Friday, December 19, 2025
Home Blog Page 758

12 वीनंतर पदवी होणार 4 वर्षाची ! D.Ed – B.ED प्रवेशाबाबत मोठी माहिती समोर

Deegree

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी 2024 – 25 पासून होणार आहे. या शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठासह सर्व महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक बदल होणार आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती घेणे खूप गरजेचे आहे. कारण बारावीनंतर या आधी पदवी तीन वर्षाची होती. परंतु आता इथून पुढे ही पदवी तीन वर्षाची नसून चार वर्षाची असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन वर्षानंतर पदवीचे शिक्षण सोडणाऱ्याना डिप्लोमाची पदवी देखील दिली जाणार आहे.

अशी असणार पदवी

अनेकवेळा मुले बारावीनंतर पदवीला ऍडमिशन घेतात. परंतु पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर काही कारणामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. परंतु त्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाचे स्वतंत्र प्रमाणपत्र मिळतील. 2 वर्षे पूर्ण केल्यानंतर अर्ध्यातून शिक्षण सोडल्यास त्यांना डिप्लोमाचे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या वर्षानंतर शिक्षण सोडल्यास त्यांना सध्याच्या नियमानुसार प्रमाणपत्र मिळेल. परंतु चौथ्या वर्षाचे पूर्ण शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला ओनर्स किंवा रिसर्च या विषयातून डिग्री मिळणार आहे. ही पदवी प्राप्त केल्यानंतर ती विद्यार्थ्याला पदवीत्तर पदवीसाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळेल. तीन वर्षानंतर जर त्यांनी शिक्षण सोडले, तर पदवी तर पदवीला प्रवेश घ्यायचा असेल, तर त्याला दोन वर्ष शिकावे लागणार आहे.

पदवीधर पदवीच्या विद्यार्थ्यांना तीन किंवा चार वर्षाची पदवी पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही त्याची संधी मिळणार आहे. त्यानुसार पहिल्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाच्या पहिल्या सत्रात रिसर्च, तर दुसऱ्या सत्रात जॉब ट्रेनिंग असे विषय असतील. पदवीधर पदवीच्या शेवटच्या सत्रात प्रत्येक विद्यार्थ्याला शोध निबंध बंधनकारक असणार आहे. या विषयावर त्याला अहवाल द्यावा लागणार आहे. तरच पदवीत्तर पद्धतीचे शिक्षण पूर्ण होणार आहेत.

बीएड आणि डीएडीची प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असणार

यावर्षी बारावीचा निकाल 20 ते 25 मे दरम्यान जाहीर होणार आहे. निकालानंतर विद्यार्थी लगेच पुढील शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू करतात. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. पण डीएड आणि बीएड प्रवेश प्रक्रिया अभ्यासक्रमाने कालावधी हे पूर्वीप्रमाणेच असणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही.

Char Dham Yatra : चार धामला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या; तर होईल यात्रा सुफळ संपूर्ण

Char Dham Yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Char dham Yatra) हिंदू धर्मात चार धाम यात्रेला विशेष महत्व आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी, असे म्हणतात. मनाला अद्भुत समाधान देणाऱ्या या चारधाम यात्रेला यंदा १० मेपासून सुरुवात झाली आहे. चार धाम म्हणजे काय तर चार मंदिरे. ज्यामध्ये यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या देवस्थानांचा समावेश आहे. ही यात्रा जवळपास ६ महिने सुरू असते. लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने आणि आस्थेने ही यात्रा करतात. ही यात्रा पूर्ण करण्यासाठी बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत.

उत्तराखंड येथील चार धाम यात्रेसाठी एकतर पायी जावे लागते किंवा घोडे, खच्चरच्या मदतीने दर्शनासाठी जाता येतं. इतकेच काय तर काही भाविक अगदी हेलिकॉप्टरने सुद्धा ही यात्रा पूर्ण करतात. गेल्या काही वर्षांत चार धाम यात्रेची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे आज लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. दरम्यान, चार धाम यात्रा (Char dham Yatra) करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. अगदी रजिस्ट्रेशन पासून कालावधीपर्यंत सर्व माहिती उपलब्ध असल्याशिवाय चार धाम यात्रा करणे कठीणच! म्हणून आज आम्ही तुम्हाला ही सर्व माहिती देत आहेत.

यात्रेसाठी बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन गरजेचे

चार धाम यात्रेसाठी जाताना सर्वात आधी भाविकांना बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. (Char dham Yatra) हे रजिस्ट्रेशन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येते. तसेच उत्तराखंड पर्यटन विकास परिषद (UTDV) कडून रजिस्ट्रेशनसाठी टोल फ्री नंबर आणि व्हॉट्सअॅप नंबरदेखील जारी करण्यात आले आहेत. ज्यावर रजिस्ट्रेशन मोफत स्वरूपात होते. यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान प्रमाणपत्र आणि पासपोर्ट दाखवावे लागेल.

यात्रेला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी आवश्यक

चार धाम यात्रा करणे सोपे काम नाही. कारण, या प्रवासातील रस्ते फार धोकादायक मानले जातात. उंच डोंगर, घनदाट जंगल अशी मनाला मोहनारी दृश्य दिसत असली तरी वाट मात्र खडतर आहे. (Char dham Yatra) त्यामुळे तुम्हाला शारिरीकदृष्ट्या फिट आसने गरजेचे आहे. यात्रा सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी जरूर करून घ्या. तुम्ही पूर्णपणे निरोगी आहेत याची खात्री करून मगच प्रवास सुरु करा.

यात्रेला जाताना सोबत ‘या’ वस्तू जरूर घ्या

चार धाम यात्रेचा प्रवास करतेवेळी सोबत मेडिकल किट, शरीराला उर्जा देणारे पदार्थ, खाण्याचे सामान आपल्या सोबत असू द्या. तसेच रोख रक्कम, आयडी कार्ड, गरम कपडे, रेनकोड, छत्री, ट्रेकिंग स्टिक, ड्राय फ्रुट्स, स्नॅक्स, थर्मल बॉटल, पर्सनल हायजीनचे सामान (टुथब्रश, शॅम्पू, सॅनिटायझर, मॉइश्चरायजर) सोबत ठेवा.

‘या’ गोष्टींची काळजी घ्या (Char dham Yatra)

चार धाम यात्रा ही जितकी कठिण तितकी सुखद आहे. मात्र, यावेळी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. चार धाम यात्रेची सुरुवात ही हरिद्वार येथून गंगा स्नान करुन होते. इथे किमान १० दिवस दर्शनासाठी जातात. चार धाम यात्रेपैकी दोन मंदिरांना जाण्याचा मार्ग फार अवघड आहे. ही दोन मंदिरे म्हणजे केदारनाथ आणि यमुनोत्री. त्या तुलनेत बद्रीनाथ आणि गंगोत्री मंदिरांकडील प्रवास थोडा सोप्पा आहे. त्यामुळे चार धाम यात्रेला जर तुम्ही पायी जायचा विचार करत नसाल तर घोडा किंवा खच्चर शिवाय पालखीचा पर्याय निवडू शकता. अशावेळी एक गोष्ट लक्षात राहूद्या की, रजिस्टर्ट लोकांकडूनच घोडा किंवा खच्चर घ्याल. कारण त्यांचे रेट फिक्स असतात.

आणखी एक महत्वाचे असे की, चार धाम यात्रेला (Char dham Yatra) निघताना शरीर हायड्रेटड ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी २ लीटर पाणी प्या. तसेच न्युट्रिएंट्सची कमतरता होणार नाही याची काळजी घेत फलाहार करा. डोंगर चढताना नेहमी नाकाने दीर्घ श्वास घ्या. यामुळे फुफ्फुसांना अधिक ऑक्सिजन मिळेल आणि तुम्ही लगेच दमणार नाही. यात्रेदरम्यान फास्ट फुड, जंक फुड, शुगर ड्रिंक्स, कॉफी, सिगरेटचे सेवन किंवा अधिक तळलेले तसेच मसालेदार जेवण करू नका. त्रास होऊ शकतो.

‘या’ लोकांनी करू नये चार धाम यात्रा

तज्ञ सल्ला देतात की, ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना हृदयविकार, अस्थमा, हाय ब्लड प्रेशर, मधुमेह सारखे आजार असतात. त्यामुळे अशा लोकांना चार धाम यात्रा करताना काळजी घ्यावी किंवा करू नये. (Char dham Yatra) तसेच गर्भवती महिलांनी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि हेल्थ चेकअप करुनच चार धाम यात्रेला जावे किंवा टाळावे.

HAL Requirements 2024 | परीक्षा न देता ‘या’ ठिकाणी मिळणार थेट सरकारी नोकरी; असा करा अर्ज

HAL Requirements 2024

HAL Requirements 2024 | अनेक विद्यार्थी हे शाळेत असल्यापासूनच सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असतात. आम्ही देखील तुमच्यासाठी नेहमीच नवनवीन सरकारी नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज आम्ही सरकारी नोकरीची एक सुवर्णसंधी घेऊन आलेलो आहोत. या नोकरीमध्ये तुम्हाला परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळणार आहे. ती म्हणजे आता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL Requirements 2024) एक मोठी भरती काढलेली आहे. या भरती अंतर्गत पदवीधर आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिससाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये अप्रेंटीस (HAL Requirements 2024) पदाची भरती निघालेली आहे. ही भरती तब्बल 124 पदांसाठी निघालेली आहे. त्यामुळे आता उमेदवारांनी लवकरात लवकर त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करावा. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. केवळ मुलाखती अंतर्गत उमेदवाराची निवड होणार आहे.

मुलाखतीची तारीख | HAL Requirements 2024

इंटरव्यूची तारीख – 23 मे 2024 (पदवीधर अभियांत्रिकी अप्रेंटीस)
इंटरव्यूची तारीख – 24 मे 2024 (इतर पोस्ट)

रिक्त पदे

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 64 पदे
  • डिप्लोमा अप्रेंटिस – 35 पदे
  • सामान्य अप्रेंटिसिस – 25 पदे

आवश्यक कागदपत्र

  • शैक्षणिक कागदपत्र
  • गुणपत्रिका
  • जन्म प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.

शैक्षणिक पात्रता

अभियांत्रिकीची पदवी असणे गरजेचे या पदवीमध्ये सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 60% गुणासह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे SC, ST कॅटेगिरी विद्यार्थ्यांना 55% गुणांनी पास असणे गरजेचे आहे.

डिप्लोमा अप्रेंटिस

संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा आयटीआय असणे गरजेचे आहे. सामान्य प्रवर्गातील विद्यार्थी 60% गुणासह पास असणे गरजेचे आहे तर एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थी 55% गुणांसह पास असणे गरजेचे आहे.

सामान्य अप्रेंटिस

या पदाचा अर्ज करण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवार 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, तर एससी एसटी कॅटेगिरीतील विद्यार्थी ४५ टक्के गुणांनी पास असणे गरजेचे आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

Beed Lok Sabha 2024 : पंकजा मुंडेंच्या बालेकिल्लाला बजरंग बाप्पा सुरुंग लावणार?

bajarang sonwane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा विरुद्ध ओबीसी … अशी स्पष्ट लढत महाराष्ट्रातल्या कोणत्या मतदारसंघात बघायला मिळणार असेल तर ती बीडमध्ये… बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे तर शरद पवार गटाकडून बजरंग बप्पा सोनवणे यांच्यात प्रमुख लढत आहे. मुंडे कुटुंबाच्या प्रस्थापित राजकारणाला बीडच्या बालेकिल्ल्यात कुणाला न लावता आला नाही. त्याच्या जोरावर आधी गोपीनाथ मुंडे, मग दोन टर्म प्रीतम मुंडे आणि आता पंकजा मुंडे लोकसभेवर जाण्यासाठी मैदानात आहेत. धनंजय मुंडे महायुतीत आल्याने आपल्या बहिणीसाठी त्यांनी जिल्ह्यात फिल्डिंग लावलीय. कागदावरही पंकजाताईंना बीड लोकसभा सोपी जाणार असली तरी ग्राउंड काही वेगळंच सांगतय. अगदी शेवटच्या काही दिवसांत शरद पवारांनी बीडचं समाजमन ओळखून टाकलेले काही डाव पाहता पंकजा मुंडे यांची खासदारकी सध्या तरी धोक्यात दिसतेय. मराठा विरुद्ध ओबीसी अशी जातीची किनार असलेल्या मतदारसंघात सध्या सामना अटीतटीचा आहे… त्यामुळे बीडात मुंडे जिल्ह्यावरचं आपलं निर्विवाद वर्चस्व कायम ठेवणार की परिवर्तन होऊन बजरंगाची कमाल बघायला मिळणार?

गोपीनाथ मुंडेंनंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवला तो पंकजा मुंडे यांनी… फडणीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये त्या आमदार झाल्या… मंत्रीपद ही त्यांच्या वाट्याला आलं…पण हळूहळू मुंडेंच्या प्रस्थापित राजकारणाला महाराष्ट्र भाजपकडून साईडलाईन केलं जाऊ लागलं… 2019 च्या निवडणुकीत तर स्वतःच्या बालेकिल्ल्यातून म्हणजे परळीतूनच त्या आमदारकीला पडल्या… यानंतर भाजपकडून राम शिंदे, धनंजय महाडिक, गोपीचंद पडळकर, मेधा कुलकर्णी या सगळ्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं… पण या प्रत्येक वेळेस डावलण्यात आलं ते पंकजा मुंडेंना… यानंतर पंकजा मुंडे यांची पक्षावरची धुसफूस अनेकदा बाहेर पडत होती. जाहीर सभेतून त्यांनी ती अनेकदा बोलूनही दाखवली. विनोद तावडेंच्या हस्तक्षेपामुळे म्हणा… किंवा ओबीसी मतं विरोधात जाऊ नये यासाठी केलेली खेळी… पंकजा ताईंना पक्ष कार्यकारणीची जबाबदारी देण्यात आली. पण त्यांचं मन त्यात काही रमलं नाही. अखेर 2024 ची भाजपसाठी प्रत्येक सिट महत्वाची असल्याने प्रीतम मुंडे यांच्या जागी थेट पंकजा मुंडे यांना खासदारकीच्या मैदानात उतरविण्यात आलं… भाजपने ही खेळी करून एकाच दगडात दोन पक्षी मारले. पहिलं म्हणजे पंकजाताई आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली तर दुसऱ्या बाजूला बीडचा गड भाजपसाठी आणखीन मजबूत केला.

तर पंकजा ताईंच्या विरोधात शरद पवार गटाकडून बजरंग बाप्पा सोनावणे आणि ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती. 2019 च्या निवडणुकीत अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या बजरंग बाप्पांना लोकसभा मिळावी यासाठी पवार आणि मुंडे या दोघांनीही बरेच प्रयत्न केले. तेव्हा ती उमेदवारी त्यांना मिळालीही… 2019 ला बाप्पांनी सर्व ताकदीनिशी प्रीतम मुंडे यांना फाईट दिली. पण मोदी लाट, ओबीसी वंजारी जातींचं समीकरण आणि मुंडे नावाला मानणारा हक्काचा मतदार यांच्या जीवावर प्रीतम ताई पुन्हा खासदार झाल्या. यानंतर बजरंग बाप्पा हे जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच ॲक्टिव्ह राहिले… साखर कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी विणलेलं उद्योगधंद्याचं जाळं यामुळे बजरंग बाप्पा यांची पॉलिटिकल इमेज चांगलीच बिल्ड अप झाली होती. त्यामुळे मेटे की सोनवणे या वादात बजरंग बाप्पा यांची सरशी झाली. अन् सोनवणे विरुद्ध मुंडे अशी बीडची लढत फिक्स झाली…सध्या महायुती एकाच छताखाली निवडणुकीला सामोरं जातेय. त्यात धनंजय मुंडे यांची ताकद भाजपला जोडली जाणार असल्याने बीडमध्ये पंकजा ताई यांचं पारडं जड दिसतंय. पण जातींच्या राजकारणावर ज्या बीडचा खासदार ठरतो. तिथं मात्र ग्राउंड रियालिटी पाहता पंकजा ताईंना बजरंग बाप्पा जड जातील…

आणि त्याचं पहिलं कारण म्हणजे मराठा आरक्षणाचं मूळ

मनोज जरांगे पाटलांनी ज्या मराठा आरक्षणाची ठिणगी पेटवली त्याचा सेंटर पॉईंट हा बीड होता. जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाज एकवटला. त्यात छगन भुजबळांनी ओबीसी एल्गार करून मराठा विरुद्ध ओबीसी यांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं. याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कुठे बघायला मिळणार असेल तर तो बीड लोकसभा मतदारसंघात. वंजारी समाज आणि ओबीसी समाजाचा मोठा सपोर्ट हा भाजपाच्या आणि पर्यायाने मुंडेंच्या पाठीशी राहिलाय. पण शरद पवारांनी बीडमध्ये मराठा कार्ड खेळत बजरंग बाप्पा सोनवणे यांना तिकीट दिलं. त्यामुळे बीडच्या लोकसभेला मराठा विरुद्ध ओबीसी अशी जातींची कडवी लढत पाहायला मिळणारय. मनोज जरांगेंनी स्पष्ट भाषेत मराठा उमेदवारांचं काम करा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याने बीडमध्ये बजरंग बाप्पा सोनावणेंच्या पाठीशी मराठ्यांची मोठी ताकद लागू शकते… आणि हाच बजरंग बाप्पांचा प्लस पॉईंट ठरणार आहे…केज हा पट्टा बजरंग साेनवणे यांचा. या पट्ट्यात त्यांचा साखर कारखाना आहे. त्यामुळे उसाचे राजकारण या भागात प्रभावी ठरेल. तसेच जातीची तुतारीही त्यांनी जोरदारपणे फुंकली आहे. त्याचा परिणाम आंतरवली सराटीला जवळ असणाऱ्या गेवराई, माजलगाव या पट्टयात तुतारीला चांगलं लीड मिळेल, असं बोललं जातंय… मराठा समाजाने बजरंग सोनवणे यांचे गावोगावी मोठे स्वागत केलंय. तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडेंची अनेक गावांत प्रचाराच्या वेळेस मराठा समाजाकडून अडवणूक करण्यात आलीय. यावरून जरांगे फॅक्टरमुळे मतदारसंघाचं वारं काही प्रमाणात तुतारीच्या बाजूने वळलं आहे…

बीड लोकसभेवर मागील पंधरा वर्षांपासून मुंडे कुटुंबाचाच सदस्य हा खासदार राहिलाय. मात्र असं असूनही विकासाच्या अनेक मुद्द्यांना मतदार संघात साधा स्पर्शही करण्यात आलेला नाहीये… सध्याही बीडच्या लोकसभेच्या प्रचारात विकासकामांच्या मुद्द्यांचे कमी आणि जातीच्या राजकारणावर सर्वाधिक भर आहे. त्यामुळे मुंडे घराण्याविषयी मतदारांच्यात अँटिइनकमबन्सी तयार झाली आहे…याचा मोठा फटका हा पंकजा मुंडेंना मतदार संघात बसू शकतो…त्यात महाविकास आघाडीने लावलेले ताकद आणि शरद पवारांचा प्रचारातला सक्रिय सहभाग या सगळ्या गोष्टी बजरंग बाप्पांच्या पथ्यावर पडू शकतात.

पण अजितदादांनी लावलेली ताकद, भाजपचं स्ट्रॉंग केडर, मुंडे कुटुंबाचा एकदिलाने चाललेला प्रचार आणि बंजारा समाजाची पारंपारिक व्होटबँक हे सारं काही मुंडे यांना लोकसभेच्या मैदानात प्लसमध्ये ठेवतं. त्यामुळे ऊसतोडी पासून ते पाण्यापर्यंतच्या अनेक मूलभूत प्रश्नांनी आजही पीडित असलेल्या बीडकरांचं जगणं सुसह्य करेल, असा परफेक्ट खासदार कोण असू शकतो…बजरंग बाप्पा सोनवणे की पंकजा मुंडे? तुमचं मत कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Starship Rocket | माणूस मंगळावर- चंद्रावर जाणार; Elon Musk चा सर्वात मोठा प्लॅन

Starship Rocket

Starship Rocket | स्टारशिप हे जगातील सर्वात वजनदार रॉकेट आहे. आणि ते पुन्हा प्रक्षेपण चाचणीसाठी सज्ज झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार येत्या तीन ते पाच आठवड्यांमध्ये चौथ्यांदा चाचणीसाठी हे रॉकेट लॉन्च केले जाऊ शकते. याबाबत दिलेला आहे तो स्टारशिप बनवणाऱ्या स्पेसएक्सचा मालक आहे. यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देताना इलोन मस्क यांनी सांगितले की, आगामी लॉन्चचा उद्देश हा आहे की, स्टारशिप गेल्या वेळेपेक्षा जास्त उष्णता निर्माण केली पाहिजे. त्याचप्रमाणे या वर्षाच्या सुरुवातीला स्टार्च घेण्यात आली होती. आणि ती चाचणी यशस्वी देखील झाली होती. स्टारशिप (Starship Rocket) चाचणी उड्डाण पूर्ण केले. परंतु शेवटच्या क्षणी तिचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.

स्टारशिप हे पुन्हा वापरता येणारे रॉकेट आहे. त्याचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. पहिला पॅसेंजर कॅरी सेक्शन आहे, जो प्रवाशांना ठेवेल, तर दुसरा सुपर हेवी रॉकेट बूस्टर आहे. स्टारशिप आणि बूस्टरसह त्याची लांबी 394 फूट (120 मीटर) आहे. तर वजन 50 लाख किलोग्रॅम आहे. माहितीनुसार, स्टारशिप रॉकेट 16 दशलक्ष पौंड (70 मेगान्यूटन) थ्रस्ट निर्माण करण्यास सक्षम आहे. हे नासाच्या स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) रॉकेटच्या जवळपास दुप्पट आहे.

स्टारशिप काय काम करेल? | Starship Rocket

स्टारशिप रॉकेटच्या मदतीने भविष्यात मानव आणि आवश्यक उपकरणे चंद्र आणि मंगळावर नेता येतील, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. असे झाल्यास, मानव यापुढे पृथ्वीपुरता मर्यादित राहणार नाही आणि बहु-ग्रहांच्या प्रजाती बनतील. अमेरिकन स्पेस एजन्सी आर्टेमिस मिशन अंतर्गत मानवाला चंद्रावर पाठवण्याची योजना आखत आहे. चंद्रानंतर मंगळावर मानव पाठवण्याची योजना आहे. ही योजना पुढील काही दशकांत पूर्ण करण्यासाठी स्टारशिपसारखे रॉकेट खूप उपयुक्त ठरू शकतात.

इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की स्टारशिप रॉकेट शेवटी 500 फूट उंच असेल. सध्या चाचणी करण्यात येत असलेल्या स्टारशिप रॉकेटपेक्षा हे प्रमाण २० टक्के जास्त आहे. मंगळ मोहीम लक्षात घेऊन स्टारशिपचा आकार वाढवण्यात येणार आहे.

Benefits Of Raisin Water | सकाळी रिकाम्या पोटी प्या मनुक्याचे पाणी; शरीराला होतील अद्भुत फायदे

Benefits Of Raisin Water

Benefits Of Raisin Water | ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. मनुक्याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. अनेक लोकांना मनुके खायला देखील खूप आवडतात. परंतु मनुक्याचे पाणी देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. तुम्ही जर रात्रभर पाण्यात मनुके भिजायला ठेवले आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी पिले, तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मनुकामध्ये पोषकतत्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे पाण्यात विरघळल्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात. आता मनुक्याचे पाणी पिण्याचे (Benefits Of Raisin Water )आपल्या शरीराला काय फायदे होतात हे आपण जाणून घेऊयात.

फायबर | Benefits Of Raisin Water

मनुक्यामध्ये आहारातील फायबर असते जे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांना मदत करते. मनुका पाणी पचनसंस्था शुद्ध करण्यास मदत करते.

लोह

मनुका पाणी लोहाचा एक चांगला स्रोत आहे, विशेषत: ज्यांना लोहाची कमतरता आहे त्यांच्यासाठी. संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवण्यासाठी लोह आवश्यक आहे.

पोटॅशियम

रक्त प्रवाह आणि हार्मोनल संतुलन राखण्यासाठी हे खनिज आवश्यक आहे. हे आपले शरीर आजारांपासून दूर ठेवते.

अँटिऑक्सिडंट

मनुकामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे पेशींना जंतूंमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी सारख्या जीवनसत्त्वांची उपस्थिती मजबूत रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यास मदत करते.

कॅल्शियम

मनुकामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि मजबूतीसाठी आवश्यक असतात. मनुका पाण्यात भिजवल्यावर ही खनिजे चांगल्या प्रकारे शोषली जातात. हे खाल्ल्याने हाडे मजबूत राहण्यास आणि ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव होण्यास मदत होते.

नैसर्गिक ग्लुकोज

मनुका हे फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचे नैसर्गिक स्त्रोत आहेत, जे शरीराला ऊर्जा देतात. मनुका पाण्यात असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील एकूण ऊर्जा पातळी राखण्यास मदत करतात. मनुका पाणी पिणे हा थकवा दूर करण्यासाठी चांगला उपाय ठरू शकतो.

Stephen Fleming : स्टीफन फ्लेमिंग होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Stephen Fleming Coach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ जूनमधील T20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपणार आहे. त्यानंतर राहुल द्रविडचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत चर्चा सुरु झाली आहे. द्रविडनंतर व्ही व्ही एस लक्ष्मण, गौतम गंभीर, स्टिफन फ्लेमिंग आणि जस्टिन लँगर यांची नावे चर्चेत आहेत. या सर्वात स्टिफन फ्लेमिंगची दावेदारी मजबूत वाटत आहे. सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या स्टीफन फ्लेमिंगला (Stephen Fleming) राहुल द्रविडचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणून BCCI विचार करत आहे. स्टिफन फ्लेमिंगची चतुर बुद्धिमता, प्रशिक्षक म्हणून त्याचा दांडगा अनुभव हि त्याची जमेची बाजू आहे. परंतु त्याला 27 मे पर्यंत प्रशिक्षक पदासाठी अर्ज करावा लागेल.

फ्लेमिंगकडे दांडगा अनुभव – Stephen Fleming

रिपोर्टनुसार, 2009 पासून चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक असलेले फ्लेमिंग यांच्याकडे द्रविडच्या जागी योग्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. फ्लेमिंग भारतीय संघाचा कोच झाला तर त्यांच्या अनुभवामुळे भारतीय संघात मोठे बदल घडू शकतात असं बीसीसीआयला वाटत आहे. तसेच प्रशिक्षक पदाच्या प्रदीर्घ अनुभवामुळे कोणतीही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याचा अनुभव फ्लेमिंगकडे (Stephen Fleming) आहे. स्टीफन फ्लेमिंग 2009 पासून चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांनी चार वर्षे बिग बॅशमध्ये मेलबर्न स्टार्सचे प्रशिक्षकपद भूषवले. CSK व्यतिरिक्त, तो SA20 मध्ये Joburg सुपर किंग्ज आणि मेजर लीग क्रिकेटमध्ये टेक्सास सुपर किंग्जचा मुख्य प्रशिक्षक देखील आहे. या दोन्हीही CSK च्याच फ्रँचायझी आहेत. याशिवाय द हंड्रेडमध्ये तो सदर्न ब्रेव्हचा मुख्य प्रशिक्षकही आहे. एकूणच पाहता कोचिंगचा मोठा अनुभव असून तो टीम इंडियाच्या कामी पडेल.

गंभीर, लक्ष्मणचाही पर्याय –

स्टीफन फ्लेमिंग शिवाय, गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि जस्टिन लँगर यांचीही नावे आघाडीवर आहेत. लक्ष्मण गेल्या तीन वर्षांपासून एनसीएचे प्रमुख म्हणून काम करत आहे. भारत अ आणि अंडर-19 संघही त्याच्या देखरेखीखाली आहेत. द्रविडच्या अनुपस्थितीत त्याने भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचीही भूमिका बजावली आहे. तर दुसरीकडे गौतम गंभीर सुद्धा चांगला पर्याय आहे. आपल्या नेतृत्वाखाली त्याने कोलकात्याला दोनदा आयपीएल चॅम्पियन बनवले होते आणि मागील दोन हंगामात लखनौला प्लेऑफमध्ये नेले. गंभीरचे व्यवस्थापन कौशल्य उत्कृष्ट आहे. आताही त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सचा संघ दमदार कामगिरी करत आहे.

Rakhi Sawant Hospitalised : राखी सावंत रुग्णालयात दाखल; हृदयासंदर्भांत आजाराने ग्रस्त

Rakhi Sawant Hospitalised

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन राखी सावंत हिची प्रकृती खालावली आहे. राखीला हृदयासंदर्भांत आजारामुळे रुग्णालयात दाखल (Rakhi Sawant Hospitalised) करण्यात आले आहे. राखी सावंतचे रुग्णालयातील फोटो सुद्धा व्हायरल झाले असून तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

हृदयाशी संबंधित त्रास- (Rakhi Sawant Hospitalised)

Viral bhayani ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राखी सावंतचे फोटो शेअर केले आहेत. तुम्ही या फोटो मध्ये पाहू शकता कि राखी सावंत रुग्णालयात दाखल असून बेडवर झोपलेली दिसत आहे. काही फोटोंमध्ये तिच्या हातावर सलाईन लावलेलं दिसत आहे. एका फोटोमध्ये नर्स तिचं बीपी चेक करताना दिसत आहे. राखी सावंतला हृदयाशी संबंधित त्रास जाणवत असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल (Rakhi Sawant Hospitalised) करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांकडून अद्याप राखी सावंतच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही असे Viral bhayani ने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मध्यंतरी तिचा पती आदिल खानसोबतच वाद आणि घटस्फोट हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आदिल खानने भिनेत्री सोमी खानसोबत लग्न केल्यानंतर चर्चाना उधाण आलं होते. त्यानंतर राखी सावंत तिचा आधीच पती रितेशसोबत दिसू लागली आहे. सध्या ती त्याच्यासोबत मुंबईत स्पॉट होत आहे. पण याच दरम्यान आता तिला रुग्णालयात अचानकपणे दाखल करण्यात आल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राखी लवकरात लवकर बरी व्हावी अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत.

Reasons for Blood Sugar Spike | केवळ साखरेमुळेच नाही, तर ‘या’ वाईट सवयींमुळे वाढते रक्तातील साखर

Reasons for Blood Sugar Spike

Reasons for Blood Sugar Spike | आजकाल लोकांना रक्तातील साखर होण्याचा त्रास वाढला आहे. त्यामुळे मधुमेहासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. लोकांना वाटते की जास्त साखर किंवा तांदूळ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. आपल्या आहारात किरकोळ बदल केल्याने, लोक आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते, असे सल्याने वाटते. परंतु आहाराव्यतिरिक्त, इतर अनेक कारणे आहेत ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. (Reasons for Blood Sugar Spike) तुमच्या काही सवयी देखील तुमच्या रक्तातील साखर वाढवतात, पण नकळत आपण त्या सवयींकडे तितकेसे लक्ष देत नाही.

नाश्ता न करणे | Reasons for Blood Sugar Spike

रोज सकाळी नाश्ता न केल्याने कॉर्टिसोलची पातळी वाढून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील वाढते. कॉर्टिसोल एक ग्लुकोकॉर्टिकोइड हार्मोन आहे, एक तणाव संप्रेरक देखील आहे, जो प्रथिनांना ग्लुकोजमध्ये रूपांतरित करतो.

नाष्टात कॉफी पिणे

नाश्त्यात कॉफीचे सेवन केल्याने कोर्टिसोलची पातळी वाढते. नाश्ता करण्यापूर्वी कॉफी पिणे कोणत्याही प्रकारे फायदेशीर नाही. कॉफी प्यायल्याने भूक कमी होते. न्याहारीमध्ये याचे सेवन केल्याने खऱ्या नाश्त्याला आणखी विलंब होऊ शकतो, ज्यामुळे शरीराच्या सर्कॅडियन लय किंवा शरीराच्या घड्याळावर परिणाम होतो. यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू लागते.

सूर्य न पाहणे

सकाळी उगवत्या सूर्याकडे पाहून शरीराचे सर्कॅडियन चक्र हळूहळू सुरू होते आणि कोर्टिसोलची पातळीही सुरळीत वाढते. त्याच वेळी, कॉफी प्यायल्याने ही पातळी अचानक वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. सूर्योदयामध्ये भरपूर लाल प्रकाश असतो, ज्यामुळे पेशींचे माइटोकॉन्ड्रिया ग्लुकोज जलद वापरतात आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते.

खाल्यावर लगेच झोपणे

जसजसा दिवस पुढे जातो तसतशी इन्सुलिनची संवेदनशीलता बिघडते. याचा अर्थ असा आहे की आपल्या रक्तातील साखरेची प्रतिक्रिया सकाळपासून रात्रीपर्यंत खराब होते, विशेषत: दिवस जसजसा वाढत जातो. त्यामुळे सूर्यास्त होताच इन्सुलिनची काम करण्याची क्षमताही कमी होऊ लागते हे समजून घेतले पाहिजे. अशा स्थितीत झोपण्यापूर्वी लगेच खाल्ल्याने इन्सुलिन वाढते.

झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम जास्त असणे

निळ्या प्रकाशामुळे कोर्टिसोलची पातळी वाढते. लॅपटॉप, टीव्ही किंवा मोबाईल यांसारख्या रात्री झोपण्यापूर्वी वापरल्या जाणाऱ्या जवळपास सर्व स्क्रीनवर निळा प्रकाश असतो. या प्रकाशामुळे कॉर्टिसोलसोबत रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनची पातळीही वाढते.

Brussels Sprout Farming | ‘या’ परदेशी भाजीची लागवड केल्यास होईल बंपर कमाई, अशाप्रकारे करा शेती

Brussels Sprout Farming

Brussels Sprout Farming | आपल्या देशात परदेशी भाज्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. त्यामुळे परदेशी भाजीची मागणी देखील वाढत चाललेली आहे. कारण भारतात अनेक पर्यटक येतात. त्यांच्या आवडीनुसार हॉटेल्समध्ये परदेशी भाज्यांची मागणी वाढत आहे. या परदेशी भाषा इतर भाज्यांच्या दराने जास्त विकल्या जातात. ब्रूसेल स्प्राऊट (Brussels Sprout Farming) हे देखील भाजी मोठ्या प्रमाणात विकली जाते. ही कोबी सारखी दिसणारी भाजी आहे. तिचे लहान शेंडे वाढत्या देठासह बाहेर पडतात आणि कोबीसारखे दिसतात. हे पीक मध्यम आणि उंच डोंगराळ भागात चांगले वाढते. शेतकरी आता हा परदेशी भाजीपाला पिकवून चांगले पैसे देखील कमवू शकतात.

या भाज्या थंड तापमानात पिकवल्या जातात. परदेशी भाजीपाला पिकवण्यासाठी डोंगराळ भागात चांगले वातावरण आहे. देशाच्या इतर भागात या भाज्यांची लागवड हिवाळ्यात केली जाते आणि डिसेंबर-जानेवारीपर्यंत त्यांचे उत्पादन होते. डोंगराळ भागात परदेशी भाजीपाला वर्षातून दोनदा मार्च-जून आणि जुलै-ऑक्टोबरमध्ये घेता येतो. मार्चमध्ये घेतलेले पीक हंगाम बंद असल्याने शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो.

ब्रसेल्स स्प्राउट्सच्या सुधारित जाती | Brussels Sprout Farming

हे कोबी भाजीपाला पीक आहे. त्याचे लहान शेंडे वाढत्या देठांसह बाहेर पडतात. हे डोके लहान कोबीसारखे असतात. हे पीक मध्यम आणि उंच डोंगराळ भागात वाढण्यास चांगले आहे. प्रथम या फळाची रोपवाटिका तयार करून 4 ते 5 आठवड्यांची रोपे लावली जातात. त्याच्या सुधारित जातींमध्ये हिल्गे आयडियल आणि रुबेन यांचा समावेश होतो.

खत

ICAR नुसार, शेत तयार केल्यानंतर शेणखत, सुपर फॉस्फेट आणि पोटॅशची संपूर्ण मात्रा आणि युरियाची एक तृतीयांश मात्रा शेतात टाकावी आणि उर्वरित एक महिन्यानंतर शेतात टाकावी. या पिकासाठी प्रथम रोपवाटिका तयार केली जाते आणि त्याची ४ ते ५ आठवडे जुनी रोपे तयार शेतात लावली जातात.

ब्रुसेल्स स्प्राउट लागवडीची पद्धत

पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत किमान एकदा तण काढणे आणि तण काढणे आवश्यक आहे, यामुळे माती मोकळी होते आणि देठांना पुरेशी हवा मिळते. याद्वारे तणांचे नियंत्रण करता येते. एक आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे. हे पीक जमिनीच्या आंबटपणाला संवेदनशील आहे. त्यामुळे पिकामध्ये अनेक प्रकारचे विकार निर्माण होतात. हे विकार टाळण्यासाठी चुना टाकणे फायदेशीर ठरते.

पीक कापणी आणि उत्पन्न

जेव्हा स्पाउट्स अंदाजे 3-4 सेमी गोलाकार होतात तेव्हा ते स्टेममधून बाहेर काढले जातात. त्याचे सरासरी उत्पादन 100 ते 150 क्विंटल प्रति हेक्टर (8-12 क्विंटल प्रति बिघा) आहे.