औरंगाबाद प्रतिनिधी । भाजपच्या बैठकीचे निमंत्रण असुन देखील पंकजा मुंडे आज औरंगाबाद शहरात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या विभागीय बैठकीला अनुपस्थित राहिल्या होत्या. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले होत. गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं भाजपशी बिनसल्याची चिन्हे त्यांच्या वागण्यातून दिसत आहे.
पंकजा मुंडे येत्या १२ तारखेला राजकारणातील आपली वाटचाल स्पष्ट करणार असल्याचं बोललं जातं असताना आजच्या अनुपस्थितीवर मात्र यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पांघरुन घालत पंकजा मुंडे यांची तब्येत ठिक नसल्याच कारण सांगितल. आता बीड़मध्ये होणा-या बैठकीला त्या हजर रहातील का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. काही दिवसापूर्वी अशाचप्रकारे उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे काही काळ अनुपस्थित राहिल्यानं भाजप नेत्यांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. त्याही वेळी एकनाथ खडसे पक्षावर नाराज असून त्यांनी बंड तर केलं नसेल न अशी शंका वर्तवली जात होती. मात्र, उशीर का होईना पण एकनाथ खडसे जळगावातील बैठकीला दाखल होत आपण पक्षाचे निष्ठावंत असून, वेळ आल्यास वेगळा विचार करावा लागेल असं म्हंटल होत. आपल्या बोलण्यातून खडसे यांनी जो संदेश पक्षाला द्यायचा होता तो दिला होता. आता पंकजा यांनी सुद्धा बैठकीला अनुपस्थित राहून काहीसा तोच मार्ग अवलंबत पक्षाला आपली नाराजी कळवली आहे असं बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी पंकजा यांची भेट घेऊन पक्षात अन्याय झाल्यास नाराज एकत्र येतीलच असं सूचक वक्तव्य केलं होत. त्यामुळं आता राज्यातील फडणवीस यांच्या नैतृत्वातील भाजपपुढे नाराज नेत्यांची फळी आता उभी राहली आहे असं चित्र निर्माण झालं आहे.