तुम्ही तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केलात, पण ..; फडणवीसांचे खळबळजनक विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिका निवडणूक हि आपली शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हो, ही तुमची शेवटचीच निवडणूक आहे असा पलटवार केला होता. त्यावर आता फडणवीसांनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर देत तुम्ही तिघांनी मिळून अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला असं खळबळजनक विधान केलं आहे. तसेच तुम्ही मला कधीच संपवू शकणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचं कालचे भाषण म्हणजे निराशेचा अरण्यरुदन होत. शिवसेनेने आमच्यासोबत निवडणूक लढवली आणि निवडून आल्यानंतर आमच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हा तुम्ही राजीनामे देऊन निवडणूक का लढली नाही असा उलट सवाल फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला.

ते पुढे म्हणाले, माझी शेवटची निवडणूक असेल असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं पण मी त्यांना एकच सांगतो. मुद्दई लाख चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में होता है. तुम्ही तिघांनी मिळून २०१९ लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रपणे अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण संपवू शकला नाहीत. यापुढेही संपवू शकत नाही.