PAK vs ENG : इंग्लंडने कराचीत रचला इतिहास; पाकिस्तानवर प्रथमच ओढवली ‘हि’ नामुष्की

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराची : वृत्तसंस्था – इंग्लंडने पाकिस्तानचा तिसऱ्या कसोटीत (PAK vs ENG) 8 गडी राखून पराभव केला आहे. या विजयसह इंग्लंडने हि मालिका (PAK vs ENG) 3-0 अशी जिंकली. यासोबत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड क्रिकेट संघाने इतिहास रचला. पाकिस्तानमध्ये कसोटी मालिकेत (PAK vs ENG) क्लीन स्वीप करणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. पाकिस्तानने 2022 मध्ये घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यांदा कोसटी मालिका गमावली आहे. पाकिस्तानने घरच्या मैदानावर सलग चौथ्यांदा पराभवाचा सामना केला आणि यासह त्यांच्या नावावर एका नामुष्कीजनक रेकॉर्डची नोंद झाली आहे.

पाकिस्तान घरच्या मैदानावर सलग चार कसोटी गमावणारा (PAK vs ENG) आशियातील दुसरा संघ बनला आहे. याआधी बांगलादेशच्या नावावर हा लाजिरवाणा विक्रम होता. बांगलादेशने 6 वेगवेगळ्या वेळी अशा प्रकारे सामने गमावले आहेत. बांगलादेशने 2001 ते 2004 पर्यंत घरच्या मैदानावर सलग 13 सामन्यात पराभव पत्करला होता. तर पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे.

कराचीत झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात (PAK vs ENG) पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. पहिल्या डावात 304 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने 354 धावा केल्या. तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात फक्त 216 धावा करू शकला. यानंतर इंग्लंडने 167 धावांचे आव्हान 2 विकेट गमावून पूर्ण केले. या सामन्यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सीरीजच्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय