हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेत्या पंकजा मुंडे या अचानक दिल्लीला रवाना झाल्यानंतर तर्क वितर्काना उधाण आले आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आलं नसून पंकजा नाराज असल्याचं बोललं जातं होत. त्या पार्श्वभूमीवर पंकजा यांची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे.
प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद नाकारल्यानंतर पंकजा समर्थकांनी अचानक राजीनामे दिल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच पंकजा मुंडे यांना अचानक दिल्लीत बोलावण्यात आल्याने अधिकच खळबळ उडाली आहे. दिल्लीत त्या पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी मी नाराज नसल्याचे माध्यमांसमोर सांगितले. पण पंकजा मुंडे खरंच नाराज नाहीत की त्या पक्षश्रेष्ठींपुढे आपली नाराजी व्यक्त करणार हे पाहावे लागेल.