तुमची लेकरं परदेशी शाळेत अन आमची ऊसाच्या फडात; व्हायरल पोस्टवर पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या अमेरिकेत आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी त्याला हॉस्टेल वर सोडण्यासाठी बोस्टन येथे गेल्या आहेत. यावरून सोशल मीडियावर एका लक्ष्मण खेडकर या शिक्षकानी पोस्ट करत ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मांडला. पंकजाताई, तुमची मुले परदेशात शाळेत आणि आमची कायम उसाच्या फडात??? असा सवाल त्यांनी केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील पोस्ट करत ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेत असल्याचं सांगितले.

काय आहे लक्ष्मण खेडकर यांची पोस्ट-

मा.पंकजा मुंडे ह्या स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कन्या , ऊसतोड कामगारांच्या कार्यक्षम आणि संघर्षशील नेत्या, त्यांनी त्यांचा मुलगा परदेशात बोस्टनला शिक्षणासाठी पाठवलाय असी बातमी सोशल मिडीयावर वाचली, आनंद वाटला, त्या बद्दल आमच काहीच म्हणणं नाहीय, त्यासाठी एक जबाबदार आई म्हणून पंकजाताई तुमचं खुप खुप अभिनंदन आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा मुलगा आर्यमनला ही मनापासून शुभेच्छा,

पंकजाताई ,आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजूरांच्या नेत्या या नात्याने, ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजूरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का ते ही जरा पाहा,लोकांची मुंडके मोडून स्वत:ची घर भरणा-या बरबटलेल्या बाकीच्या बोलघेवड्या पुढा-यांकडून आम्हाला अपेक्षा नाहीयेत, कसयं ? राज्याची नसली तरी केंद्रातली सत्ता तुमच्या हातात आहे,तुमच्या लहान भगिनी मा. प्रितमताई मुंडे ह्या खासदार आहेत तुम्ही स्वतः बहुमतात सत्तेत असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहात , करा काही तरी, नाही तर असं नको व्हायला की तुमची लेकरं परदेशात शाळेत अन आमची कायम ऊसाच्या फडात..

https://www.facebook.com/147552098663693/posts/4321858051233056/

पंकजा मुंडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली –

जरूर लक्ष्मण मी ते करेन … आम्ही पहिल्यांदा अमेरीका इथे आलो ते ही ऊस तोडणारी विमल (तेव्हा ते ऊसतोड कामगार होते) आणि तश्याच लढण्यास तयार राहून यश मिळवणार्‍या सख्या घेऊन… आता त्या योजनेचे चित्र बदलले असावे मी incharge नाही राहिले .. प्रत्येकाची लढाई भिन्न असते कोणाची जगण्याची आणि कोणाची जगवण्याची .. मी अनेक ऊसतोड मजुरांना त्यांच्या मुलाच्या शिक्षण घेण्यासाठी मदत करत होते, करते आणि करत राहणार.. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मधून गरजूंच्या शिक्षणाला मदत,आपत्ती ग्रस्त संसाराला मदत, रुग्णांच्या ईलाज साठी मदत, covid 19 मध्ये covid centre, पूर ग्रस्त लोकांसाठी मदत फेरी, हे सर्व वंचित आणि शोषित यांच्या साठी करणे म्हणजे जगणे आहे..आणि कष्ट आणि मेरिट यांची सांगड घातल्या शिवाय काहीही नाही होऊ शकत.. अस पंकजा मुंडे यांनी म्हंटल.

Leave a Comment