व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून शेणोली येथे पाणंद रस्ता मंजूर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून शेणोली गावाच्या पाणंद रस्त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते या योजनेतून 25 लाख रुपयांचा निधी मिळाला. या कामाचे भूमिपूजन गावचे जेष्ठ नेते रघुनाथ कणसे (अण्णा) यांच्या हस्ते व युवानेते इंद्रजीत चव्हाण व कराड दक्षिण काँग्रेस चे अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी कार्वे गावचे माजी सरपंच वैभव थोरात, सूर्यकांत पवार, सुरेश जाधव, दिग्विजय उर्फ आबा सूर्यवंशी, डॉ. जयसिंग कणसे, पैलवान प्रमोद कणसे, सुधाकर कणसे, बाळासो कणसे, संभाजी कणसे, मोहन कणसे, मारुती कणसे, माजी सरपंच अशोक पाटील, अण्णासो पाटील, शिवाजी कणसे, सदस्य राजेंद्र कणसे, दिलीप कणसे, विजयसिंह कणसे, सुनील कणसे, बाळासाहेब माळी, पोपट माळी, हिंदुराव कणसे, राजकुमार कणसे, शहाजी माने, प्रवक्ते अजय चव्हाण, सदस्य सुहास कणसे, भास्कर कणसे, अक्षय कणसे, प्रसाद कणसे, अमोल गायकवाड, उदय पवार, राजेंद्र राक्षे व ग्रामस्थ उपस्थित होते.

या रस्त्यासाठी शेणोली ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे त्यांच्या मागणीनुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला. शेणोली येथील सती मंदिर ते प्रकाश माळी ते डॉक्टर जयसिंग कणसे यांच्या शेतापर्यंतचा (कारखाना स्टेशन जोडणारा) असा हा रस्ता होणार आहे. ग्रामस्थांच्या दळणवळणासाठी रस्ता सोयीचा होणार असल्याच्या भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमाची प्रस्तावना महेश कणसे (मेहरबान) यांनी केले. तर आभार अजय चव्हाण यांनी मानले.