येते. तुम्ही मिरचीचे उत्पन्न घेऊन लखपती होऊ शकता. आता ही लागवड कशी करायची हे जाणून घेणार आहोत.

लागवड कशी करायची? | Green Chilli Cultivation

मिरची लागवड केल्यावर त्याची पाण्याची फवारणी वेळोवेळी करावी लागते. त्यानंतर 35 दिवसांनी मिरचीची रोपे शेतात लावण्यासाठी तयार होतात. ही रोपे लावल्यानंतर 60 दिवसापर्यंत तुम्हाला खूप चांगले पीक मिळते. मिरचीची लागवड करून तुम्ही एका एकरात 35 क्विंटल हिरव्या मिरचीचे उत्पादन घेऊ शकता. करू शकतो.

खर्च किती येतो ?

मिरचीच्या लागवडीसाठी 20 ते 30 हजार रुपये खर्च येतो. बाजारात 4000 रुपये प्रति क्विंटल दराने ही मिरची विकली जाते. तुम्ही जर ही हिरवी मिरची वाळवून लाल मिरची विकली तर त्यातून आणखी नफा मिळेल.

Kalyan Lok Sabha 2024 : श्रीकांत शिंदेंना कल्याणमध्ये धक्का बसणार?

shrikant shinde vaishali darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला… तर त्याच्या जवळच लागून असलेला कल्याण (Kalyan Lok Sabha 2024) हा श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला…सलग दोन टर्म खासदार असणाऱ्या श्रीकांत शिंदे यांनी वडिलांच्या नावावर 2014 ला खासदारकी पदरात पाडून घेतली. पण 2019 ची लोकसभा उजाडता श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचं असं राजकारण उभं करत विकास कामांच्या जोरावर सलग दुसऱ्यांदा खासदारकी मोठ्या लीडने जिंकली. कल्याण आणि श्रीकांत शिंदे हे समीकरण त्यांनी असं काही बनवून ठेवलं की राजकारणाच्या कुठल्याही खेळ्या त्यांना कल्याण पासून वेगळं करू शकणार नव्हतं. म्हणूनच 2024 ला महायुतीकडून सलग तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी जाहीर झाली. मागच्या दोन टर्म मध्ये आणि स्वतः शिंदे मुख्यमंत्री पदावर असल्यापासून श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) मतदारसंघात मोठा निधी आणत पैशांचा पाऊस पाडला. हीच डी फॉर डेव्हलपमेंटची लाईन मोठी करत शिंदे सलग तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी मैदानात असताना त्यांच्या विरोधात ठाकरेंकडून कडवी झुंज देणारा एक मोठा चेहरा मैदानात आणला जाईल, असा सर्वांचाच अंदाज होता. म्हणूनच सुषमा अंधारे, वरुण देसाई अशा अनेक नावांचा विचार या जागेसाठी करण्यात येत होता. पण उद्धव ठाकरेंनी अगदी मोघपणे बोलताना कल्याणच्या उमेदवारीची घोषणा केली आणि सगळ्यांना धक्का बसला… कारण ठाकरेंनी दोन टर्मच्या खासदार राहिलेल्या श्रीकांत शिंदेंच्या विरोधात एका सर्वसामान्य माजी नगरसेवकाला लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. ते नाव म्हणजे वैशाली दरेकर.

सुरुवातीला कल्याणच्या जागेवरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात साटलोट झाल्याच्या बऱ्याच वावड्या उठल्या. ठाकरेंनी शिंदेंना फ्री चेंडू खेळायला दिला असाही आरोप झाला. पण मतदान अगदी तोंडावर आलेलं असताना ठाकरेंची डोकॅलिटी आता समोर येऊ लागलीय. श्रीकांत शिंदे यांचा गेम करण्यासाठीच वैशाली दरेकर हा साधा चेहरा ठाकरेंनी उमेदवार म्हणून पुढे केलाय. त्यामुळे भल्याभल्यांना जमलं नाही ते शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दरेकर करून दाखवणार? शिंदेंच्या कल्याणमधील वर्चस्वाला धक्का लावून वैशाली दरेकारांची मशाल पेटेल, असं आम्ही आत्मविश्वासाने का म्हणतोय? तेच पाहुयात

श्रीकांत शिंदेंच्या विरोधात कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर होताच ठाकरेंच्या या निर्णयावर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई यांसारख्या दिग्गज चेहऱ्यांचा कल्याणच्या जागेसाठी विचार चालू असताना अचानक दरेकर यांना दिलेली उमेदवारी पाहून अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदेंची लोकसभेची हॅट्रिक पूर्ण होणार, असं मतदारसंघात बोललं जाऊ लागलं. पण आता मतदान उद्यावर येऊन ठेपलेलं असताना वारं बरच फिरलय. वैशाली दरेकर या सुरुवातीपासुनच हार्डकोर शिवसैनिक. पण 2009 मध्ये त्यांनी मनसेमध्ये प्रवेश करत कल्याणमधून लोकसभा लढवली होती. तेव्हा त्यांनी लाखांहून अधिक मतं घेत अनेकांना धक्का दिला होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावरही त्यांनी काही काळ काम पाहिलं.आक्रमक शैली आणि बेधडक भाषणांनी त्यांना राजकारणात चांगला युएसपी मिळवून दिला. पण त्यांनी पुन्हा शिवसेना जॉईन केली. शिंदेंच्या फुटीच्या वेळेस त्या मात्र ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्या. त्याचीच पावती म्हणून की काय दरेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. पण एका प्रस्थापित खासदाराच्या विरोधात एका सर्वसामान्य शिवसैनिकाला निवडणुकीत उतरवून ठाकरेंनी इथं लढण्याआधीच शस्त्र खाली टाकली का? तर याचं उत्तर येतं, नाही… यांचं कारण म्हणजे शिवसेनेच्या धक्कातंत्राचा इतिहास…

राष्ट्रवादी, काँग्रेस हा पक्ष प्रस्थापित राजकारण्यांचा, सहकार आणि कारखानदारीवर मोठ्या झालेल्या नेत्यांचा राहिला. या तुलनेत शिवसेनेनं पान टपरीवाल्यापासून ते चहा वाल्यापर्यंत प्रत्येक शिवसैनिकाला राजकारणासाठी स्पेस दिला… ते आमदार, खासदार झाले… थोडक्यात शिवसेनेसाठी नेता महत्त्वाचा असतोच पण त्यापलीकडे मातोश्रीशी असणारी निष्ठाही महत्त्वाची असते… त्यामुळे ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला दगा फटका दिला. त्यांना शिवसैनिकांनी मतदानातून त्याचं योग्य बक्षीस दिलं. छगन भुजबळ जेव्हा शिवसेना सोडून गेले होते तेव्हा देखील बाळासाहेब ठाकरेंनी बाळा नांदगावकरांसारख्या एका साध्या नगरसेवकाला निवडून आणत भुजबळांना इंगा दाखवला होता. यंदा तर शिंदेंनी पक्ष फोडल्याने ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीचं वार दिसतंय. त्यात निवडणूक ही शिंदेंच्या मुलाच्या विरोधात होत असल्यानं याला निष्ठेची धार आणखीनच चढणार आहे… अगदी लांब लांब पर्यंत विजय आपल्या हातातही नाही. असं वाटत असताना शिवसेनेनं निवडणूक ही शिवसैनिकांच्या भरोशावर सोडली. असंच काहीसं सध्या कल्याणमध्ये घडतंय. श्रीकांत शिंदे यांना घोडे मैदान सोपं वाटत असलं तरी सहानुभूतीची सुप्त लाट, शिवसैनिकांची ताकद हे सगळं दरेकरांच्या पाठीशी मतदानाच्या दिवशी उभे राहणार आहे, एवढं मात्र नक्की…

दुसरा मुद्दा येतो तो गटातटामुळे होणार नुकसान टाळण्याचा…

महायुतीमध्ये कल्याणची जागा भाजपला सोडण्यात यावी यावरून बरंच राजकारण घडलं. कल्याणमधील स्थानिक भाजप पदाधिकारी आणि नेत्यांनी आम्ही शिंदेंना सपोर्ट करणार नाही, असा पवित्र घेतला… शेवटी बरीच घासाघीस झाल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली.. असं असलं तरी कल्याणमधील भाजपचे कार्यकर्ते शिंदेंच्या पाठीशी एकदिलाने उभे राहतील का? हा मोठा प्रश्न आहे.. मतदानाच्या दिवशी त्यांना आपल्याच मित्र पक्षांकडून दगाफटका होण्याचे चान्सेस अधिक आहेत. पण हीच गोष्ट ठाकरेंनी जाणीवपूर्वक टाळली…कुठल्या गटाच्या तटाच्या नेत्याला उमेदवारी देण्यापेक्षा या सर्वांपासून लांब असणाऱ्या एका सर्वसामान्य नेत्याला उमेदवारी देऊन त्यांनी पक्षांतर्गत बंडाळीला आवर घातला…उलट ठाकरे गटाचे सर्वच कार्यकर्ते हे दरेकरांचा प्रचार एकदिलाने करताना दिसून आले…व्यक्ती विरुद्ध व्यक्ती अशी कल्याणची लढत घेऊन न जाता सर्वसामान्य चेहरा दिल्यामुळे शिंदे विरुद्ध निष्ठा असा रंग त्यांनी या जागेला दिला…याचाच इम्पॅक्ट मतदानाच्या दिवशी ठाकरेंच्या बाजूने शिफ्ट होताना दिसून येऊ शकतो…

तिसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे भाजपची मतं वळती करून घेण्याची संधी

महायुती पूर्ण राज्यात समन्वय साधून निवडणूक लढत असली तरी ठाण्यात मात्र शिंदे आणि भाजप यांच्यात बरेच मनभेद झालेत. गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाने याला आणखीनच हवा दिली…कल्याणच्या निवडणुकीच्या प्रचाराचाही बेस हा मोदी सेंट्रिक न राहता तो श्रीकांत शिंदे राहिला, हे देखील बऱ्याच भाजप कार्यकर्त्यांना पटलं नाही. त्यामुळे भाजपच्या बाजूने असणारी ही हक्काची मतं ट्रान्सफर होण्याची दाट शक्यता आहे. याचाच फायदा घेण्यासाठी दरेकर या मतदारसंघात दारोदारी फिरल्या… भाजपच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीला टारगेट करतानाच त्यांचा सर्वात जास्त फोकस राहिला तो शिंदेंनी केलेल्या बंडाचा! नरेंद्र मोदींना थोडासा सॉफ्ट कॉर्नर देत दरेकर या एकनाथ शिंदेंवर तुटून पडताना दिसल्या. यांचं मेन कारण हे भाजपची मतं आपल्याकडे शिफ्ट करून घेण्याचा असल्याचं लक्षात येतं. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा हा अंतर्गत विरोध दरेकर यांच्या पथ्यावर पडण्याचे चान्सेस जास्त आहेत…

हे सगळं वैशाली दरेकर यांना श्रीकांत शिंदेंच्या विरोधात स्ट्रॉंग बनवतं. कल्याणची उमेदवारी ही ठाकरेंनी हारण्यासाठी दिली नसून कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठीच दिली आहे…त्यासाठी त्यांनी कल्याणच्या पॉलिटिक्समधील जवळपास सर्वच डायनामिक्सचा विचार केल्याने कल्याणचा निकाल हा धक्कादायक लागू शकतो…त्यामुळे शिंदेंसाठी सर्वात सेफ समजल्या जाणाऱ्या त्यांच्याच मुलाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातच आता मतदान उलटं होण्याची शक्यता वाढलीय… सलग दोन टर्मच्या खासदार राहिलेल्या श्रीकांत शिंदेंना धक्का देत वैशाली दरेकर या निवडून आल्या तर शिवसेना पक्ष आणि नाव चोरलं असलं तरी शिवसैनिक आजही मातोश्रीपाशीच निष्ठा बाळगून आहे, हे चित्र आणखीन स्पष्ट होईल.श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर या लढतीत विजय कोणाचा होईल? मशाल की धनुष्यबाण? तुमचं मत कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Accident News: छत्तीसगडमध्ये भीषण अपघात!! 20 फूट खड्ड्यात पिकअप पडल्यामुळे 15 जणांचा जागीच मृत्यू

Accident News (1)

Accident News| छत्तीसगड (Chhattisgarh) येथील कावर्धामध्ये पिकअप वाहन उलटल्यामुळे 15 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना घडली आहे. या अपघातामध्ये 25 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी आणि मृत्यू झालेले सर्वजण आदिवासी समुदायाचे लोक आहेत. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये 10 महिलांचाही समावेश असल्याचे वृत्त समोर आले आहे. याबद्दल संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर आता जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

भरधाव पिकअप 20 फूट खोल खड्ड्यात पडली (Accident News)

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, बैगा आदिवासी समाजातील 25-30 कामगार तेंदूपत्ता गोळा करून पिकअप ट्रकमधून घरी परतत होते. मात्र प्रवासादरम्यान बहपनी परिसरात येताच त्यांची पिकअप 20 फूट खोल खड्ड्यात पडली. यामुळे ही पिकअप जागीच पलटली गेली. या अपघातामुळे 15 जणांना जागीच जीव जमवावा लागला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. यातील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण कुई येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अरुण साव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हणले आहे की, “कावर्धा जिल्ह्यातून अत्यंत वेदनादायक अपघाताची माहिती मिळाली आहे. कावर्धा जिल्ह्यातील कुकडूर पोलीस स्टेशन परिसरात पिकअप गाडी उलटून 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तेंदूपत्ता तोडून सर्वजण जंगलातून घरी परतत होते. दिवंगत आत्म्यांना शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.”

UPSC Recruitment 2024 | थेट मुलाखतीद्वारे केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये नोकरीची संधी, मिळणार 1 लाख 40 हजार पगार

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. ती म्हणजे एका मोठ्या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर या भरतीला सुरुवात करा. या भरतीची अधिसूचना देखील प्रसिद्ध झालेली आहे. ही भरती प्रक्रिया केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC Recruitment 2024) राबवली जात आहे. त्यामुळे जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाही. थेट मुलाखती द्वारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. 30 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.

पदांची नावे | UPSC Recruitment 2024

या भरती अंतर्गत असिस्टंट रिसर्च ऑफिसर, सायंटिफिक ऑफिसर, फॅक्टरी मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, असिस्टंट कमिशनर, टेस्ट इंजिनियर ट्रेनिंग ऑफिसर आणि प्रोफेसर ही पदे भरली जाणार आहेत.

रिक्त पदांची संख्या

या भरती अंतर्गत एकूण 83 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

मासिक पगार

दर महिन्याला 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

आता इंटरनेटशिवाय WhatsApp वरून फाईल शेअर करता येणार

WHATSAPP FILE TRANSFER

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहेत. वापरायला अतिशय सोप्प असल्यानेप्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप पाहायला मिळतेच. कंपनी सुद्धा व्हाट्सअप मध्ये सतत नवनवीन फीचर्स ऍड करत असते. त्यामुळे व्हाट्सअप वापरणं आणखी मजेशीर होत आहे. आताही व्हाट्सअप एक नवीन फीचर्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फिचर मुळे तुम्हाला इंटरनेटशिवाय WhatsApp वरून फाईल शेअर करता येणार आहे.

खरं तर अनेकदा आपण एकमेकांना फाईली शेअर करत असतो, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अँप सुद्धा उपलब्ध आहेत. त्याशिवाय व्हॉट्सॲपद्वारे सुद्धा एकमेकांना फाईल्स शेअर करता येतात, मात्र त्यासाठी मोबाईल मध्ये इंटरनेट कनेक्शन असंण गरजेचं असत. मात्र आता तुम्ही इंटरनेटशिवायही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फाइल शेअर करू शकणार आहात. व्हाट्सअप एका नवीन फीचरवर काम करत आहे. या अंतर्गत व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना एकमेकांमध्ये फाइल्स ट्रान्सफर करण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे फीचर इंटरनेटशिवाय दोन व्हॉट्सॲप अकाउंट्समध्ये फाइल्स ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. इंटरनेट शिवाय फाइल्स शेअर करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये काही सेटिंग्ज चेंज कराव्या लागतील. त्यानंतर फाइल सहज शेअर करता येईल. WABetaInfo नुसार, हे फीचर व्हॉट्सॲप अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.24.9.22 यूजर्ससाठी उपलब्ध असेल. येथून इंटरनेट कनेक्शनशिवाय फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे किंवा इतर फाइल्स शेअर करणे शक्य होणार आहे. मात्र, त्यासाठी व्हॉट्सॲप सेटिंग मध्ये जाऊन परमिशन द्यावी लागेल.

PM kissan Sanman Nidhi Yojana | PM किसान योजनेचा17 वा हप्ता मिळण्यापूर्वी सरकारने घेतला मोठा निर्णय, मोठी अपडेट समोर

PM kissan Sanman Nidhi Yojana

PM kissan Sanman Nidhi Yojana | केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना चांगले आर्थिक पाठबळ मिळावे, त्याचप्रमाणे त्यांच्या शेतातील पीक चांगले यावे. या उद्देशाने सरकारने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्यातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही सरकारची लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा लाभ भारतातील कितीतरी शेतकऱ्यांना होत असतो. या योजनेच्या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 6000 रुपये एवढे आर्थिक पाठबळ दर वर्षाला देत असतात. आतापर्यंत या योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि आता सगळे शेतकरी 17 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता या 17 व्या हप्त्याबाबतच एक मोठी बातमी समोर आलेली आहे.

केंद्र सरकार योजनेचे मूल्यमापन करणार | PM kissan Sanman Nidhi Yojana

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता कधी मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यापूर्वी केंद्र सरकार त्याचे मूल्यमापन देखील करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. यासाठी NITI आयोगाशी संबंधित विकास देखरेखाने मूल्यमापन कार्यालयांनी या योजनेच्या मूल्यमापनासाठी विविध मागवलेले आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार दरवर्षी 60 हजार कोटी रुपयांचा खर्च करत असते.

पीएम किसान योजनेचे मूल्यमापन करण्याचा उद्देश काय?

या योजनेअंतर्गत (PM kissan Sanman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या किती आर्थिक गरजा पूर्ण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर काय परिणाम झाला आहे?या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी सरकार या योजनेचे मूल्यमापन करणार आहे.

सरकारने 2024 -25 या वर्षासाठी या योजनेसाठी 60000 कोटी रुपये राखून ठेवलेले आहे. या योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी 24 राज्यांमधील किमान 5000 शेतकऱ्यांच्या सर्वेक्षणात समाविष्ट केले जाणार आहे. त्यापैकी 17 राज्यांमध्ये सुमारे 95 टक्के पीएम किसान लाभार्थी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल. त्याचप्रमाणे बी- बियाणे वेळेवर खरेदी करता येईल. यासाठी हे मूल्यबाबत केले जाणार आहे.

Kitchen Tips : घरातील मच्छर होतील छूमंतर ! वापरा कांद्याची ‘ही’ अनोखी ट्रिक

Kitchen Tips : उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याची सुरुवात… हे वातावरण म्हणजे उकाड्याने हैराण होणे आणि पावसाच्या सारी बारसल्यावर हवा थंडगार होणे. आत्ता सध्याचा काळ असाच काहीसा चालू आहे. या काळात डासांचा उपद्रव (Kitchen Tips) किती होतो हे काही वेगळे सांगायला नको. असे वातावरण डासांच्या वाढीसाठी पोषक असते. संध्याकाळच्या वेळी तर डासांचा उपद्रव अधिकच वाढतो.

बाजारात असे अनेक उपाय आहेत जसे की डासांचा स्प्रे , कॉईल . लिक्विड रिपेलंट पण हे सगळे उपाय म्हणजे केमिकल्सनी भरलेले आणि काही वेळा विषारी ठरतात. म्हणूनच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक भारी आणि घरगुती (Kitchen Tips) उपाय आम्ही सांगणार आहोत. prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.



आपल्याकडे कांदा प्रत्येकाच्या घरात असतोच, हा कांदा आपल्याला डास पळवण्यासाठी मदत करेल. त्यासाठी सगळ्यात आधी एक कांदा घ्या त्याची पुढची आणि मागची बाजू थोडी कट करून घ्या. आता साल काढण्याच्या सुरीने आतमधला कांद्याचा (Kitchen Tips) भाग पोखरून घ्या. जेणेकरून एखाद्या वाटीप्रमाणे त्यामध्ये जागा तयार होईल. आता कापराच्या तीन वड्या घ्या. भीमसेनी कापूर असेल तर उत्तमच. या कापराच्या तीन वडया आणि तीन लवंगा कुटून घ्या. आता कापलेल्या कांद्यामध्ये तेल घाला. त्यामध्ये कपूर आणि लवंग यांचे मिश्रण (Kitchen Tips) घाला. आता त्यामध्ये वात घालून हा दिवा लावा. विशेषतः संध्याकाळच्या डास घरी येण्याच्या वेळेत हा उपाय करून पहा.

आता व्हायरल होणारा हा उपाय कितपत प्रभावी आहे माहिती नाही. मात्र या व्हायरल (Kitchen Tips) होणाऱ्या व्हिडीओ वर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तुम्ही देखील हा उपाय करून पहा आणि कमेंट करून आम्हाला त्याबाबत प्रतिक्रिया कळवा.