‘पेडन्यूज प्रकरणात बारकाईने लक्ष ठेवा’- सूचना खर्च निरीक्षक आर. नटेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । ‘विधानसभा निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांकडून पेडन्यूज होण्याची शक्यता असल्याने पेडन्यूज प्रकरणात बारकाईने लक्ष ठेवा आणि भारत निवडणूक आयोगाच्या याबाबत असलेल्या सूचनांची काटेकोर अमंलबजवणी करा,’ अशा सूचना खर्च निरीक्षक आर. नटेश यांनी दिल्या.

खर्च निरीक्षक श्री. नटेश यांनी जिल्हास्तरीय माध्यम कक्षास भेट देऊन कक्षाकडील कामकाजाची माहिती घेतली. प्रसार माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी कक्षाकडील सोशल मीडिया, पेडन्यूज, सायबर सेल, जाहिरात प्रमाणिकरण, जाहिरात खर्च विषयक कामकाजाची माहिती दिली. सहायक नोडल अधिकारी एस.आर.माने यांनी स्वागत केले.

”निवडणुकीतील प्रक्रियेत माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. वृत्तपत्रामध्ये जाहिरातीबरोबरच पेडन्यूज होण्याची शक्यता असल्याने प्रसारमाध्यम कक्षाने पेडन्यूज प्रकरणाबाबत अधिक दक्ष रहावे. इलेक्ट्रॉनिक माध्यमात आणि सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या जाहिरातीवर देखील लक्ष ठेवणे गरजचे असल्याचे” खर्च निरीक्षक श्री. नटेश यांनी सांगितले.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment