हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आले आहे. यावेळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात येईल, असे वाटले होते. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही.मात्र, आज परळी येथील गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीविषयी मोठे विधान केले आहे. “संधीसाठी रांगेत वाट पाहणं, ही माझी प्रवृत्ती नाही. मी कोणत्याही संधीची अपेक्षा करत नाही किंवा त्यासाठी प्रयत्नही करत नाही. पण विधानपरिषदेची संधी मिळाल्यास त्याचं सोनं करून दाखवू. मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार असल्याचे मुंडे यांनी म्हंटले.
परळी येथील बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यासमोर आपली भूमिका मांडली. यावेळी त्या म्हणाल्या की, आज गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतीदिन आहे. मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाले. तुमच्या बरोबर नात जन्मभर असचं राहिल.
धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम नव्हे तर मानवता धर्म. आज सकाळी टीव्ही लावून मोहन भागवत यांचे भाषण पाहात होते. हिंदू-मुस्लिम वाद आपल्याला मिटवायचं आहे. महिला विकृतीच्या द्वारे विकल्या जात आहेत. स्त्रियांची प्रतारण करणे हे छत्रपतींच्या राज्यात कधीच सहन होणार नाही.
मला माझ्या पराभवाचंही सोनं करता आले. हा पराभव मला खूप काही शिकून गेला. मला शिवराजसिंह चौहानापर्यंत पोहोचवले. मी सत्तेसाठी नाही. तर सत्यासाठी लढणार आहे, माझी राजकारणातील काही तत्वे आहेत. खे तर कर्म, धर्म एकत्र जायला हवं, असं राजकारण हवं, असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे, आता पंकजा मुंडे यांनी सूचक असे विधान केले आहे.
मला माझ्या भविष्याची चिंता नाही
आज गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, सत्य तत्व, माझ्या राजकारणाचा पाया आहे. अनेकजण मला विचारतात की आता काय? पण माझी चिंता करून नका. उद्या काय होणार? काय मिळणार? याची मला चिंता नाही. दिलेल्या संधीचे सोने करणे हे गोपीनाथ मुंडे याचे संस्कार आहेत, असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले.