व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

काॅलर उडवणारे शांत तर मिशिला पिळ मारणारे घरात बसलेले ; शेतकर्‍यांच्या पाठीशी कोणीच नाही

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शेतकरी अडचणीत असताना कॉलर उडवणारे शांत बसलेले आहेत तर मिशिला पिळ मारणारे घरात बसलेले आहेत असे टीकास्त्र बळीराजा संघटनेच्या पंजाबराव पाटील यांनी सोडले. कराड येथे वीज बिल निषेध मोर्चावेळी ते बोलत होते.

सातारा जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले व लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील या दोघांच्यावर पंजाबराव पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला. कराड येथे विज कनेक्शन तोडणी विरोधात मोर्चा काढण्यात आला होता‌. तसेच तहसीलदार कार्यालयासमोर वीजबिले फाडून वाढीव बिलांचा निषेध करण्यात आला. त्यावेळी पंजाबराव यांनी सातरच्या दोन्ही खासदारांवर निशाणा साधला.

पंजाबराव पाटील म्हणाले, कोरोना काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकार वीज बीलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लुट करत असून ती कुठल्याही परिस्थिती खपवून घेतली जाणार नाही. सध्या शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणीही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज बिल भरू नये असे आम्ही जाहिरपणे सांगतो. शेतकरी अडचणीत असताना अशा परिस्थितीत कॉलर उडवणारे शांत तर मिशीला पीळ देणारे घरात बसल्याची टीका पंजाबराव पाटील यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’