बीड | जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज होत आहे. यापूर्वीच पंकजा मुंडे यांनी ट्विट करून या निवडणुकीवर भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी म्हंटले की, राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे. रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजपची सत्ता असली तरी संख्याबळाचा विचार करता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चमत्कार घडवण्याची शक्यता आहे. बीड जिल्हा परिषदेत 53 सदस्य अध्यक्षपदासाठी मतदान करणार आहेत. यात आज तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड दिसून येत आहे. भाजपची सत्ता असली तरी राज्यात झालेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत होताना दिसत आहे. त्यामुळेच पंकजा मुंडे यांनी राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही दिसत आहे असे म्हंटले. बाकी निकाल स्पष्ट आहेत असे म्हणून त्यांनी एक प्रकारे पराभवच स्वीकारला आहे. कोल्हापूर, नाशिक नंतर आता बीड जिल्हा परिषदेतूनही भाजपची सत्ता जाणार असल्याच दिसत आहे.
मागच्या वेळेस राष्ट्रवादीचे बहुमत असताना बंडखोरीचा त्यांना फटका बसला आणि शिवसेनेच्या जोरावर भाजपने सत्ता मिळवली होती. यावेळेस मात्र शिवसेना भाजपला साथ देणार नाही असे चित्र आहे.
राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली ..लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 4, 2020
महाराष्ट्रच्या कानाकोपर्यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News