लवकरात लवकर पॅन-आधार करा लिंक अन्यथा भरावा लागू शकेल 10,000 रुपये दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली I जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड अजून आधारशी लिंक केले नसेल तर ते लवकर करा. पॅन-आधार लिंकिंगची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. या काळात तुम्ही हे काम न केल्यास तुमच्या बँकिंग सर्व्हिस ठप्प होऊ शकतात. याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही करू शकणार नाही.

पॅन-आधार लिंक नसेल तर समस्या इथेच संपत नाही. जर तुम्ही 31 मार्चपर्यंत हे काम केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड इनऍक्टिव्ह केले जाऊ शकते. यामुळे तुम्हाला म्युच्युअल फंड आणि स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे तसेच बँक खाते उघडणे कठीण होईल. 31 मार्चनंतर आधारशी पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त 1000 रुपये द्यावे लागतील.

…तर तुम्हाला 10,000 रुपये दंड भरावा लागू शकतो
31 मार्चनंतर जर एखाद्या व्यक्तीने अवैध पॅनकार्ड सादर केले तर आयकर कायदा 1961 च्या कलम 272N अंतर्गत संबंधित अधिकाऱ्याला 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच, पॅनकार्डशिवाय तुम्हाला मोठी रक्कम काढता येणार नाही. अवैध पॅन कार्डसह अशा प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी तुम्हाला दंड देखील भरावा लागेल.

तुम्ही अशाप्रकारे स्टेट्स तपासू शकता
जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले असेल तर तुम्ही स्टेट्स तपासू शकता. यासाठी इन्कम रॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइट http://www.incometaxindiaefiling.gov.in वर जा, म्हणजेच आता नवीन वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal. तळाशी लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा. तुमचे स्टेट्स पाहण्यासाठी, हायपर लिंकवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा आधार आणि पॅन कार्ड तपशील भरावा लागेल. जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असेल, तर तुम्हाला हे कंफर्मेशन दिसेल की, तुमचा your PAN is linked to Aadhaar Number झाला आहे.

वेबसाइटवर पॅन-आधार लिंक अशा प्रकारे करता येईल

सर्वप्रथम इन्कम टॅक्स वेबसाइटवर जा.

आधार कार्डमध्ये दिलेले नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाका.

आधार कार्डमध्ये जन्माचे वर्ष नमूद असेल तरच चौकोनावर टिक करा.

आता कॅप्चा कोड टाका.

आता Link Aadhaar बटणावर क्लिक करा.

तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.

तुम्ही SMS पाठवून सुविधेचा लाभ घेऊ शकता
यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनवर – UIDPAN टाइप करावा लागेल, त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाइप करावा लागेल आणि त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक लिहावा लागेल. हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा.

इनव्हॅलिड पॅन कसे सक्रिय करावे
इनव्हॅलिड पॅन कार्ड कार्यान्वित केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला SMS करावा लागेल. तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जावे लागेल आणि तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरून 12 अंकी पॅन क्रमांक टाकल्यानंतर स्पेस देऊन 567678 किंवा 56161 वर SMS करून 10 अंकी आधार नंबर टाका.

Leave a Comment