Friday, December 19, 2025
Home Blog Page 753

Street Video : आमी जे तोमार!! भररस्त्यात नाचत होती मंजुलिका; तरुणीचा खतरनाक अवतार पाहून टरकले लोक

Street Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Street Video) सोशल मीडिया हा प्रसिद्ध होण्यासाठी एक परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे आजकाल लोक सोशल मीडियाचा वापर करून काहीही करताना दिसतात. फक्त प्रसिद्ध व्हायचंय म्हणून लोक जीवघेणे स्टंट करताना सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. काही कधी ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करतात तर कधी चित्रविचित्र चाळे करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्हाला भुलभुलैय्या चित्रपटही मंजोलीका आठवल्याशिवाय राहणार नाही.

पहा व्हिडीओ (Street Video)

सोशल मीडियाहीवर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक तरुणी भररस्त्यात हिरव्या रंगाच्या साडीत नाचताना दिसतेय. तिचा अवतार पाहून कुणीही घाबरून जाईल. विस्कटलेले केस, केसात गजरा, पसरलेलं काजळ आणि कपाळावरील कुंकू.. असा एकंदर अवतार पाहून तुम्हाला या तरुणीने हुबेहूब ‘भुलभुलैय्या’ चित्रपटातील मंजुलिकाचा अवतार केल्याचे लगेच लक्षात येईल. इतकंच काय तर ही तरुणी भर रस्त्यात याच चित्रपटातील मंजुलीकावर चित्रित केलेल्या ‘आमी जे तोमार’ गाण्यावर थिरकताना दिसते आहे.



हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर preetithapasoss नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत खाली कॅप्शनमध्ये ‘मंजुलिका गुवाहाटीमध्ये दिसली’, असं लिहिण्यात आलं आहे. (Street Video)आतापर्यंत हा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी पाहिला असून या व्हिडिओवर अनेक लोकांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या दिसत आहेत. तीन हजारांहून जास्त व्ह्यूज मिळवून हा व्हिडीओ सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आलेला दिसतोय.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या व्हिडिओवर बऱ्याच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय की, ‘कॅमेरामन नसता तर लोक हिला पाहून पळून गेले असते’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘कुठून येतो एव्हढा कॉन्फिडन्स’. तसेच अन्य एकाने म्हटले आहे की, ‘अरे मंजुलिका रात्री बाहेर पडायची… तू सकाळी बाहेर कशी आलीस?’ (Street Video) अन्य एकाने लिहिले, ‘प्रसिद्धीसाठी लोक काहीही करू शकतात… हे आणखी एक उदाहरण’. तसेच अन्य एकाने म्हटले, ‘ही बघा सेकंड हॅन्ड मंजुलिका.

Army Canteen : आर्मी कॅन्टीनमध्ये स्वस्त वस्तू खरेदीचा लाभ कोणाला मिळतो? जाणून घ्या नियम

Army Canteen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Army Canteen) तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की, आर्मी कॅन्टीनमध्ये वस्तू स्वस्त मिळतात. कदाचित कधी कुणासोबत खरेदी देखील केली असेल. तर तुमच्या लक्षात आलं असेल की, बाहेरील बाजार किंमतीपेक्षा अमूक एक गोष्ट आर्मी कॅन्टीनमध्ये स्वस्तात विकली जातेय. अगदी खाण्यापिण्याच्या सामानापासून ते घरात लागणाऱ्या इतर वस्तूंपर्यंत बरंच सामान, उत्पादनं या ठिकाणी स्वस्त मिळतात. आर्मी कॅन्टीनमधून मिळणारी ही सुविधा केवळ लष्करातील जवान, सुरक्षा दलातील विविध हुद्द्यांवर असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असते. पण प्रश्न असा आहे की, आर्मी कॅन्टीनमध्ये बाहेरील किंमतीपेक्षा कमी आणि सवलतीच्या दरात वस्तूंची विक्री का होते? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय? तर चला उत्तर जाणून घेऊया.

कोणाला मिळतो लाभ? (Army Canteen)

आर्मी कॅन्टीन स्टोर्स डिपार्टमेंटचा लष्कराच्या सेवेत असणाऱ्या आणि निवृत्त अधिकारी तसेच जवानांसह विविध हुद्द्यांवरील अधिकाऱ्यांना लाभ घेता येतो. एकूणच भारतीय लष्करातील जवान आणि त्या संबंधित अधिकारी वर्गासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे इथे मिळणाऱ्या घसघशीत सवलतीचा लाभ केवळ त्यांनाच घेता येतो. आज जवळपास १३.५ मिलियन म्हणजेच १ कोटी ३० लाखांहून अधिक जवान या सवलतीचा फायदा घेत आहेत.

इथे सामान्य नागरिकांना खरेदी करता येत नाही. (Army Canteen) कारण ही सुविधा केवळ लष्करी सेवेत असणाऱ्यांपुरता सीमीत आहे. आर्मी कॅन्टीनच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी लष्कराच्या जवानांना स्मार्ट कार्ड जारी केलं जातं. ज्याचा वापर करून त्यांना येथे खरेदी करता येते. या कार्डचे २ प्रकार असतात. एक ग्रॉसरी आणि दुसरं लिकर.

ग्रॉसरी कार्ड आणि लिकर कार्डमधील फरक काय?

(Army Canteen) लष्कराच्या जवानांना आर्मी कॅन्टीनच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी देण्यात आलेल्या ग्रॉसरी कार्डच्या माध्यमातून किराणा, विद्युत उपकरणं अशा वस्तूंची खरेदी करता येते. तर, लिकर कार्डवर मद्य खरेदी करता येते.

आर्मी कॅन्टीनमध्ये स्वस्त दरात सामान विक्री का होते?

एका वृत्तानुसार, आर्मी कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या उत्पादनांवर सरकारकडून जीएसटीमध्ये ५०% सवलत दिली जाते. त्यामुळे इथे मिळणाऱ्या वस्तूंची विक्री कमी दरात करणे शक्य होते. (Army Canteen) पण एक लक्षात घ्या, इथे उत्पादनं कमी दरात मिळत असले तरी त्यांच्या खरेदीवर मात्र मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे इथे कुणीही मर्यादेहून जास्त सामानाची खरेदी करू शकत नाही.

Viral Video : पाणीपुरी आवडते? मग ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हाला अजिबात कंट्रोल होणार नाही; लगेच खावीशी वाटेल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे पाणी पुरी. मस्त आंबट गोड तिखट पाण्यासह लुसलुशीत बटाटा आणि त्यासोबत कुरकुरीत पुरी.. अहाहा!! नुसतं कल्पना करूनच तोंडाला पाणी सुटलं ना? हा असा पदार्थ आहे जो क्वचितच कुणाला आवडत नसेल. सुट्टीच्या दिवशी कमाल पाणीपुरीचा बेत आखून घरच्या घरी कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणींसोबत एन्जॉय करायला कुणाला आवडणार नाही? तुम्ही करता का नाही असा काही बेत? करत नसाल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अशी एक पार्टी नक्की द्याल.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो एका घरातील व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण मुले मुली अगदी मांडी घालून शेजारी शेजारी पंगत करून बसले आहेत. इतकच नाही तर प्रत्येकासमोर पुरी, बटाट्याचे मिश्रण आणि पाणीपुरीचे पाणी देखील दिसत आहे. प्रत्येक जण पाणी पुरी खाण्यात प्रचंड मग्न आहे. शिवाय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मनसोक्तपणे पाणीपुरी खाण्याचा आनंद दिसतो आहे. व्हिडीओ पाहून हे तरुण एकतर मित्र असावेत किंवा भावंड असावीत असा अंदाज लावला जातोय. पण काही म्हणा, व्हिडीओ पाहून एक अशी पंगत आपल्याही घरात लागावी असे वाटत असेल, तर त्यात काही चूक नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओवर लिहिले आहे की, ‘माझ्या टाइपनुसार फॅन्सी रेस्टॉरंट’, हा व्हिडीओ बऱ्याच खवय्यांनी आणि पाणीपुरी लव्हर्सने पसंत केला आहे. (Viral Video) सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ritu_kishan_sangani या नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘घरी बनवलेली पाणी पुरी. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एकाने मजेत म्हटलंय, ‘अरे … मी नजर लावली आता तुमच्या सगळ्यांच्या पोटात दुखणार’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘भाऊ.. आता ठेला लावायला तुम्ही सगळे तय्यार आहात’. तसेच अन्य एकाने लिहिले आहे की, ‘हे तर पाणी पुरी खाण्याच्या स्पर्धेसारखं वाटत आहे.. एकदम भारी’. आणखी एका नेटकाऱ्याने लिहिलंय, ‘अशी पार्टी करायला मला पण आवडेल… कशी इथे मीपण असते’. (Viral Video)

Health Care Tips : सतत चहा- कॉफी पिणाऱ्यांनो सावधान!! होईल आरोग्याचे गंभीर नुकसान; जाणून घ्या दुष्परिणाम

Health Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Care Tips) संपूर्ण जगभरात तमाम चहा आणि कॉफी लव्हर्स सापडतील. ज्यांची सकाळ हे पेय प्यायल्याशिवाय होत नाही. बरेच लोक सकाळी कडकडीत चहा आणि पेपरसोबत गुड मॉर्निंग म्हणतात. तर बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पिऊन गुड नाईट. एकंदरच काय तर बऱ्याच लोकांना ही पेय नुसती आवडत नाहीत तर या पेयांचे व्यसन आहे. तुम्हालाही चहा किंवा कॉफीच्या घोटाशिवाय दिवस अपूर्ण वाटतो? तर ही बातमी तुमच्यासारख्या सगळ्या टी- कॉफी प्रेमींसाठी आहे.

बऱ्याच लोकांना जेवणाआधी किंवा जेवणानंतरसुद्धा ही पेय पिण्याची सवय असते. या पेयांची तलफ इतकी तीव्र असते की, काही केल्या घशाखाली घोट गेला नाही तर अनेकदा चिडचिड होते. (Health Care Tips) दरम्यान जर तुम्हालाही जेवणाआधी किंवा जेवल्यानंतर चहा वा कॉफी पिण्याची सवय असेल तर सावधान!! तुम्ही तुमच्या आरोग्याचे प्रचंड नुकसान करत आहात. या संदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या काही तज्ञांनी एक संशोधन केले होते. ज्यातून काही महत्वाचे निष्कर्ष काढून सादर करण्यात आले आहे.

चहा आणि कॉफी पिण्यासंदर्भात तज्ञांचा सल्ला (Health Care Tips)

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मार्फत नुकतीच भारतीयांसाठी एकूण १७ आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये, निरोगी जीवनासाठी संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. एकूणच मार्गदर्शक तत्वांपैकी एका संशोधनात उत्तेजक पेयासंदर्भात काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये चहा आणि कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करण्याचा सल्ला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) च्या संशोधन शाखेतील तज्ञांनी दिला आहे.

ICMR चे तज्ञ काय म्हणाले?

ICMR च्या तज्ञांनी म्हटले की, चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असते. जे आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करते आणि शारीरिक अवलंबित्व वाढवते’. त्यामुळे ही पेये पूर्ण बंद करू नये. (Health Care Tips) पण ती पिण्याच्या काही सवयींमध्ये बदल करावा. खास करून जेवण करण्यापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर लागलीच चहा किंवा कॉफी पिऊ नये.

दिवसभरात किती चहा आणि कॉफी प्यावी?

तज्ञ सांगतात की, एक १५० ml कप कॉफीमध्ये ८० ते १२० mg इतके कॅफिन असते. तर इन्स्टंट कॉफीमध्ये ५० ते ६५ mg कॅफीन असते. तसेच इन्स्टंट चहामध्ये ढोबळमाणे ३० ते ६५ mg कॅफिन असते. मात्र, एका दिवसात शरीराला मर्यादेपेक्षा जास्त (३०० mg) कॅफिनचे सेवन करता येत नाही. यामुळे बऱ्याच आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात.

काय दुष्परिणाम होतात?

1. अधिक मात्रेत कॅफीनचे सेवन केल्याने मानवी शरीराला लोह शोषण्याच्या कामात अडथळा येतो. (Health Care Tips) कारण चहा किंवा कॉफी या उत्तेजक पेयांमध्ये टॅनिन नावाचे संयुग असते. ज्याची मात्रा वाढल्याने मानवी शरीराच्या कामात व्यत्यय येते.

2. टॅनिन हे शरीराच्या अन्नातून लोह शोषणाच्या क्रियेत अडथळा आणते. यामुळे खाल्लेल्या अन्नातून रक्तप्रवाहात प्रवेश करणाऱ्या लोहाचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे शरीरात लोहाची कमतरता होते आणि कमी हिमोग्लोबिनची समस्या होऊ शकते.

3. कॅफीनयुक्त पेयांचे अधिक सेवन करणे पेशींच्या कार्यासाठी हानिकारक ठरते. लोहाची पातळी कमी झाल्यामुळे ‘ॲनिमिया’चा धोका वाढतो. ज्यामुळे सतत थकल्यासारखे वाटते आणि अशक्तपणा येतो. (Health Care Tips)

4. अधिक कॅफ़िनमुळे शरीरात जाणारे टॅनिन केवळ लोहाची कमतरता निर्माण करत नाही तर शारीरिक ऊर्जा देखील कमी करतात. यामुळे धाप लागणे, वारंवार डोकेदुखी, अशक्तपणा, हृदयाचे जलद ठोके, त्वचा पांढरी फिकट पडणे, नखे ठीसूळ होणे किंवा केस गळणे अशा समस्या होतात.

Petha Sweet Benefits : उन्हाळ्यात ‘ही’ मिठाई खाल्ल्याने वाटेल गार गार; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Petha Sweet Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Petha Sweet Benefits) उन्हाळ्यात आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घावी लागते. कारण या दिवसात तापमान सर्वाधिक असल्याने आरोग्यविषयक बऱ्याच समस्या होण्याची शक्यता असते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला आपल्या आहारात कोणते पदार्थ घ्यावे आणि कोणते पदार्थ घेऊ नये याविषयी माहिती असणे गरजेचे असते. बऱ्याच लोकांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते. मग ते गोड पान असो, आईस्क्रीम असो किंवा एखादा पदार्थ. तुम्हालाही गोड खाण्याची आवड असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही पोटाला थंडावा देणारा रसरशीत पेठा खाऊ शकता. याचे बरेच फायदे आहेत.

पेठा ही आग्र्याची प्रसिद्ध मिठाई आहे. जी आजकाल कुठेही सहज उपलब्ध होते. मुख्य म्हणजे ही मिठाई साठवल्याने लवकर खराब होत नाही. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवून खाण्याची गरज पडत नाही. (Petha Sweet Benefits) बर्फासारखा दिसणारा पेठा हा पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने चांगला मानला जातो. मात्र त्याच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी फार कमी लोकांना माहित असल्याचे खूप कमी लोक याचे सेवन करतात. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट राहण्यासाठी मदत करणाऱ्या पेठ्याचे आरोग्यदायी फायदे आज आपण जाणून घेऊया.

1. शरीर डिटॉक्सीफाय होते

पेठामध्ये अनेक असे घटक असतात जे आपल्या शरीरात साचलेली घाण बाहेर काढून टाकण्याचे काम करते. यामुळे किडनीमध्ये द्रव पदार्थाचा स्राव वाढण्यास मदत होते. एकंदरच काय तर पेठा शरीराला डिटॉक्सिफाय करतो आणि शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

2. पोटाला उष्णतेपासून आराम मिळतो (Petha Sweet Benefits)

गरमीच्या दिवसात पोटाला थंडावा देण्यासाठी पेठा खाणे कधीही फायदेशीर आहे. ही एक अशी भाजी आहे ज्याच्यापासून मिठाई बनते. अत्यंत रसाळ आणि कोरड्या अशा दोन्ही प्रकारच्या पेठांमुळे उन्हाळ्याच्या दिवसात पोटाला उष्णतेचा त्रास होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात हा पदार्थ खाणे फायदेशीर आहे.

3. पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरते

पेठा या मिठाईत फायबरचे प्रमाण चांगले असते. (Petha Sweet Benefits) त्यामुळे पोटाच्या कोणत्याही समस्येवर ही मिठाई परिणामकारक ठरते. पेठ्यातील या गुणधर्मामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, अपचन, पेटके आणि सूज अशा समस्या दूर होतात. हा पदार्थ आपल्या आतड्याचे आरोग्यदेखील सुधारतो आणि पचनसंस्थेला चांगली चालना देतो.

4. फुफ्फुसांचे आरोग्य राखले जाते

पेठा या पदार्थात अनेक गुणकारी घटक असतात जे श्वसन मार्गात जमा झालेला कफ वा श्लेष्मा सहजपणे बाहेर पडतो. पेठा खाल्ल्याने श्वसनमार्ग स्वच्छ आणि मोकळा होतो. ज्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य राखले जाते आणि श्वसनमार्गातील अडथळे दूर होऊन ऍलर्जीची शक्यता देखील कमी होते.

5. लठ्ठपणा नियंत्रित करण्यास मदत होते

पेठा या मिठाईत अत्यंत कमी कॅलरी असतात. (Petha Sweet Benefits) मात्र, यामध्ये भरपूर पोषक आणि फायबर तत्व असल्याने हा पदार्थ खाल्ल्यास बराच काळ पोट भरल्यासारखे राहते. पेठाची भाजी किंवा ज्यूस नियमित प्यायल्यास वजन कमी होण्यासही मदत होते. मात्र, जास्त गोड पेठा खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो.

IRCTC Tour Package: लेह-लडाखचं सौंदर्य अनुभवा किफायतशीर दरात; जाणून घ्या डिटेल्स

IRCTC Tour Package

IRCTC Tour Package| पृथ्वीवरच राहून स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा लोकांनी आयुष्यात एकदा तरी लेह – लडाखला भेट द्यावी, असे आपण अनेक वेळा ऐकले असेल. परंतु प्रत्येकच व्यक्तीला नियोजन पूर्व पद्धतीने लडाखला जाता येत नाही. त्यामुळे, IRCTC ने लेह-लडाख फिरू इच्छिणाऱ्या लोकांसाठी सर्वात खास टूर पॅकेज आणले आहे. IRCTC च्या या पॅकेजअंतर्गत लेह-लडाखसह इतर अनेक जवळील ठिकाणांना भेट देता येणार आहे. तसेच यासाठी अधिक पैसेही मोजावे लागणार नाही.

IRCTC Tour Package विषयी माहिती

IRCTC ने आणलेल्या या टूर पॅकेजनुसार, पर्यटकांना लेह-लडाखसह पँगॉन्ग लेक, शाम व्हॅली, नुब्रा आणि तुर्तुक अशा सर्व ठिकाणांना अतिशय कमी किमतीत भेट देता येणार आहे. हे पॅकेज 6 रात्री आणि 7 दिवसांसाठी आहे. IRCTC चे हे टूर पाटणा येथून सुरू होईल. येथून तुम्हाला विमानाने थेट दिल्ली आणि नंतर लेहला नेले जाईल. परतीचा मार्गही तसाच राहणार आहे. खास म्हणजे, लेह ते दिल्ली आणि दिल्ली ते पटना हे 6 रात्री आणि 7 दिवसांचे पॅकेज IRCTC 28 जून ते
4 जुलैदरम्यान असेल.

खर्च किती येईल?? (IRCTC Tour Package)

या पॅकेजअंतर्गत तुम्हाला वाहतूक सेवा, राहणे आणि नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल. हे टूर पॅकेज भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर EPA017 या कोडसह उपलब्ध आहे. या पॅकेजसाठी एका व्यक्तीला 67,600 रूपये भरावे लागते. तसेच, दोन व्यक्तींना 62,650 रुपये प्रति व्यक्ती भरावे लागेल. यासह तीन लोकांना एकत्र राहण्यासाठी पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती 62,100 रूपये आहे. यात स्वतंत्र बेड हवे असल्यास 60,800 रुपये प्रति व्यक्ती भरावे लागतील.

IRCTC ची अधिकृत वेबसाइट

जर तुम्हाला IRCTC या टूर पॅकेजबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर www.irctc.co.in या वेबसाईटवर जावे. याशिवाय ८५९५९३७७३२ आणि ८५९५९३७७२७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Kapaleshwar Temple Nashik : महादेवाच्या ‘या’ एकमेव मंदिरात नंदी नाही; ब्रह्मदेवाशी निगडित आहे रहस्य

Kapaleshwar Temple Nashik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kapaleshwar Temple Nashik) आपल्या महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. ज्यांच्या आख्यायिका शतकांपासून सांगितल्या जात आहेत. यातील बरीच मंदिरे अत्यंत अद्भुत आणि अध्यात्माचा अनोखा वारसा लाभलेली आहेत. जिथे कायम भाविक मोठ्या भक्तीने आणि श्रद्धेने येताना दिसतात. देशभरात नाथांचे नाथ भोलेनाथांची अनेक पुरातन मंदिरे आहेत. तुम्ही पाहिले असेल की, जिथे महादेवाचे स्थान आहे तिथे मंदिरासमोर नंदीची प्रतिमा असते. पण आपल्या महाराष्ट्रात एक असे शिवमंदिर आहे, ज्यांच्यासमोर नंदीचा प्रतिमा नाही. चला या मंदिराबद्दल अधिक माहिती घेऊया.

कुठे आहे हे मंदिर? (Kapaleshwar Temple Nashik)

संपूर्ण जगभरात महादेवाची अनेक मंदिरे आहेत. जिथे महादेव तिथे नंदी असा एक नियम आपण पाहिला असेल. मात्र महाराष्ट्रात नाशिकमध्ये पंचवटी परिसरात एक असे अद्भुत शिवमंदिर आहे जिथे नंदीची प्रतिमा उभारलेली दिसत नाही. जगभरातील हे असे एकमेव मंदिर आहे. जिथे महादेवाच्या मंदिरासमोर नंदी दिसत नाही. गोदावरी नदीच्या तिरावर वसलेले हे शिवमंदिर ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ म्हणून सर्वत्र ओळखले जाते. जिथे नित्यनियमाने महादेवाची पूजा होते. मात्र, या मंदिरात नंदीचे दर्शन होत नाही.

काय सांगते आख्यायिका?

‘कपालेश्वर महादेव मंदिर’ या ऐतिहासिक मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. ज्यानुसार, महादेवांना ब्रह्महत्येचे पातक लागले होते. ब्रह्मदेवाच्या चार मुखातून वेड मात्र पाचव्या मुखातून निंदा केली जात होती. (Kapaleshwar Temple Nashik) संतप्त महादेवांनी ब्रह्मदेवाचे पाचवे मुख उडवले आणि त्यांना ब्रह्महत्येचे पातक लागले. महादेवांनी या पातकापासुन स्व:ताची मुक्ती करुन घेण्यासाठी संपूर्ण त्रिभुवन पालथे घातले. मात्र, त्यांना हे पातक दूर कसे करावे ते समजत नव्हते. काही केल्या त्यांना लागलेले ब्रह्महत्येचे पातक दूर होत नव्हते आणि या पातकापासून आपली सुटका कशी होणार? याची त्यांना चिंता वाटू लागली.

अशावेळी आपल्या देवाच्या चिंतेचे निरसन करण्या हेतू नंदीने महादेवांना नाशिकच्या रामकुंडावर आणले. या रामकुंडात गोदावरी आणि अरुणा संगमात महादेवांनी स्नान केले. ज्यामुळे महादेवांना लागलेले ब्रह्महत्येचे पातक दूर झाले आणि ते या दोषातून मुक्त झाले. (Kapaleshwar Temple Nashik) अत्यंत गंभीर परिस्थितीत ब्रह्महत्या दोष पातकाच्या संकटातून नंदीने आपली मुक्तता केल्याने महादेवांनी त्यास आपले गुरू मानले. त्यामुळे कपालेश्वर मंदिरात महादेवांसमोर नंदीची स्थापना केल्याचे दिसत नाही.

बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे मिळते पुण्य

या मंदिरात अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. येथील लोकांच्या मान्यतेनुसार, जो भक्त पूर्ण श्रद्धा, आस्था आणि विश्वासाने या कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेईल त्याला बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळते. (Kapaleshwar Temple Nashik)

Job Requirement: कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Railway Recruitment 2024

Job Requirement| सध्या अनेक तरुण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशा तरुणांसाठी एक नोकरीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता तरुणांना थेट केंद्र शासनाच्या अंतर्गत नोकरी (Job Requirement) करता येणार आहे. कारण की कोकण विभागाने 42 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, डिझाईन असिस्टंट, तांत्रिक सहाय्यक अशी विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे इच्छूक तरुणांनी याबाबत सविस्तर माहिती वाचावी.

कोकण रेल्वे विभागाकडून यापूर्वी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी अनेक तरुणांना रोजगार मिळाला होता. आता पुन्हा एकदा कोकण रेल्वे विभागाने रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत तब्बल 42 रिक्त पदे भरली जाणार आहेत. खास म्हणजे, या भरती प्रक्रियेसाठी येत्या 5 जून 2024 ते 21 जून 2024 दरम्यान थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल.

जे तरूण या पदावर काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. सीवूड्स रेल्वे स्टेशन, नवी मुंबई येथे 5 जून 2024 ते 21 जून 2024 मुलाखतीसाठी हजर राहावे. तसेच मुलाखतीला जाताना आवश्यक कागदपत्रे घेऊन जावीत. या भरतीसाठी आयटीआय पास असलेले तरुणही मुलाखत देऊ शकतात. (Job Requirement) अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार https://konkanrailway.com/ या ठिकाणी देण्यात आलेली अधिसूचना वाचावी.

मोठी बातमी!! मनोज जरांगेंची बीडमध्ये होणारी सभा अचानक रद्द; नेमके कारण काय?

manoj jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची येत्या 8 जून रोजी बीडमध्ये (Beed) जाहीर सभा पार पडणार होती. परंतु आता ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल 911 एक्करांवर होणाऱ्या या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. परंतु आता हीच सभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ही सभा रद्द करण्यामागे नेमके कारण काय?? असा सवाल विचारला जात आहे.

महत्वाचे म्हणजे, सध्या बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे तेथील लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. अशातच बीडमध्ये मनोज जरांगे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु या सभेला येणाऱ्या लोकांची असुविधा होऊ नये. त्यामुळे ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांची ही सभा नारायण गडावर होणार होती. तसेच या सभेला 6 कोटीपेक्षा अधिक मराठा बांधव उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

बीडमध्ये होणाऱ्या या सभेची संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरू होईल. असे असतानाही ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, बीडमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे. याठिकाणी लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये. अशी परिस्थिती असताना बीडमध्ये सभा घेतली असती तर सभेसाठी आलेल्या लोकांना गैरसोयीचा सामना करावा लागला असता. त्यात उन्हाचा पारा वाढल्यामुळे उष्णतेने लोक आहेत. या सर्व बाबींचा विचार करूनच बीडमधील सभा रद्द करण्यात आली आहे.

Ramling Bet : हनुमंताने बाहूंनी महापूर रोखला अन् तयार झाले अध्यात्माचे महत्व लाभलेले ‘हे’ सुंदर बेट

Ramling Bet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ramling Bet) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभला आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीसह अनेक ऐतिहासिक वास्तू, प्राचीन प्रार्थनास्थळे, पुरातन मंदिरे आपल्याला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पहायला मिळतील. यातील बऱ्याच मंदिरांच्या आख्यायिका अगदी चकित करणाऱ्या आहेत. अशाच एका मंदिराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या मंदिराला अद्भुत अध्यात्माचा वारसा लाभला आहे. आपण ज्या ठिकाणाविषयी बोलत आहोत ते स्थळ संपूर्ण महाराष्ट्रात रामलिंग बेट नावाने प्रसिद्ध आहे.

कुठे आहे? (Ramling Bet)

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यामधील बहे गावात कृष्णा नदीकाठी रामलिंग बेट वसले आहे. या नदीच्या मधोमध आजुबाजूला हिरव्यागार परिसरात रामलिंग बेट आहे आणि त्यामुळे येथील सभोवतालचा परिसर अत्यंत नयनरम्य तसाच मनमोहक आहे. या बेटावर असलेल्या श्रीराम मंदिरातून आजूबाजूला वाहणारा नदीचा सुंदर खळखळणारा प्रवाह पाहण्यात विशेष सुख आहे.

मंदिराचे वैशिट्य

या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. ते असे की, हे मंदिर ज्या बेटावर आहे ते बेट हनुमानाने आपल्या हाताने पूर रोखल्याने तयार झाले होते. या मंदिरात प्रभू श्रीरामांसह भ्राता लक्ष्मण आणि माता सीता यांच्याही मूर्तीचे पूजन केले जाते. तसेच मठामागे समर्थ रामदासांनी स्थापन केलेली हनुमंताची देखील मूर्ती आहे. (Ramling Bet) येथील अत्यंत लक्षवेधी बाब म्हणजे नदीच्या मध्याभागी असणारे शिवलिंग. यामागे एक आख्यायिका आहे ती जाणून घेऊया.

काय सांगते आख्ययिका?

रामलिंग बेटामागे एक प्राचीन अख्यायिका सांगितली जाते. ती अशी की, प्रभू श्री रामचंद्र आपल्या १४ वर्षांचा वनवास संपवून लंकेहून परतत असताना या ठिकाणी थांबले होते. तेव्हा माता सीता या शेजारी असणाऱ्या शिरटे गावात वास्तव्यास होत्या. (Ramling Bet) दरम्यान, या ठिकाणी विसावले असताना प्रभू श्री रामचंद्रांनी वाळूचे शिवलिंग स्थापन केले आणि त्याची पूजा केली. ते पूजा करत असताना अचानक कृष्णामाईला पूर आला.

हा पूर इतका भयानक होता की, तो अडवण्यासाठी स्वतः हनुमंत प्रभू श्री रामाच्या मागे उभे राहिले. त्यांनी महापूर येत असल्याचे पाहिले आणि आपल्या बलवान बाहूंनी नदीचे पाणी थोपवून धरले. यामुळे नदीचे दोन वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले आणि आपोआपच या ठिकाणी एक बेट तयार झालं. यामुळे गावाचं नाव ‘बाहे’ आणि बेटाचे नाव रामलिंग (Ramling Bet) असे पडले. पुढे जाऊन ‘बाहे’ गावाचे नाव ‘बहे’ असे झाले.

कसे जाल?

मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरुन इस्लामपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर रामलिंग बेट (Ramling Bet) हे सुंदर ठिकाण आहे. या बेटावर जाण्यासाठी तुम्ही स्वतःच्या गाडीचा वापर करू शकता. मात्र मुख्य रस्त्यावर दुचाकी किंवा चारचाकी पार्क करून पुढे जावे लागते. यानंतर बेटापर्यंत उभारण्यात आलेल्या पुलावरुन चालत जाऊन मंदिरात दर्शन घेता येते आणि त्यासह निसर्गरम्य दृश्यांचा अनुभव घेता येतो.