Friday, December 19, 2025
Home Blog Page 759

Vande Bharat Express : अहमदाबाद-मुंबई वंदे भारत ट्रेन तिसऱ्या रूटसाठी सज्ज, घेण्यात आली ट्रायल रन

vande bhart express

Vande Bharat Express : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी असलेला प्रकल्प म्हणजे अहमदाबाद-मुंबई रेल्वे मार्ग. या मार्गावरील तिसरा टप्पा आता सज्ज झाला असून मुंबई अहमदाबाद मार्गावरील तिसऱ्या वंदे भारत ट्रेनच्या अंतिम चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. शुक्रवारी याची ट्रायल रन झाली.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार नवीन वंदे भारत ट्रेनने ऊर्जा कार्यक्षमता, प्रवासी सुविधा आणि सुरक्षितता वैशिष्ट्यांच्या बाबतीत सुसज्ज आहे. नवी दिल्ली-वाराणसी आणि नवी दिल्ली-कटरा यासारख्या इतर मार्गांवर धावणाऱ्या (Vande Bharat Express) सध्याच्या वंदे भारत ट्रेनच्या तुलनेत, नवी रेल्वे प्रवासाचा उत्तम अनुभव देईल.

प्रवासाचा वेळ होणार कमी (Vande Bharat Express)

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील नवीन वंदे भारत ट्रेनचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रवासाच्या वेळेत होणारी लक्षणीय घट. प्रवासी त्यांच्या प्रवासात अंदाजे 45 मिनिटे वाचू शकतात, ज्याला साधारणतः 5 तास आणि 25 मिनिटे लागतात. नवीन डिझाईन केलेल्या रेकमध्ये चांगली प्रवेग/मंदीकरण क्षमता आहे, जी पूर्वीच्या 145 सेकंदांच्या तुलनेत केवळ 140 सेकंदात 160 किमी प्रतितास वेगाने पोहोचण्यास सक्षम (Vande Bharat Express) असेल.

या’ गाड्यांचा समावेश (Vande Bharat Express)

मुंबई आणि अहमदाबादला जोडणाऱ्या सुमारे ५० हून अधिक गाड्या आहेत ज्यात वंदे भारत, तेजस आणि शताब्दी एक्स्प्रेस सारख्या प्रसिद्ध गाड्यांचा समावेश आहे. सध्या लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबई सेंट्रल-बोरिवली मार्गावर ताशी 100 किमी आणि बोरिवली-विरार मार्गावर 110 किमी प्रतितास या वेगाने धावू शकतात. या गाड्या विरार ते अहमदाबादचा वेग वाढवू शकतात. नवीन निळी आणि पांढरी ट्रेन एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारने (Vande Bharat Express) सुसज्ज असेल

कसे असेल ​​वेळापत्रक ? (Vande Bharat Express)

या मार्गावरील इतर वंदे भारत गाड्यांप्रमाणे ही ट्रेन देखील रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावू शकते.

ट्रेन क्रमांक 22962 अहमदाबाद – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस अहमदाबादहून 06:10 वाजता सुटते आणि 11:35 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचते. मुंबई सेंट्रलला सकाळी 11.35 वाजता पोहोचण्यापूर्वी ट्रेन वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली सारख्या काही स्थानकांवर थांबेल.

त्या बदल्यात, ट्रेन क्रमांक 22961 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस मुंबई सेंट्रल येथून 15:55 वाजता सुटेल आणि अहमदाबादला 21:25 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात दोन्ही दिशांना वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली स्थानकावर गाडी थांबेल.

या स्थानकांवर घेईल थांबे (Vande Bharat Express)

अहदाबाद,वडोदरा,सूरत,वापी,बोरीवली,मुंबई सेंट्रल

Best Tourist Places In Pune : लॉन्ग विकेंडसाठी जायचंय? तर पुण्याजवळील ‘या’ सुंदर ठिकाणांना जरूर भेट द्या, प्रेमातच पडाल

Best Tourist Places In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Tourist Places In Pune) कधीतरी कुठेतरी लांब मस्त शांत ठिकाणी फिरायला जाण्याचा मूड होतो. पण पुन्हा आठवतात ती रोजची घरातली काम, ऑफिसचा वर्क लोड आणि बरंच काही.. ज्यामुळे शांत झोप सुद्धा लागत नाही. मग कधीतरी खरोखर एखादा विकेंड प्लॅन करायला काय हरकत आहे? खूप लांब नाही पण खूप जवळही नको, निसर्गाच्या सानिध्यात आणि मनाला शांत वाटेल अशा ठिकाणी जायचं असेल तर बेस्ट लोकेशन निवडावं लागत. आता ते कसं शोधायचं? याचा कंटाळा म्हणून बऱ्याचदा विकेंड प्लॅन कॅन्सल होतात.

पण आता तुम्हाला विकेंड प्लॅन कॅन्सल करायची गरज नाही. इतकंच काय बेस्ट लोकेशन शोधायला वेबसाईट ढुंढाळायचीसुद्धा गरज नाही. (Best Tourist Places In Pune) कारण आज आम्ही तुम्हाला पुण्याच्या आसपास असणारी काही भन्नाट लोकेशन्स सांगणार आहोत. जे लाँग वीकेंडसाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरतील. भोवताली हिरवा निसर्ग, अंगावर शहारा आणणारी थंडी आणि अप्रतिम खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी हे एकदम कमाल स्पॉट्स आहेत. आता हे स्पॉट्स नेमके कोणते? याविषयी पटकन जाणून घेऊया.

1. खंडाळा

पुण्याच्या अगदी जवळ असणारं खंडाळा हे एक थंड हवेचं सुंदर असं ठिकाण आहे. (Best Tourist Places In Pune) हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक असून पुण्यापासून सुमारे ६९ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी फिरण्यासारखे अनेक स्पॉट्स आहेत. जे एक्स्प्लोर करताना निसर्गाचा सुंदर अनुभव घेणे तुमच्यासाठी फारच सुखद ठरेल. येथे ‘टायगर लीप’ नावाचे व्हिज्युअल स्पॉट आहे. शिवाय फिरण्यासारखे इतरही अनेक स्पॉट्स आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक इथे आवर्जून येतात. खंडाळ्यातील धुकं आणि सुंदर निसर्ग तसेच आल्हाददायक वातावरण तुमच्या विकेंडला कमाल बनवेल.

2. लोणावळा (Best Tourist Places In Pune)

मुंबईकर आणि पुणेकर अगदी आवर्जून जातात असे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे लोणावळा. लोणावळा हे पुण्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असल्यामुळे इथे लॉन्ग विकेंड काय शॉर्ट विकेंडसुद्धा अगदी सहज एन्जॉय करता येईल. लोणावळ्याजवळ फिरण्यासारखे अनेक स्पॉट्स आहेत/ जे तुम्हाला अगदी प्रेमात पाडतील. सुंदर निसर्ग, आल्हाददायी वातावरण, शुभ्र धुक्याची चादर आणि गुलाबी थंडी तुमचा मूड एकदम फ्रेश करेल. येथील टायगर पॉईंट, लॉयन पॉईंट पाहण्यासारखे आहेत. शिवाय येथे खूप उत्तम रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळे लोणावळ्यात जाणे आणि स्टे करणे तुमच्या विकेंडचा एक सर्वोत्तम भाग ठरेल.

3. वाई

पुण्यापासून सुमारे ८५ किलोमीटर अंतरावर असलेले वाई हे कृष्णा नदीजवळ वसलेले अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक वारसा लाभला असून येथे अनेक सुंदर मंदिरे आहेत. (Best Tourist Places In Pune) वाईचा शांत परिसर, मनाला भुरळ घालणारा मनमोहक निसर्ग आणि आल्हाददायी वातावरण तुमच्या विकेंडला फ्रेशनेस देईल. इथली हिरवळ पाहून मन प्रसन्न होईलच. शिवाय पुणे ते वाई प्रवास करताना एक मस्त लॉन्ग ड्राइव्ह होईल. मुख्य रस्ता घाटातून जात असल्यामुळे निसर्गाचा अनोखा फील घेण्याची ही संधी अजिबात सोडू नका.

4. कामशेत

जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि त्यासोबत ट्रेकिंगची सुद्धा आवड असेल तर मात्र तुम्ही पुण्यातील कामशेत या सुंदर ठिकाणाला भेट द्यायलाच हवी. कामशेत हे महाराष्ट्राचे पॅराग्लायडिंग हब म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक इथे पॅराग्लायडिंग करण्यासाठी येतात. हे ठिकाण पुण्यापासून सुमारे ४८ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी प्राचीन पर्वत, किल्ले, पुरातन मंदिरे (कोंडेश्वर मंदिर, विदेशेश्वर मंदिर, कार्ला, भाजा गुहा) पाहण्यासारखे आहेत. (Best Tourist Places In Pune) त्यामुळे विकेंड एन्जॉय करायचा असेल तर कामशेतला जरूर जा.

ICMR Guidelines : आता गृहिणींना बदलावी लागणार जेवणाची पद्धत; ICMR कडून मार्गदर्शक सूचना जारी

ICMR Guidelines : आपले आरोग्य हे पूर्णपणे आपण घेत असलेल्या अन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण चांगला आहार घेतला तर आरोग्यही चांगले राहते यात शंका नाही. मात्र हल्लीच्या काळात मात्र जीवनशैली बदलल्यामुळे अन्नपदार्थ बनवण्याची पद्धत तसेच त्याची प्रक्रिया देखील बदलत चालली आहे. त्यामुळे त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. म्हणूनच ICMR ने आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. चला जाणून घेऊया…

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR Guidelines) च्या अहवालात असे समोर आले आहे की भारतातील 56.4 टक्के आजारांचे कारण अन्नाशी संबंधित चुका आहेत.ICMR ने 17 आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ICMR अंतर्गत कार्यरत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) म्हणते की निरोगी आहार आणि शारीरिक हालचालींद्वारे कोरोनरी हृदयरोग आणि उच्च रक्तदाब टाळता येऊ शकतो.NIN म्हणते की जर तुम्ही तुमचा आहार योग्य ठेवला तर टाइप 2 मधुमेहाचा धोका 80 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

NIN ने या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहारासंबंधी इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत. वैज्ञानिक परिणाम, जीवनशैलीतील बदल, आजार आणि खाण्याच्या सवयी लक्षात घेऊन एनआयएनने या सूचना जारी केल्या आहेत. आरोग्य संस्थेचे म्हणणे आहे की लोकांनी कमी मीठ खाण्याची सवय लावावी. कमी साखर आणि अतिप्रक्रियायुक्त पदार्थांपासून दूरच राहावे आणि शक्य तितके शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहावे. निरोगी जीवनशैलीने आपण लठ्ठपणा टाळू शकतो. हा आहाराचा मसुदा ICMR-NIN च्या संचालक हेमलता आर यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांच्या समितीने (ICMR Guidelines) तयार केला आहे.

कसा असावा आहार ? (ICMR Guidelines)

एनआयएन च्या सूचनेनुसार लोकांनी संतुलित आहाराचे पालन केले पाहिजे ज्यामध्ये 45 टक्के कॅलरीज धान्यापासून, 15 टक्के कॅलरीज डाळी, बीन्स किंवा मांस यांमधून याव्यात आणि उर्वरित कॅलरीज काजू, भाज्या, फळे आणि दुधामधून घेता येतील. आरोग्य संस्थेचे म्हणणे आहे की, देशात डाळी आणि मांसाच्या चढ्या किमतींमुळे बहुतेक लोक कॅलरीजसाठी धान्यावर अवलंबून असतात.

काय आहेत आयसीएमआरच्या इतर मार्गदर्शक सूचना

  • प्रेशर कुकिंग- वाफेच्या दाबाखाली अन्नपदार्थ शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. या पद्धतीत अन्नातील विटामिन आणि मिनरल कमी होत नाहीत.
  • तळणे– या पद्धतीनं अन्नातील स्निग्धतेचं प्रमाण वाढू शकतं. ज्यामुळं हृदयविकारांचा धोका बळावतो. त्यामुळं शक्यतो ही सवय टाळा.
  • उकडणे आणि वाफवणे- या पद्धतीमध्ये पदार्थातील पाणी शोषून ठेवणारे घटक स्थित राहून ते पदार्थ अधिक पोषक करतात.
  • मायक्रोवेवचा वापर – किमान वेळात जेवण बनवणाऱ्या या पद्धतीमध्ये पोषक तत्त्वंही नष्ट होत (ICMR Guidelines) नाहीत.

जेवण बनवताना योग्य भांड्यांचा वापर (ICMR Guidelines)

स्वयंपाक करीत असताना आपण ज्या भांड्यांमध्ये जेवण बनवत असतो टी भांडी देखील महत्वाची आहेत. कारण जेवण बनवत असताना हीटिंग प्रोसेस होत असते. म्हणून भांड्यांकरिता देखील मार्गदर्शक तत्वे जरी करण्यात आली आहेत. (ICMR Guidelines)

  • ग्रेनाईट अथवा दगडाची भांडी– ही भांडी नॉनस्टीकच्या तुलनेत अधिक सुरक्षित समजली जातात. फक्त त्यावर रसायनांचा थर नाही, याची मात्र काळजी घ्यावी.
  • टेफ्लॉनचा थर असणारी नॉनस्टीक भांडी– या भांड्यांमध्ये जेवण करत असताना ती मोठ्या आचेवर न ठेवता त्यातून धूर निघणार नाही याची काळजी घ्या.
  • धातू आणि स्टेनलेस स्टील- या प्रकारच्या भांड्यांमध्ये जेवण बनवणं अतिशय सुरक्षिकत असतं.
  • मातीची भांडी – अन्नपदार्थांच्या चवीसोबतच त्यातील पोषक तत्त्वं वाढवण्यासाठीसुद्धा मातीची भांडी फायदेशीर ठरतात. पण, त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेतली जाणं तितकंच महत्त्वाचं.

देवपूजा करण्याची योग्य वेळ कोणती असते? ती करताना कोणते नियम पाळावेत? जाणून घ्या

Devpuja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंदू धर्मामध्ये दैनंदिन दिनचर्येत देवपूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की, दररोज देवपूजा केल्याने मानसिक शांती मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. त्याचबरोबर, दररोज देवपूजा केल्यामुळे घरामध्ये कोणतीही सकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. परंतु या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी देवपूजा ही योग्य वेळेत आणि नियमानुसार करण्याची आवश्यकता असते. त्यासाठीच हे नियम आणि देवपूजेची योग्य वेळ आपल्याला माहीत असायला हवी.

देवपूजेची योग्य वेळ

ज्योतिषाच्या मते, सकाळ असो संध्याकाळ देव पूजेची वेळ कायम लक्षात ठेवली पाहिजे. हिंदू धर्मात देवी-देवतांची दिवसातून पाच वेळा पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते. परंतु, इतर कामकाजांमुळे हिंदू कुटुंबांमध्ये देवपूजा दोनच वेळा केली जाते. ही देवपूजा ब्रह्म मुहूर्तावर सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत करावी. तसेच संध्याकाळी, सूर्यास्ताच्या एक तास आधीपासून आणि सूर्यास्तानंतर एक तासापर्यंतची वेळ देवपूजेसाठी योग्य मानले जाते.

देवपूजा करताना हे नियम पाळावी

असे म्हणतात की, संध्याकाळची पूजा रात्रीच्या वेळी कधीही करू नये. असे केल्याने देवांचा कोप होतो. ज्यामुळे आर्थिक संकट येऊ शकते. संध्याकाळच्या पूजेच्या वेळी देवाला फुले अर्पण करणे टाळावे. शास्त्रानुसार संध्याकाळी फुले तोडणे शुभ नाही. असे केल्याने जीवनात वाईट परिणाम होऊ शकतात. हिंदू धर्मात तुळशीच्या पानांचा पूजा किंवा विधीमध्ये वापर करणे खूप शुभ मानले जाते, परंतु तुळशीची पाने संध्याकाळी तोडू नयेत किंवा संध्याकाळच्या पूजेमध्ये तुळशीची पाने वापरू नयेत.

Kalonji Seeds Benefits : गंभीर आजार बरे करू शकते ‘ही’ काळी बी; पोषक गुणधर्मांमूळे ठरते आरोग्यदायी

Kalonji Seeds Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kalonji Seeds Benefits) आपल्या दैनंदिन जीवनात आपण बरेच पदार्थ खात असतो. पण ते सगळेच आरोग्यदायी असतील असे काही सांगता येत नाही. एखाद्या पदार्थाची चव, रंग, रूप तो आरोग्यासाठी चांगला की वाईट हे ठरवू शकत नाही. तर त्या पदार्थात असणारे गुणधर्म हे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचे आहेत हे त्या पदार्थाला आरोग्यदायी सिद्ध करते. अशाच एका पदार्थांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. हा पदार्थ जवळपास प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात असतो. ज्याचा आकार लहान आणि रंग काळा असला तरीही आरोग्यदायी गुणधर्मांमुळे हा पदार्थ आयुर्वेदातही महत्वाच्या स्थानावर आहे. हा पदार्थ म्हणजे कलोंजी.

कलोंजी म्हणजे काय? (Kalonji Seeds Benefits)

कलोंजीला इंग्रजीत ‘ब्लॅक सीड्स’ किंवा ‘नायजेला सीड्स’ असे म्हणतात. या पदार्थाचे वैज्ञानिक नाव नायजेला सॅटिवा असे आहे. आयुर्वेदात हा पदार्थ गेल्या अनेक शतकांपासून औषधी बनवण्यासाठी वापरला जात आहे. या पदार्थाचे सेवन केल्यास शरीरात लपलेल्या व्याधी आणि आजार दूर होतात. अर्थात आकाराने लहान रंगाने काळा असा हा पदार्थ स्वतःच एक औषध आहे. त्याचे सेवन केल्यास बरेच आजार दूर पळून जातात. यासाठी कलोंजीचे सेवन कसे करावे आणि त्याचे फायदे काय ते जाणून घेऊया.

असे करा कलोंजीचे सेवन

आरोग्यदायी फायद्यांसाठी १/२ चमचा कलोंजी १ चमचा मधात मिसळून सेवन करता येईल. (Kalonji Seeds Benefits) याशिवाय १ कप गरम पाण्यात कलोंजीच्या १/२ चमचा बिया भिजवूनदेखील त्याचे सेवन करता येईल. तसेच विविध भाज्यांमध्येदेखील या बिया घालून त्यांचे सेवन करणे लाभदायी ठरेल. अगदी सॅलडमध्येसुद्धा कलोंजी मिसळून खाता येईल. कलोंजीचे सेवन केल्यास मिळणारे फायदे खालीलप्रमाणे:-

1. उच्च रक्तदाबावर नियंत्रण

कलोंजीचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित करता येतो. वास्तविक हा पदार्थ शरीरात लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून काम करतो. ज्यामुळे मज्जासंस्थेची अतिक्रियाशीलता कमी होते आणि परिणामी उच्च रक्तदाबाची पातळी कमी होण्यास मदत होते. परंतु काही प्रकरणांमध्ये याचे सेवन करण्याआधी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. (Kalonji Seeds Benefits)

2. मधुमेहावर प्रभावी

शरीरात साखरेची पातळी कमी करण्यासाठी कलोंजीच्या बियांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. (Kalonji Seeds Benefits) त्यामुळे ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी कलोंजीचे सेवन केल्यास रुग्णांच्या शरीरातील इन्सुलिनची प्रक्रिया सुधारू शकते.

3. दम्यावर परिणामकारक

कलोंजीचे सेवन केल्यास ब्रॉन्किओल्स उघडतात. ब्रॉन्किओल्स म्हणजे फुफ्फुसांमध्ये पसरलेल्या लहान नळ्या. ज्यातून फुफ्फुसाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हवा जाते. जेव्हा ब्रॉन्किओल्स उघडले जातात तेव्हा श्वासोच्छवास सामान्य होतो आणि दम्यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. मात्र याचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

4. संसर्गापासून सुरक्षा (Kalonji Seeds Benefits)

जे लोक सतत आजारी पडतात अशा लोकांनी आपल्या आहारात आवर्जून कलोंजी खावी. यातील औषधी घटक संसर्गापासून बचाव करतात. यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे संसर्गजन्य रोगांपासून सुरक्षा मिळते.

5. अ‍ॅलर्जीपासून सुटका

कलोंजीतीळ अँटी बॅक्टेरियल गुणधर्म अ‍ॅलर्जी दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. त्यामुळे जर तुम्हीही एखाद्या अ‍ॅलर्जीने हैराण असाल तर कलोंजीचे सेवन जरूर करा. पण त्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. (Kalonji Seeds Benefits)

Internet Usage : काय सांगता? मानसिक आरोग्यासाठी INTERNET ठरतं फायदेशीर; संशोधनातून धक्कादायक खुलासा

Internet Usage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Internet Usage) एक अशी वेळ होती जेव्हा जगभरातील माणसाची मूलभूत गरज केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा होती. पण आज अब्जावधी लोकांसाठी मूलभूत गरजांमध्ये इंटरनेटचा समावेश झाला आहे. अनेकांची सकाळ चहा आणि इंटरनेटसोबत होते. बरेच लोक वर्क फ्रॉम करतात. त्यांच्यासाठी तर उत्पन्न सुद्धा इंटरनेटवर आधारलेलं आहे. त्यामुळे एकंदरच काय तर आत्ताच्या घडीला टाईमपास असो किंवा काम.. इंटरनेट गरज झाला आहे. पण काही लोकांना मात्र इंटरनेटचं जणू व्यसन लागलं आहे.

असं म्हणतात, इंटरनेटचा अतिवापर मानसिक आरोग्याला हानी पोहचवतो. (Internet Usage) पण नुकत्याच समोर एका संशोधनानुसार, इंटरनेटमूळे हृदयाचे तसेच मेंदूचे आरोग्य सुधारते असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

संशोधनातून धक्कादायक खुलासा

एकीकडे इंटरनेटच्या अतिवापराने मानसिक आरोग्य खराब होते असे म्हटले जाते. तर दुसरीकडे काही संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, इंटरनेट लोकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. (Internet Usage) एका नव्या अभ्यासात असे उघड झाले आहे की, इंटरनेट माणसाच्या समाधानाची पातळी सुधारू शकते. ज्यामुळे साहजिक ताण तणाव कमी होतो. याचा फायदा आरोग्य सुधारणेसाठी होतो. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिट्यूटने केलेल्या संशोधनात अशी माहिती उघड झाल्याचे एका वृत्तात म्हटले आहे.

रिसर्च रिपोर्टनुसार…

युनिव्हर्सिटीच्या काही तज्ञांनी केलेल्या अभ्यासात असे समजले की, इंटरनेटचा वापर केल्याने लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक फायदा होत आहे. (Internet Usage) यासाठी २००६ ते २१ या कालावधीत १६८ देशांतील २ दशलक्षाहून अधिक लोकांनी केलेला इंटरनेटचा वापर या माहितीचा आधार घेण्यात आला आहे.

इंटरनेटचे धक्कादायक आरोग्यदायी फायदे (Internet Usage)

1. संशोधकांच्या मते, जे लोक इंटरनेटचा वापर करतात त्यांची मानसिक स्थिती इंटरनेट वापरत नसलेल्या लोकांपेक्षा चांगली आहे.

2. इंटरनेट वापरकर्ते आपल्या जीवनात इतरांपेक्षा थोडे अधिक समाधानी आहेत.

3. इंटरनेट वापरल्याने मानसिक ताण तणाव कमी राहतो असे समोर आले आहे.

4. इंटरनेटच्या वापराने आत्मिक शांतता मिळते आणि त्यामुळे हायपर टेन्शनची समस्या दूर होऊ शकते, असेही यात समोर आले आहे. (Internet Usage)

इंटरनेटचा आरोग्यासाठी बराच चांगला फायदा होत असला तरीही अतिरेक हा वाईट असतो हे विसरून चालणार नाही. त्यामुळे इंटरनेटच्या वापराचे केवळ सकारात्मक नव्हे तर काही प्रमाणात नकारात्मक परिणाम देखील या अभ्यासातून समोर आले आहेत. ते कोणते जाणून घेऊया.

इंटरनेटचे नकारात्मक परिणाम

या संशोधनातून इंटरनेटच्या फायद्यांसोबत काही प्रमाणात तोटेदेखील समोर आले आहेत. त्यानुसार तज्ञांनी म्हटले की,

1. इंटरनेट वापरताना अधिक वेळ स्क्रीनवर नियंत्रण ठेवल्याने डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे डोळ्यांना कोरडेपणा, दृष्टीदोष, डोळ्यांची जळजळ अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. (Internet Usage)

2. तसेच काही प्रकरणात इंटरनेटच्या माध्यमातून केला जाणारा सोशल मीडियाचा अतिवापर मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

Viral Video : खतरनाक… ! चक्क डिझेलमध्ये तळाला पराठा ? नेटिझन्सनी दिली संतप्त प्रतिक्रिया

Viral Video : भारतामध्ये फुडीजची काहीच कमी नाही, सोशलमिडीयावर सुद्धा खाद्यपदार्थांबाबत दररोज नवनवे व्हिडीओज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओज पाहून अशा लज्जतदार डिश कधी एकदा ट्राय करिन असे होत असेल. मात्र सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहूनच तुमच्या तोंडाची चव गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एव्हाना पनीर पराठा, मेथी पराठा , असे पराठ्याचे बरेच प्रकार पहिले आणि ट्राय केले असतील. पण तुम्ही कधी डिझेल पराठा ऐकलंय काय ? पण, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या संबंधीच्या व्हिडिओने (Viral Video) सर्वांनाच हादरवले आहे.

नक्की काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

फूड ब्लॉगरचा दावा आहे की ती व्यक्ती डिझेलमध्ये पराठे बनवत आहे. या व्हिडीओ मध्ये फूड ब्लॉगर सांगतो की, लोक इथे मोठ्या उत्साहाने जेवायला येतात. यावर पराठा बनवणारा तरुण म्हणतो की, तुम्हाला खायला मजा आली नाही तर पोलीस ठाण्यात तक्रार करा. पराठा बनवणारा तरुण सांगतो, की तो डिझेलमध्येे पराठा बनवत आहे. गेल्या ३५ वर्षांपासून तो डिझेल पराठा (Viral Video) बनवत असल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय विचार करा की लोक निरोगी राहण्यासाठी तेलकट पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवतात, अशा परिस्थितीत या ढाब्यावर तयार केलेला पराठा कोणी खाल्ले तर काय होईल?

ढाबा मालकावर कारवाईची मागणी

सोशल माडीयावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा डिझेल पराठा पाहून नेटिझन्सनी चिंता व्यक्त केली असून हा व्हिडिओ प्रथम X हँडल @nebula_world वर शेअर करण्यात आला होता, परंतु आता तो काढला गेला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले होते,’ पेट्रोल डिझेलसोबत पराठा. कॅन्सरची हीच खरी रेसिपी आहे’. व्हायरल झालेल्या क्लिपने (Viral Video) अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर संतप्त इंटरनेट वापरकर्त्यांनी FSSAI ला टॅग केले आणि संबंधित ढाबा मालकावर योग्य कारवाईची मागणी केली.

विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर; आयोगाचा मोठा निर्णय

Legislative Council

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 10 जूनला विधान परिषदेच्या (Legislative Council) मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागांसाठी निवडणुका पार पडणार होते. परंतु आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिक्षक मंडळाने केलेल्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निवडणुका नेमक्या कोणत्या तारखेला घेण्यात येतील, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यावर शिक्षक, पदवीधर संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. तसेच, या संघटनांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती की, “शाळांना सुट्टी असल्यामुळे त्याचा परिणाम थेट निवडणुकीवर होईल. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर निवडणुका घेण्यात याव्यात” या मागणीच्या आधारावरच आयोगाने अनिश्चित काळासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सध्या विलास पोतनीस हे मुबंई पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. कोकणात निरंजन डावखरे हे विद्यामान आमदार आहेत. यासह नाशिकच्या शिक्षक मतदार संघावर किशोरे दराडे विद्यमान आमदार आहेत. तसेच, कपिल पाटील हे मुंबई शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. या सर्वांचा विधान परिषदेचा कार्यकाळ 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. यामुळेच निवडणूक आयोगाने या चार जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली होती.

Zee Marathi New Serial : ‘लागिरं..’ फेम अभिनेत्याची नव्या मालिकेत वर्णी; प्रोमोमध्ये दिसली पहिली झलक

Zee Marathi New Serial

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zee Marathi New Serial) गेल्या काही काळात झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांनी एकामागे एक सलग प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर आता लवकरच झी मराठीवर नव्या मालिका सुरु होऊ लागल्या आहेत. अलीकडेच ‘झी मराठी’ वाहिनीने एका नव्या मालिकेची घोषणा केली. ज्या मालिकेचे नाव ‘लाखात एक आमचा दादा’ असे आहे. खास बाब अशी की, या मालिकेतून प्रेक्षकांच्या ओळखीचा एक जुना चेहरा नव्याने त्यांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. हा जुना चेहरा म्हणजे ‘लागिरं झालं जी..’ मालिकेतील आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण. नितीशच्या या नव्या मालिकेचा पहिला सुरू होतोय व्हायरल.

मालिकेचा प्रोमो (Zee Marathi New Serial)

झी मराठीच्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा पहिला प्रोमो अक्षय्य तृतीयेला रिलीज केला गेला. या पहिल्या प्रोमोत खंडेरायाच्या दर्शनाला आलेला एक युवक दिसतो. चांगभलं म्हणत त्याची पहिली झलक समोर येताच समजत की, मध्यवर्ती भूमिकेत अभिनेता नितीश चव्हाण आहे.

‘भक्त खंडोबाचा मर्द हा रांगडा, मनगट कणखर तरी मनाने हा भाबडा….’ अशी या नायकाची ओळख करून दिली जात आहे. अत्यंत वेगळ्या आणि दिलदार भूमिकेतून नितीश पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकही त्याच्या नव्या मालिकेबाबत उत्सुक आहेत.

दर्जेदार कथानक मिळणार प्रेक्षकांचं प्रेम

‘लाखात एक आमचा दादा’ ही नवी मालिका अत्यंत वेगळी आणि कौटुंबिक मालक असणार आहे. (Zee Marathi New Serial) प्रोमोमध्ये प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याची एंट्री झाल्यानंतर आता मध्यवर्ती भूमिकेत कोणती महिला कलाकार दिसणार याबाबत वेगळीच उत्सुकता आहे. शिवाय ‘आमचा दादा’ची झलक तर दिसली पण या दादाच्या बहिणी कोण असणार? याबाबत देखील चर्चा आहे. कथानकात दादा आणि त्याच्या चार बहिणी आपल्या भेटीस येत आहेत. त्यामुळे नितीश बरोबर पाहायला मिळणाऱ्या त्या चार बहिणी कोण असणार? हे पाहणं उत्कंठावर्धक आहे. अशातच या मालिकेत झळकणाऱ्या आणखी एका अभिनेत्याचा खुलासा झाला आहे.

‘लागिरं झालं जी..’ मधील आणखी एक अभिनेता झळकणार

या मालिकेत ‘लागिरं झालं जी’ फेम ‘टॅलेंट’ म्हणजेच अभिनेता महेश जाधवदेखील महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. यासंदर्भात त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत त्याने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा पहिला प्रोमो आणि त्यासोबत ‘गणपती बाप्पा मोरया…नवीन गोष्ट, नवीन सुरुवात’, असे लिहिले आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी महेशने उद्योग क्षेत्रात पदार्पण केलंय. (Zee Marathi New Serial) फलटणमध्ये त्याने स्वतःचा फूड ट्रक सुरू केला असून अभिनय क्षेत्रातील काम मात्र त्याने थांबवलेलं नाही.

निवडणुकीच्या काळात रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल; नेमके कारण काय??

Ravindra Dhangekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात कसब्याचे आमदार आणि पुणे मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन भाजपच्या विरोधात आंदोलन केले होते. याचवेळी बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी रवींद्र धंगेकर यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व गुन्हे कलम 143, 145, 149, 188, 135 आणि लोकप्रतिनीधी अधिनियम 1951 चे कलम 126 अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाचे म्हणजे, मतदानाच्या पूर्वी भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. याप्रकरणीच त्यांनी 12 मे रोजी सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन केले. या आंदोलनावेळी त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते ही पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी ठाण्यात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. ज्यामुळे गोंधळ निर्णय झाला. या सर्व प्रकारानंतर पुणे पोलिसांनी रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.