नवी दिल्ली । आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे आजच्या काळात खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहेत. आधार कार्डाशिवाय सरकारी योजना, सबसिडी, किसान सन्मान निधी आणि उज्ज्वला योजना यासारखे लाभ मिळू शकणार नाहीत, तर पॅन कार्डशिवाय बँक खाते आणि इन्कम टॅक्स रिटर्नही भरता येणार नाही.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने पॅनला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. जर 31 मार्चपर्यंत तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला यासाठी दंड भरावा लागू शकतो.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या सर्व खातेदारांना पॅन-आधार लिंकबाबत अलर्ट जारी केला आहे. 31 मार्च 2022 पूर्वी पॅन आणि आधार लिंकिंग न केल्यास ग्राहकांच्या बँकिंग सर्व्हिस कॅन्सल केल्या जाऊ शकतात. SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले होते की,”कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करावे.”
जर पेमेंट तारखेपर्यंत पॅन-आधार लिंक झाले नाही, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमचे पॅन कार्ड रद्द करू शकते. त्यामुळे शेवटच्या तारखेपूर्वी पॅन-आधार लिंक केल्याचे सुनिश्चित करा. यासोबतच तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. तुम्ही तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक खालील प्रकारे लिंक करू शकता-
एसएमएसद्वारे करा लिंक
तुम्ही घरबसल्या फक्त एका एसएमएसद्वारे तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला 567678 किंवा 56161 वर मेसेज करावा लागेल.
तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवावा लागेल. मेसेजमध्ये, UIDPAN<space><12 अंकी आधार कार्ड><space><10 अंकी PAN> टाइप करा आणि 567678 किंवा 56161 वर पाठवा.
इन्कम टॅक्स वेबसाइटद्वारे लिंक:
इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइट http://www.incometaxindiaefiling.gov.in ला भेट द्या.
मेन पेजवर, आपल्याला डाव्या बाजूला क्विक लिंक्स दिसतील.
दुसऱ्या ऑप्शनच्या टॉप वर ‘Link Aadhaar’ वर क्लिक करा.
एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमचे नाव, पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकावा लागेल.
कॅप्चा कोड एंटर करा आणि OTP साठी बटण दाबा.
OTP एंटर करा आणि लिंक आधार बटणावर क्लिक करा.
असे केल्याने तुमचे स्वतःचे पॅन कार्ड तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केले जाईल.