वृत्तसंस्था । मागील काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात भारतीय जवानांच्या दहशतवाद्यांसोबत चकमकी सुरू आहेत. या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे आतापर्यंत ८ जवान शहीद झाले आहेत. तर हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी पाकिस्तानला सडेतोड ऊत्तर देण्याचा कडक इशारा दिला होता. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पाठबळ देणे सुरू असेपर्यंत आम्ही योग्य कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे आणि दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणार असल्याचे भारताने स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राइकची भीती वाटू लागली आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर रियाज नायकू यालाही कंठस्नान घातले. या चकमकीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या संभाव्य कारवाईची धास्ती घेतली आहे. इम्रान खान ट्विट करत भारतविरोधी सूर आवळला आहे. दक्षिण आशियातील शांतता भारतामुळे धोक्यात येण्याआधी आंतरराष्ट्रीय समुदायाने कारवाई करण्याची मागणी इम्रान यांनी ट्विटरवर केली. काश्मीरमध्ये नुकत्याच घडलेल्या घटना या स्थानिक असल्याचा दावा इम्रान यांनी केला असून पाकिस्तानचा यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचे सांगतिले.
याआधी भारतीय लष्कराने उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइकची कारवाई केली होती. यावेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानी हद्दीत शिरून सीमेलगतचे दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करत दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तर दुसऱ्यांदा पुलवामा येथील प्राणघातक हल्ल्यात शहिद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”