परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
महाराष्ट्रात कोरोना विषाणूने हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केलीय. दुसऱ्या बाजूला कोरणा संसर्ग प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने देशभरामध्ये लॉक डाऊन घोषित केला आहे. या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची मात्र तारांबळ उडतांना दिसतेय. अशा संकटवेळी गरजु आणि मजूर व्यक्ती उपाशी पोटी झोपू नयेत म्हणून सामाजिक बांधिलकी जपणारे व जाण असणारे अनेक मदतीचे हात ही समोर येऊ लागले आहेत.
परभणी जिल्हातील पाथरी शहरातील परिवर्तन विकास मित्र मंडळ चे संस्थापक अध्यक्ष सईद खान उर्फ गब्बर खान, आसेफ खान, एडहॊकेट मेहेराज खान यांच्या वतीने गरजू आणि हातावर पोट असणाऱ्या गरीब पाच हजार कुटुंबाना गुरुवार दि १६ एप्रिल पासून गहू, तांदूळ, तेल, साबण, साखर, चहापत्ती, तेल असे जीवनावश्यक वस्तू पैकींग किट वाटप करण्याची सुरुवात करण्यात आली आहे.
शहरी व ग्रामीण भागातील गरजूंपर्यंत ही मदत घरपोच पोहोचवली जाणार आहे. आज सोशल डिस्टन्ससिंग ठेवत, प्राथमिक स्वरूपामध्ये पाथरीचे तहसीलदार कांगणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधगिरे यांच्या हस्ते या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पुढील दीड महिन्यापर्यंत हा उपक्रम चालणार आहे अशी माहिती परिवर्तन विकास मंचच्यावतीने देण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”