हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PAN-Aadhaar Link : ITR भरण्याची शेवटची तारीख आता निघून गेली आहे. तसेच ती आणखी वाढविण्यासाठी सरकारकडून कोणतीही माहिती जारी करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत आता 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांनी ITR दाखल केल्यास त्यांच्याकडून दंड आकारला जाईल. जर आपल्याकडे ITR दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसेल तरी देखील दंड होऊ शकेल. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले पॅन कार्ड आधारशी लिंक असणे. PAN-Aadhaar Link
30 जून रोजीच आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख देखील संपली आहे. त्यामुळे आता आधारशी पॅन लिंक करण्यासही आपल्याला दंड भरावा लागणार आहे. आता ITR दाखल करताना पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नसेल तर आयकर कायद्याच्या कलम 272बी अंतर्गत दंड होऊ शकेल. अशा प्रकारे दुप्पट दंड भरावा लागू शकेल. PAN-Aadhaar Link
आधारशी पॅन लिंक करणे गरजेचे का आहे ???
जर आपले पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल तर पॅन कार्ड इनव्हॅलिड ठरेल. यामुळे ITR फाइल करणे अवघड होते कारण पॅन कार्डशिवाय ITR फाइल करता येत नाही. मात्र, जर आपण इनव्हॅलिड पॅन कार्ड वापरून ITR फाइल करण्याचा प्रयत्न केला तर 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकेल. पॅन कार्ड इनव्हॅलिड झाल्याने फक्त ITR च नाही तर मनी ट्रान्सफर, केवायसी आणि ट्रेडिंगमध्येही अडचणींचा सामना करावा लागेल. PAN-Aadhaar Link
आधारशी पॅन लिंक कसा करावा ???
पॅन कार्ड आधारशी दोन प्रकारे लिंक करता येते. यासाठी सर्वात आधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर जा. आता आधार लिंक विभागात क्लिक करा. यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक आणि नाव टाका. आता लिंक आधार पर्यायावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचा आधार पॅन लिंक केला जाईल. यानंतर हे काम SMS द्वारेही करता येते. यासाठी फोनवरून UIDPAN टाइप करा आणि त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक टाका. त्यानंतर 567678 किंवा 56161 वर पाठवा. शेवटची तारीख निघून गेलेली असल्याने आता आधारशी पॅन लिंक करण्यासाठी 1,000 रुपये दंड भरावा लागेल. PAN-Aadhaar Link
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.incometax.gov.in/iec/foportal/help/how-to-link-aadhaar
हे पण वाचा :
‘या’ e-bike साठी ड्रायव्हिंग लायसन्सची नाही आवश्यकता !!!
Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण !!! नवीन दर पहा
Multibagger Stock : गेल्या 5 वर्षांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
HDFC च्या ग्राहकांना धक्का !!! कंपनीचे होम लोन महागले
Multibagger Stocks : गेल्या आठवड्यात ‘या’ 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला मजबूत नफा !!!