नवी दिल्ली । भारतात आजकाल पॅन कार्ड (PAN Card) प्रत्येकासाठी एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल, क्रेडिट कार्ड किंवा आर्थिक व्यवहार करायचा असेल तर मग तुम्हाला पॅनकार्ड लागेल. पर्मनन्ट अकांउट नंबर (Permanent Account number) हा 10-अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो जो एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक हिस्ट्रीची संपूर्ण नोंद ठेवतो. हे कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जारी करतो. हे आयडेंटिटी प्रूफ डॉक्युमेंट म्हणून देखील उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत, आपल्या पॅनकार्डवरील फोटोमध्ये काही दोष असल्यास आपण ते बदलू शकता.
पॅन कार्डवरील फोटो बदलण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करा
>> पहिले एनएसडीएलच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
>> त्यानंतर Application Type ऑप्शन वर क्लिक करून Changes or correction in existing PAN Data ऑप्शन सिलेक्ट करा.
>> आता कॅटेगरी मेन्यू मधून Individual ऑप्शन निवडा
>> यानंतर, सर्व आवश्यक माहिती भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
>> आता पॅन अर्जावरच जा आणि KYC चा पर्याय निवडा.
>> त्यानंतर Photo Mismatch आणि ‘Signature Mismatch चा एक ऑप्शन दिसेल.
>> येथे फोटो बदलण्यासाठी तुम्ही Photo Mismatch पर्यायवर क्लिक करू शकता.
>> आता पालकांची माहिती भरल्यानंतर Next बटणावर क्लिक करा.
>> सर्व माहिती भरल्यानंतर, अर्जदार ओळख प्रमाणपत्र, ऍड्रेस प्रूफ आणि डेथ ऑफ बर्थ प्रूफ अटॅच करा.
>> यानंतर Declaration वर क्लिक करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
>> फोटोग्राफ आणि सिग्नेचरमध्ये बदल करण्यासाठी अर्ज फी भारतासाठी 101 रुपये (जीएसटीसह) आणि भारताबाहेरील पत्त्यांसाठी 1011 रुपये (जीएसटीसह) आहे.
>> संपूर्ण प्रक्रियेनंतर 15-अंकी पोचपावती मिळेल.
>> अर्जाची प्रिंटआउट इनकम टॅक्स पॅन सर्व्हिस युनिटला पाठवा.
>> पावती क्रमांकाद्वारे अर्जाला ट्रॅक केले जाऊ शकते.
इन्स्टंट पॅन कार्ड मिळू शकेल
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार इन्स्टंट पॅन सुविधेअंतर्गत आधार कार्डद्वारे ई-पॅन कार्ड देण्यास सुमारे 10 मिनिटे लागतात. या सुविधेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 7 लाख पॅनकार्डस देण्यात आलेली आहेत.
पॅनकार्ड मिळविण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असेल
पॅनकार्ड मिळविण्यासाठी त्या व्यक्तीकडे ओळख, पुरावा आणि जन्मतारीख असणे आवश्यक आहे. या ओळखपत्रांत तुम्हाला अनेक पर्याय दिले जातील. या पुराव्यांसाठी आपण एखाद्याची निवड करू शकता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.