मुंबई | भारताच्या बाजूचा असणारा पाकिस्तान हा देश यावेळी आमिर खानमुळे खूप ट्रोल होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीने अभिनेता आमिर खानवर दुहेरी हत्याकांडाचा आरोप केला आहे. यानंतर सोशल मीडियावर बातमीचे स्क्रिनशॉट व्हायरल ही होऊ लागले आहेत. त्यामुळे अमीर खानच्या चाहत्यांनी त्या पाकिस्तानी वाहिनीला खूप ट्रोल केल आहे.
दरम्यान पाकिस्तानातील एका न्यायालयाने १७ वर्षांनंतर राजकीय पार्टी मुहाजीर कौमी आंदोलन हक्की पक्षाचा नेता आमिर खानला दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणातून मुक्त केलं. अशी बातमी ब्रेकिंग एक वाहिनी ब्रेकिंग म्हणून चालवत होती. या वाहिनीने बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा फोटो दाखवला. व थोड्या वेळाने वाहिनीने स्वतःची चूक सुधारली आणि अभिनेता आमिर खानचा फोटो बातमीवरून हटवला.
Headline: After 17 years MQM leader Amir Khan exonerated in a murder case.
— Naila Inayat (@nailainayat) April 16, 2020
Didn't know Indian actor Amir Khan was in Pakistan for the last 17 years.. pic.twitter.com/YcUmg6LKfk
मात्र तोवर लोकांनी या बातमीचे स्क्रिनशॉट व्हायरल करायला सुरुवात केली होती, आणि त्यानंतर या वाहिनीला व पाकिस्तानला लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अमीर खान हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचे भारतात अनेक चाहते आहेत. अमीर खानच्या चाहत्यांनी ही बातमी पाहिल्यावर त्यांनी त्या पाकिस्तानी वाहिनीला चांगलच ट्रोल केल आहे.
कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!#USPresident #Presumed #coronavirus #HelloMaharashtra https://t.co/mFiLmmCxPj
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2020