खळबळजनक !! धावत्या लक्झरी बसने घेतला पेट ; शॉर्टसर्किटने लागली आग ?

परभणी  प्रतिनिधी । गजानन घुंबरे 

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात रस्त्यावरून जात असलेल्या एका लक्झरी बसने ८ जानेवारी रोजी सकाळी अचानक पेट घेतल्याची घटना घडली असून यामध्ये मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुठलीही मनुष्यहानी झाली नाही .

जिंतूर तालुक्यातील चारठाणा गावा जवळ सेलू जिंतूर या रस्त्यावर सकाळी लक्झरी बस ला आग लागून बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे .लागलेली आग एवढी भीषण होती की अवघ्या काही वेळा मध्ये संपूर्ण बसने पेट घेतला होता .सुदैवाने या बस मध्ये प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांना इजा झालेली नाही .घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आगीचे लोट पाहायला मिळाले .बसला लागलेल्या आगीमुळे रस्त्यावर वाहतूक थोड्यावेळासाठी थांबले होती .दरम्यान आग विझवण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने बस जळून खाक झाली आहे .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like