‘या’ पाक खेळाडूकडून आयसीसीच्या नियमाचा भंग; चेंडू चमकवण्यासाठी केला लाळेचा वापर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मँचेस्टर । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने क्रिकेट सामने खेळताना काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार चेंडू चमकवण्यासाठी खेळाडूला लाळेचा वापर करता येणार नाही. दरम्यान, आयसीसीच्या या नियमनानंतरही एका पाकिस्तानी खेळाडूने नियम भंग केला आहे. मँचेस्टरच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमिर चेंडूला लाळ लावताना कॅमेऱ्यात कैद झाला. आयसीसीने अद्याप याबद्दल अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाही.

आयसीसीच्या नवीन नियमानुसार, सामन्यादरम्यान कोणत्याही गोलंदाजाने किंवा खेळाडूने चेंडूला चमकवण्यासाठी लाळेचा वापर केला, तर त्याला पंच पहिल्यांदा समज देऊ शकतात. पण यानंतरही खेळाडूंकडून असे प्रकार वारंवार होत असतील तर आयसीसीच्या नवीन नियमांप्रमाणे, ५ धावा दंड म्हणून प्रतिस्पर्धी संघाला बहाल करण्यात येतील. दरम्यान, इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याटी-२० सामन्यात मोहम्मद आमिर अनेकदा चेंडूला लाळ लावताना कॅमेऱ्यात कैद झाला.

इंग्लंड आणि पाकिस्तान संघातला पहिला टी-२० सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे. मँचेस्टरच्या मैदानावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इमाद वासिमने सलामीवीर जॉनी बेअरस्टोला आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. १६.१ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात इंग्लंडच्या संघाने १३१ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर मैदानात पावसाचं आगमन झाल्यामुळे सामना थांबवण्यात आला. बराच काळ पावसाची संततधार सुरु असल्यामुळे खूप वेळ वाया गेला. अखेरीस पावसाने उसंत घेतल्यानंतर पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी केली. परंतू मैदान खेळण्यायोग्य नसल्याचं समजताच दोन्ही पंचांनी कर्णधारांच्या अनुमतीने पहिला टी-२० सामना रद्द झाल्याची घोषणा केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment