Saturday, December 20, 2025
Home Blog Page 749

Viral Video : दादी Rock पब्लिक Shock!! बॉलिवूडच्या गाण्यावर आजींचा भन्नाट डान्स; हावभाव पाहून वेडेच व्हाल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ बनवताना दिसतात. यामध्ये अगदी लहानांपासून ते वयोवृद्ध मंडळींपर्यंत सगळ्यांचे व्हिडीओ पहायला मिळतात. यातील बरेचसे व्हिडीओ हे डान्सचे असतात. वेगवेगळ्या गाण्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने खुल्या पद्धतीने डान्स करणारे लोक कायम सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये दिसतात. अशातच आता एका आज्जीबाईंचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये एक आज्जी चक्क बॉलिवूडच्या गाण्यावर भन्नाट नाचताना दिसतेय.

पहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा डान्स पाहून अगदी तरुण मंडळी सुद्धा लाजतील. या व्हायरल व्हिडीओमध्ये या आजीने डोक्यावर पदर घेतला घेऊन नव्वदच्या दशकातील एका लोकप्रिय गाण्यावर असला भन्नाट डान्स केलाय की, व्हिडीओ पाहून तुमचेही पाय थिरकतील. या आजीने ९०’च्या काळात सुपरहिट झालेल्या ‘करन- अर्जुन’ या सिनेमातील ‘लम्बा लम्बा घूँघट काहे को डाला – मुझको राणाजी माफ करना’ या गाण्यावर डान्स केला आहे. (Viral Video)या व्हिडिओत नाचणाऱ्या आजीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला कौतुक वाटेल.



उतार वयातही आपल्या लहान लहान नातवंडे आणि घरातील इतर सदस्यांसोबत मनसोक्त डान्स करणारी ही आजी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. या आजीच्या डान्स स्टेप्स आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आजच्या तरुण पिढीला अगदी थक्क करणारे आहेत. (Viral Video)आजीची एनर्जी तर इतकी खतरनाक आहे की, तिच्यासोबत स्पर्धा करताना कुणी दहावेळा विचार करेल. हा व्हिडीओ पाहून खरोखर म्हणावे लागेल की, ‘आनंदाला वयाचे भान नसते’ किंवा ‘वय हा फक्त आकडा असतो’

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या आजीचा हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर 90s_song नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आज्जी’. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला असून यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिलं आहे की, ‘दादी रॉक, पब्लिक शॉक’. (Viral Video) तर आणखी एकाने लिहिलंय, ‘जवानी मोड ऑन आज्जी… खूप गोड दिसताय’. अन्य एकाने लिहिलंय, ‘आजी तिच्या काळातली मधुबाला होती’. तर अनेकांनी या व्हिडिओवर हार्ट ईमोजी शेअर केले आहेत.

Benefits Of Eating Walnuts : उन्हाळ्यात भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Benefits Of Eating Walnuts

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Walnuts) उन्हाळा असो पावसाळा असो किंवा मग हिवाळा. ऋतू कोणताही असला तरीही सुका मेवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे तज्ञ सांगतात. कारण आपल्या शरीराला दैनंदिन स्वरूपात जे पोषण गरजेचे असते ते देण्याची क्षमता सुक्या मेव्यात असते. त्यामुळे दररोज काही ठराविक प्रमाणात सुका मेवा जरूर खावा, असे म्हटले जाते. त्यातही अक्रोड खाल्ल्याने अनेक शारीरिक तसेच मानसिक आरोग्यास फायदे मिळतात. खास करून भिजवलेले अक्रोड उन्हाळ्याच्या दिवसात अत्यंत चांगले मानले जाते. चला तर जाणून घेऊ भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे आणि मर्यादा .

अक्रोडमधील पोषक तत्त्वे (Benefits Of Eating Walnuts)

सुका मेव्यातील अक्रोड खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अक्रोड खाणे अत्यंत लाभदायी असल्याचे, तज्ञ सांगतात. कारण, अक्रोड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यामध्ये आढळणारे ओमेगा – ३ फॅटी ॲसिड हृदयाला निरोगी बनवते. शिवाय अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो. त्यातही उन्हाळ्याच्या दिवसात अक्रोड पाण्यात भिजवून खाल्ल्याने ते अधिक पौष्टिक होते.

अक्रोडमध्ये व्हिटॅमिन इ, पॉलिफेनॉल्स यांशिवाय अल्फा-लिनोलेनिक ऍसिडचे (एएलए) चांगले प्रमाण असते. (Benefits Of Eating Walnuts) शिवाय यातील दाहक- विरोधी संयुगे हृदयरोगाचा धोका कमी करतात. इतकेच नव्हे तर अक्रोडमध्ये लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक तत्वांचादेखील समावेश असतो.

एका दिवसात किती अक्रोड खाता येईल?

नियमित स्वरूपात अक्रोडचे सेवन करणे नक्कीच लाभदायी आहे. त्यामुळे तुम्ही दररोज २ ते ३ अक्रोड बिनधास्त खाऊ शकता. तसेच लहान मुलांना मात्र नियमित स्वरूपात फक्त एक अक्रोड द्या. कारण लहान मुलांनी जास्त अक्रोड खाल्ल्याने काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

उन्हाळ्यात भिजवलेले अक्रोड अधिक फायदेशीर

उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या तापमानासोबत आपल्या शरीराचे देखील तापमान चांगलेच वाढलेले असते. त्यामुळे अशा दिवसात सुका मेवा खाताना विशेष करून अक्रोडखावे. तेही भिजवलेले. (Benefits Of Eating Walnuts) भिजवलेल्या अक्रोडमध्ये उष्णता दूर होऊन पौष्टिक घटक वाढतात. यासाठी अक्रोड रात्रभर स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवून सकाळी खावे. यामुळे शरीराला उष्णतेच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. मात्र इतर कोणत्याही ऋतूत तुम्ही अक्रोड न भिजवता खाल्ले तरीही चालतील.

अक्रोड खाण्याचे फायदे

  • रोज अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो.
  • स्मरणशक्ती वाढते.
  • यातील अँटी-ऑक्सिडंट्स हृदयासाठीही फायदेशीर ठरतात.
  • ताण- तणाव दूर होऊन मानसिक आरोग्य सुधारते. (Benefits Of Eating Walnuts)
  • अनिद्रेचा त्रास दूर होऊन झोप सुधारण्यास मदत होते.
  • रक्तदाब नियंत्रित राहतो.
  • शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.

Skin Care Tips : सौंदर्याची हाव पडेल महागात; ‘हे’ घरगुती उपाय लावतील त्वचेची वाट

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) सुंदर दिसायला कुणाला आवडत नाही? पण सुंदर दिसण्यासाठी अति आग्रही असणे कधीही त्रासदायक ठरू शकते. असे लोक सुंदर दिसायचंय म्हणून काय वाट्टेल ते करायला तयार होतात. पण अनेकदा बाहेरील ब्युटी प्रोडक्ट्स किंवा ट्रीटमेंट्स महाग आहेत म्हणून वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेले वेगवेगळे उपाय घरच्या घरी केले जातात.

निश्चितच काही घरगुती उपाय हे अत्यंत जालीम आणि प्रभावी असतात. पण सगळेच उपाय चांगले किंवा योग्य असतील असे काही खात्रीने सांगता येत नाही. (Skin Care Tips) अज्ञानामुळे किंवा उगाच कुणाचं काही ऐकून आपण त्वचेवर जे वेगवेगळे प्रयोग करतो त्यामुळे सौंदर्यात वाढ होत नाही. मात्र, सौंदर्याची वाट लागते. अशाच काही अपायकारक घरगुती उपायांची आज आपण माहिती घेणार आहोत.

लिंबू- साखरेने स्क्रबिंग

बरेच लोक घरच्या घरी त्वचा स्क्रब करण्यासाठी लिंबू आणि साखर यांचा एकत्रित वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का? या उपायाने तुमच्या त्वचेला बरीच हानी पोहचू शकते. (Skin Care Tips) एकतर साखरेमुळे त्वचेवर ओरखडे येऊन जखमा होऊ शकतात आणि दुसरं लिंबातील अॅसिड तुमची त्वचा कोरडी करू शकते. ज्यामुळे त्वचेच्या विविध समस्या होऊ शकतात.

आईस फेशियल (Skin Care Tips)

घरच्याघरी आईस फेशियल करणे सध्या चांगलेच ट्रेंडमध्ये आहे. क्षणिक सुखासाठी केलं जाणारं हे फेशियल कितीही चांगला वाटत असलं तरीही त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. कारण यासाठी फ्रिजरमधला बर्फ काढून थेट त्वचेवर मसाज केल्यास त्वचेचे बरेच नुकसान होते. जर तुम्हीही असे फेशियल करत असाल तर यासाठी बर्फ एका कपड्यात गुंडाळून मग त्वचेवर फिरवा किंवा बर्फाच्या पाण्याचा वापर करा. ज्यामुळे त्वचेला नुकसान होणार नाही.

पिंपल्स घालवण्यासाठी टूथपेस्टचा वापर

अनेकांना चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात. ज्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्यामुळे बरेच लोक हे पिंपल्स घालवण्यासाठी विविध उपाय करतात. त्यापैकी एक म्हणजे चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी टुथपेस्टचा वापर करणे. (Skin Care Tips) एकतर यामुळे पिंपल्स जात नाहीत आणि दुसरी गोष्ट टूथपेस्टमुळे पिंपल्स आणखी चिघळून त्याच्या जखमा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हा उपाय म्हणून प्रयोग करत असाल तर आत्ताच थांबवा.

त्वचा सुंदर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर

बरेच लोक त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करतात. तास बेकिंग सोडा हा ठराविक प्रमाणात वापरला तर तो त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतो. पण त्याचं प्रमाण जर का चुकलं किंवा त्याचा अतिरेक झाला तर मात्र त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जे काही केल्या निस्तरणे शक्य होत नाही.

घरच्याघरी व्हॅक्सिन

फेशियल हेअर किंवा हातापायावरचे केस काढण्यासाठी घरच्याघरी व्हॅक्सिंग केली जाते. यासाठी अनेक जण साखरेचा पाक, गुळाचा पाक करून होममेड व्हॅक्स तयार करतात. (Skin Care Tips) पण, खरतर हा प्रयोग नसून धोकादायक स्टंट आहे. कारण, यामुळे त्वचेला नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जर तुम्ही असे प्रयोग करत असाल तर तुमच्या त्वचेचे नुकसान होणार नाही याची आधी खात्री करून घ्या.

Bhimashankar Forest : रात्रीच्या अंधारात चमकतं ‘हे’ जादुई जंगल; अख्खं तारांगण जमिनीवर आल्याचा होतो भास

Bhimashankar Forest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bhimashankar Forest) आजपर्यंत तुम्ही अनेक गोष्टींमध्ये, कथांमध्ये मायावी वा जादुई जंगल, रहस्यमयी अभयारण्य यांच्याविषयी ऐकले असेल. पण तुम्ही अशा एखाद्या जंगलाला कधी भेट दिली आहे का? जर तुम्हाला असा काही अनुभव घ्यायचा असेल निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची संधी शोधात बसू नका. आज आम्ही तुम्हाला ज्या जंगलाविषयी सांगणार आहोत, तिथे जा. कारण हे एक असं जादुई जंगल आहे, जे रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात अत्यंत रहस्यमयी पद्धतीने चमकत. चला तर या जंगलाविषयी अधिक जाणून घेऊया.

रात्रीच्या अंधारात चमकणार जादुई जंगल (Bhimashankar Forest)

निसर्गात अनेक जादुई गोष्टी आहेत. ज्या पाहण्यासारख्या आणि अनुभवण्यासारख्या आहेत. फक्त आपण तिथपर्यंत पोहचायला हवं. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ट्रेकिंगचा नाद असेल. जर तुम्हीही ट्रेकिंग प्रेमी असाल तर आयुष्यात किमान एकदा तरी भीमाशंकरच्या जंगलात नाईट ट्रेकिंगला नक्की जा. कारण इथे रात्रीच्या वेळी जादू होते. एकीकडे रात्र असल्यामुळे सर्वत्र काळोख असतो तर दुसरीकडे भीमाशंकरचे हे जंगल मात्र सोनेरी प्रकाशाने उजळलेले दिसते. ते कसे? हे जाणून घेऊ.

कशामुळे चमकतं?

तुम्ही काजवा पाहिलाय का? जो रात्रीच्या वेळी आपल्या आसपासची जागा प्रकाशमान करतो. होय. तुम्ही बरोबर समजत आहात. भीमावशंकर जंगलात लक्ष लक्ष काजवे आहेत. जे प्रत्येक झाडा पानांवर रात्रीच्यावेळी लुकलुकताना दिसतात. (Bhimashankar Forest) या लुकलुकणाऱ्या काजव्यांमुळेच संपूर्ण जंगल काळ्याकुट्ट रात्रीतसुद्धा प्रकाशमान होतं. काजव्यांचे लुकलुकने एका लयीत असल्याने निसर्ग एखादी जादू वा किमया करतोय असेच वाटते. या काजव्यांचं हे लुकलुकणं पाहण्यात एक अत्यंत वेगळा सुखद अनुभव आहे. जो घेण्यासाठी इथे जायला हवं.

कसे जाल?

भीमाशंकर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून येथे कायम भाविकांची गर्दी असते. मात्र, तीर्थक्षेत्रासह हे ठिकाण अभ्यारण्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक ट्रेकर्स, पक्षी निरिक्षक आणि वनजीवन पाहण्यासाठी उत्सुक पर्यटक इथे आवर्जून भेट देतात. (Bhimashankar Forest) मुंबईपासून साधारण साडेचार तासांच्या अंतरावर म्हणजेच २१३ किलोमीटरवर भीमाशंकर अभयारण्य आहे. त्यामुळे अगदी स्वतःची गाडी घेऊन निसर्ग पाहत एन्जॉय कारतग जाणे अगदी शक्य आहे. मात्र निसर्गाला न्याहाळायचे असेल तर इथे गेल्यानंतर पायीच फिरावे लागेल.

Monsoon Picnic Spot: पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणांना द्या भेट

Mansoon Travel

Monsoon Picnic Spot| गेल्या दोन महिन्यांपासून कडक उन्हाळ्यामुळे लोक हैराण झाले होते. परंतु आता पावसाच्या रिमझिम सरी बरसण्यास सुरुवात झाल्यामुळे वातावरणात थंडावा जाणवू लागला आहे. अशा वातावरणामध्ये एखाद्या थंडगार ठिकाणी फिरायला जावेसे वाटते. कारण पावसाळा सुरू झाला की, निसर्गाचे सौंदर्य आणखीन फुल लागते. तसेच धबधबे कोसळण्यास सुरूवात होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांची माहिती देणार आहोत, जिथे गेल्यावर तुम्हाला सर्वात सुखद अनुभव होईल.

माळशेज घाट – माळशेज घाट हा निसर्ग सौंदर्याचे एक सुंदर उदाहरण आहे. या घाटामध्ये गेल्यानंतर सर्वत्र हिरवाई दिसून येते. या घाटातून दूरवर आपल्याला फक्त डोक्यांची चादर त्यात दडलेले डोंगर आणि दुधासारखे कोसळणारे धबधबे दिसून येतात. (Monsoon Picnic Spot) माळशेज घाटा फोटोग्राफरचा तर अतिशय आवडता स्पॉट आहे. या घाटामध्ये अनेक कपल ही फिरण्यासाठी जात असतात. या घाटाच्या जवळच हरिश्चंद्रगड ही आहे. जिथे भेट देता येऊ शकते.

दापोली – शहराच्या गर्दीपासून दूर निवांत आणि स्वच्छ म्हणून ओळखले जाणारे दापोली हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षित केंद्र आहे. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला निसर्ग सौंदर्य दिसून येईल. येथे तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर जाऊन मनमुराद आनंद लुटता येईल. त्यामुळे या पावसाळ्यात आवश्यक दापोलीला भेट द्या.

भीमाशंकर – भीमाशंकर हे घनदाट अरण्याने वेढलेले ठिकाण आहे. याचठिकाणी भगवान शंकराचे ऐतिहासिक मंदिर आहे. त्याचबरोबर, कोकणकडा, सितारामबाबा आश्रम, नागफणी अशी इतर ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. हे ठिकाण पावसाळ्यामध्ये तर अतिशय सुंदर दिसते. शाळेच्या सहली असो, कुटुंबासोबत ट्रीप काढायची असो किंवा बायकोसोबत फिरायला जायचं असो हे ठिकाण सर्वांसाठी बेस्ट पर्याय ठरते.

इगतपुरी – महाराष्ट्रात राहून स्वर्ग पहायचा असेल तर इगतपुरीला अवश्य भेट द्यावी. याठिकाणी केल्यानंतर तुम्हाला निसर्ग सौंदर्याचे अद्भूत रूप पाहायला मिळेल. पावसाळ्यामध्ये तर इगतपुरीचे सौंदर्य आणखीन खुलते. इगतपुरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, गिरीसागर फॉल्स, कॅमल व्हॅली, थाल घाट, म्यानमार गेट, अशा अनेक ठिकाणी फिरता येतील.

चिखलदरा – विदर्भ भागातील एकमेव थंडगार हवेचे ठिकाण म्हणजेच चिखलदरा. पावसाळ्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक चिखलदऱ्याला भेट देण्यासाठी जात असतात. आजच्या घडीला चिखलदरा हे सुंदर पर्यटक स्थळांमध्ये गणले जाते. (Monsoon Picnic Spot) तुम्हाला जर शहराच्या गोंधळापासून सुटका करायची असेल आणि एखाद्या निवांत ठिकाणी भेट द्यायची असेल तर चिखलदरा हा चांगला पर्याय आहे. येथे गेल्यानंतर तुम्हाला निसर्ग सौंदर्याचे अद्भुत रूप पाहायला मिळेल.

Khatron Ke Khiladi 14 : ‘खतरों के खिलाडी 14’च्या स्पर्धकांची नावं जाहीर; ‘या’ लोकप्रिय कलाकारांसोबत रंगणार धाडसी खेळ

Khatron Ke Khiladi 14

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Khatron Ke Khiladi 14) कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी’ हा अत्यंत लोकप्रिय टीव्ही शो आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी कलाकार मंडळी सहभागी होतात आणि वेगवेगळे धाडसी स्टंट करताना दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या शोचे वेगळे क्रेझ आहे. या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय ऍक्शन डिरेक्टर रोहित शेट्टी करतो. दरम्यान, ‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमाच्या १४व्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. जो लवकरच येऊ घातला आहे. इतकेच नव्हे तर यावेळी कोणते कलाकार यामध्ये सहभागी होणार? याबाबत देखील उत्सुकता आहे. त्या नावांची संभाव्य यादी अलीकडेच समोर आली आहे.

‘खतरों के खिलाडी’चं १४वं पर्व लवकरच सुरू होणार (Khatron Ke Khiladi 14)

धाडसी स्टंटवर आधारित असलेला कलर्स टीव्हीवर प्रसारित होणारा ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाचे १४ वे पर्व लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. यासाठी निर्मात्यांची पूर्ण तयारी झाली असून प्रेक्षक आता या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात झळकणाऱ्या स्पर्धकांची संभाव्य यादी देखील जाहीर झाली आहेत. यामध्ये एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे देखील नाव आहे. चला तर जाणून घेऊया यंदा ‘खतरों के खिलाडी १४’मध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार आहेत.

KKK १४ मध्ये झळकणार ‘हे’ कलाकार

अलीकडेच ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या संभाव्य नावांची यादी समोर आली आहे. यानुसार, हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आणि ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वात झळकलेली अभिनेत्री निमृत कौर आहलूविया, प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ या लोकप्रिय कार्यक्रमात झळकणार असल्याचे समजत आहे आहे. (Khatron Ke Khiladi 14) याशिवाय ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात झळकणाऱ्या कलाकारांच्या यादीत ‘कपिल शर्मा शो’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती, शिवाय अभिनेत्री नियति फतनानी, करण वीर मेहरा, अदिती शर्मा हे हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरेसुद्धा झळकणार असल्याचे समोर आले आहे.

‘बिग बॉस’मधून प्रकाश झोतात आलेला बिग बॉस १७ फेम अभिनेता अभिषेक कुमार, अभिनेता समर्थ जुरैल, बिग बॉस १६ फेम शालिन भनोट आणि ‘बिग बॉस १३ फेम आसिम रियाज देखील ‘खतरों के खिलाडीमध्ये यंदा झळकणार आहेत. (Khatron Ke Khiladi 14) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहित शेट्टीच्या या लोकप्रिय कार्यक्रमात एक मराठी चेहरा सुद्धा झळकणार आहे. तो म्हणजे अभिनेता गश्मीर महाजनी. यासंदर्भात त्याने स्वतः खुलासा केला असून या प्रवासासाठी तो उत्सुक आहे.

पोस्ट ऑफिसची बेस्ट योजना!! दररोज 300 रूपये गुंतवल्यास मिळेल बक्कळ परतावा

Post Office Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांपैकी एक योजना आहे ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme). ही योजना खास 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी चालवली जाते. या योजनेत दररोज 300 रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीवर 7.4 टक्के परतावा दिला जातो. म्हणजेच गुंतवणूकदाराला 7.39 लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. त्यामुळे ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते. ही योजना आर्थिक दृष्ट्या सुरक्षित आहे मानले जाते कारण की योजनेत गुंतवलेल्या पैशांचे हमी केंद्र सरकार घेते. त्यामुळे या योजनेत कोणत्याही प्रकारची जोखीम येत नाही.

परंतु पोस्ट ऑफिसच्या या योजनेसाठी फक्त 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे व्यक्ती खाते उघडू शकतात. तसेच, 55 वर्षांवरील नागरिक कर्मचारी सेवानिवृत्ती निधीचा लाभ घेण्यासाठी एका महिन्याच्या आत ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते उघडू शकतात. परंतु यातील कर्मचाऱ्यांचे वय 50 वर्षे आहे. सरकारच्या या योजनेचे व्याजदर 7.4 टक्के आहे. या योजनेंतर्गत मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. ज्यात वाढ ही होऊ शकते.

मॅच्युरिटी रक्कम होईल 7 लाख रूपये

महत्वाचे म्हणजे, या योजनेअंतर्गत (Senior Citizens Savings Scheme) जर कोणत्याही गुंतवणूकदाराने दररोज 300 रुपयांची गुंतवणूक केली तर त्या व्यक्तीची एका वर्षात 1 लाख 8 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. ही गुंतवणूक 5 वर्षांसाठी 5 लाख 40 हजार रुपये असेल. या गुंतवणुकीवर 7.4 टक्के व्याजाने एकूण मॅच्युरिटी रक्कम 7 लाख 39 हजार 800 रुपये इतकी होईल. यामध्ये गुंतवणूकदाराला 1 लाख 99 हजार 800 रुपयांच्या गुंतवणुकीच्या दराचा लाभ मिळेल.

Tur Crop Cultivation | तुरीच्या ‘या’ सुधारित वाणांची करा लागवड, होईल भरघोस कमाई

Tur Crop Cultivation

Tur Crop Cultivation | खरीप हंगाम सुरू आहे. शेतकरी खरीप हंगामात वेगवेगळ्या पिकांची लागवड करतात. या हंगामात खास करून सोयाबीन आणि कपाशी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या काही वर्षापासून कपाशी या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका देखील बसला आहे. तसेच सोयाबीन पिकावर देखील किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे दोन्ही पिकांना बाजारभाव देखील कमी होत आहे. परंतु आता या खरीप हंगामात तुम्ही तूर या पिकाची लागवड केली, तर शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा मिळू शकतो. या पिकाला पैशाचे पीक म्हणून देखील ओळखले जाते.

तुम्ही जर योग्य व्यवस्थापन केले, तर तुरीपासून (Tur Crop Cultivation) कमी खर्चात तुम्हाला खूप चांगले उत्पादन मिळवता येईल. या पिकाला बाजारभाव देखील चांगला मिळतो. आज काल अनेक शेतकरी तूर या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळलेले आहे. तुम्ही देखील तुरीची लागवड करणार असाल, तर तुरीच्या काही वाणांबद्दल माहिती करून घेणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला योग्य निवड करता येईल आणि तुम्हाला उत्पादन देखील चांगले मिळेल.

भरघोस उत्पादन देणारे तुरीचे वाण | Tur Crop Cultivation

बीडीएन 711

तुरीचे हे वाण कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांनी विकसित केलेले आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील कोरडवाहू शेतीसाठी हे वाण अत्यंत उपयुक्त आहे. लागवड केल्यानंतर 150 ते 160 दिवसानंतर हे पीक काढणीस येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कमीत कमी पाण्यात हे पीक वाढते.

गोदावरी बीडिएन 2013 – 41 | Tur Crop Cultivation

ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी गोदावरी या तुरीच्या वाणाची लागवड केली, तर त्यांना खूप फायद्याची होईल. गोदावरी हे वाण उशिरा काढणीस तयार होते. या पिकाची परिपक्वता 170 दिवसांनी होते. तसेच या वाणापासून तुम्हाला भरघोस उत्पन्न देखील मिळते. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे आणि सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांना या वाणाची लागवड करता येईल. या वाणांच्या तुरीचे दाणे हे पांढऱ्या रंगाचे असतात. त्याचप्रमाणे विदर्भ विभागासाठी बदनापूर कृषी संशोधन केंद्राने हे विकसित केलेले आहे.

RBMCACS Bharti 2024 | पुण्यातील ‘या’ महाविद्यालयात प्राचार्य पदासाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

RBMCACS Bharti 2024

RBMCACS Bharti 2024 | पुणे येथे एक नोकरीची मोठी संधी आहे. ती म्हणजे आता आर. बी. मुंदडा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पुणे अंतर्गत भरती निघालेली आहे. यासाठी आता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. तुम्हाला देखील या भरतीसाठी अर्ज करायचे असेल, तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. ही भरती प्राचार्य या पदासाठी आहे. आता या भरतीसाठी पदांनुसार अर्ज मागविण्यात आलेली आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 30 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच लवकरात लवकर अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता | RBMCACS Bharti 2024

प्राचार्य या पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यास तुम्हाला पुण्यात नोकरी करावी लागेल

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

आर. बी. मुंदडा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सर्वेक्षण क्रमांक 54 नेरे दालतवची तालुका मुळशी, जिल्हा पुणे, पिन कोड 41033

अशा पद्धतीने अर्ज करा | RBMCACS Bharti 2024

  • हा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज तुम्हाला वरील पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे.
  • 30 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तरपणे वाचावी.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Mahavitaran Bharti: महावितरणात तब्बल 800 रिक्त पदे भरली जाणार; येथे करा अर्ज

mahavitaran job

Mahavitaran Bharti| तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण अंतर्गत विविध पदांच्या भरती केल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 800 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2024 आहे. हे अर्ज दिलेल्या तारखेच्या ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहेत. त्यामुळे हा अर्ज कसा करायचा?? वयोमर्यादा काय आहे?? पात्रता काय हवी?? याविषयी जाणून घ्या.

ज्युनिअर असिस्टंट

महावितरणअंतर्गत जुनियर असिस्टंटची 468 पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवाराने बीकॉम/बीएमएस/ बीबीए केलेले असावे. यासह अर्ज करणाऱ्या उमेदवाराला एमएससीआयटी किंवा समकक्ष ज्ञान असायला हवे. निवड झालेल्या उमेदवाराला प्रथम वर्ष 19,000 हजार पगार दिला जाईल. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 20 हजार आणि तिसऱ्या वर्षी 21 हजार पगार मिळेल. त्यामुळे वेळ न दवडता इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदासाठी अर्ज करावा.

ग्रॅज्युएट असिस्टंट

महावितरणाअंतर्गत (Mahavitaran Bharti) 51 रिक्त पदे ग्रॅज्युएट असिस्टंटची भरली जाणार आहेत. या पदाकरिता इच्छुक उमेदवाराने इलेक्ट्रीकल किंवा सिविल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असायला हवा. निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला अठरा हजार रुपये पगार दिला जाईल.

ग्रॅज्युएट इंजिनीअर

महावितरणअंतर्गत (Mahavitaran Bharti) ग्रॅज्युएट इंजिनिअरची 281 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेमधून इलेक्ट्रीकल किंवा सिविल इंजिनीअरिंगची पदवी. घेतली असावी. या रिक्त पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला 22 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

लक्षात ठेवा की, या सर्व रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे. या पदांविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर www.mahadiscom.in या वेबसाईटला भेट द्यावी. महत्वाचे म्हणजे दिलेल्या तारखेच्या पुढे अर्ज केल्यानंतर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.