टेम्पोची बाईकला धडक, मग थेट गुजरातच्या सीमेपर्यंत फरफटत नेलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-अहमदाबाद हायवेवर एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका टेम्पोने बाईकला जोरदार धडक दिली आहे. या धडकेनंतर टेम्पोने चक्क बाईकला दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत अक्षरशः फरफटत (accident) नेलं होतं. या धक्कादायक प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या टेम्पोच्या मागून जाणाऱ्या एका गाडीतून हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. टेम्पो चालकानं बाईकला आधी धडक (accident) दिली. त्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान बाईक टेम्पोच्या मागच्या बाजूला अडकली (accident) होती. अडकलेली बाईक तशी च फरफटत नेत टेम्पोचालकाने महामार्गावरुन जाणाऱ्या सगळ्यांचाच जीव धोक्यात घातला होता.

कधी घडली घटना ?
ही घटना 25 मे रोजी मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. टेम्पोनं बाईकला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच कोसळला होता. तर बाईक टेम्पोमध्ये अडकली होती. ईश्वर पाचलकर असे या अपघातात (accident) गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जखमी दुचाकीस्वारावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टेंपोच्या चालकाने बाईकला धडक दिल्यानंतर टेंपो न थांबवता तसाच सुसाट वेगात पुढे नेला.

या टेम्पोचालकाने अडकलेल्या मोटारसायकलला ओढत नेत गुजरातपर्यंत नेले होते. यानंतर आरोपी टेम्पो चालकाने अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलासरी पोलिसांनी टेम्पो आणि बाईक ताब्यात घेतली आहे. तलासरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. टेंपोने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्यानंतर मोटारसायकलस्वार महामार्गावरच गंभीर जखमी होऊन पडला होता. यानंतर त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी जखमी दुचाकीस्वाराला तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सेलवास येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

Leave a Comment