फडणवीसांना ‘त्यासाठी’ माझ्या मनापासून शुभेच्छा! संजय राऊत असं का म्हणाले ?

मुंबई । काँग्रेस नेते नाना पटोले (nana patole) यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनामा दिला. आणि नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवड झाली. यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. त्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या लवकरच फासे पलटतील या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

फडणवीसांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी एका वाक्यात भाष्य केलंय. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात लवकरच फासे पलटतील असं भाष्य केलंय याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी “देवेंद्र फडणवीसांना यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा”, असं एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी नाना पटोले यांची निवड झाल्याबद्दल संजय राऊत यांनी पटोले यांचं अभिनंदनही केलं. यासोबतच सामनाच्या अग्रलेखातून नानांवर टीका नाही, तर कौतुक केलंय, असंही ते म्हणाले. “नानांवर टीका नाही, कौतुक केलंय, पक्षाला संजीवनी देण्याचा काँग्रेसचा उत्साह महत्त्वाचा आहे, काँग्रेस हा देशात महत्त्वाचा राजकीय पक्ष सत्तेत नसला तरी या पक्षाची परंपरा आणि इतिहास मह्त्त्वाचा आहे. राज्यातच नव्हे, तर देशात काँग्रेसला संजीवनी मिळावी, ही आमची इच्छा आहे. पक्षात परिवर्तन करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असं संजय राऊत म्हणाले.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like