माणुसकीला काळिमा ! कबरेतून अल्पवयीन मुलीचा मृतदेह बाहेर काढून केला बलात्कार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानात माणुसकीला लाजवणारी एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. 13 ऑगस्टला पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरु असताना आरोपीने हे घृणास्पद कृत्य केलं आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील थट्टा जिल्ह्यातील असरफ चांडीओ गावामध्ये हि घटना घडली आहे.

आमना चांडीओ नावाच्या मुलीचा एक दिवसाआधी तापामुळे मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह सर्व रितीरिवाजासोबत दफन करण्यात आला होता. पण त्याच रात्री एका माथेफिरू व्यक्तीने मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला आणि तेथून अर्धा किलोमीटर अंतरावर झाडामागे जाऊन तिच्या मृतदेहवर अत्याचार केला. नंतर मृतदेह तिथेच सोडून फरार झाला. या व्यक्तीचं नाव रफीक चांडीओ असून तो या भागातील गुंड आहे.

यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणीची कबर खणली असून आत मृतदेह नसल्याचं काही जणांच्या ध्यानात आलं. याची माहिती तातडीने तिच्या वडिलांना देण्यात आली. यानंतर या मुलीचे वडील आणि गावकरी घटनास्थळी गेले. पोलिसांना बोलावून मृतदेह शोधण्यात आला. काही वेळातच जवळच्या झाडीत तरुणीचा मृतदेह सापडला. मृतदेहाला घातलेले कपडे अस्ताव्यस्त होते. पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटला पाठवला असता डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण निर्माण झाले. लोक पोलिसांविरोधातही आपली नाराजी जाहीर करत आहेत. मुलीचे वडील रमजान चांडीओने पोलिसांवर आरोप केला की, सूचना मिळाल्यावर बरेच उशीरा पोलीस आले आणि ज्याच्यावर आम्हाला शंका आहे त्याला पकडण्यात काही इंटरेस्ट दाखवला नाही. काही परिवारांनी गुंड आरोपीला थेट गोळी मारण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी तातडीची पावलं टाकत आरोपीची शोध मोहीम हाती घेतली. छापेमारी करताना रफीकने पोलिसांवरही गोळी झाडली. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत पोलिसांनी त्याचा खात्मा केला.