Thursday, December 18, 2025
Home Blog Page 754

Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर!! फक्त 100 रुपयांत करता येणार मेट्रोने अमर्याद प्रवास

Pune Metro

Pune Metro| पुणेकरांकडून मेट्रोला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाकडून पुणेकरांसाठी नवनवीन सुविधा देण्यात येत आहेत. यातीलच एक भाग म्हणून मेट्रोने पुणेकरांसाठी दैनंदिन पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे दिवसभरात फक्त शंभर रुपयात मेट्रोने प्रवास करता येऊ शकतो. मेट्रोने प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने दिवसभरासाठी एकच शंभर रुपयाचा पास काढला तर तो दोन्ही मार्गांवर अमर्यादित प्रवास करू शकतो.

सध्या पुणे मेट्रोने (Pune Metro) लाखो प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. या प्रवाशांना पिंपरी- चिंचवडमार्गे अर्धा तासांत पुणे स्टेशन, येरवडा, वनाजपर्यंत जाता येते. याच ठिकाणी रस्ते मार्गाने जात असताना दोन तासांचा कालावधी जातो. यामुळेच पुणेकरांकडून मेट्रोला सर्वात जास्त प्राधान्य दिले जात आहे. या कारणामुळे मेट्रोकडून ऑनलाईन आणि ऑफलाइन तिकीट काढण्याची सुविधा दिली जात आहे. आता मेट्रोने प्रशासनाने आणखीन एक पाऊल पुढे टाकत पुणेकरांसाठी पासची सुविधा आणली आहे

मेट्रो प्रशासन आपल्या प्रवाशांना स्मार्ट कार्ड, मासिक पास देत आहे. यातील दैनंदिन पासच्या सुविधामुळे प्रवासी शंभर रुपयांमध्ये मेट्रोने अमर्यात प्रवास करू शकतात. यामुळे प्रवाशांच्या पैशांमध्ये मोठी बचत होत आहे. खास गोष्ट म्हणजे, हे पास मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर वापरता येत आहेत. कोणताही प्रवासी दैनंदिन शंभर रुपयाचा 6 सकाळी ते रात्री 10 वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत वापरू शकतो. त्यानंतर दुसऱ्या दिवसासाठी त्याला वेगळा पास काढावा लागतो.

पासवर कोणतीही सूट नाही (Pune Metro)

मेट्रो प्रशासनाने या पासची किंमत प्रति व्यक्ती 100 रुपये निश्चित केली आहे. एकदा हा पास घेतला की तो परत करता येत नाही. तसेच, सर्व लोकांसाठी या पासची किंमत 100 रुपयेच आहे. हा पास खरेदी केल्यानंतर त्या व्यक्तीला मेट्रोने अमर्याद प्रवास करता येऊ शकतो.

Best Places To Visit In Pune : पुण्यात एक्स्प्लोर करता येतील अशी सर्वोत्तम 10 ठिकाणे; माहित नसतील तर जाणून घ्या

Best Places To Visit In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Places To Visit In Pune) पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्याती असणाऱ्या पुण्यात विविध जिल्ह्यातून, गावातून केवळ शिक्षणासाठी अनेक मुले येत असतात. पुण्याची संस्कृती, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुपे पुणे तिथे काय उणे? असेही म्हटले जाते. अनेक पर्यटक वीकेंडला फिरायला जायचं म्हणून पुण्याची निवड करतात. कारण मुंबईपासून अगदी जवळ असणाऱ्या पुण्यात पाहण्यासारखी अनेक ठिकाण आहेत.

पुणे म्हटलं की, पुणेरी मिसळ, एसपीडीपी आणि मस्तानीची चव अचानक जिभेवर रेंगाळू लागते. यासोबत पुण्यात ऐतिहासिक वास्तू आणि वस्तूंचे केलेले जतन खरोखरच पाहण्यासारखे आहे. (Best Places To Visit In Pune) त्यामुळे एखाद्या दिवशी शॉर्ट पिकनिक म्हणून देखील पुण्याला जाणार असाल तर कुठे फिरायचं हे आधी जाणून घ्या. आज आम्ही तुम्हाला पुण्यातील अशाच काही महत्वाच्या ठिकाणांची माहिती देणार आहोत. जिथे न केवळ तुम्ही तर तुमच्यासोबत लहान मुलांनादेखील फिरायला घेऊन जाता येईल आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे काही दाखले दाखवता येतील.

1. शनिवार वाडा (Best Places To Visit In Pune)

पुणे शहरातील जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू म्हणजे शनिवार वाडा. हा वाडा पेशवेकालीन आहे. त्या काळी मराठा पेशवे येथे वास्तव्यास होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन १७३६ मध्ये हा वाडा बांधला होता. त्याकाळी बांधलेला हा अत्यंत भव्य असा लाकडी राजवाडा होता. कालांतराने इंग्रजांनी अत्यंत कुत्सित भावनेने हा वाडा नष्ट केला. त्यामुळे आता या वाड्याचा केवळ पाया शिल्लक आहे. तरीही हा पाया आणि कमान पाहून ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद घेता येतो. त्याची भव्यता आणि बांधकाम तुम्हाला मोहित करू शकते.

2. लाल महल

पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंमध्ये शहराच्या मध्यस्थानी असलेल्या लाल महलचादेखील समावेश आहे. असे म्हणतात की, या लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. (Best Places To Visit In Pune) पुण्यात याच वास्तूत शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इतकेच नव्हे तर, याच वास्तूत त्यांनी स्वराज्याकडे घाणेरड्या नजरेने पाहणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती. पुढे जाऊन पुणे महानगरपालिकेने या महालाची पुर्नबांधणी केली आणि आज ही वास्तू एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून पहायला पर्यटक येतात.

3. आगा खान पॅलेस

गांधी मेमोरिअल सोसायटीचा ‘आगा खान पॅलेस’ पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. त्याची बनावट ही खास इटालियन पद्धतीची आहे. या पॅलेसच्या उपयोग ब्रिटीश राजवटीत तुरुंग म्हणून केला होता. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या महात्मा गांधी, कस्तूरबा गांधी, महादेव भाई यांना इथेच कारावासात ठेवले होते. या ठिकाणी महादेव भाई आणि कस्तूरबा गांधी यांचे निधन झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या पॅलेसमध्ये त्यांच्या स्मारकाची बांधणी केली आहे.

4. विश्रामबाग वाडा

मराठा पेशवा दुसरा बाजीराव यांचे निवासस्थान विश्रामबाग वाडा देखील पुण्यातील ऐतिहासिक वास्तु आहे. दुसरे बाजीराव यांनी वडिलोपार्जित शनिवारवाड्यात राहण्यापेक्षा विश्रामबागेत राहणे पसंत केले आणि ते इथेच वास्तव्यास होते याचे बरेच दाखले आहेत. (Best Places To Visit In Pune) पुढे जाऊन पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी एक सांस्कृतिक केंद्र सुरू केले आहे. जे खरोखरच पाहण्यासारखे आहे.

5. भाऊसाहेब रंगारी वाडा

स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिकारकांची हक्काची जागा म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी वाडा उभारण्यात आला होता. भाऊसाहेब इथे वास्तव्यास नव्हते. मात्र, ते राजवैद्य असल्याने हा वाडा दवाखाना म्हणून ओळखला जायचा. (Best Places To Visit In Pune) तेव्हा क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकांसाठी हा वाडा कामी येत होता. त्याकाळी येथे गुप्त मार्ग, भुयारी मार्ग होते. शस्त्र लपवायला जागा होती. आश्रय या वाड्याचे महत्व पुढील पिढयांना कळावे म्हणून २०२२ मध्ये जीर्णोद्धार करुन हा वाडा लोकांसाठी खुला करण्यात आला.

6. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

पुण्यातील अत्यंत मोठे श्रद्धास्थान म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. प्लेगच्या साथीने आपला एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर श्री दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी हे मंदिर उभारले होते. (Best Places To Visit In Pune) पुढील काळात लोकमान्य टिळकांनी लोकांना स्वातंत्र्य लढ्यात एकत्र आणण्यासाठी सुरु केलेल्या गणेशोत्सवात या ठिकाणाला आणखीच महत्व प्राप्त झाले. दरवर्षी नव्हे तर दर दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अनेक भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात.

7. पर्वती

पुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली पर्वती टेकडी जगप्रसिद्ध ठिकाण आहे. पर्वताई देवीच्या नावावरुन या टेकडीला पर्वती असे नाव पडले. या टेकडीच्या माथ्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६४० मीटर इतकी आहे. या टेकडीच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी सुमारे १०३ पायर्‍या चढून जावे लागते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात आणि इथून पुढे या टेकडीच्या माथ्यावर देव देवेश्वर मंदिर तसेच अन्य काही देवी देवतांची मंदिरे पहायला मिळतात.

8. ओशो आश्रम

पुण्यातील ओशो आश्रम हे शहरातील कोरेगाव पार्क भागात २८ एकरांवर पसरलेले एक प्रकारचे रिसॉर्टच्या आहे. हे आश्रम १९७४ साली ओशोंनी बांधले होते. (Best Places To Visit In Pune) आसपासचा मनमोहक निसर्ग आणि आधुनिकतेचा मिलाप पहायचा असेल तर एकदा तरी ओशो आश्रमला जरूर भेट द्या. येथे बांबूचे कॉटेजेस दिसून येतील. शिवाय आश्रमातील संगमरवरी मंडप, कृत्रिम पाण्याचे झरे, थंड वारा आणि मोठा जलतरण तलाव येथील मुख्य आकर्षण आहेत. बरेच पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेता यावा म्हणून इथे येत असतात.

9. ओकायामा फ्रेंडशिप गार्डन

पुण्यातील प्रसिद्ध पु.ल.देशपांडे गार्डनचे पूर्वीचे नाव ‘ओकायामा फ्रेंडशिप गार्डन’ असे होते. आजही बरेच लोक या गार्डनला याच नावाने ओळखतात. पुण्यातील सिंहगड रोडवर वसलेल्या या उद्यानाची रचना जपानी पद्धतीची आहे. माहितीनुसार, जपानमधील ओकोयामा शहरातील ३०० वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. असे भारतातील हे एकमेव उद्यान आहे.

10. भिगवण पक्षी अभयारण्य

पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर भिगवण पक्षी अभयारण्य आहे. जिथे जाणे निसर्गप्रेमी, पक्षी प्रेमी आणि पक्षी निरिक्षकांसाठी अत्यंत आनंद निर्माण करणे आहे. (Best Places To Visit In Pune) महाराष्ट्राचे भारतपूर म्हणून ओळखले जाणारे भिगवण हे फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी गुलाबी फ्लेमिंगो पहायला येत असतात.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार!! मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा

Mohit kamboj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) टप्पे पार पडत आहेत. आता या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. त्यानंतर पुढे 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. परंतु हा निकाल लागण्यापूर्वीच भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. नुकतेच कंबोज यांनी एक ट्विट करत राजकीय वर्तुळात आणखीन एक भूकंप होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मोहित कंबोज यांनी आपल्या X वर केलेल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, “लोकसभा निवडणुकीचा 04 जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आणखी एक फूट पडेल. या दोन्ही पक्षातील आमदार, नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देऊन बाहेर पडतील. सध्या हे सर्वजण इतर पक्षांच्या संपर्कात आहेत.” मोहित कंबोज यांनी केलेल्या याचं दाव्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, खरंच ठाकरे गट आणि शरद पवार गटात ही फूट पडेल का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

https://twitter.com/mohitbharatiya_/status/1790935233447256366?t=qSdw7X3gwC8TZinzPFvp2Q&s=19

दरम्यान, 4 जूननंतर भाजप पक्षातही फूट पडेल असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नाशिकमध्ये झालेल्या सभेत बोलताना, “माझी मला चिंता नाही. मला तुमच्या आशीवार्दाचं कवच आहे, तोपर्यंत मला कोणाचीही भीती नाही. मोदीजी तुम्ही तुमच्या भाजपची चिंता करा. कारण 5 तारखेलाचा अर्धा भाजप पक्ष फुटल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळे गद्दार जमवले आहेत, सत्ता आल्यावर सगळी यंत्रणा आमच्या हातात असेल” असे उद्धव ठाकरे यांनी म्हणले आहे.

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करायचे आहे? तर गुळासोबत खावा लसूण; मिळतील आश्चर्यचकीत फायदे

Garlic And Jaggery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण देण्यासमान असते. शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळेच हृदयविकार आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तर बॅड कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाल्यामुळे नसा ब्लॉक होतात. खरे तर, अती तेलकट मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत जाते. मात्र घरगुती पदार्थांचा वापर करूनही या कोलेस्ट्रॉलला कमी करता येते. हे पदार्थ नेमके कोणते आहेत त्याचे फायदे काय? याविषयी वाचा. (Garlic And Jaggery Health Benefits)

आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गूळ आणि लसूण नेहमी असतोच. हा गुळ आणि लसूण एकत्र खाल्ल्यामुळे बॅड कोलेस्ट्रोल कमी होते. आयुर्वेदानुसार, हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी लसूण आणि गुळ खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही गुळ आणि लसणाची चटणी बनवून खाऊ शकता. तसेच, गुळ आणि लसूण एकत्र स्टोअर करून ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा खाऊ शकता. भारतीय स्वयंपाकात प्रत्येक भाजीत लसूण वापरला जातो. फक्त या लसणाला गुळासोबत खायची गरज आहे.

याचे फायदे कोणते पण??

लसूण आणि गुळ खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. तसेच रक्ताची कमतरता दूर होते. लसूण हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतो. या लसणात अॅलिसिन नावाचा गुणधर्म असतो. यासह, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम अशा इतर ही गोष्ट असतात. त्यामुळे लसूण खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरतो. लसणातील अॅलिसिन हे बॅड कोलेस्ट्रॉलच्या ऑक्सिकरणाला रोखण्याचे काम करते. कच्चा लसूण खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात.

सेवन कसे करावे??

लसूण आणि गुळाचे सेवन रोज सकाळी रिकाम्या पोटी करावे. त्यासाठी सर्वात प्रथम लसणाच्या दोन-तीन पाकळ्या तुपात परताव्यात. त्यानंतर लसूण गुळासोबत रिकाम्या पोटी खावा. असे केल्यामुळे शरीरातील चांगले फायदे दिसून येते.

Upcoming Marathi Movie : ग्रीन इंडिया, ग्रीन विश्व!! ‘झाड’ चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र; पहा पोस्टर

Zaad Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upcoming Marathi Movie) वाढती लोकसंख्या आणि प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. पण त्याचसोबत काही मानवी कृत्य देखील निसर्गाला हानी पोहचवण्यास कारणीभूत आहेत. एकीकडे वाढतं तापमान तर दुसरीकडे काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘झाड’ या आगामी मराठी चित्रपटात झाडांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होऊ घातला आहे. त्याच पहिलं पोस्टर आता समोर आलं आहे.

‘झाड’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज (Upcoming Marathi Movie)

‘झाड’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. ज्यामध्ये ओसाड जमिनीवर पूर्ण सुकून गेलेल्या झाडाची तोड केलेले दिसत आहे. हे पोस्टर न बोलता बरंच आहि बोलत आहे. योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या ‘झाड’ या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी केली आहे. सचिन बन्सीधर डोईफोडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे. गणेश मोरे आणि प्रशांत मुरकुटे सहदिग्दर्शक आहेत. सतीश सांडभोर यांनी छायांकन, शरद ठोंबरे, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आदर्श शिंदे आणि जान्हवी अरोरा यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.

कधी होणार प्रदर्शित?

हा चित्रपट येत्या २१ जून २०२४ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. (Upcoming Marathi Movie) या आगामी चित्रपटात डॉ. दिलीप डोईफोडे, प्रकाश धोत्रे, संदीप वायबसे, शिवलिंगआप्पा बेंबळकर, कैलास मुंडे, प्रल्हाद उजागरे, प्रशांत मुरकुटे, संजीवकुमार मेसवाल, जोशना नेहरकर, दुर्वास चौरे, दत्तात्रय मुंडे, देवई डोईफोडे, मच्छिंद्र डोईफोडे, प्रियंका नेहरकर, ओमकार डोईफोडे, करण डोईफोडे, माऊली सानप, काजल डोईफोडे, पंकजा वायबसे, जान्हवी कदम, राजवी डोईफोडे, आर्यन हजारे अशी स्टारकास्ट आहे.

पर्यावरण संवर्धनाचा कानमंत्र देणार

झाड वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष, पर्यावरण संवर्धनाचा या देशाला दिलेला कानमंत्र असं या चित्रपटाचं आशयसूत्र आहे. आजवर चित्रपटांतून सामाजिक विषय हाताळले गेले असले, तरी पर्यावरण संवर्धन, झाडांचं जतन-संगोपन हा विषय चित्रपटातून मांडला गेल्याचं फारसं पाहायला मिळालेलं नाही. (Upcoming Marathi Movie) त्यामुळे आजच्या ज्वलंत आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाची मांडणी ‘झाड’ या चित्रपटातून कशी करण्यात आली आहे, याबाबत नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

आता 41 आजारांवरील औषध मिळणार स्वस्त दरात; भारत सरकारचा मोठा निर्णय

41 Medicines

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे विविध आजारांवर मिळणारी औषधेही महागली आहेत. परिणामी या औषधांच्या वाढत्या किमतीमुळे सर्वच रुग्णांना ही औषधे घेणे परवडत नाहीयेत. त्यामुळेच यावर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारने (Indian Government) मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून विविध आजारांवर 41 औषधे (Medicines) आणि 6 फॉर्म्युलेशनच्या (Formulation) किमती कमी करण्यात आल्या आहेत. यामध्ये, शुगर, हृदय, यकृत, अँटासिड, संसर्ग, ऍलर्जी, मल्टीविटामिन, अशा आजारांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकींमध्येच एकूण 41 औषधांवरील किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, या बैठकीवेळी गॅझेट नोटीफिकेशन जारी करण्यात आली. महत्वाचे म्हणजे, NPPA ही एक सरकारी नियामक संस्था आहे. जी फार्मास्युटिकल औषधांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी काम करते. या संस्थेच्या निर्णयामुळेच औषधांच्या किमतीत घट झाली आहे.

रुग्णांना मोठा दिलासा

आपल्या देशामध्ये विविध आजारांवरील रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. हे रूग्ण कोणत्या ना कोणत्या आजारांमुळे त्रस्त आहेत. या रुग्णांच्या औषधोपचारांसाठी कुटुंबाकडून बक्कळ पैसा खर्च करण्यात येतो. अनेकवेळा तर काहीजण ही औषधे घेण्यासाठी आणि रुग्णाला योग्य उपचार सुविधा मिळावी यासाठी आयुष्यभरासाठी कमावलेला पैसा खर्च करतात. या सर्व बाबी विचारात घेऊनच NPPA ने औषधांवरील किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, भारतामध्ये दहा कोटीपेक्षा अधिक रुग्ण मधुमेहाचे आहेत. यातील अनेक रुग्ण हे दररोजच्या औषधांवर आणि इन्सुलिनवर अवलंबून आहेत. आता सरकारने या औषधांमध्ये घट केल्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांना ही याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

Shaktimaan Movie : स्वतःमध्ये स्वतःचा शोध घेणाऱ्या सुपरहीरोची गोष्ट; सामान्यांतील असामान्य ‘शक्तिमान’ येतोय भेटीला

Shaktimaan Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shaktimaan Movie) मराठी कलाविश्वात कायम वेगवेगळे प्रयोग केले जातात. त्यामुळे गेल्या काही काळात मराठी सिनेइंडस्ट्रीचा प्रेक्षक मोठ्या संख्येने वाढला आहे. दर्जेदार कलाकृतींच्या जोरावर प्रेक्षकांचे कायम मनोरंजन करणे हा एकच ध्यास अनेक निर्माते आणि दिग्दर्शक उराशी बाळगून कार्यरत आहेत. दरम्यान अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी अभिनित ‘शक्तिमान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातून स्वतःमध्ये स्वतःचा शोध घेणाऱ्या सुपरहीरोची गोष्ट पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

शक्तिमान’चा ट्रेलर (Shaktimaan Movie)

मोशनस्केप एंटरटेनमेंट निर्मित आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘शक्तिमान’ या नव्या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आदिनाथने सिद्धार्थ ही भूमिका साकारली असून स्पृहा त्याच्या बायकोच्या भूमिकेत झळकते आहे. एका सामान्य व्यक्तीची असामान्य गोष्ट या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार आहे.

ट्रेलरमध्ये कुटुंबाचा विरोध पत्करून सगळ्यांच्या मदतीला धावणारा सिद्धार्थ आपल्याला भेटणार आहे. शिवाय हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एका लहान मुलीचं हार्ट ट्रान्सप्लांट करण्यासाठी त्याची सुरु असलेली धडपड या चित्रपटाला भावनिक जोड देते.

आदिनाथची पोस्ट

अभिनेता आदिनाथ कोठारेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा ट्रेलर शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘ ”शक्तिमान”- आपल्या सगळ्यांच्यात दडलेला असतो एक सुपरहिरो. (Shaktimaan Movie) त्याला योग्यवेळी स्वतःमध्ये शोधावं लागतं. अगदी आपल्या बाबांसारखं! सामान्यांतील असामान्यत्व दाखवणारी…आपल्या आजूबाजूला घडू शकणारी गोष्ट…आपल्या घरातली गोष्ट ‘शक्तिमान’ २४ मे पासून सिनेमागृहात…’.

कधी होणार रिलीज?

‘शक्तिमान’ या आगामी चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या व्यतिरिक्त अभिनेता प्रियदर्शन जाधव, ईशान कुंटे, विक्रम गायकवाड हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट येत्या २४ मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Shaktimaan Movie) ‘शक्तिमान’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल होतो आहे.

Weather updates: राज्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येणार; तर या भागात कोसळणार पाऊस

Weather updates

Weather updates| गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परंतु आता पुढच्या 2 दिवस राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये तुरळक पाऊस बरसेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना या भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे.

सध्याच्या घडीला पाहिला गेलो तर, मुंबईत नव्हे तर महाराष्ट्राच्या इतर भागातही गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे तर मुंबईची दशा फारच विकट झाली आहे. मंगळवारी मुंबईमध्ये 2 मोठे बॅनर कोसळल्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या सर्व लोकांसाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. अशा स्थितीत हवामान खात्याने पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील, अशी माहिती दिली आहे. (Weather updates)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या 19 मेपर्यंत राज्यात मान्सून दाखल होऊ शकतो. त्यानंतर 31 मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळात दाखल होतील. त्यापुढे 7 ते 10 जूनच्या आसपास महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल. परंतु महाराष्ट्रात मान्सून येईपर्यंत लोकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी बसायला लागल्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.

दरम्यान यावर्षीचा एप्रिल महिना सर्वात उष्ण ठरला आहे.(Weather updates) जागतिक स्तरावर एल-निनो फॅक्टरमुळे एप्रिल महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. यामुळेच नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये एप्रिल महिना सर्वाधिक उष्ण राहिला. यासह युरोपमध्ये सर्वात उष्ण असलेल्या महिन्यांमध्ये एप्रिल महिन्यांचे दुसऱ्या क्रमांकावर नोंद करण्यात आली.

Accident News: ओव्हरटेकच्या नादात बसचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 15 हून अधिकजण जखमी

Accident news

Accident News| देशभरात सरकार नवनवे महामार्ग उभारताना असताना दुसरीकडे रस्ते अपघाताच्या प्रमाणात ही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कारण, गुरुवारी पहाटे चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर मदुरांतकम येथे बस आणि लॉरीचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात चारजण जागीच ठार तर 15 पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहे. या सर्व जखमींना चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर बस ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. याचवेळी बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट जाऊन एका लॉरीला धडकली. ज्यामुळे बसमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली तर चार जणांना आपला जीव गमवावा लागला. पुढे या जखमींना उपचारासाठी तातडीने चेंगलपट्टू सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आणि मृतदेह पुढील वैद्यकीय औपचारिकतेसाठी पाठवण्यात आले.

बुधवारी झालेल्या अपघातात 9 जणांना मृत्यू (Accident News)

या अपघातापूर्वीच बुधवारी तामिळनाडूमध्ये दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात (Accident News) सुमारे 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली, बुधवारी कल्पक्कममध्ये गुरे वाचवण्याच्या प्रयत्नात कारचे नियंत्रण सुटले होते. ज्यामुळे ती एका झाडाला जाऊन धडकली. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या 5 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे 5 तरुण पुद्दुचेरीहून परतत होते. तर दुसऱ्या अपघातात चेन्नईच्या मधुरमगाम येथे कार आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.

Gold Price Today: बाप रे!! आता चांदीच्या किमतींनी गाठला विक्रमी उच्चांक, सोने 74 हजारांच्या पार

Gold Price Today

Gold Price Today: मे महिना म्हणजेच लग्न सराईचा काळ असतो. त्यामुळेच सराफ बाजारात ही सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येते. मात्र सध्याच्या घडीला मे महिना सुरू असूनही सराफ बाजारात सुकसुकाट पसरली आहे. कारण गेल्या 2 महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या भावांनी विक्रमी उच्चांक काढला आहे. आज म्हणजेच 16 मे 2024 रोजी सोन्या-चांदीच्या भावात कोणतीही घसरण झालेले नाही. उलट आज सोन्याचे भाव आणखीन वाढले आहेत. तर चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे.

गुरूवारी Good Return नुसार सोन्याचे भाव पाहिला गेलो तर, 16 मे 2024 रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 67,850 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने हे 74,020 रुपयांवर गेले आहे. MCX नुसार, आजचे सोन्याचे भाव पाहिले तर, आज 24 कॅरेट सोने 73215 रुपयांनी बाजारात व्यवहार करत आहे. त्यामुळे ग्राहकांना सोन्याचे हे दर उत्तरेपर्यंत वाट पहावी लागणार आहे. (Gold Price Today)

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 67,850 रुपये
मुंबई – 67,850 रुपये
नागपूर – 67,850 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 74,020 रूपये
मुंबई – 74,020 रूपये
नागपूर – 74,020 रूपये

चांदीचे आजचे भाव

आज Good Return नुसार, आज चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. कारण की, 10 ग्रॅम चांदीचा भाव 891 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 8910 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 89,100 रूपये अशी आहे. म्हणजेच, फक्त सोन्याच्याच नाहीतर चांदीच्या भावात ही कमालीची वाढ(Gold Price Today) झाली आहे.