Friday, December 19, 2025
Home Blog Page 752

Mumbai – Goa Expressway | मुंबई-गोवा महामार्ग लवकरच होणार सुरु; नितीन गडकरी यांनी दिली महत्वाची माहिती

Mumbai - Goa Expressway

Mumbai – Goa Expressway | हॅलो महाराष्ट्र गेल्या पंधरा वर्षापासून मुंबई-गोवा महामार्ग बनवण्याचे काम रखडलेले आहे. त्यामुळे आता हे काम कधी पूर्ण होणार आहे. याकडे अनेक कोकणी लोकांचे लक्ष लागलेले आहे. कारण गणपती, होळी आणि शिमगा या सणांसाठी हे रस्ते गावी जाणाऱ्या लोकांसाठी खूप त्रासदायक ठरत आहेत. या महामार्गाचे काम चालू असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे कधी कधी या कामामुळे वाहतूक कोंडी देखील होत आहे. परंतु आता नागरिकांचे हे प्रश्न लवकरच सुटणार आहे. मुंबई, गोवा या महामार्गाचे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिलेली आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी ? | Mumbai – Goa Expressway

नितीन गडकरी यांनी सांगितले की, “चिपळूणचा उड्डाणपूल सोडून मुंबई गोवा महामार्गाचे संपूर्ण काम जून अखेरीस पूर्ण होणार आहे. मुंबई ते गोवा हा महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबईतून गोव्याला पोहोचणे अगदी 5 तासात शक्य होणार आहे. कोकणातील नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही पीव्हीटीमधून रोरो सेवा सुरू केली आहे. त्यामुळे तुम्ही वाहने थेट अलिबागला घेऊन जाऊ शकता. तसेच अलिबागवरून मुंबई गोवा महामार्गाला जोडले जाऊ शकता. मुंबईतून अलिबाग जो प्रवास रस्ते मार्गे साडेतीन तासांचा होता. तो आता 45 मिनिटात होतो. तसेच यामुळे कोकणातून मुंबईत व्यावसायिकांना येणाऱ्या व्यापाऱ्यास प्रवास सोपा होणार आहे.”

विरार ते दिल्ली महामार्ग | Mumbai – Goa Expressway

विरार ते दिल्ली या महामार्गाचे काम एनएचआय यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गाची काम होत असताना रोजगार निर्माण होणार आहे. या भागातील गरिबी देखील दूर होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितलेले आहे.

मुंबई गोवा या महामार्गाची काम चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतिक कोंडी होते. आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. तसेच आता गणेश उत्सवाच्या अगोदर मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले तर प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. महामार्गाच्या कामामुळे कित्येक तास नागरिकांना ट्रॅफिकमध्ये अडकून बसावे लागते.

गणेशोत्सव कधी आहे?

यावर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी असून 16 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार आता यावर्षी गणेश उत्सवाच्या आधीच मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार आहे. आणि या मार्गाने आता नागरिकांना प्रवास देखील करता येणार आहे.

मलाही एका मोठ्या पक्षाने उमेदवारीची ऑफर दिली होती पण..; किरण मानेंचा मोठा खुलासा

kiran Mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मध्यंतरीच मराठी कलाकार किरण माने यांने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तेव्हापासून किरण माने राजकीय क्षेत्रात हे सक्रिय असल्याचे दिसून येत आहेत. अशातच किरण माने (Kiran Mane) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “लोकसभा निवडणुकीच्या काळात मलाही एका मोठ्या पक्षाकडून तिकिटासाठी विचारणा करण्यात आली होती” असे किरण माने यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता किरण माने यांना ऑफर देणार हा पक्ष नेमका कोणता होता?? याबाबत विचारणा केली जात आहे.

एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत बोलताना किरण माने यांनी सांगितले की, “लोकसभा निवडणुकीसाठी मला विचारणा झाली होती. भारतातील एका मोठ्या आणि जुन्या पक्षाच्या नेत्याने मला उमेदवारीबाबत विचारले होते. त्याने सांगितलेला मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ होता. या उमेदवारीबाबत मला विचारणा झाल्यानंतर मी त्या ऑफरला नकार दिला होता. कारण, मी विद्रोही आहे पण द्रोही नाही”

त्याचबरोबर, “या उमेदवारीच्या ऑफरची माहिती मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली. मला उमेदवारी शिवसेना पक्षाकडून असती तर मी स्विकारली असती. पण, ती दुसऱ्या पक्षाची होती. उद्धव ठाकरे यांना मी तुम्हाला सोडून जाणार नाही असे म्हटले. या उमेदवारीच्या ऑफरबाबत सुषमा अंधारे आणि उमेदवारीची ऑफर करणाऱ्या पक्षाच्या नेत्याला याची कल्पना होती.” असेही किरण माने यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटात प्रवेश का केला?? या प्रश्नावर उत्तर देताना किरण माने यांनी म्हटले की, “शिवसेनेत सरंजामी विचारसरणी नाही. बहुजनवादी विचारांच्या जवळ जाणारा शिवसेना पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करताना मी उद्धव यांना प्रबोधन ठाकरे यांचे हिंदुत्व मान्य असून त्यांना पुढे घेऊन जाणार असल्याचे सांगितले. त्यावर उद्धव यांनीही मीदेखील तोच विचार घेऊन जात असल्याचे सांगितले.”

सोने खरेदी करताना घ्या ही काळजी; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड

Gold

भारतामध्ये गेल्या अनेक वर्षापासून दागिने खरेदी करताना सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. भारतातील स्त्रियांना सोन्याचे खूप जास्त आकर्षण आहे. सोन्याच्या दागिने छान दिसतात आणि सोन्याच्या दागिन्यांकडे एक गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. भारतामध्ये कोणतेही लग्नकार्य असो किंवा समारंभ असो. यावेळी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते.

सध्या सोन्याच्या दराने उच्चांक गाठलेला आहे. सोन्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा दर वाढलेला आहे. तरी देखील सोने खरेदी करण्याचा ट्रेंड मात्र गेलेला नाही. अनेकजण सोने खरेदी करताना दिसत आहेत. परंतु जेव्हा आपण सोने खरेदी करतो तेव्हा काही दृष्टिकोनातून आपली फसवणूक होण्याची देखील शक्यता आहे. आपण सोन्यामध्ये खूप जास्त पैसे गुंतवणूक करतो. त्यामुळे सोने खरेदी करताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आता सोने खरेदी करताना फसवणूक होऊ नये. यासाठी तुम्ही काय काळजी घ्यावी? याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

सोने खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या

हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचीच खरेदी करा

जेव्हा आपण सोने खरेदी करायला जातो. तेव्हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करणे. बऱ्याच वेळा आपल्याला दागिने आवडतात आणि त्या डिझाईनच्या नादामध्ये आपण त्याचे हॉलमार्क पाहत नाही. बीआयएस हॉलमार्क दागिने शुद्ध असण्याची ओळख आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना हॉलमार्क आहे की नाही याची नक्की चौकशी करा. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

सोन्याचे वजन तपासा

सोन्याची खरेदी करत असताना तुम्हाला ज्या वजनाचे सोने खरेदी करायचे आहे. त्या वजनाचे दागिने आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. सध्या सोने प्रचंड महागले आहे. त्यामुळे सोन्याच्या वजनामध्ये थोडा जरी चढ उतार झाला, तरी तुमचा आर्थिक दृष्टिकोनातून मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सोने खरेदी करताना त्याचे वजन तपासणे खूप गरजेचे आहे.

सोन्याची शुद्धता तपासणी

सोने खरेदी करताना सोन्याची शुद्ध तपासणी खूप गरजेचे आहे. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते. परंतु सामान्यपणे सोन्याचे दागिने हे 18 ते 22 कॅरेटमध्ये बनवलेले असतात. यामध्ये इतर काही धातूंचे देखील मिश्रण असते. 24 कॅरेट सोन्यापासून दागिने न बनवता सोन्याची नाणी बनवली जातात. 24 कॅरेटचे सोने बनवले तर ते तुटायला अत्यंत पातळ असते त्यामुळे 22 कॅरेटचे दागिने बनवले जातात आणि त्यात इतर धातू असतात जेणेकरून दागिन्यांना कठीणपणा प्राप्त होतो.

सोने खरेदीची पावती घ्यावी

सोने खरेदी करताना केल्यानंतर सोनाराकडून बिल घ्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे बिलावर मेकिंग चार्जेस जीएसटी या संबंधीची माहिती आहे की नाही? याची देखील खात्री करून घ्या. त्यामुळे नंतर सोने खरेदी केल्याचा पुरावा तुमच्याकडे कायम राहतो. आणि सोने कोणाकडून खरेदी केले आहे? किती तारखेला खरेदी केली आहे? याची देखील माहिती मिळते.

दागिने तयार करण्यासाठी लागणारे चार्जेस तपासा

सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावर मेकिंग चार्जेस सह इतर काही चार्जेस लावले जातात. त्यामुळे सोने खरेदी करताना मेकिंग चार्जेस तपासणे खूप गरजेचे आहे. मेकिंग चार्जेसचा भाग हा 30 टक्के असतो. आणि सोनारांना त्याचा खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे सोने खरेदी करताना मेकिंग चार्जेस तपासणे खूप गरजेचे आहे.

चिमुकल्याची कमाल!! शक्कल लढवत पाण्याच्या जारपासून बनवला मिनी कूलर

Mini cooler

आपल्या भारतामध्ये जुगाड्याची अजिबात कमतरता नाही. अनेक लोक त्यांच्या घरगुती समस्याचे निराकरण करण्यासाठी अनेक जुगाड करत असतात. अनेकवेळा एखादे काम शास्त्रज्ञ आणि यंत्र करू शकत नाही. ते काम भारतातील लोक जुगाड्याद्वारे सोडवतात. असेच एक जुगाड कांतीलाल याने केलेला आहे. दहावीत शिकणाऱ्या या कांतीलालने पाण्याच्या भांड्याचा कुलर बनवलेला आहे. जो सध्या चांगला चर्चेत आहे. कांतीलाल हा अवघ्या 14 वर्षाचा आहे. परंतु त्याचा हा नवीन जुगाड पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे.

कांतीलाल हा पदरू या गावातील आहे. त्याने पाण्याच्या भांड्याचे एका कुलरमध्ये रूपांतर केलेले आहे. विजेवर न चालणारा हा पोर्टेबल कुलर पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे. बाडमेर जिल्हा मुख्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनात त्याने हा पोर्टेबल कुलर सादर केला आहे. तेव्हा सर्वजण पाहतच राहिले. या कुलरची किंमत केवळ 500 रुपये एवढी आहे.

सध्या सर्वत्र उन्हाळा चालू आहे. अशा परिस्थितीत उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत आहे. अशातच या 14 वर्षाच्या कांतीलालने जुगाड्याद्वारे एका कुलरची कल्पना आणली, त्याचा हा कुलर सध्या चांगलाच चर्चेत आहे. कांतीलालने पाण्याचे भांडे कापून त्याला कुलरचा आकार दिला आहे. याला वीज लागत नाही. तसेच मोठ्या जागेची गरजही लागत नाही. तो सहज कुठेही नेला जाऊ शकतो. त्याची बॅटरी, स्विच, पंखा, जाळी हे सगळे बसवण्यात आलेले आहे.त्याद्वारे हा कुलर चालत आहे. विज्ञान प्रदर्शनात सादर केलेला त्याचा हा प्रकल्प सध्या चांगला चर्चेत आहे. त्याचप्रमाणे 14 वर्षाच्या मुलाने हा एक अनोखा प्रयोग केला. यामुळे त्याचे कौतुक देखील होत आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियात या रिक्त पदासाठी भरती सुरू; अर्जाची अंतिम तारीख पहा

Central Bank of India

Job Requirements| बँकेत नोकरी करू इच्छेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank Of India) नुकतीच भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ज्यात अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. आता या भरती प्रक्रियेअंतर्गत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. गेल्या 15 मे पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक तरुण येत्या 31 मे पर्यंतच रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे इच्छुकांनी अजिबात वेळ न वाया घालवता त्वरित भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करावेत. तसेच याविषयी अधिक माहिती जाणून घ्यावी.

पदाचे नाव – सल्लागार (निवृत्त अधिकारी)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्जाची अंतिम तारीख – 31 मे 2024

वयाची मर्यादा – 65 वयोवर्षे

अर्ज करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, एचसीएम विभाग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सतरावा मजला, मध्यवर्ती कार्यालय, नरिमन पॉइंट, मुंबई

अधिकृत संकेतस्थळ – https://www.centralbankofindia.co.in/

अर्ज कसा करावा??

  • सर्वात प्रथम इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदासाठी अर्ज तयार करावा.
  • या अर्थासहित आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावीत.
  • त्यानंतर हा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यावा.
  • पुढे हा अर्ज योग्य असेल तर तुम्हाला बँकेकडून संपर्क साधला जाईल.

EPFO Update | EPFO च्या नियमात मोठे बदल!! आता 3 दिवसात मिळणार 1 लाख रुपये; करोडो खातेधारकांना होणार फायदा

EPFO Update

EPFO Update | जे लोक नोकरी करत असतात. ते त्यांच्या भविष्यसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये गुंतवणूक करत असतात. ही एक सरकारी संस्था आहे. जी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी ही संस्था करत असते. अनेक सुविधाही पुरवत असते. भविष्यासाठी दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेमध्ये जाते. ही रक्कम त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना वापरता येते. त्याचप्रमाणे आता ईपीएफओने पीएफ म्हणून पैसे काढण्याची प्रक्रिया देखील अगदी सोपी केलेली आहे. ईपीएफ होण्याचा ऑटोमोड सेटलमेंट सुरू केलेले आहे. त्यामुळे आता सहा कोटींपेक्षा अधिक पीएफ सदस्यांना याचा फायदा होणार आहे. आता सदस्यांना कोणत्याही इमर्जन्सीमध्ये त्यांचा निधी उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत तुमच्या बँक खात्यात तीन दिवसाच्या आत तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहेत.

या ऑटोमोट सेटलमेंट अंतर्गत कर्मचारी त्यांच्या आणीबाणीच्या वेळी पीएफमधून पैसे काढू शकतात. ईपीएफओ त्यांच्या सदस्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैसे काढण्याची परवानगी देखील देते. यामध्ये आपत्कालीन आजारांवर उपचार, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी तुम्हाला पैसे काढून शकता. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून देखील काढू शकता. निधीच्या क्लेम सेटलमेंटसाठी एप्रिल 2020 मध्येच ऑटोमोड सुरू करण्यात आलेला आहे. परंतु त्यावेळी केवळ आजारपणासाठी पैसे काढता येत होते. आता आजारपण, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी देखील तुम्ही ईपीएफओ मधून पैसे काढू शकता. तसेच बहीण आणि भावाच्या लग्नासाठी तुम्हाला पैसे काढता येतात.

पैसे काढण्याची मर्यादा वाढली | EPFO Update

या आधी पीएफमधून (EPFO Update) आगाऊ निधी काढण्याची मर्यादा 50 हजार रुपये होती. परंतु आता ती एक लाख रुपये करण्यात आलेली आहे. ऑटो सेटलमेंट मोडद्वारे ॲडव्हान्स पैसे काढण्याचे काम ऑनलाईन प्रकारे होणार आहे. तीन दिवसाच्या आत तुमच्या खातात पैसे देखील जमा होणार आहे. यासाठी तुम्हाला काही कागदपत्र सबमिट करावी लागतील. यामध्ये केवायसी क्लेम रिक्वेस्ट, एलिजिबिलिटी, बँक अकाउंट डिटेल्स यांसारख्या गोष्टींचा समावेश असेल.

आगाऊ पैसे काढण्याची प्रक्रिया

आगाऊ पैसे काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी ईपीएफओ पोर्टलवर लॉगिन करावे लागेल. यासाठी युएएन आणि पासवर्ड गरजेचा आहे.
लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सेवांच्या पर्यायावर जाऊन क्लेम सेक्शन निवडावा लागेल.
त्यानंतर तुमचा बँक अकाउंट व्हेरिफाय करावे लागेल. आणि बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील.
त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटचा चेक आणि पासबुकची प्रत देखील अपलोड करावी लागेल.
त्याचप्रमाणे ज्या कारणासाठी तुम्हाला पैशाची गरज आहे. त्या कारणाचा उल्लेख करावा लागेल.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसात तुमच्या खातात पैसे येतील.

Best Jio Plans | फ्री Amazon प्राइम व्हिडिओ आणि Netflix सह, ‘हे’ आहेत जिओचे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स

Best Jio Plans

Best Jio Plans | रिलायन्स जिओ या भारतातील सगळ्यात आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. त्यांच्या ग्राहकांना ते नेहमीच नवनवीन ऑफर देत असतात. त्याचप्रमाणे जिओ त्यांच्या ग्राहकांना मोबाईल रिचार्ज अनेक ओटीटीच्या सबस्क्रिप्शन देखील देत असतात. ज्यामुळे ग्राहकांना चांगलाच फायदा होतो. आज आम्ही जिओच्या अशाच काही रिचार्ज ऑफर बद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रीप्शन (Best Jio Plans) देखील फ्रीमध्ये मिळणार आहेत.

Jio Rs 4498 प्रीपेड प्लॅन | Best Jio Plans

Jio Rs 3227 प्रीपेड प्लॅन Jio कडून Rs 3227 प्रीपेड प्लॅन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनच्या एका वर्षाच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो. शिवाय, हा प्रीपेड प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसाठी 2GB डेटा/दिवस, अमर्यादित व्हॉइस कॉल, अमर्यादित 5G डेटा आणि 100 SMS/दिवस ऑफर करतो. यामध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud सबस्क्रिप्शनचाही समावेश आहे.

Jio Rs 3227 प्रीपेड प्लॅन

Jio कडून Rs 3227 प्रीपेड प्लॅन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनच्या एका वर्षाच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो. हा प्रीपेड प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसाठी 2GB डेटा/दिवस, अमर्यादित व्हॉइस कॉल, अमर्यादित 5G डेटा आणि 100 SMS/दिवस ऑफर करतो. यामध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud सबस्क्रिप्शनचाही समावेश आहे.

Jio Rs 1198 प्रीपेड प्लॅन

1198 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 84 दिवसांसाठी मोफत प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन ऑफर करतो. हा प्लॅन Sony LIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT आणि इतर अनेकांसाठी मोफत सबस्क्रिप्शन देखील ऑफर करतो.

Jio रु. 1099 प्रीपेड प्लॅन

Jio च्या या प्रीपेड प्लॅनची किंमत रु. 1099 आहे, JioTV, JioCinema आणि JioCloud सह Netflix मोबाईलवर विनामूल्य प्रवेश प्रदान करते. शिवाय, प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसाठी 2GB/डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 SMS/दिवसासह येतो.

Jio Rs 857 प्रीपेड प्लॅन | Best Jio Plans

Jio प्लॅन 84 दिवसांसाठी Netflix मोबाईलवर मोफत प्रवेश प्रदान करतो. याव्यतिरिक्त, ते 2GB/डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 SMS/दिवस ऑफर करते. 857 रुपयांच्या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud सबस्क्रिप्शनचाही समावेश आहे.

MHADA Lottery 2024: पुणेकरांनो नवीन घर घ्यायचे आहे?? तर 1 आणि 2BHK घरांसाठी येथे करा अर्ज

MHADA Lottery

MHADA Lottery 2024| घर घेण्याचे स्वप्न अनेकजण पाहत असतात. परंतु घरांच्या किमतीत महाग असल्यामुळे हे स्वप्न प्रत्येकाचे पूर्ण होत नाही. सर्वसामान्यांच्या या स्वप्नाला भरारी देण्याचे काम म्हाडा (Mhada Homes) करते. म्हाडाकडून ठरलेल्या कालावधीत घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात येते. गेल्या महिन्यातच पुणे म्हाडा मंडळाने घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे या लॉटरी साठी अनेकांना अर्ज करता येत नव्हते. त्यामुळे अर्ज भरण्याची तारीख वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.

याच मागणीला विचारात घेऊन म्हाडाने घरांसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घरांची संख्या 100 ने वाढवली आहे. म्हाडाने लॉटरी जाहीर करताना ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल अशी ठेवली होती. परंतु आता लोकांच्या मागणीमुळे या तारखेत 30 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 30 मे पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत घरांसाठी अर्ज करता येऊ शकतो. म्हाडाच्या या निर्णयामुळे अनेकजणांना दिलासा मिळाला आहे.

ऑनलाइन अर्ज कुठे करावा?? (MHADA Lottery 2024)

पुण्यातील म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. त्यानंतर सविस्तर माहिती जाणून घेऊन आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. म्हाडाच्या सोडतमध्ये तुमचे नाव जाहीर झाल्यास आवश्यक प्रक्रियेनंतर तुमचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. (MHADA Lottery 2024)

आवश्यक कागदपत्रे (MHADA Lottery 2024)

  • आधारकार्ड, पॅनकार्ड
  • वास्तव्याचा पुरावा
  • डोमासाईल सर्टिफिकेट
  • उत्पनाचा पुरावा
  • पती/पत्नीच्या उत्पन्नाचा पुरावा

टर्म इन्शुरन्स की लाइफ इन्शुरन्स कोणता पर्याय सर्वाधिक फायदेशीर; एका क्लिकवर वाचा

Term and life insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजकालच्या काळात विमा योजना ही एक गरज बनली आहे. यात कोरोनाच्या कालावधीनंतर आरोग्य विमा करून ठेवण्याबाबत लोक अधिक विचार करू लागले आहेत. यामुळेच अनावश्यक खर्च सोडून लोक विम्यात जास्त गुंतवणूक करत आहेत. परंतु या महिन्यात गुंतवणूक करताना टर्म इन्शुरन्स (Term Insurance) की लाइफ इन्शुरन्स (Life Insurance) यातील नेमका कोणता पर्याय निवडावा यामध्ये लोकांचा गोंधळ उडतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला या दोन्हीतील फरक सांगणार आहोत. ज्यातून तुम्ही योग्य पर्याय निवडू शकाल.

टर्म इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स म्हणजे काय?

मुदत विमा ही एक विमा पॉलिसी आहे. जी एका निश्चित कालावधीसाठी निश्चित पेमेंट दराने कव्हरेज प्रदान करते. यामध्ये पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कव्हरची रक्कम नॉमिनीला एकर कमी दिली जाते. यामुळे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते. टर्म इन्शुरन्समध्ये मॅच्युरिटी रिटर्न उपलब्ध नसतात.

तर लाइफ इन्शुरन्स पॉलिसी संपूर्ण आयुष्यासाठी कव्हरेज प्रदान करण्याचे काम करते. यामध्ये जर विमाधारक व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या नॉमिनीला विमा कंपनीकडून परिपक्वता लाभ, सरेंडर बेनिफिट, लॉयल्टी ॲडिशन इत्यादी आर्थिक सहाय्य मिळते. तसेच, लाइफ इन्शुरन्समध्ये मॅच्युरिटीनंतर प्रीमिअम रकमेवर व्याजासह एकरकमी अमाउंट दिली जाते.

सर्वात जास्त फायदेशीर काय??

खरे तर, तुम्ही कोणताही इन्शुरन्सचा पर्याय निवडावा हे तुमच्यावर अवलंबून असते. टर्म इन्शुरन्स हा लाईफ इन्शुरन्स पेक्षा अधिक स्वस्त असतो. जर तुम्हाला कमी कालावधीसाठी इन्शुरन्स करायचे असेल तर टर्म इन्शुरन्स हा एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो. टर्म इन्शुरन्स योजना तुम्हाला कमी पैशात जास्तीत जास्त परतावा देते. याच्या मदतीने तुम्ही पैसे वाचवू शकता. लक्षात ठेवा की जर एखाद्या व्यक्तीने मुदतीच्या विमा योजनेत प्रीमियम भरणे थांबवले तर त्याला फायदे मिळणे बंद होते. यासह पॉलिसी देखील बंद केली जाते

परंतु जर तुम्हाला आजीवन कव्हरेज हवे असेल तर तुम्ही लाइफ इन्शुरन्सचा विचार करावा. लक्षात ठेवा की, यात तुम्हाला अधिक पैसे गुंतवावे लागतात. तुम्ही तुमची लाइफ इन्शुरन्स योजना मध्येच थांबवली तर या पॉलिसीची संपूर्ण रक्कम मिळत नाही. तुम्हाला फक्त प्रीमियम म्हणून जमा केलेली रक्कम मिळते. त्यामुळे या दोन्ही इन्शुरन्स मधला नेमका कोणता पर्याय निवडावा?? हे सर्वस्वी तुमच्या हातात असते.

Mumbai Local Mega Block: पुढील 15 दिवस मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल

mumbai mega block

Mumbai Local Mega Block| रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की, प्रवाशांच्या तोंडावर बारा वाजताच. या मेगाब्लॉकमुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होतात. आता तर या प्रवाशांना पुढचे पंधरा दिवस या मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. कारण 17 मेपासून ते 1 जूनपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. काही तांत्रिक कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक राहणार असल्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. सध्या 24 डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील 10 आणि 11 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासह काही तांत्रिक कामेही करणे बाकी आहेत. या कारणांमुळेच 17 मेपासून ते 1 जूनपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात काही लांब पडल्याच्या पल्ल्याच्या गाड्या पनवेल, दादर स्थानकांपर्यंत धावतील. (Mumbai Local Mega Block) यामुळे लांब प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक गैरसोयीचा सामना करावा लागेल.

या मेगाब्लॉकचा उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर ही मोठा परिणाम होणार आहे. (Mumbai Local Mega Block) या काळात CSMT हून 12.14 वाजचा कसारासाठीची शेवटची लोकल सोडली जाईल. तर कल्याण येथून रात्री 10 वाजून 34 मिनिटांनी CSMT साठी शेवटची लोकल असेल. तर पहाटे 4.47 वाजता CSMT हून कर्जतला जाण्यासाठी पहिली लोकल असेल. तर ठाण्यामधून पहाटे चार वाजता CSMT साठी पाहिली लोकल सुटेल. या मेगा ब्लॉकच्या काळामध्ये भायखळा ते CSMT दरम्यान लोकल धावणार नाही. (Mumbai Local Mega Block)