हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Panic Attack) काही लोकांना प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची भीती वाटते. काहींना असा त्रास अगदी लहानपणीपासून असतो. एखाद काम करताना ते होईल का नाही? इथून सुरु झालेला भीतीचा हा प्रवास पॅनिक अटॅकपर्यंत कधी पोहोचतो कळत नाही. पॅनिक अटॅक हा अति काळजी किंवा भीतीमूळे येऊ शकतो. पॅनीक अटॅक अचानक येतो आणि यामुळे त्याची काही विशिष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र पॅनिक अटॅकचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. आज आपण याविषयी काही महत्वाची माहिती घेणार आहोत.
पॅनिक अटॅक येतोय हे कसे समजेल? (Panic Attack)
पॅनिक अटॅक येतेवेळी खूप घाम येतो. अचानक घसा कोरडा होतो, अंग थंड पडतं, श्वास घ्यायला त्रास होतो, काहींना चक्कर येते, पोटात किंवा छातीत कळा येतात. अनेकदा पॅनिक अटॅक येतेवेळी हात- पाय थरथर कापतात आणि प्रचंड भीती वाटू लागते.
पॅनिक अटॅकचे परिणाम
पॅनिक अटॅक येऊन गेलेल्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठे गंभीर परिणाम होऊ शकतात. यात श्वास अडकणे, मूर्च्छित होणे, हृदयाचे ठोके वाढणे, स्नायूंमध्ये क्रॅम्प्स अशा समस्या होऊ शकतात. (Panic Attack) पॅनीक अटॅक येऊन गेल्यावर हे परिणाम साधारण अर्ध्या तासापर्यंत राहतात आणि त्यानंतर व्यक्ती पुन्हा पहिल्यासारखी होते. अशा वेळी आपल्या भावनांवर आणि समस्यांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असते. ते कसे मिळवायचे? याविषयी जाणून घेऊ.
पॅनिक अटॅकच्या समस्येवर ‘असा’ करा कंट्रोल
1. सावध रहा – आपल्याला पॅनिक अटॅक येतोय हे आधी त्या व्यक्तीलाच समजते. त्यामुळे एखाद्या गंभीर प्रसंगात तटस्थ व्हा आणि सावधगिरी बाळगा. चालू विषयांचा आपल्या मनावर आणि डोक्यावर परिणाम होऊन देऊ नका. (Panic Attack) भीती आणि चिंता आपल्यापासून दूर ढकला आणि स्वतःला शांत करा.
2. आवडीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा – जर तुम्हाला पॅनिक अटॅक येतोय असे जाणवले तर आपल्याला आवडणाऱ्या वस्तू, पदार्थ, ठिकाण, माणसांचा विचार करा. समोर असणाऱ्या कोणत्याही गडद वस्तूकडे लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमचे लक्ष इतर क्रियाकलापांकडे वळेल आणि मनावर भीतीचा कब्जा होण्याआधी तुम्ही रिलॅक्स व्हाल.
3. अजिबात पळू नका – पॅनिक अटॅक येतोय असे वाटले तर आहात तिथून दूर पळू नका. (Panic Attack) उलट ज्या ठिकाणी आहात तिथेच शांत बसा. इकडे तिकडे गेल्याने आणखी घाबरायला होत आणि अनोळखी माणसांमध्ये गेल्याने परिस्थिती आणखी बिघडते. शिवाय धाप लागते आणि धडधड वाढल्याने आणखी त्रास होतो.
4. श्वासोच्छवासाचा सराव – जर तुम्हाला वरचेवर पॅनिक अटॅक येत असतील तर नियमित खोल आणि हळू श्वास घेण्याचा सर्व करा. नाकातून श्वास घ्या, १ ते ४ मोजा मग श्वास रोखून ठेवा. नंतर १ सेकंद थांबा आणि तोंडातून श्वास सोडा. अशा श्वासोच्छवासाच्या सरावाने तुमची मज्जासंस्था शांत राहील आणि पॅनिक अटॅक दरम्यान श्वास अडकणार नाही.
5. नियमित व्यायाम – जर तुम्ही पॅनिक अटॅकच्या समस्येने त्रस्त असाल तर चालणे आणि इतर हलका व्यायाम सुरू करा. यामुळे एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतील आणि मड चांगला राहण्यास मदत होईल. परिणामी पॅनिक अटॅक येण्याची समस्या हळूहळू कमी होईल. (Panic Attack)