Panjabrao Dakh | हवामान खात्याकडून आपल्याला वेळोवेळी पावसाविषयी तसेच हवामानाविषयी अंदाज येत असतात. यासोबतच हवामान खात्याचे हवामान अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असलेले पंजाबराव डख (Panjabrao Dakh) हे देखील हवामानाचा अंदाज व्यक्त करत असतात. आजपर्यंत त्यांनी अनेक वेळा हवामानाविषयी एक अंदाज लावले आहेत. आणि ते अंदाज बरोबर देखील लागलेले आहेत. ज्यामुळे आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज सांगितल्यामुळे त्यांना शेतीची आणि जमीन पेरणीची मशागत योग्य वेळेत करता येते. आणि पुढील नियोजन देखील करता येते. तसेच पाऊस कधी येणार आहे, याचा अंदाज माहित असल्यामुळे त्यांचे नुकसान टाळले जाते. परंतु यावर्षी पंजाबराव डख यांचा हवामानाचा अंदाज चुकलेला आहे. आणि त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झालेले दिसत आहे. मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी कालपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आणि यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. यासोबतच कितीतरी हेक्टर शेतजमीन ही पाण्याखाली गेलेली असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले.
पंजाबराव डख (Panjabrao Dakh) हे परभणी या जिल्ह्यात राहत आहेत. त्यांच्या गावात देखील मुसळधार पाऊस पडलेला आहे. आणि यामुळे संपूर्ण गावात पुरसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. मोठे नुकसान झालेले आहे. पावसामुळे 6 – 7 एकर मधील सोयाबीन पूर्णपणे निघून गेलेले आहे. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. आणि शेतीचे नुकसान देखील होत आहे. आता नुकसान झालेल्या या शेतीचे सरकारने ताबडतोब पाहणी करावी आणि पंचनामे करावे तसेच पूरक ग्रस्त आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. असे आव्हान पंजाबराव डख यांनी सरकारला केलेले आहे.
पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी हवामानाविषयी अंदाज व्यक्त केला होता. त्यांनी सांगितले होते की, येत्या दोन दिवसात शेतातील सगळे कामे उरकून घ्या. कारण सहा सप्टेंबर दरम्यान राज्यभरात जोरदार पाऊस कोसळणार आहे.. त्याचप्रमाणे जायकवाडी हे धरण 100% भरणार असल्याची माहिती देखील पंजाबराव डख यांनी दोन दिवसापूर्वी दिलेली होती. पंजाबराव यांचा हवामानाचा अंदाज खरा ठरला आहे. परंतु त्यांच्या शेतीतील सोयाबीनचे पीक वाहून गेल्यामुळे त्यांना खूप मोठा आर्थिक झटका बसलेला आहे.
विदर्भ मराठवाड्यात पावसाने थैमान घातलेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आहे आणि नागरिकांची तारांबळ उडालेली आहे. हवामान विभागाने विदर्भ मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे
त्यामुळे या लोकांना काळजी घेण्याची आश्वासन देखील देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आता येत्या दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.