हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यानंतर आता माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने देखील अफगाणिस्तानमधील तालिबानचे स्वागत केले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान एका चांगल्या विचाराने सत्तेत आलं आहे अस म्हणत तालिबानचं तोंडभरुन कौतुक करताना तालिबानी राजवटीचं खुलं समर्थन शाहिद आफ्रिदी याने केलं आहे.
आफ्रिदी म्हणाला, तालिबान यावेळी सकारात्मक दृष्टीकोन घेऊन आले आहेत. त्यांनी येथील महिलांना काम करण्याची व राजकारणात सहभाग घेण्याची परवानगी दिली आहे. या गोष्टी आधी पाहायला मिळाल्या नाहीत. तालिबानी क्रिकेटलाही पाठिंबा देत आहेत. श्रीलंकेतील परिस्थितीमुळे मालिका होऊ शकली नाही, परंतु तालिबानी क्रिकेटला संपूर्ण पाठिंबा देत आहेत.”
❝Taliban have come with a very positive mind. They're allowing ladies to work. And I believe Taliban like cricket a lot❞ Shahid Afridi. He should be Taliban's next PM. pic.twitter.com/OTV8zDw1yu
— Naila Inayat (@nailainayat) August 30, 2021
दरम्यान, आफ्रिदीच्या या वादग्रस्त विधानानंतर त्याला टिकेचा सामना करावा लागत आहे. खरं तर शाहिद आफ्रिदी आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. आफ्रिदी नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आता त्याने थेट तालिबानी राजवटीचे समर्थन केल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे.