शिवसेनेकडून पालघरमध्ये सोशल इंजिनिअरींग; आदिवासी, वंचित घटकांना प्राधान्य

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर प्रतिनिधी। पालघर विधानसभेसाठी शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन सोशल इंजिनिअरिंगचा खेळ खेळला आहे. आदिवासीबहुल पट्टा म्हणून पालघरची ओळख आहे. अशा परिसरात आदिवासी घटकाला उमेदवारी देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः दिलेला शब्द पाळला आहे.

आदिवासी समुदायाचा मोठा ताफा सोबत बाळगत वनगा यांनी काल गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. आदिवासी पारंपरिक नृत्य करत लोक एकत्र जमले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश शहा, संपर्कप्रमुख रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

शिवसेनेने ठरवून आणि विचारपूर्वक आपल्या जागाचं वाटप केल्यामुळे भाजपसोबत ऐनवेळी काही फिस्कटलं तर इतर मित्रपक्षाला सोबत घेऊन सेना सरकार स्थापन करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.