पालघरमध्ये एसटी बस 25 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात, 20 जण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर : हॅलो महाराष्ट्र – पालघर येथील वाघोबा खिंडीत एस टी महामंडळाच्या रातराणी बसचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. भुसावळ ते बोईसर या एसटी बसचा पालघर खिंडीत अपघात होऊन ही एसटी बस थेट दरीत कोसळली आहे. बस चालकचे नियंत्रण सुटल्याने बस 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात (Accident) बसमधील 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

काय घडले नेमके ?
रातराणी बस सेवेअंतर्गत एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा चालवली जाते. दरम्यान, भुसावळ-बोईसर या मार्गावरील एसटी बसचा सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातानंतर एसटी बसमधील प्रवाशांनी चालकावर गंभीर आरोप केले आहेत.

नाशिक मध्ये बदललेला गाडीचा चालक
भुसावळ-बोईसर मार्गावर वाघोबा खिंडीत एसटी बस आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि एसटी थेट 20 ते 25 फूट खोल दरीमध्ये कोसळली. यादगोदर नाशिकमध्ये या बसचा चालक बदलण्यात आला होता. बदलण्यात आलेल्या चालकाने दारुचं सेवन केले असल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता. याबाबत कंडक्टरकडे तक्रारही करण्यात आली होती. मात्र मद्यधुंद चालकाबाबतच्या तक्रारींकडे कंडक्टरने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात आला आहे.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

Leave a Comment