शोएब- सानियाच्या संसारातील ‘ती’ कोण?? पहा शोएब सोबतचे तिचे बोल्ड फोटोशूट

0
425
sania mirza shoib malik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिक सध्या चर्चेत आहेत. सानिया आणि शोएब लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चानी जोर धरला आहे. सानिया आणि शोएबने अधिकृतपणे याबाबत स्पष्ट असं काही सांगितलं नाही. परंतु पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर हिच्यामुळे दोघांच्या संसाराला ग्रहण लागलं असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

shoib malik sania

शोएब मलिकचे आयशासोबत अफेअर असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. शोएब आणि आयशा गेल्या काही महिन्यांपासून एकत्र दिसत आहेत. दोघांनी एका मासिकासाठी स्विमिंग पूलमध्ये एक बोल्ड फोटोशूट देखील केले, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शोएब आणि आयशा मध्ये खरच अफेअर आहे कि नाही याबाबत अजून स्पष्टता नाही मात्र, आयशासोबतच्या जवळीकतेमुळे सानिया आणि शोएबचे नाते तुटण्याच्या मार्गावर असल्याचे बोललं जात आहे.

shoib malik ayesha omar

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट नुसार, शोएब मलिक आणि सानिया मिर्झा आता वेगळे झाले आहेत. दोघेही सोबत राहत नाहीत. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट फायनल झाला आहे. दोघेही बऱ्याच काळ एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली होती. “तुटलेली हृदये कुठे जातात? अल्लाला शोधण्यासाठी.” अशी पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली होती. सानियाच्या या पोस्टवरून शोएबसोबतच्या तिच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरु झाली होती.

shoib malik ayesha omar

कोण आहे आयशा उमर –

आयशा उमर ही पाकिस्तान मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला पाकिस्तानची स्टाईल आयकॉन देखील मानले जाते. आयशा उमरने लाहोर ग्रामर स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ आर्ट्समधून बॅचलर आणि मास्टर्स डिग्री घेतली. आयशा उमरने इंडस्ट्रीत तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. त्यांनी अनेक जाहिरातींमध्ये काम केले. आयशा उमरने टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यासोबतच पाकिस्तानी चित्रपटांमध्येही आपलं नशीब आजमावल आहे.

shoib malik ayesha omar

शोएब मलिक आणि आयशा 2021 मध्ये एका फोटोशूट दरम्यान भेटले होते. हे फोटोशूट समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. बोल्ड फोटोशूटबद्दल बोलताना मलिकने एका मुलाखतीत आयशाचे कौतुक केले होते. बोल्ड फोटोशूटमध्ये आयशाने त्याला खूप मदत केली होती, असे त्याने म्हटले होते.