परभणीत महामार्गावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाने चिरडले : दोघांचा जागीच मृत्यु

0
56
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी | मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग 222 वर पाथरी-पोखर्णी दरम्यान केकरजवळा (ता. मानवत) गावाजवळ आज दि. 12 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. अपघातात गावचे पोलीस पाटील अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत .

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पहाटे माॅंर्निग वाॅकला काहीजण गेले होते. यावेळी पाथरी पोखर्णी महामार्ग 222 वर परभणी कडून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने केकरजवळा (ता. मानवत) येथील मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या चौघांजणांना चिरडले. यावेळी लोकांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी केलेली होती.

अज्ञात वाहनाच्या धडकेत केकरजवळाचे पोलीस पाटील उत्तमराव नामदेव लाडाने (वय- 52), आत्माराम भीमराव लाडाने (वय -42 ) यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात नंदकिशोर साहेबराव लाडाने (वय- 50), राधेश्याम रामभाऊ लाडाने (वय- 48) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत . जखमींना परभणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here