Friday, December 19, 2025
Home Blog Page 760

New Horror Show : झी वर सुरु होतेय HORROR मालिका; प्रोमो पाहून उडेल रात्रीची झोप, वाटेल भीती

New Horror Show

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Horror Show) छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा महत्वाचा भाग आहेत. रोजच्या आयुष्यात हलकं फुलकं मनोरंजन म्हणून अनेक लोक आवर्जून विविध मालिका पाहतात. त्यांपैकी बऱ्याच मालिका अत्यंत लोकप्रिय ठरतात. प्रत्येक प्रेक्षकांची आवड ही वेगवेगळी असते. त्यामुळे विविध जॉनरच्या मालिका कायम येत असतात. यामध्ये हॉरर अर्थात भयानक कंटेन्ट असलेल्या मालिकांना देखील चांगला प्रेक्षक मिळतो. जर तुम्हालाही हॉरर मालिका पाहण्यात रस असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच झी वर हॉरर मालिका येतेय/ जिचा प्रोमो अलीकडेच रिलीज झाला असून व्हायरल होतो आहे.

नवी Horror मालिका (New Horror Show)

नुकतीच ‘झी युवा’ने एका भयावह मालिकेची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ‘भीतीची छाया सगळीकडे पसरणार आणि तुमची रात्रीची झोप उडणार’. अशा थरकाप उडवणाऱ्या कथांनी अंगावर भीतीचा काटा उभा करणाऱ्या कंटेन्ट सोबत ही नवी मालिका ‘झी युवा’वर सुरू होणार आहे. याचा प्रोमो अलीकडेच ‘झी युवा’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अनेक भयावह दृश्य दिसत आहेत. जी पाहून प्रेक्षकांच्या लक्षात येईल की ही मालिका इतर मालिकांपेक्षा नक्कीच वेगळी आहे. या मालिकेचे नाव झी हॉरर शो ‘जशी आहे तशी’ असे आहे.

काय आहे प्रोमो मध्ये?

झी युवावर सुरु होणाऱ्या हॉरर शो ‘जशी आहे तशी’मध्ये अनेक भयावह कथा पहायला मिळणार असल्याचे या प्रोमोमध्ये सांगण्यात आले आहे. या प्रोमोमध्ये काही भयावह दृश्य दाखवण्यात आली आहेत. (New Horror Show)जी अंगावर काटा उभा करत आहेत.



जर प्रोमो इतका भयानक असू शकतो तर मालिका किती भयानक असू शकते याचा अंदाज येतो आहे. खास बाब अशी की, मालिकेच्या प्रोमोमध्ये ही मालिका हिंदीमध्ये असेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा एक वेगळा प्रयोग ठरणार आहे.

कधी सुरु होणार?

भय आणि थरकापाने अंगावर काटा उभा करणारी ही नवी मालिका लाडकी वाहिनी ‘झी युवा’वर सुरु होते आहे. येत्या २७ मे २०२४ पासून रात्री १० वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. (New Horror Show) या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी अनेक हॉरर मालिकांना चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ही मालिका देखील प्रेक्षकांचे मन जिंकेल अशी आशा आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

Sign Of Kidney Disease | ‘ही’ लक्षणे दिसत असतील तर सावधान !! तुमच्याही किडनीला असू शकते सूज

Sign Of Kidney Disease

Sign Of Kidney Disease | आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा खूप महत्त्वाचा असतो. परंतु किडनी ही आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा असा अवयव आहे. तुमच्या किडनीला जरा काही समस्या झाली, तर तुम्हाला अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. आपली किडनी (Sign Of Kidney Disease) ही आपल्या शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे काम करत असते. त्यामुळे आपले शरीर नेहमीच निरोगी राहते.

लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल किडनीच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. ज्यावेळी किडनी नीट काम करत नाही. त्यावेळी आपल्या शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. आपले शरीर हे आपल्याला काही संकेत देत असतात. त्यामुळे तुमच्या शरीरात जर अशी काही लक्षण दिसत असतील, तर आत्ताच सावध व्हा, कारण यामुळे तुमच्या किडनीला धोका असू शकतो.

सकाळी थंडी वाजणे | Sign Of Kidney Disease

सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त थंड वाटत असेल, तर हे तुमची किडनी खराब होण्याचे एक लक्षण असू शकते. हे कोणत्याही सीजनमध्ये होऊ शकते. अगदी उन्हाळ्यात जरी तुम्ही सकाळी लवकर उठला आणि सकाळी थंडी वाजत असेल, तरी देखील तुमच्या किडनीला समस्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टरांना भेटा आणि किडनीच्या टेस्ट करून घ्या.

लघवीतून फेस

लघवीतून जर फेस येत असेल तरी देखील तुमच्या किडणीला धोका असण्याची शक्यता आहे. लघवीचा रंग हलकासा पिवळा असेल, तर लघवीमध्ये प्रोटीनचा संकेत असतो. त्यामुळे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधा.

लघवी अडकत अडकत येणे

लघवीतून किडनी संबंधित अनेक समस्या जाणून घेता येतात. तुम्हाला किडनीची त्रास असेल, तर लघवी अत्यंत कमी येते किंवा सारखी सारखी लागते. अशी लक्षणे दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

शरीरात सूज | Sign Of Kidney Disease

अनेकदा आपल्याला आपला एखादा भाग सुजल्यासारखा वाटतो आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु हा एक किडनीचा खराब होण्याचा संकेत असू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर अशी काही समस्या जाणवत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

शरीरावर खाज

तुमच्या शरीरावर जर विनाकारण खाज जाणवत असेल, तर हे देखील किडनी खराब होण्याचे संकेत आहेत. हा संकेत प्रामुख्याने किडनी स्टोन किंवा शरीराशी संबंधित आजाराचा असू शकतो. त्यामुळे तुमच्या शरीरावर जर काही कारण नसताना सारखी खाज येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Government Subsidy | दूध व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार 75 टक्के अनुदान, असा घ्या लाभ

Government Subsidy

Government Subsidy | सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमी नवनवीन योजना आणत असतात शेतीशी निगडित व्यवसाय त्याचप्रमाणे शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक मदत व्हावी या कल्पनेतून सरकारने अनेक योजना राबवलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळते.

शेतकरी शेतीसोबत अनेक जोड व्यवसाय करत असतात. या सगळ्यात पशुसंवर्धन हा व्यवसाय प्रामुख्याने अनेक गावांमध्ये केला जातो. या व्यवसायाला शेतीच्या आणि दूध उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. त्यामुळे आता कृषी संवर्धन या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या जिल्हा परिषद आणि राज्यस्तरीय पशुवर्धन विभागाच्या माध्यमातून योजना राबवण्यात येतात. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान (Government Subsidy) देखील मिळते. या योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित तरुण आणि शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मदत होते. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाला 75 टक्के आणि सर्वसाधारण प्रवर्गांना 50% इतके अनुदान दिले जाते.

दुधाळ जनावरांवर मिळणार अनुदान | Government Subsidy

राज्य सरकाराने जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत अनुदानावर दुधाळ जनावरांना वाटप करण्यात येते. आणि या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला 75 टक्के व सर्वसाधारण गटाला 50 टक्के अनुदानाचा लाभ मिळतो.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करण्यात येतो. गाईच्या गटासाठी 75 टक्के म्हणजे 1 लाख 67 हजार 668 रुपये अनुदान दिले जाते. तर म्हशीच्या एका गटासाठी 1 लाख 34 हजार 443 रुपये एवढे अनुदान दिले जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता | Government Subsidy

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा जमातीतील असणे गरजेचे आहे.
  • लाभार्थी हा दारिद्र रेषेखाली असेल तर त्याला प्राधान्य दिले जाते.
  • अल्पभूधारक शेतकरी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना देखील या योजनेचा लाभ होतो.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?

या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला महाबीएमएस या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यानंतर पात्र उमेदवारांना दुधाळ जनावरांचा गट वाटप करण्यात येईल.

निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्ज प्लॅन्स महागणार; सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका

Mobile Recharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणूक (Loksabah Election) संपल्यानंतर कोट्यावधी मोबाईल युजर्स एक मोठा धक्का बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक संपताच टेलिकॉम कंपन्या मोबाइल टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेणार आहे. या किमतीत तब्बल 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाऊ शकते. या निर्णयामुळे कंपन्यांच्या महसूलात दुपटीने वाढ होईल. मात्र दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांना मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge Plans) करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.

ब्रोकरेज फर्म अ‍ॅक्सिस कॅपिटलने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, टेलिकॉम कंपन्यानी 5G सुविधेत मोठी गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे कंपन्या त्यांना अधिक नफा कसा होईल, याकडे लक्ष देत आहेत. याचाच एक भाग म्हणून कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढवण्याचा विचार करत आहेत. या किंमती फक्त शहरी नाही तर ग्रामीण भागातही वाढवल्या जातील. यात पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन पूर्वीच्या किंमतींपेक्षा अधिक महाग होऊ शकतात.

किती रुपयांनी रिचार्ज प्लॅन महागणार??

रिचार्ज प्लॅनच्या किंमती 25 टक्क्यांनी वाढल्यानंतर याचा सर्वसामान्यांना फटका बसेल. रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढल्यानंतर तुम्ही जर दरमहा 200 रुपयांचा रिचार्ज करत तर तुम्हाला पन्नास रुपये अधिक मोजावे लागतात. म्हणजे 240 साठी 250 रुपये भरावे लागतील. तसेच एक हजार रुपयांच्या रिचार्ज करता 250 रूपये अधिक मोजावे लागतील.

या नव्या अहवालानुसार, रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढल्यानंतर टेलिकॉम कंपनीच्या मूळ रिचार्जच्या किमतीही वाढवल्या जातील. यात एअरटेलच्या मूळ किमतीत 29 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. जिओमध्ये 26 रुपयांची वाढ केली जाऊ शकते. खरे तर, टेलिकॉम कंपन्यांनी वर्ष 2019 आणि 2023 या कालावधीमध्येच रिचार्ज प्लॅनमध्ये तिपटीने वाढ केली आहे. आता पुन्हा या किमती वाढवल्या जाणार आहेत.

Kitchen Tips : एक युनिक ट्रिक ! झटक्यात सोला किलोभर लसूण, वापरा ‘हा’ पांढरा पदार्थ

kitchen tips garlic 1

Kitchen Tips : स्वयंपाक रुचकर करायचा म्हंटल्यावर लसूण असायलाच हवा. रोजच्या जेवणापासून अगदी पार्टी मेन्यू मध्ये देखील जेवणाची लज्जत वाढवायला लसूण हवाच. पण लसूण सोलने म्हणजे वेळखाऊ आणि काटकटीचे काम. म्हणूनच आम्ही लसूण सोलण्यासाठीचे काही जबरदस्त फंडे सांगणार आहोत ज्याने लसणाचा 1 गड्डा काय किलोभर (Kitchen Tips) लसूण तुम्ही सहज सोलू शकाल. चला तर मग जाणून घेऊया…

शिवाय लसणामध्ये प्रोटीन्स, कार्ब्स, मँगनीज, विटामिन बी ६, विटामिन सी, सेलेनियम आणि फायबर असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच हाडांसाठी हे लसूण अतिशय फायदेशीर असतो. याशिवाय ज्यांना हृदय रोगाचा त्रास आहे त्यांच्यासाठी देखील लसूण हा फायदेशीर असतो.

गरम पॅनचा वापर (Kitchen Tips)

जर तुम्हाला लसूण झटपट सोलायचा असेल तर तो पॅनवर भाजून त्याची साल तुम्ही काढू शकता. यासाठी गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून भाजून घ्या. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवा. चार ते पाच मिनिटांसाठी लसणाच्या पाकळ्या भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर हलक्या हाताने लसणाच्या पाकळ्या सोला या ट्रिक मुळे काही मिनिटात लसूण सोलून (Kitchen Tips) होईल.

बेकिंग सोडा (Kitchen Tips)

बेकिंग सोडा खाण्याशिवाय इतरही गोष्टींसाठी वापरला जातो. विशेषतः स्वच्छता करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर सध्या आवर्जून अनेक गोष्टींमध्ये केला जातो. आता लसुन सोडण्यासाठी सोडा कसा वापरायचा हे पाहूयात. यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. यंत्र गॅस बंद करा पाणी कोमट झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घाला. पाच मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा पाच मिनिटानंतर हलक्या हाताने लसणाच्या पाकळ्या चोळा. काही मिनिटात लसूण सोलून (Kitchen Tips) होईल

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्षफुटीबाबत अमित शहांचा सर्वात मोठा दावा; म्हणाले की…

Amit Shah, thackeray, pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) चार टप्पे पार झाल्यानंतर आता पाचव्या टप्प्यांमध्ये मुंबई, नाशिक, ठाणे, धुळे या भागात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा धुळे दौरा झाला. या दौऱ्यावेळी त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीवर आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर, हे दोन्ही पक्ष नेमके कोणत्या कारणासाठी फुटले याचे कारण देखील माध्यमांना सांगितले.

माध्यमांशी बोलताना अमित शहा म्हणाले की, “शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे. तर उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला राजकारणात पुढे आणायचं आहे. जर शरद पवार यांनी मुलीच्या ठिकाणी अजित पवारांना संधी दिली असती आणि उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते. पवार-ठाकरेंच्या मुला-मुलींमुळे त्यांचे पक्ष फुटले आणि त्याचा आरोप मात्र भाजपावर लावला जात आहे.”

इतकेच नव्हे तर, “गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी माझ्यासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला सहमती दर्शविली होती. निवडणुकीनंतर त्यांच्या मनात मुख्यमंत्री बनण्याचा मोह आला. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांना सोडून ते काँग्रेस आणि शरद परवारांसोबत गेले. आज औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे. त्याला विरोध करणाऱ्यांसोबत जाऊन बसले आहेत. त्यामुळे आज बाळासाहेबांचा आत्मा दु:खी झाला असेल की नाही” असाच सवाल उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Viral Video : प्रचंड गर्दीत ट्रेनखाली अडकली महिला; आरडा ओरड, जीवाचा आकांत… अंगावर काटा आणणारी घटना

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य घटक म्हणजे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल. रोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. सकाळी ऑफिस टायमिंग चुकू नये म्हणून वेळेत निघालेल्यांना आणि घरी वेळेत पोहचायची ओढ असलेल्या लोकांना कायम लोकलची गर्दी पहावी लागते. धक्के- बुक्के खात हे प्रवास सुरूच आहेत, पण अशा प्रवासात कधीतरी एखादी थरारक घटना दृष्टीस पडते. सोमवारी मुंबईत झालेल्या वादळी पावसाने अचानक मुंबईकरांची दाणादाण उडवली. लोकलला अचानक गर्दी वाढली आणि ट्रेन पकडण्यासाठी सगळ्यांचीच घाई दिसून आली. दरम्यान महिला प्रवाशांची उडालेली झुंबड आणि त्यात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर ठाणे रेल्वे स्थानकावरील एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात ट्रेन पकडण्यासाठी महिला प्रवाशांची धडपड दिसतेय. प्लॅटफॉर्मला लागलेल्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी बऱ्याच महिला डब्याजवळ गर्दी करून एकमेकींना धक्का देताना दिसत आहेत. दरम्यान एक महिला प्रवासी लोकल ट्रेन पकडत असताना तोल जाऊन चक्क ट्रेनखाली अडकल्याचे दृश्य यात दिसत आहे. प्रचंड गर्दीमूळे त्या महिलेला बाहेर पडणंसुद्धा अवघड झाल्याचं आपण पाहू शकतो. (Viral Video) जिवाच्या आकांताने तिची बाहेर येण्याची धडपड सुरु आहे. तर काही महिला प्रवासी तिला बाहेर ओढताना आरडा ओरडा करताना दिसत आहेत. एकंदरच हे दृश्य फारच थरारक आहे. हा व्हिडीओ रेलवे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

.. म्हणून अनर्थ टळला

काल मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. ज्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान, ठाण्यातील कोपरी संकुलात लोकल ट्रेनची ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल ट्रेन ३० ते ३५ मिनिटे उशिराने येत होत्या. परिणामी प्रवाशांची गर्दी सेकंद सेकंदाला वाढत होती. (Viral Video) यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. धक्काबुक्की आणि प्रचंड गर्दीच एकच प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. जो ती ट्रेन पकडण्याची धडपड करत होता. यातच त्या महिलेचा तोल गेला आणि ती ट्रेनखाली अडकली. पण प्रसंगावधान दाखवून काही महिला प्रवाशांनी तिला वेळीच बाहेर काढल्याने मोठा भीषण प्रसंग टळला.

जबाबदार कोण?

ठाणे रेल्वेस्थानकावरील या घटनेच्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, ट्रेन पकडण्यासाठी महिला प्रवाशांची केव्हढी गर्दी होती. अशातच ट्रेनखाली अडकलेली महिला जीव वाचवण्यासाठी आरडा ओरड करत होती हे काहींच्या लक्षातही आले नाही. मात्र, काही महिलांनी पुढे येत तिला कसेबसे खेचून बाहेर काढले आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. (Viral Video) दरम्यान अनेक महिला धक्काबुक्कीमुळे एकमेकांच्या अंगावर पडल्या होत्या. या संपूर्ण घटनेमुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. एका पावसाच्या सरीत झालेला हा गोंधळ पाहून अनेकांनी या परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे.

MPSC Recruitment 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मोठी भरती जाहीर; येथे करा अर्ज

MPSC Recruitment 2024

MPSC Recruitment 2024 | आजकाल अनेक तरुण सरकारी नोकरीची तयारी करताना दिसत आहेत. अगदी पदवीचे शिक्षण घेताना ते तयारी सुरू करतात. कारण चांगली नोकरी आणि चांगला पगार मिळावा असे त्यांचे स्वप्न असते. MPSC च्या तयारीसाठी अनेक लोक तयारी करत असतात. आणि त्या लोकांसाठी त्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जात असतात. सध्या या भरतीचे एक नोटिफिकेशन निघालेले आहे. त्यामुळे MPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या भरतीचे नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलेले आहे. आता या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा अर्ज करण्याची शेवटची तारीख या सगळ्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

एकूण रिक्त पदे | MPSC Recruitment 2024

MPSC कडून विविध पदांच्या एकूण 524 रिक्त जागा आहेत. आणि या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे.

रिक्त पदांची नावे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख

24 मे 2024 की अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज भरा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

FD High Intrest Rate | ‘या’ बँका FD वर देतायेत सर्वात जास्त व्याजदर; आजच करा गुंतवणूक

FD High Intrest Rate

FD High Intrest Rate | अनेक लोक भविष्यासाठी काही रक्कम सुरक्षित करून ठेवत असतात. बाजारामध्ये अनेक पर्याय यासाठी उपलब्ध आहेत. परंतु बहुतांश लोक हे फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडीचा पर्याय निवडतात. अनेक बँका देखील त्यांच्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन योजना घेऊन येत असतात. 2024 चे नवे आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरू झाले. परंतु भारतीय रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. तो रेट 6.5% इतकाच ठेवला. त्यामुळे बँका त्यांच्या नवीन नवीन योजना त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे. एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी यांसारख्या बँक फिक्स डिपॉझिटमध्ये अधिक व्याज देणाऱ्या योजना (FD High Intrest Rate) घेऊन आलेल्या आहेत.

SBI मोड्स | FD High Intrest Rate

एसबीआय मोड्स नवीन स्कीम अंतर्गत आता त्यांच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे जास्त पैसे न देता 1000 मल्टिपलमध्ये पैसे काढता येणार आहे. या सोबतच पैशावरील व्याजात कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही. या योजनेअंतर्गत ग्राहकांना कमीत कमी दहा हजार रुपये गुंतवता येतात. त्याचप्रमाणे जास्त रक्कम गुंतवण्याची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत ग्राहकांना 7 दिवस ते 45 दिवसांच्या अवधीपर्यंत 3 टक्के व्याज मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्क्यांनी व्याज मिळेल. 46 दिवसापासून ते 179 दिवसापर्यंतच्या एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 5 टक्के तर सामान्य नागरिकांना 4.5% दराने व्याज मिळेल.

त्याचप्रमाणे 180 ते 210 दिवसांच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 5.60% तर सामान्य नागरिकांना 5.25% दराने व्याज मिळेल. 3 ते 5 वर्षापर्यंतच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांना 7 टक्के आणि सामान्य नागरिकांना 6.50% एवढे व्याज मिळेल 5 ते 10 वर्षाच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांना 7.50% तर सामान्य नागरिकांना 6.50% एवढे व्याज मिळेल.

पंजाब नॅशनल बॅंक | FD High Intrest Rate

पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या एफडी डिपॉझिटवर 12 एप्रिल 2024 पासून व्याजदरात बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार 120 ते 210 दिवसांच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांना 6.8% तर सामान्य नागरिकांना 6.5% एवढे व्याज मिळेल. त्याचप्रमाणे 1 वर्षाच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 7.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.55% एवढे व्याज मिळेल. 400 दिवसांच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांना 8.5% तर सामान्य नागरिकांना 7.3% एवढे व्याज मिळेल.

HDFC बॅंक

एचडीएफसी बँक एफडीवर सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्क्यांनी जास्त व्याज देत असते. एक वर्ष ते 15 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.60 टक्के तर 2 वर्षे ते एक महिन्यापर्यंतच्या कालावधीसाठी 7.50% 3 वर्ष एक दिवसाच्या कालावधीसाठी 7.50% एवढे व्याज देते.

रोहित शर्मा वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत खेळू शकतो; माजी क्रिकेटपटूच मोठं विधान

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फक्त भारतातच नव्हे संपूर्ण जगभरात राहते आहेत. त्यामुळे सचिन तेंडुलकरने आणखीन काही काय खेळायला हवे होते, असे सर्वांनाच वाटते. परंतु वयाच्या 40 वर्षापर्यंतच सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मैदानात खेळताना दिसला. तसेच, महेंद्रसिंग धोनीने देखील 39 वयापर्यंतच मैदान गाजवले. थोडक्यात सांगायचे म्हणजे एखाद्या खेळाडू वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत पोहोचला की त्याची निवृत्ती जवळ येते. आता इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 37 वर्षांचा आहे. पुढे 2026 मध्ये टी-20 वर्ल्डकपवेळी त्यांचे वय 39 असेल.

त्यामुळेच 2026 चा वर्ल्डकप रोहित शर्मासाठी शेवटचा असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु रोहित शर्माची 2027 चा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा आहे. त्यामुळेच रोहित शर्मा पुढे जाऊन काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच, युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी BCCI ला खेळाडूंच्या वय आणि निवृत्ती संदर्भात एक मोठा सल्ला दिला आहे. योगराज सिंग यांनी, “बीसीसीआयने खेळाडूंचं वय आणि निवृत्ती याबाबत विचार करु नये” असे सांगितले आहे. तसेच, “जोपर्यंत रोहित शर्माचा फॉर्म आणि फिटनेस कायम आहे त्याला खेळू द्यावं” असेही सुचवले आहे.

इतकेच नव्हे तर, “रोहित शर्मामध्ये अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. तो वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत भारताकडून खेळू शकतो”असे मोठे विधान योगराज सिंग यांनी केले आहे. स्पोर्ट्स 18 शी बोलताना योगराज सिंह म्हणाले, “जेव्हा वयाबद्दल चर्चा होते तेव्हा मला समजते की, या खेळाडूचं इतकं वय झालंय या चर्चेला अर्थ नाही. जरी तुम्ही 40, 42 किंवा 45 वर्षांचे असलात, तरी त्यात चुकीचं काय? आपल्या देशात लोकांना तुम्ही 40 वर्षाचे असलात तर वय झालं आहे असं वाटतं. आता तुमचं मूल होण्याचं वय झालं असून सगळं संपलं आहे असं सांगतात. पण तुम्ही संपला नाहीत हेच सत्य आहे,”

त्याचबरोबर, “मोहिंदर अमरनाथ यांनी भारतासाठी वर्ल्डकप जिंकला तेव्हा 38 वर्षांचे होते. अंतिम सामन्यात ते प्लेअर ऑफ द मॅच होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये वयाचा मुद्दा कायमचा बंद केला पाहिजे. रोहित शर्मा आणि विरेंद्र सेहवाग हे असे दोन महान खेळाडू आहेत ज्यांना कधीच फिटनेस आणि ट्रेनिंगचा विचार केला नाही. तो 50 वर्षांचा होईपर्यंत खेळू शकतो” असे स्पोर्ट्स 18 शी बोलताना योगराज सिंह यांनी म्हणले.