लपून वार करू नका, समोरून वार करा – पंकजा मुंढे

1
71
Pankaja Mundhe
Pankaja Mundhe
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रतिनिधी | ‘वाघाच्या पोटी वाघिणच जन्माला येते’ असे म्हणत दसरा मेळाव्याला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी सुरवात केली. संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भगवानबाबांच्या २५ फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पणही झाले.

मेळाव्याला उत्तर देतांना मंत्री पंकजा म्हणाल्या, मी आणि आमचे सरकार मराठवाड्याकडे दुर्लक्ष करणार नाही. माझ्या कारखान्याच्या शेतकऱ्यांना FRP साठी पैसे नव्हते, तेव्हा माझ्या आईने स्वत:ची जमीन गहाण ठेवून पैसे दिले. तोडीपाणी करण्याची काम आम्ही करत नाही. सत्तेत असो किंवा विरोधात आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचं काम केलं आणि करत राहु. आम्ही करमणुकीचे कार्यक्रम करत नाही. ‘लपून वार काय करता, समोरून वार करा’. मी कोणालाच घाबरत नाही, ना मला कोणत्याही पदाची लालसा नाही. मी तुमच्यामुळे मंत्री झालेय आणि महाराष्ट्रात २०१९ ला भाजपाच्या विजयाचीच घंटा वाजणारच. मुंडेसाहेब किंगमेकर होते, त्याच जागी जनतेने मला बसवलं आहे.

या दसरा मेळाव्याला न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती. अनेक महंत, संत यंदा व्यासपीठावर उपस्तिथ होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here