मी एक अभ्यासक, OBCची दिशाभूल,बुद्धीभेद खपवून घेणार नाही; हरी नरकेंचा फडणवीसांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जेष्ठ विचारवंत हरी नरके यांच्यात आरोप – प्रत्यारोप होत आहेत. काही दिवसांपूर्वी हरी नरके यांनी ओबीसी आरक्षणावरून काही मुद्दे उपस्थित करून फडणवीसांना 9 सवाल केले होते. दरम्यान फडणवीसांनी मात्र हरी नरके हे राष्ट्रवादीचे प्रवक्तेच जास्त आहेत अस म्हणत त्यांना उत्तर देणे टाळले होते.

दरम्यान हरी नरके यांनी आज पुन्हा एकदा ट्विट करत फडणवीसांना खडेबोल सुनावले आहेत. हरी नरके म्हणाले, मी एक अभ्यासक आहे, OBC ची दिशाभूल, बुद्धीभेद खपवून घेणार नाही अशा शब्दांत हरी नरके यांनी सुनावलं.

 

यापुढे राजकारणाच्या नावाखाली, राजकीय कोंबडे झुंजवण्याच्या नादापायी फसवणूक सहन केली जाणार नाही. म्हणून बोलतोय. प्रत्येक OBC/VJ/NT/SBCने बोललं पाहिजे. या पुढे BCC थेट बोलेल. स्वाभिमानाने, खड्या आवाजात बोलेल. कोणीही रोखू शकणार नाही. असेही हरी नरके म्हणाले.

Leave a Comment